Author: अनंत पांगारकर

संगमनेर – महाराष्ट्रातील अनेक सहकारी संस्था वाईट अवस्थेत असताना, संगमनेरमधील सहकार मात्र उत्कर्ष करत आहे. या यशाचे श्रेय राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टी आणि कठोर परिश्रमाला असून थोरात यांनी राजकारणापलीकडे जाऊन लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी सहकाराला प्राधान्य दिले. थोरात यांनी यापुढील काळात राज्यातील सहकारी चळवळीला दिशा देण्यासाठी नेतृत्व म्हणून राज्य पातळीवर काम करावे असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 58 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत तांबे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे, बाजीराव खेमनर, माधवराव कानवडे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कारखान्याचे…

Read More

पुणे –  मराठा साम्राज्याची एकेकाळची राजधानी असलेल्या सातारा शहरात यंदा ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या शतकाच्या उंबरठ्यावरील संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची निवड झाली आहे.  पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात झालेल्या महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. बैठकीला महामंडळाच्या घटक संस्थांसह संलग्न संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संमेलनाध्यक्ष पदासाठी अनेक नावांवर चर्चा झाली. मात्र, विश्वास पाटील यांच्या योगदानाचा आणि मराठी साहित्यासाठी त्यांनी केलेल्या भरीव कामाचा विचार करून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.  ऐतिहासिक कादंबरी लेखनात त्यांचा हातखंडा मानला जातो. त्यांची ‘पानिपत’ ही कादंबरी मराठी साहित्यातील एक मैलाचा दगड मानली जाते.…

Read More

संगमनेर – वारकरी संप्रदायात पांढरे कपडे घालून काही ‘मंबाजी’ घुसले असून, तुकाराम महाराजांना त्रास देणारी ही प्रवृत्ती आजही शिल्लक आहे. अशा ढोंगी लोकांना शोधून संप्रदायाबाहेर काढले पाहिजे, असे परखड मत संगमनेर येथील राज्यस्तरीय वारकरी चिंतन परिषदेत ज्येष्ठ कीर्तनकारांनी व्यक्त केले. यासोबतच, संयोजकांनी कीर्तनकारांसाठी आचारसंहिता तयार करून तिचे पालन करणे अनिवार्य करावे, असे आवाहनही या वेळी करण्यात आले. सकल वारकरी समाजाच्या वतीने संगमनेर येथील विठ्ठल मंदिर ऑफ नामदेव शिंपी समाज येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे मठाधिपती भारत महाराज जाधव होते, तर ज्येष्ठ कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी उद्घाटक म्हणून मार्गदर्शन केले.…

Read More

संगमनेर: ज्यांनी काहीच केलं नाही असे लोक सध्या जलदूत व्हायला निघाले आहेत, ‘वांझोटीला पोरं होईल पण निळवंडे होणार नाही’ असं म्हणत हिणवणाऱ्या विरोधकांवर राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी जोरदार प्रत्युत्तर देत हल्लाबोल केला. संगमनेर तालुक्याचा गौरवशाली इतिहास आणि विकासाचा वारसा जपण्याची जबाबदारी नवीन पिढीची आहे, असे सांगताना या तालुक्यातील विकासाचा इतिहास देखील विसरता कामा नये असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. संगमनेरमधील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना त्यांनी हे परखड मत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर कारखान्याचे माजी अध्यक्ष, साखर संघाचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार…

Read More

प्रवीण पुरो नेपाळमध्ये सुरू असलेलं आंदोलन नक्की कशासाठी, याचा उलगडा करण्याची तयारी भारतीय माध्यमांची नाही. त्यांना वाटतं हा केवळ सोशल मिडियावरील बंदीचा मामला आहे. या आंदोलनाची डोळसपणे चिकित्सा केली तर एक लक्षात येईल, की आमचे सत्ताधारी शहाणे झाले नाही तर हे आंदोलन भारताची जागा घेऊ शकतं. भारतीय माध्यमं हे सत्ताधार्‍यांना सांगायच्या भानगडीत पडत नाहीत. यामुळे धृतराष्ट्राचं आंधळंपण सत्तेच्या डोळ्यावर आलं आहे. आपणच सत्यवान असल्याचा त्यांना भास झालाय. नेपाळच्या सत्तेलाही असंच वाटत होतं. नेपाळमध्ये सुरू असलेल्या धुमश्‍चक्रीला भ्रष्टाचारात माखलेली तिथली एकूणच व्यवस्था कारण आहे. या व्यवस्थेने डोळे उघडे ठेवून कारभार केला असता, भ्रष्ट मंत्र्यांना ताळ्यावर आणलं असतं तर उद्रेकाची ही वेळ…

Read More

मेष: आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. कुटुंबातील सदस्यांसोबत वाद टाळा. कामाच्या ठिकाणी नवीन योजनांवर लक्ष केंद्रित करू शकता. वृषभ: आजचा दिवस तुमच्यासाठी फायद्याचा आहे. तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहाल. कामात नवीन सहयोगी मिळतील, ज्यामुळे तुमची अनेक कामे सोपी होतील. मिथुन: आजचा दिवस थोडा कष्टदायक असू शकतो, त्यामुळे प्रत्येक काम काळजीपूर्वक करा. कुटुंबीय आणि मुलांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. कर्क: आज तुमच्या कल्पनाशक्तीत आणि कलात्मकतेत काहीशी कमतरता जाणवेल. त्यामुळे निर्णय घेण्यात अडचणी येऊ शकतात. सिंह: थोड्या अडचणी असूनही तुमचे प्रेमजीवन चांगले राहील. तुम्ही तुमच्या जोडीदाराला आनंदी ठेवण्यात यशस्वी व्हाल. कन्या: नवीन कल्पना फलदायी ठरतील. तुमच्या आत्मविश्वासाचा उपयोग करून नवीन लोकांशी संपर्क…

Read More

संगमनेर – संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे सध्याच्या परिस्थितीत खराखोटा निवाडा करण्यासाठी वारकरी संत विचारावर चिंतन होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर भागवत वारकरी चिंतन परिषदेचे संगमनेरमध्ये आयोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. रविवारी (१४ सप्टेंबर) सकाळी १० वाजता रंगारगल्लीतील विठ्ठल मंदिर ऑफ नामदेव शिंपी समाजाच्या जनसखा समाज भवनामध्ये आयोजित या चिंतन परिषदेचे उद्घाटन जेष्ठ कीर्तनकार ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी पंढरपूरच्या संत कैकाडी महाराजांचे उत्तर अधिकारी ह. भ. प. भारत जाधव महाराज असतील. सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात सकाळी ११ वाजता वारकरी संप्रदाय काल आज आणि उद्या या विषयावर…

Read More

संगमनेर –  संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी राज्यात एक अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते. यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केलेली बाजार समितीची ही संकल्पना संगमनेरमध्ये यशस्वीरित्या राबवली गेली, यामुळे ती जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आणि राज्यातही सर्वात पुढे असल्याचे प्रतिपादन काँग्रेसची ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. ते बाजार समितीच्या 21 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. या सभेला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, बाजीराव खेमनर, माधवराव कानवडे, दुर्गाताई तांबे, पांडुरंग घुले आदी मान्यवर उपस्थित होते.  थोरात म्हणाले, बाजार समितीने शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा पुरवल्या आहेत. वडगाव पान, साकुर, आंबी…

Read More

संगमनेर –  पैगंबर मोहम्मद यांच्या १५०० व्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून संगमनेर शहरात ‘ईद-ए-मिलादुन्नबी’ निमित्त ‘सर्वधर्म समभाव’ जपणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा विशेष सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशन, सर्वांसाठी मानवाधिकार आणि ‘न्यूज एनएमपी मराठी’ वृत्तवाहिनीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यात पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणीनुसार समाजात चांगले कार्य करणाऱ्या संस्थांना त्यांच्या योगदानाबद्दल ‘सन्मानचिन्ह’ आणि ‘कृतज्ञता सन्मानपत्र’ देऊन गौरवण्यात आले. यात एनआरसीसी ग्रुप मंत्री फाउंडेशन, एकता नगर सोशल फाउंडेशन, ह्युमन रिलिफ अल्पसंख्याक फाउंडेशन, मोगलपुरा मस्जिद ट्रस्ट, गवंडीपुरा मस्जिद ट्रस्ट याचबरोबर, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण नारायणे (शिवकला पोहे सेंटर) आणि एस.डी.पी.आय…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील जमीन विक्रीमध्ये २० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सोनेवाडी येथील पोलिस पाटील दगू मोहन गुडघे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेशन दुकानदार किरण सीताराम डांगे (वय ४२, रा. जोशीनगर, कोपरगाव) यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात ही फिर्याद दाखल केली आहे. पोलिस पाटलाने आधीच तीन वेगवेगळ्या व्यक्तींना विकलेली ५० गुंठे जमीन पुन्हा डांगे यांना विकण्याचा प्रयत्न केला. या व्यवहारात त्याने डांगे यांच्याकडून १५ लाख रुपये धनादेशाद्वारे आणि ५ लाख रुपये रोख असे एकूण २० लाख रुपये घेतले. मात्र, ठरल्याप्रमाणे जमिनीचा ताबा न दिल्याने आणि खरेदीची कागदपत्रे न मिळाल्याने डांगे यांना संशय आला. त्यांनी…

Read More