Author: अनंत पांगारकर

मंगळवार, ०१ ऑक्टोंबर कोल्हापूर : जगभरात भारताची होत असलेली प्रगती आणि सांस्कृतिक पुनरुत्थान हे पाहवत नसल्यानं हिंदूविरोधी वातावरण तयार करण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. कोल्हापुरात कणेरी इथं सिद्धगिरी मठात आयोजित संत समावेश या कार्यक्रमात ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, हिंदू विरोधाच्या मुकाबल्यासाठी आता संतशक्तीनं पाठबळ द्यावं. लोकसभा निवडणुकीत महायुतीला व्होट जिहादचा फटका बसला असल्याचे स्पष्ट करत ते म्हणाले, लोकसभेच्या ४८ पैकी १४ जागांवर व्होट जिहाद झाल्याचं दिसून आलं. ठराविक वर्गातील लोकांनी हिंदुत्ववादी उमेदवाराला पाडण्यासाठी मतदान केलं. धुळ्यात पाच विधानसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार जवळपास दोन लाखांनी आघाडीवर होता. पण मालेगावमध्ये दुसऱ्या उमेदवाराला १.९४ लाख मते…

Read More

मंगळवार, ०१ ऑक्टोंबर कळस :- अकोले तालुक्यातील कळस खुर्द येथे निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या आवर्तनामुळे मोठ्या प्रमाणात पाणी शेतांमध्ये आणि घरांमध्ये शिरले आहे. मात्र जलसंपदा विभागाने याकडे साफ दुर्लक्ष केले असून आदिवासी समाजाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. गेले एक महिन्यापासून निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यात आले आहे, परंतु त्यामुळे जमिनीचे पृष्ठभाग उपळून आले असून शेतांमध्ये उभे पिक पाण्यात बुडाले आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त झाली असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आदिवासी समाजाच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे त्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे. घरातून पाणी बाहेर काढण्यासाठी लोक जीवाचे रान करत आहेत. स्वयंपाक करायची आणि झोपायची सोय उरली…

Read More

मंगळवार, दि. ०१ ऑक्टोंबर मेष – आज तुम्ही शत्रूंपासून सावध राहा आणि कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका. कुटुंबाकडून तुमच्याकडून काही अपेक्षा असतील, ज्या पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. नशीब तुमच्या सोबत असेल, पण तुम्हाला थकवा आणि आळस येऊ शकतो. वृषभ – जर तुम्ही पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला आज नफा मिळण्याची शक्यता आहे, परंतु खर्चही वाढू शकतात. अडकलेला पैसा परत येऊ शकतो आणि चैनीच्या कामांवर खर्च होईल. आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. निष्काळजीपणा टाळा. मिथुन – जर तुमचे काही दिवसांपासून एखाद्याशी चांगले संभाषण होत असेल तर ते संभाषण आज थांबू शकते. तुम्ही बोलता त्या व्यक्तीला राग येऊ शकतो, ज्यामुळे संवाद…

Read More

सोमवार, ३० सप्टेंबर राज्‍य सरकारच्‍या माध्‍यमातून सुरु असलेल्‍या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत तालुक्‍यातील लाभार्थ्‍यांना ऑगस्टअखेरचे २ कोटी ५५ लाख ५५ हजार ८०० रुपये महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या विशेष प्रयत्‍नांमुळे लाभार्थी खात्‍यात आज वर्ग करण्यात आले आहे, अशी माहिती संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ पाटील यांनी दिली. संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण ५७२५ लाभार्थ्याना ८४ लाख ३८ हजार १०० रुपये, अनुसूचित जातीच्या ६२७ लाभार्थ्याना ९ लाख ३२ हजार ७०० रुपये, अनुसूचित जमातीच्या २५५ लाभार्थ्यांना ३ लाख ७९ हजार ५०० रुपये, श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या सर्वसाधारण ५२६१ लाभार्थ्यांना ७८ लाख ९१ हजार…

Read More

सोमवार, ३० सप्टेंबर  दिल्ली – दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या सहाय्यक, आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि माजी नगरसेविका निशा सिंग यांना २०१५ च्या एका खटल्यात दोषी ठरविण्यात आले असून हिंसा भडकवल्याबद्दल त्यांना न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. हरियाणा नागरी विकास प्राधिकरणाच्या अतिक्रमण विरोधी पथकाविरुद्ध हिंसक जमाव भडकविल्याबद्दल आणि त्यानंतर जमावाने गुडगावमध्ये पेट्रोल बॉम्ब फेकले होते. २०१५ च्या या खटल्यात निशा सिंग यांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मोना सिंग यांच्या न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरविले. मोना सिंग यांच्या न्यायालयाने या खटल्यात निशा सिंग यांच्यासह अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली दहा महिलांसह सतरा जणांना दोषी ठरविले. या खटल्यात दहा रुपयांना…

Read More

सोमवार, ३० सप्टेंबर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षात घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक संगमनेरमध्ये मंगळवारी (१ ऑक्टोंबर) आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस शहर व तालुक्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संगमनेर शहराध्यक्ष कैलास कासार यांनी केले आहे. पडताणी कॉम्प्लेक्समध्ये दुपारी साडेबारा वाजता ही बैठक होत असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर मतदार संघात या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा केली जाणार आहे. संगमनेर तालुका अध्यक्ष आशिष शेळके, तालुका कार्याध्यक्ष विजूभाऊ खरात, शहराध्यक्ष कैलास कासार आदी पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होत आहे. बैठकीसाठी युवक अध्यक्ष योगेश…

Read More

सोमवार, दि. ३० सप्टेंबर मेष- आज तुमचा आत्मविश्वास जास्त असेल, ज्यामुळे तुम्ही तुमची कामे वेगाने पूर्ण कराल. कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयांचे कौतुक होईल. आर्थिक बाबतीत थोडे सावध राहा, पण उत्पन्नात सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. वृषभ- आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचा आणि समर्पणाचा तुम्हाला फायदा होईल. आर्थिक स्थिती सुधारेल आणि नवीन योजना समोर येऊ शकेल. मिथुन- आजचा दिवस तुमच्यासाठी सर्जनशीलता आणि नवीन कल्पनांनी परिपूर्ण असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कलागुणांचे कौतुक केले जाईल आणि तुम्ही नवीन प्रकल्पांमध्ये सहभागी होऊ शकता. आर्थिक बाबतीत स्थैर्य राहील, पण फालतू खर्च टाळा. कर्क- आज तुमच्यासाठी आत्मपरीक्षण करण्याचा आणि तुमच्या योजनांचे…

Read More

रविवार, २९ सप्टेंबर  एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रकार नगरच्या बोल्हेगावमधील गांधीनगरमध्ये समोर आला आहे. पिडीत मुलीच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन संतोष सरोदे (रा. नगर) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी शालेय अभ्यासाविषयीच्या झेरॉक्स काढण्यासाठी घराबाहेर पडली होती. पीडित मुलगी घराबाहेर पडल्याची संधी साधत आरोपीने तिच्या पाठलाग केला. तसेच रस्त्यात तिला गाठत आपल्या दुचाकीवर बसण्याची जबरदस्ती देखील केली. मात्र पीडित मुलीने आरोपीच्या दुचाकीवर बसण्यास नकार दिल्याने आरोपीने तिला शिवीगाळ करत बळजबरीने दुचाकीवर बसवत बोल्हेगावच्या गांधीनगर परिसरात नेले. तेथे असलेल्या एका खोलीत नेत तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर याबाबत कोणाला काही सांगू नको, कोणाला काही…

Read More

रविवार, २९ सप्टेंबर अहमदनगर – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याने नाशिक विभागात माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये सर्वोत्तम कामगिरी करीत ४ नगर परिषदांनी व महानगरपालिकेने पुरस्कार मिळविल्याने पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे पत्राद्वारे अभिनंदन केले आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याने भूमी, वायू, अग्नी, जल आणि आकाश या पाचही घटकात चांगली कामगिरी केली. घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, सौर ऊर्जेचा उपयोग, एलईडी दिव्यांचा उपयोग, वृक्षारोपण, वॉटर ऑडिट, जल प्रदूषण कमी करणे, नागरिकांचा स्वच्छतेत सहभाग, वायू प्रदूषण मुक्ती, जनजागृती आदी क्षेत्रात विविध उपक्रम राबविले. नुकताच वसुंधरा अभियान ४.० चा निकाल जाहीर करण्यात आला. यात…

Read More

रविवार, २९ सप्टेंबर बदलापूर येथे बालवाडीच्या चार वर्षीय दोन चिमुरड्या मुलींच्या अत्याचार प्रकरणात आरोपी अक्षय शिंदे जेलमध्ये होता, त्याच्या पहिल्या पत्नीने लैंगिक अत्याचाराच्या केलेल्या तक्रारीची चौकशी करण्याकरता तळोजा कारागृहातून त्याला वारंट घेऊन बदलापूरकडे नेण्यात येत होते. त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक घेऊन फायर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी स्वत:च्या बचावासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्या त्या गोळीबारात अक्षय गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. एनकाउंटरची बातमी मिडियावर प्रसिद्ध होताच संपूर्ण बदलापूरमध्ये लोकांनी फटाके वाजून दिवाळी साजरी केली, दुसरीकडे ज्या विरोधी पक्षांनी बदलापूर अत्याचार प्रकरणांत पोलीस यंत्रणेवर आरोप करून आरोपींला फाशीची तात्काळ शिक्षा दया, नाहीतर आरोपीला आमच्या…

Read More