Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज, पुणे पुणे शहरातील महात्मा फुले मंडईजवळील मेट्रो स्टेशनसमोरील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये अनैसर्गिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने एका व्यक्तीचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कातरड येथील रहिवासी रमेश प्रकाश सत्रे (वय २१) याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. खून झालेल्या मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा फुले मंडई परिसरातील मेट्रो स्टेशनजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या गंभीर गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तात्काळ तपासचक्रे फिरवली. शहराच्या विविध भागांमध्ये पथके रवाना करण्यात आली होती. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील रामेश्वर मंदिरात सुरू असलेल्या सात दिवसीय शिवपुराण कथेची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. याप्रसंगी त्र्यंबकेश्वर येथील पंचदशनाम जुना आखाड्याचे महामंडलेश्वर १००८ स्वामी शिवगिरी महाराज यांनी धर्माच्या कार्यासाठी आणि प्रचार-प्रसारासाठी राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्र आल्यास खरी क्रांती घडते, असे प्रतिपादन केले. हरी ओम वृक्षमित्र परिवाराच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाला कोपरगाव येथील जनार्धन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज, नारायणपूर येथील अण्णा महाराजांचे उत्तराधिकारी टेंबे स्वामी महाराज, आमदार अमोल खताळ, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आणि हरी ओम वृक्षमित्र परिवाराचे प्रमुख अविनाश वाकचौरे यांच्यासह अनेक राजकीय नेते उपस्थित होते. शिवगिरी महाराजांनी उपस्थित भाविकांना हिंदू धर्माचा…

Read More

प्रतिनिधी, संगमनेर –  ऊस आणि दूध ही शाश्वत पिके असून, संगमनेर तालुका एक कुटुंब आहे आणि यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक आहेत, आगामी काळात एकरी ऊस उत्पादन वाढवण्यासाठी नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.  सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ गळीत हंगामासाठीच्या पहिल्या मिल रोलर पूजनावेळी थोरात बोलत होते. या कार्यक्रमाला कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील घुले, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, लक्ष्मणराव कुटे, संचालक संपतराव गोडगे, इंद्रजीत थोरात, डॉ. तुषार दिघे, विनोद हासे, रामदास धुळगंड, विलास शिंदे, रामनाथ कुटे, विजय राहणे, गुलाब देशमुख, अरुण वाकचौरे,…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी संगमनेर तालुका माहेश्‍वरी सभेच्या वतीने आयोजित महेश नवमीनिमित्त बुधवारी (४ जून) निघालेल्या भव्य शोभायात्रेने संगमनेरकरांचे लक्ष वेधून घेतले. विशेषतः केरळी बँड आणि माहेश्‍वरी महिलांच्या टाळ नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. याशिवाय माहेश्‍वरी समाज बंधू-भगिनींची आकर्षक वेशभूषा आणि शोभायात्रेतील नियोजनबद्धता हे देखील प्रमुख आकर्षण ठरले. आमदार अमोल खताळ यांनीही या शोभायात्रेत सहभागी होत माहेश्‍वरी बंधू-भगिनींना महेश नवमीच्या शुभेच्छा दिल्या. महेश नवमीनिमित्त श्री बालाजी मंदिरात महेश भगवान रुद्राभिषेक यजमान पल्लवी व शैलेश कासट आणि शिवानी व कृष्णा आसावा यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर लगेचच शोभायात्रेचा शानदार शुभारंभ झाला. या शोभायात्रेचे नियोजन आणि रथ सजावट राजस्थान युवक मंडळाच्या सदस्यांनी अतिशय सुंदरपणे केली…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी  माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांमुळे निळवंडे धरणाचे पाणी अहमदनगर जिल्ह्यातील 182 गावांसह, विशेषतः तळेगाव गटातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये पोहोचले आहे. त्यांच्या पूर्णत्वास गेलेले धरण आणि उजवा व डावा कालवा शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घेऊन आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, असे प्रतिपादन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी केले. चिंचोली गुरव येथे निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून विविध बंधारे भरताना आयोजित पाणीपूजन प्रसंगी थोरात बोलत होते. थोरात पुढे म्हणाले की, निळवंडेच्या कालव्यांमधून पाणी आल्याने संगमनेर तालुक्यात जलसमृद्धी निर्माण झाली आहे. थोरात कारखान्याच्या माध्यमातून विविध गावांमध्ये यंत्रसामग्री पुरवून चारी खोदून बंधारे भरून देण्यात आले आहेत, तर…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी संगमनेरमध्ये एक अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली असून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून दोनदा बलात्कार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी आदित्य अर्जुन शेटे या आरोपी विरोधात बलात्कार, पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिकारी विकास काळे पुढील तपास करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी संगमनेर शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. महाविद्यालयात जात असताना बसस्थानकावर तिची ओळख आरोपी तरुणासोबत झाली. आरोपीने तिच्यासोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केले आणि लग्नाचे आमिष दाखवून तिला आपल्या घरी बोलावले. ५ डिसेंबर २०२४ ते १५ एप्रिल २०२५ या कालावधीत आरोपीने पीडित मुलीवर बलात्कार केला. या घटनेची…

Read More

मुंबई, विशेष प्रतिनिधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मे महिन्याचा प्रलंबित हप्ता कधी देणार या संदर्भात महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सन्मान निधीच्या वितरणाची माहिती दिली असून तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच आजपासून (५ जून) हा निधी थेट लाभार्थ्यांच्या आधार-लिंक्ड बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होईल. मे महिन्याचा हप्ता जून महिना उजाडला तरी जमा न झाल्याने महिला वर्गात काहीशी नाराजी दिसून येत होती. निवडणुकीपूर्वी वेळेवर पैसे जमा करणाऱ्या सरकारकडून निवडणुकीनंतर या योजनेत दिरंगाई होत असल्याची चर्चा होती. मात्र, आता आदिती तटकरे यांनी स्वतः याबाबत स्पष्टीकरण देत महिलांना दिलासा दिला आहे. तटकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये…

Read More

संगमनेर (प्रतिनिधी):  माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि पाठपुराव्यामुळे निळवंडे धरणाचे डावे आणि उजवे कालवे त्यांच्याच कार्यकाळात पूर्ण झाले असून, या कालव्यांमधून संगमनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये पाणी पोहोचले आहे. यामुळे अनेक बंधारे आणि गावतळी भरली असून, तालुक्यात जलसमृद्धी निर्माण झाल्याचे संगमनेर तालुका दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी म्हटले आहे. बुधवारी (४ जून) रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते अंभोरे, पानोडी, मालुंजे, पिंपारणे येथील उजव्या कालव्यातून भरलेल्या बंधाऱ्यांचे जलपूजन करण्यात आले. यावेळी संचालक सतीश वर्पे, गंगाराम वाकचौरे, अण्णा राहिंज, लहानभाऊ वर्पे, रवींद्र रोहम, अरुणराव देशमुख, शुभम काळे, दिनकर वाकचौरे, नवनीत देशमुख, राजेंद्र देशमुख, सरपंच नारायण मरभळ, अरुण राहिंज, रमेश राहिंज,…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई युती सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना (ठाकरे गट) जमीनदोस्त करण्याचे विधान केल्यापासून राजकारणात एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. महाजनांच्या या विधानाला प्रत्युत्तर देत खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र डागले. ज्यानंतर महाजनांनकडूनही उत्तर देण्यात आले. पण आता मात्र, खासदार संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले असून त्यांच्यावर गंभीर आरोपही केले आहेत. गिरीश महाजन हे फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले सर्वाधिक भ्रष्ट मंत्री आहेत. महाजनांच्या कार्यालयात बसणारा अभिषेक कौल हा एक दलाल असून तो बिल्डर आहे. त्याने सांगितल्याशिवाय महाजन फाइल्सवर सही सुद्धा करत नाही, असा आरोप राऊतांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ…

Read More

मुंबई, ४ जून २०२५: भाजप महायुतीचं सरकार जनतेच्या हिताऐवजी अदानी समूहाच्या फायद्यासाठी अहोरात्र काम करत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. मुंबईतील अनेक महत्त्वाच्या जागा अदानींना दिल्या गेल्या असून, आता फक्त मंत्रालय आणि विधिमंडळच त्यांना देणं बाकी आहे का, असा संतप्त सवाल सपकाळ यांनी विचारला आहे. टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले की, मुंबईतील दोन्ही विमानतळे, धारावी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत डंपिंग ग्राऊंडची जमीन, कुर्ल्यातील ८.५ हेक्टर मदर डेअरीची जमीन आणि वांद्रे येथील एमएसआरडीसीच्या कार्यालयाची जागाही अदानींना देण्यात आली आहे. या सर्व गोष्टी अदानींच्या घशात घालून महाराष्ट्राला काय मिळणार आहे, असा प्रश्न त्यांनी…

Read More