Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : संगमनेर शहर व परिसरातून दररोज दुचाकीची चोरी सुरू होती. या दुचाकी चोरांचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले होते. पोलीस उपाधीक्षक आणि शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेल्या चार पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने दुचाकी चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलासह दोघा आरोपींकडून तब्बल २६ लाख रुपये किमतीच्या चोरीच्या ५१ मोटर सायकल हस्तगत करत आरोपींना ताब्यात घेतले. प्रदीर्घ कालखंडानंतर संगमनेरात झालेल्या या मोठ्या शोध मोहिमेचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी बुधवारी संगमनेरमध्ये येऊन पथकाच्या कामगिरीचे कौतुक केले. संगमनेर शहर पोलीस ठाणे, तालुका पोलीस ठाणे, घारगाव पोलीस ठाणे, आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दररोज दुचाकी चोरी सुरू होती. ओला म्हणाले,…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: महिलांनी विज्ञान, कला, क्रीडा, शिक्षण, संशोधन, समाजकारण, राजकारण, साहित्य यासह प्रत्येक क्षेत्रात केलेली कामगिरी ही अभिमानास्पद आहे. क्रिकेटमध्ये भारतीय मुलींची कामगिरी ही देशवासीयांसाठी अभिमानास्पद ठरत असून कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून एकविराच्यावतीने सुरू झालेल्या महिला क्रिकेट स्पर्धेमधून मुलींसाठी एक मोठे व्यासपीठ निर्माण झाले असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात एकविरा फाउंडेशनच्यावतीने महिला क्रिकेट सह बॅडमिंटन, रस्सीखेच व कुस्ती स्पर्धेच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कांचनताई थोरात, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, अर्चना बालोडे, सुनंदाताई दिघे, सुषमा भालेराव, एकविराच्या डॉ. वृषाली साबळे, ज्योती थोरात, शर्मिला हांडे, तृष्णा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ‘एकमेका सहाय्य करू, अवद्ये धरू सुपंथ’ या तुकाराम महाराजांच्या अभंगाचा प्रत्यय शासनाच्या गटशेती योजनेच्या माध्यमातून दिसून येतो. शासनाच्या गटशेती योजनेत अकोले तालुक्यातील विरगाव येथील तरूण शेतकऱ्यांनी एकत्र येत कृषी गट व शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. आज या कंपनीच्या माध्यमातून हे तरूण शेतकरी १०८ एकर शेतीचे उत्कृष्ट व्यवस्थापन करत आहेत. कंपनीची वार्षिक उलाढाल ३ कोटी रूपयांची असून पूर्वी जेमतेम एकरी १ लाख रूपये उत्पन्न घेणारे तरूण आता गटशेतीच्या माध्यमातून एकरी १० लाख रूपयांचे उत्पन्न घेत आहेत. गटशेतीच्या या अभिनव प्रयोगाने या तरूण शेतकऱ्यांच्या जीवनमानात कायापालट झाला आहे. शेतकऱ्यांचे पीक उत्पादन वाढविण्यासाठी निविष्ठा, प्रशिक्षण, सिंचन, यांत्रिकीकरण, काढणी पश्चात…
महाराष्ट्र संवाद न्यूज केवळ राज्यातच नव्हे तर देश पातळीवर देखील आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या, शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ, आदर्श राजकारणी माजी मंत्री बी. जे. खताळ पाटलांच्या कार्याची दखल ऑल इंडिया रेडिओने २६ मार्चला घेतली. ऑल इंडिया रेडिओने आपल्या “आजादी का सफर विथ एअर न्यूज” या कार्यक्रमात बी. जे. खताळ पाटील यांच्या कार्याचा आढावा घेतला. खताळ दादांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली. ऑल इंडिया रेडिओची क्लिप महाराष्ट्र संवादच्या वाचक, श्रोत्यांसाठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज राहाता (अहमदनगर) : तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने राज्यातील सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानत शेतकरी कर्जमाफीसह अनेक लोक कल्याणकारी निर्णय घेतले. भाजपची सध्याची कार्यपद्धती जनतेला मान्य नाही. खड्ड्यांमधून जाणारा आणि मृत्यूचा सापळा बनलेला नगर-मनमाड रस्ता वर्षानुवर्ष सत्ता असून देखील का होत नाही? असा असा प्रश्न उपस्थित करत शिर्डी मतदारसंघातील दहशतीचे झाकण उडविण्याचे आवाहन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. राहाता येथे महाविकास आघाडीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात थोरात बोलत होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व भाऊसाहेब कांबळे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पंकज लोंढे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुधीर म्हस्के, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुजीब शेख व प्रमोद लबडे, महेंद्र शेळके, अनिल…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: श्रीराम नवमी निमित्ताने संगमनेरमध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गावाहिनी मातृशक्ती आयोजित “भव्य दिव्य शोभायात्रा” गुरुवारी (३० मार्च) सायंकाळी पाच वाजता संगमनेर येथील अभिनव नगरमधील श्रीराम मंदिर येथून निघणार आहे. श्रीरामचंद्र यांचा जन्मोत्सव गुरुवारी दुपारी बारा वाजता संगमनेर तालुक्यातील सर्व प्रमुख मंदिरे, श्रीराम मंदिरे व हनुमान मंदिरात जन्मोत्सवाचे विविध कार्यक्रम विश्व हिंदू परिषदेने आयोजित केले आहे. सायंकाळी निघणाऱ्या शोभायात्रेत भव्य दिव्य धार्मिक देखावे, भव्य श्रीरामचंद्र मूर्ती, प्रमुख आकर्षण “महाबली हनुमान”, श्रीराम रथ, श्रीराम पंचायत, भजनी मंडळ, सनई- चौघडे, घोडे, पारंपारिक वाद्य, आकर्षक रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी अशी भव्य- दिव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शोभायात्रा अभिनव नगर येथून…
महाराष्ट्र संवाद न्यूज खरंतर एखाद्या गोष्टीत वादाला प्रतिवादाने उत्तर द्यायला हवे. जेथे वाद निर्माण होतो तेथे प्रतिवादाने उत्तर द्यायला पाहिजे मात्र सावरकर प्रश्नी भारतीय जनता पक्ष प्रतिवाद करण्यास तयार नाही, अशी टीका माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. थोरात संगमनेरमध्ये माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या प्रत्येक पक्षामध्ये मत-मतांतर विचारधारा वेगवेगळी असू शकते. मात्र आम्ही किमान समान कार्यक्रमावर आधारित काम करीत होतो. यापुढेही करीत राहू. काँग्रेसचे युवा नेते खासदार राहुल गांधी यांनी अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध काय? हा प्रश्न उपस्थित केला असता, याला भाजपने उत्तर द्यायला हवे होते. मात्र उत्तर न…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: लोणी – नांदूर शिंगोटे रस्त्यावर तळेगाव नजीक दुधाचा टँकर आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रवींद्र बाळासाहेब पवार (वय 32 वर्ष, रा. तळेगाव दिघे, संगमनेर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अधिक माहिती अशी, रवींद्र बाळासाहेब पवार हा सोमवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास पिंपळे येथील रवी चकोर यांच्या खडी क्रेशर वरील काम आटोपून घरी तळेगाव दिघेकडे मोटार सायकलवरून नांदूर शिंगोटे – लोणी रस्त्याने परतत असताना समोरून भरधाव वेगाने नाशिकच्या दिशेने प्रभात डेअरीचा दूध टँकर येत होता. लोणी – नांदूर शिंगोटे मार्गावर हॉटेल कमलेश समोर दूध टॅंकरने पवार यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.…
महाराष्ट्र संवाद न्यूज डंपर चालक डंपर रिव्हर्स (मागे) घेत असताना डंपर खाली सापडून चार वर्षे वयाच्या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी संगमनेर तालुक्यात घडली. या प्रकाराने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संगमनेर तालुक्यातील मेंढवन येथे ही दुर्दैवी घटना घडली असून माही आजीज पठाण (वय चार वर्षे) असे या दुर्दैवी बालिकेचे नाव आहे. या संदर्भात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये डंपर चालक राजेंद्र भागवत बडे याच्या विरोधात विविध कलमांतर्गत या बालिकेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. डंपर चालक राजेंद्र बडे हा सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास माळवाडी वस्ती मेंढवन येथे त्याच्या ताब्यातील डंपर हयगयीने व अविचाराने डंपर मालकाच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज सुरतच्या न्यायालयाने काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर गुजरात मधील नवसारी न्यायालयाचा आणखी एक निकाल समोर आला आहे या न्यायालयाने काँग्रेस आमदार अनंत पटेल यांना शिक्षा सुनावली आहे. आमदार पटेल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो फाडला म्हणून 99 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास त्यांना सात दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. आमदार अनंत पटेल यांच्यासह आणखी काही विद्यार्थ्यांनी 2017 मध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान नवसारी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या कार्यालयात घुसून गैरवर्तन आणि कुलगुरूंच्या टेबलावर ठेवलेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो फाडल्याचा आरोप त्यांच्यावर होता. आमदार पटेल यांच्यासह युवक काँग्रेसच्या सदस्यांसह इतर…
