Author: अनंत पांगारकर

शनिवार ३१ ऑगस्ट  शिर्डी – सध्या नवीन कृषी तंत्रज्ञान विकसित होत असून कृषी क्षेत्रातील उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी तरुणांनी नवीन कृषी तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. प्रवरा कृषी शास्त्र संस्था (लोणी), कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर (पायरेन्स) आणि शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने लोणी येथे आयोजित शिवार फेरी व कृषी प्रदर्शनाप्रसंगी ते बोलत होते. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे यांच्या १२४ व्या जयंती व शेतकरी दिनानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिवार फेरी व कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती…

Read More

शनिवार, दि. ३१ऑगस्ट  पालघर : १३ दिवस झाले तरी गावाकडील आई वडील आणि बहिणीची संपर्क झाला नाही. त्यामुळे मनात हजारो शंका निर्माण होत चलबिचल सुरू झाली आणि त्याने गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. गावाकडील घरी जाऊन दरवाजा उघडून बघतो तर काय, घरात पसरलेल्या प्रचंड दुर्गंधीत त्याला आई-वडिल आणि बहिणीचे मृतदेह कुजलेल्या स्थितीत दिसून आले. समोरच दृश्य बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. राज्यात दररोज येथे धक्कादायक घटना समोर येत असतानाच या घटनेत आणखी एका घटनेची भर पडली आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील नेहरोली गावात एकाच कुटुंबातील तीन जणांचे मृतदेह आढळून आले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात…

Read More

शनिवार, ३१ ऑगस्ट  नागपूर – भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणय फुके आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात नागपूरच्या अंबाझरी पोलीस ठाण्यात कौटुंबिक छळवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार फुके यांच्या मृत भावाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार परिणय फुके, फुके यांचे वडील रमेश गोविंदराव फुके (वय ७२), आई रमा (वय ६७), नितीन फुके (वय ४०), पत्नी डॉक्टर परिणीता फुके (वय ४१) यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फुके यांचे मृत भाऊ संकेत फुके यांची पत्नी प्रिया यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार संकेत फुके यांना किडनीचा आजार होता. लग्नाच्या वेळी फुके…

Read More

शनिवार, ३१ ऑगस्ट  शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एका कार्यक्रमाच्या निमित्ताने संगमनेरमध्ये येत असलेल्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंदोबस्तासाठीच्या ताफ्यातील पोलीस जीपला अपघात झाला. अपघातग्रस्त जीपने अन्य काही वाहनांना धडक दिल्याने या वाहनांचेदेखील नुकसान झाले तर अपघातात संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक सोनल फडोळ यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल विजय आगलावे जखमी झाले आहे. अपघातातील जखमींवर संगमनेरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार धीरज मांजरे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन उपस्थित होते. महसूल मंत्री राधाकृष्ण…

Read More

मेष – आज तुमच्याकडून होणारे काम कौतुकास पात्र ठरेल. धनस्थानातील गुरु हर्षल युतीमुळे आर्थिक समस्या सुटेल. वृषभ –  आजचा दिवस खर्चिक असेल. मुबलक पैसा हाती येईल परंतु खर्च सुद्धा मोठ्या प्रमाणात होईल. मिथुन –  आज आपल्या संतापावर नियंत्रण ठेवा. आर्थिक घडी विस्कटत चालल्याने आपली चिडचिड वाढेल. सांभाळा, मित्र धरून ठेवा. कर्क – नाही म्हणायला शिका, म्हणजे फसगत होणार नाही. आज वादावादी केल्याशिवाय पैसा मिळणार नाही. सिंह – प्रवास करू नका, खर्च वाढेल. जोडीदार संयमाची भूमिका बजावेल त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. कन्या –  कोर्ट कचेरीच्या खेपा वाढविणारा दिवस. मित्रमंडळी पासून दूर राहा. तुळ – सप्तमेश शुक्र केतूच्या युतीमध्ये आहे. आपल्या…

Read More

शनिवार, दि.३१ ऑगस्ट  अहमदनगर – श्रीगोंदा तहसील कार्यालयाने जप्त केलेल्या गहू आणि तांदुळाचा जाहीर लिलाव शासकीय धान्य गोदाम पेडगाव रोड, श्रीगोंदा येथे ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत करण्यात येणार आहे. लिलावात सहभागी होण्याकरिता १० हजार रूपये अनामत रक्कम भरणे बंधनकारक राहील. लिलावाबाबतच्या सर्व अटी व नियम लिलावाच्या दिवशी लिलावाच्या ठिकाणी पाहावयास मिळतील. लिलाव देण्याचा अथवा नाकारण्याचा पूर्ण अधिकार तहसील कार्यालयाने राखून ठेवला आहे. लिलावात सहभाग घेण्याकरीता इच्छुक भुसार माल खरेदी विक्री वैध परवानाधारकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्रीगोंद्याच्या तहसीलदारांनी केले आहे.

Read More

शुक्रवार, दि. ३० ऑगस्ट  अहमदनगर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण सुधारित कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय तसेच संबंधित मतदान केंद्रांवर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवडणूक प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील महिला मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे. जिल्हा निवडणूक प्रशासनाने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे मतदार यादीत ५३ हजार ८३० मतदारांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे वाढ झालेल्या मतदारांमध्ये महिला मतदारांची संख्या ३३ हजार ५१४ पेक्षा अधिक आहे. विशेष संक्षिप्त पुनरिक्षण सुधारित कार्यक्रमाआधी…

Read More

शुक्रवार, ३० ऑगस्ट  राज्य सरकार कर्जाच्या डोंगराखाली असल्याचे स्पष्ट करत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’सह मोफत लाभ अदा करणाऱ्या विविध योजना विरोधात सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. राज्य सरकार कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहे. २०२२-२३ मध्ये राज्यावर ६ लाख २९ हजार २३५ कोटीचे कर्ज होते. २०२३-२४ मध्ये या कर्जाच्या रकमेत १३ टक्के वाढ होऊन ते ७ लाख ११ हजार २७८ कोटी रुपयांवर गेले. २०२४-२५ मध्ये कर्जाची ही रक्कम ७ लाख ८२ हजार कोटींवर जाऊ शकते, असे स्पष्ट करत याचिकाकर्त्याने राज्याची बिकट झालेली आर्थिक परिस्थिती लक्षात घेता अशा योजना संदर्भातील निर्णय असंवैधानिक, मनमानी व तर्कहीन घोषित…

Read More

शुक्रवार, ३० ऑगस्ट संगमनेर : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगाव येथील तलाठी संतोष देवराम पवार यांची तलाठी कार्यालयात निघृणपणे हत्या करण्यात आली. या हल्ल्याचा महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या संगमनेर शाखेच्यावतीने गुरुवारी (२९ ऑगस्ट) काम बंद ठेवत निषेध करण्यात आला. संघटनेच्यावतीने तहसीलदार धीरज मांजरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी संगमनेर शाखेचे अध्यक्ष गणेश शिंदे, कार्याध्यक्षा योगिता शिंदे, उपाध्यक्ष अनिल कुंदेकर, सरचिटणीस बाबासाहेब नरवडे, सह सरचिटणीस संग्राम देशमुख, खजिनदार रोहिणी कोकाटे, हिशेब तपासणीस भीमराज काकड, संघटक प्रशांत हासे, सदस्य पोमल तोरणे, विक्रम ओतारी, अनिल आव्हाड, भालचंद्र वैद्य, आर. एम. मुळे, संतोष लंके, डी. बी. भालचिम, डी. ए. शेख, महिला प्रतिनिधी मंगल…

Read More

असा असेल आजचा दिवस मेष – मेष राशीचे लोक प्रिय व्यक्तीशी भांडण करू शकतात. रागावर नियंत्रण ठेवा. आज तुम्हाला व्यवसायात आर्थिक लाभ होऊ शकतो. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ राहील. जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्यासाठी नाते येऊ शकते. वृषभ – वृषभ राशीच्या लोकांना लवकरच नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. आज, आपण बऱ्याच काळापासून आपली नोकरी बदलण्याचा प्रयत्न करीत होते, ती संधी आज आहे. आज आपण आपल्या व्यवसायात नवीन योजना लागू करू शकता, जी आपल्याला भविष्यात उत्कृष्ट परिणाम देईल. मिथुन – मिथुन राशीच्या लोकांसाठी आज अति गोड लोकांपासून सावध राहा, हे लोक तुमची फसवणूक करू शकतात. कोणत्याही भांडणापासून स्वतःला दूर ठेवा.…

Read More