Author: अनंत पांगारकर

मुंबई – महाराष्ट्र संवाद न्यूज काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात असून योग्य वेळ आल्यानंतर हे सर्व आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना पेव फुटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. या चर्चांवर राजकीय वातावरण तापलेल असतानाच फडणवीस यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. फडणवीस मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. फडणवीस म्हणाले, अनेक आमदार आमच्या संपर्कात असतात. आपल्या आत्मविश्वासामुळे अनेक जण संपर्कात आहेत. गेल्या पाच वर्षात अनेक जण आमच्याकडे भाजपात आले. संपर्काच्या नात्यांमध्ये…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज | अनंत पांगारकर संगमनेर शहरातील चार मोठ्या बँकांना बनावट सोन्याच्या दागिन्यांच्या आधारे तब्बल सहा कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश शहाणे आणि कर्जदारांचे प्रकरण ताजे असतानाच आता मनोली येथील दोघा भावंडांनी शहरातील एका पतसंस्थेच्या नावाने बनावट कागदपत्राच्या आधारे ७/१२ उताऱ्यावरील कर्जाचा बोजा परस्पर कमी करून पतसंस्थेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस ठाण्यात या संदर्भात श्री. कुलस्वामीनी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमीटेड या पतसंस्थेच्या संगमनेर शाखेचे व्यवस्थापक संदीप तानाजी संते (रा. नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनील भास्कर शिंदे व सहकर्जदार संदीप भास्कर शिंदे (दोघे रा. मनोली, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) या दोघां…

Read More

मुंबई| महाराष्ट्र संवाद न्यूज गेल्या काही दिवसापासून रखडलेल्या युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीला अखेर मुहूर्त लाभला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिर्डी लोकसभेतील युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या असून जिल्हा युवा अधिकारीपदी अमित रामकिसन चव्हाण (संगमनेर, अकोले, राहाता) यांची फेरनिवड करण्यात आली. युवा सेनेच्या नव्या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून, सहा महिन्यांनंतर पदाधिकार्‍यांचे काम बघून त्या कायम करण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे. युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस पाठविलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली असून पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’मधून या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. युवा सेनेचे नवे पदाधिकारी पुढीलप्रमाणे…

Read More

अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज वरदहस्त आणि आर्थिक हितसंबंधांमुळे सामान्य नागरिकांच्या जीवावर बेतलेल्या वाळू तस्करीचा विषय गंभीर बनल्याने ती थांबविण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नसताना मंगळवारी सकाळी प्रवरा नदी काठावर मॉर्निंग वॉक करणारे पर्यावरण प्रेमी अचानक आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. पर्यावरण प्रेमींनी आंदोलन करताना तस्करांच्या वाळूने भरलेल्या शेकडो गोण्या पुन्हा नदीपात्रात रिकाम्या केल्या. इतिहासात हा प्रकार प्रथमत:च घडल्याने राजरोसपणे नदीपात्रातून सुरू असलेली वाळू तस्करी रोखण्यासाठी या पर्यावरण प्रेमींनी केलेले आंदोलन चर्चेचा विषय ठरले आहे. प्रवरा, मुळा, म्हाळुंगी अशा नद्यांचा नदी काठ लाभलेल्या संगमनेर शहर आणि तालुक्यातून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत असते. सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी या वाळू तस्करीमध्ये गुंतल्याने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज | संगमनेर यापूर्वी संगमनेर तालुक्यात गारपीट आणि अतिवृष्टीने नूकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने ६ कोटी रुपयांची मदत उपलब्ध करून दिली आहे. नव्याने झालेल्या नूकसानीची भरपाई देण्यास शासन कुठेही कमी पडणार नाही. या संकटात सरकार तुमच्या सोबत असल्याची ग्वाही महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. महसूलमंत्री विखे पाटील यांनी मंगळवारी तालुक्यातील पश्चिम भागातील गावात अतिवृष्टी आणि गारपीटीने नूकसान झालेल्या गावात जावून शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या.अतिवृष्टीने प्रत्येक पीकाचे किती क्षेत्र बाधीत झाले याची आकडेवारी त्यांनी महसूल आणि कृषी विभागाकडून जाणून घेतली. तसेच पंचानाम्याचा आढावाही घेतला. मागील दोन दिवसांपासून तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या अतिवृष्टीने द्राक्ष डाळींब…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज वाढलेली महागाई, शेतमालाचे पडलेले भाव अशा कठीण परिस्थितीतून मोठी गुंतवणूक करत फुलवलेल्या शेतीचे अवकाळी पाऊस व गारपिटीने मोठे नुकसान झाले आहे. सरकारने घोषणा न करता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने जास्तीत जास्त मदत द्यावी, अशी आग्रही मागणी माजी कृषी व महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. आमदार थोरात व डॉ. जयश्री थोरात यांनी तालुक्यातील सावरचोळ, निमगाव खुर्द, निमगाव बुद्रुक, पेमगिरी, नांदुरी दुमाला, मेंगाळवाडी येथील गारपीट व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी अनिल नागणे, कृषी अधिकारी प्रवीण गोसावी आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. थोरात यांनी नुकसानग्रस्त…

Read More

शेत पीके व पडझड झालेल्या घरांची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी महाराष्ट्र संवाद न्यूज | अहमदनगर पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात रविवारी (९ एप्रिल) वादळी वारा, गारपीटीसह झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली‌. “एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी युध्दपातळीवर पंचनामे करण्यात येऊन एका आठवड्यात शेतकऱ्यांचा खात्यात मदत वितरित करण्यात येईल.” अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वनकुटे गावातील शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला‌. त्यांच्या अडचणी जाणून‌ घेत पडझड झालेल्या घरांची तात्पुरत्या स्वरूपात आजच उभारणी‌ करण्याचे आदेश दिले. वनकुटेमधील पडझळ‌ झालेल्या‌ २२ कुटुंबाना शबरी घरकुल योजनेमधून तात्काळ पक्के घरकुले उपलब्ध करून देण्याच्या सूचना…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायर, निमा संगमनेर आणि माधवबाग आयुर्वेद कार्डियाक क्लिनिक, संगमनेर संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिनानिमित्त “विन डायबेटीस भव्य वाकेथॉन (चालण्याची स्पर्धा) स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले होते. लहानग्यांपासून तर अगदी वयोवृद्धांपर्यंत सर्वांनीच या स्पर्धेत सहभाग घेऊन लायन्स क्लब राबवित असलेल्या विन डायबेटीज या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. वैज्ञानिक शास्त्रानुसार दैनंदिन ३ किलोमीटर चालल्याने मधुमेह असलेले रूग्ण त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू शकतात. समाजामध्ये चालण्याच्या व्यायामविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वय ३० वर्ष ते ९२ वर्ष वय असलेले स्पर्धेक सहभागी झाले होते. ५०० पेक्षा जास्त स्पर्धकांनी या…

Read More

विसावं शतक मागे टाकून 21 व्या शतकाच्या सुरुवातीलाच माहिती तंत्रज्ञान उदयास आले आणि मानवी जीवनाची स्पर्धा तंत्रज्ञानाशी सुरू झाली. त्यामुळे स्पर्धा आणि गतीच्या विळख्यात मानवी जीवन अडकले. अनेक बदलांना सामोरे जात संभ्रमांच्या वर्तमानातून मार्ग काढत संघर्ष आणि अनेक स्पर्धांचं आव्हान पुढच्या पिढ्यांना झेलायची आहेत. खरंतर अनेक स्वप्न घेऊन आपण एकविसाव्या शतकात प्रवेशिलो. परंतु माध्यमक्रांतीमुळे संधीसोबत प्रचंड अशा संघर्ष आणि स्पर्धेच्या युगात त्या स्वप्नांची पडझड होतांनाचा हा काळ म्हणजे कोलाज ही कादंबरी होय. डॉ. अशोक लिंबेकर यांनी आपल्या सभोवतालचा काळ जोखताना भूत, वर्तमान आणि भविष्य या तीनही काळांचा स्वर एकत्र करत समाजवास्तवाचा आरसा आजच्या तरुणांसमोर ठेवला आहे. कादंबरीतील नायक हा ग्रामीण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ○ कृषी कमी पावसाच्या प्रदेशामध्ये पाण्याच्या प्रत्येक थेंबास महत्व आहे. त्यामुळे या प्रदेशामध्ये पाटाद्वारे पाणी देणे शक्य नसते. अशा प्रदेशामध्ये सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून पिकांना पाण्याची उपलब्धता दिल्यास उत्पन्नामध्येही वाढ होते आणि पाण्याचीही बचत होते. याच उद्देशाने सूक्ष्म सिंचन म्हणजेच ठिबक सिंचनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेती क्षेत्राला पाण्याची उपलब्धता देण्याच्या उद्देशानेच ‘प्रती थेंब अधिक पीक योजना’ राबविण्यात येत आहे. पाण्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाखालील क्षेत्र वाढविणे. अचूक पाणी व्यवस्थापनाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे. पिकांची व्याप्ती वाढविणे, सूक्ष्म सिंचन पद्धतीच्या वापरास चालना देणे. कृषी आणि फलोत्पादन विकासासाठी सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाचा प्रचार, विकास आणि प्रसार करणे. कुशल आणि अकुशल व्यक्तींसाठी…

Read More