Author: अनंत पांगारकर
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर बुद्रुकमधील सर्वे नं. १०६ (४४२) येथील गेल्या ४०-५० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या शेकडो कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळाव्यात यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी काल (सोमवार १४ जुलै) राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीत तांबे यांनी संगमनेरमधील रहिवाशांच्या जमिनीच्या या गंभीर प्रश्नावर सविस्तर चर्चा करत तातडीने न्याय मिळवून देण्याची मागणी केली. महसूल मंत्र्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच यावर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. काय आहे नेमका प्रश्न? संगमनेर बुद्रुक, सर्वे नं. १०६ (४४२) येथील अनेक कुटुंबे गेल्या चार ते पाच दशकांपासून त्यांच्या प्रत्यक्ष…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम आणि नागरिकांना दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्यासाठी आज (सोमवारी, १४ जुलै) एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत संगमनेरच्या विविध आरोग्यविषयक प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह आमदार अमोल खताळ, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार विठ्ठलराव लंघे यांची प्रमुख उपस्थिती होती. खताळ म्हणाले, बैठकीत संगमनेरच्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये १०० खाटांचे अत्याधुनिक स्त्री रुग्णालय मंजूर करण्याच्या मागणीसह, घुलेवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करणे, तसेच चंदनापुरी, धांदरफळ खुर्द आणि तळेगाव दिघे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ग्रामीण…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर शहरात दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या दिव्यांग भवनाचे काम लवकरच सुरू होणार असल्याची व त्यासाठी नगरपालिकेने नेहरू गार्डनजवळ दिव्यांग भवनासाठी जागा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली. गणेशनगर येथील नगरपालिका योग भवनात आयोजित एका कार्यक्रमात आमदार खताळ यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना कृत्रिम हात-पाय, कॅलिपर्स आणि दिव्यांग प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड, डॉ. संदीप कचोरिया, शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, आरपीआयचे शहर प्रमुख कैलास कासार, जालिंदर लहामगे यांच्यासह महायुतीचे अनेक मान्यवर उपस्थित होते. आमदार खताळ यांनी आपल्या राजकीय प्रवासात संजय गांधी निराधार योजनेतून दिव्यांग…
मुंबई, विशेष प्रतिनिधी: अर्बन नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी जनसुरक्षा कायदा आणल्याचा सरकारचा दावा अत्यंत हास्यास्पद आहे. हा कायदा आतून बाहेरून काळा असून सामान्यांची गळचेपी करणारा आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासूनच त्याला विरोध आहे. सभागृहात सत्ताधारी पक्षाकडे बहुमत असल्याने त्यांनी बहुमताच्या जोरावर रेटून नेत कायदा मंजूर करून घेतलेला आहे. सरकारने कायदा मंजूर करून घेतला असला तरी काँग्रेसचा विरोध कायम असून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात या काळ्या कायद्याची होळी केली जाईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, जनसुरक्षा कायद्यामागचा हेतूच मुळात काळा आहे. या कायद्याचा फायदा फक्त…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त नाशिक: निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी लोकसंख्येनुसार सदस्य संख्या आरक्षणासह निश्चित केली आहे. ही सदस्य संख्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे, यामुळे आगामी निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर, जामखेड, राहाता, शेवगाव, राहुरी, श्रीगोंदे, पाथर्डी, देवळाली प्रवरा, शिर्डी या ११ नगरपरिषदा आणि नेवासे नगरपंचायत अशा एकूण १२ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका प्रस्तावित आहेत. सर्वाधिक ३४ सदस्य श्रीरामपूर नगरपरिषदेत असतील, तर नेवासे नगरपंचायतीमध्ये सर्वात कमी १७ सदस्य असणार आहेत. निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम- सध्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त मुंबई/संगमनेर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे प्रस्तावित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम निधीअभावी रखडले असून, गेल्या वर्षभरापासून शासनाकडून याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. यामुळे स्मारकाचे स्वप्न अजूनही अपूर्णच असल्याची खंत आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी पावसाळी अधिवेशनात शासनाने या प्रकरणी तातडीने लक्ष घालावे अशी मागणी केली आहे. गेल्या वर्षी तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक तालुक्यात एक कोटी रुपये खर्चून शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर संगमनेर बस स्थानकावर स्मारकासाठी जागा निश्चित करण्यात आली आणि नगरपालिकेने निधीसाठी प्रस्तावही पाठवला. सुरुवातीला, जिल्हा नियोजन व विकास समिती (DPDC) च्या बैठकीत हा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यातील निमोण आणि तळेगाव परिसरातील दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या भोजापूर धरणाचे पाणी आता थेट दुष्काळी भागापर्यंत पोहोचणार आहे. आमदार अमोल खताळ यांनी रविवारी (आज) भोजापूर धरणाचे जलपूजन केले आणि ग्रामस्थांसोबत भोजापूर पूरचारीची पाहणी केली. यामुळे अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या या भागाला आता टँकरमुक्त पाणीपुरवठा होण्याची आशा निर्माण झाली आहे. यावेळी बोलताना, आमदार खताळ यांनी विश्वास व्यक्त केला की, आता भोजापूर धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी तळेगाव आणि निमोण या दुष्काळी भागातील जनतेला त्यांच्या हक्काने मिळेल. यापूर्वी निवडणुका जवळ आल्या की केवळ टँकरने चारीमध्ये पाणी आणून दाखवले जात होते, मात्र आता ही परिस्थिती बदलणार…
नवी दिल्ली: प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महत्त्वपूर्ण आणि उच्चस्तरीय गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सरकारी वकील म्हणून त्यांनी आपली छाप पाडली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे कायद्याच्या क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व आता संसदेत प्रतिनिधित्व करेल. ॲड. उज्ज्वल निकम यांच्यासह एकूण चार जणांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निवड झाली आहे. ॲड. निकम यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूकही लढवली होती, परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर आता त्यांना राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेत संधी मिळाली आहे. ॲड. उज्ज्वल निकम यांचे नाव १९९३ च्या मुंबई…
‘हिंदी भाषिकांना मुंबईत मारणार्यांनो, हिंमत असेल तर ऊर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात कुत्रा देखील वाघ असतो, कोण कुत्रा कोण वाघ स्वत:च ठरवा. महाराष्ट्राच्या बाहेर या आपटून आपटून मारू, तुम्ही कोणाची भाकरी खात आहात? तुम्ही आमच्या पैशावर जगत आहात, तुम्ही कोणता कर भरता? कोणते उद्योग तुमच्याकडे आहेत? अशी दर्पोक्ती करणारा निशिकांत दुबे हा राज्यातल्या सरकारचा मानद जावई वाटू लागला आहे. त्याच्या या वक्तव्याने ज्याचं मस्तक भडकणार नाही, तो मराठी कसला? अनेक वर्षं महाराष्ट्रात राहणार्या असंख्य अमराठी तरुणांनी या मानद जावयाची चांगलीच उतरवली आहे. मराठीमध्ये मानद या पदनामाला अनन्यसाधारण महत्व आहे. एकार्थी ही व्यक्ती वर्तणुकीने कशीही असली तरी तिला दोष द्यायचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर येथील भूमिगत गटार दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या अतुल पवार आणि जावेद पिंजारी यांच्या कुटुंबीयांची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी भेट घेऊन सांत्वन केलं. या दोन्ही कुटुंबांना सरकारकडून तातडीने आणि जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन थोरात यांनी दिलं. कोल्हेवाडी रोड येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेनंतर थोरात यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, विश्वास मुर्तडक, नितीन अभंग, निखिल पापडेजा, गणेश मादास, जावेद पठाण, लाला बेपारी, अंबादास आडेप, वैष्णव…
