Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज – मुंबई:  राज्य शासनाने विविध काळात जारी केलेले अनेक शासन निर्णय (GR) सध्याच्या परिस्थितीत लागू आहेत की नाहीत, हे समजणे प्रशासकीय कामकाजासाठी एक मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे कामकाजात गोंधळ निर्माण होऊन निर्णय प्रक्रियेत विलंब होत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केली की, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व जुने आणि कालबाह्य शासन निर्णय रद्द केले जातील. त्याऐवजी, एकच अद्ययावत, प्रमाणित आणि स्पष्ट शासन निर्णय तयार करण्यात येईल. यामुळे शेतकरी, नागरिक आणि शासकीय अधिकारी यांना सुलभ मार्गदर्शन मिळणार असून, कामकाजातील विलंब कमी होईल.…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज (28 एप्रिल) जम्मू काश्मीर विधानसभेमध्ये एकमुखी ठराव करत गेल्या सोमवारी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. जम्मू आणि काश्मीर विधानसभेचं एकदिवसीय विशेष अधिवेशन आज बोलावण्यात आलं होतं. या अधिवेशात उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी निषेध प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव सरकार आणि विरोधकांनी एकमताने मंजूर केला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीनंतर जाहीर केलेल्या राजनैतिक उपाययोजनांना या ठरावाद्वारे पाठिंबा देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांनी दहशतवाद संपवण्यासाठी टाकलेलं हे पहिलं पाऊल मानलं जात आहे. विशेष अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर शहर आणि तालुक्यात बोकाळलेले अवैध धंदे आणि अनधिकृत कत्तलखाने आता आमदार अमोल खताळ यांच्या रडारवर आले आहेत. या गंभीर प्रकारांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून, या विघ्नसंतोषी प्रवृत्तींवर तातडीने अंकुश लावण्याचे आणि शहरातील सर्व अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करून अनधिकृत कत्तलखाने उध्वस्त करण्याचे सक्त निर्देश आमदार खताळ यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत. संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर शहर, तालुका आणि घारगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारी परिस्थितीचा विस्तृत आढावा घेतला. या महत्त्वपूर्ण बैठकीला संगमनेर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, तालुका पोलीस…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर येथील प्रतिष्ठित मालपाणी उद्योग समूहाच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. येत्या बुधवारी (३० एप्रिल) अक्षय्य तृतीयेच्या शुभदिनी हा सोहळा मालपाणी लॉन्स येथे संपन्न होणार असून, यात हिंदू आणि बौद्ध धर्मातील एकूण ३५ नववधू आणि वर विवाहबद्ध होणार आहेत. सामाजिक दायित्वाच्या भावनेतून मालपाणी उद्योग समूहाने गेली २८ वर्षे हा स्तुत्य उपक्रम अविरतपणे सुरू ठेवला आहे. यावर्षी केवळ एक रुपया नोंदणी शुल्कात ३५ जोडप्यांनी या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या विवाह सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे जलसंपदा व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार सत्यजीत तांबे,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात बासमती तांदळाच्या नावाखाली अक्षरशः नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या धाडसी कारवाईत तब्बल ६२ लाख रुपये किमतीचा बनावट तांदळाचा साठा जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, ग्राहकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी एमआयडीसीमधील एका संशयित आस्थापनाच्या गोदामावर अचानक छापा टाकला. या तपासणीत धक्कादायक सत्य समोर आले. साध्या, निकृष्ट दर्जाच्या तांदळावर घातक रासायनिक पावडर फवारून त्याला कृत्रिम सुगंध देण्यात येत होता आणि बासमतीचा बनावटी भास निर्माण केला जात होता. इतकेच नव्हे, तर हा…

Read More

कळस – प्रतिनिधी अगस्ती एज्युकेशन सोसायटी, मुंबई संचलित कळस येथील कळसेश्वर विद्यालयातील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले आहे. विद्यालयातील तब्बल पाच विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवत संस्थेचे नाव रोशन केले आहे. या परीक्षेत आर्या गोपीनाथ ढगे हिने १६८ गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला, तर सृष्टी धनराज वाकचौरे १६६ गुणांसह द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली. याशिवाय, सार्थक दत्तात्रय ढगे (१३६ गुण), श्रुतिक संजय वाकचौरे (१३४ गुण) आणि नैतिक ज्ञानेश्वर बोऱ्हाडे (१३२ गुण) यांनीही गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले आहे. विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल मुख्याध्यापक भाऊसाहेब घेलवडे यांनी समाधान व्यक्त केले. माजी मुख्याध्यापिका नंदा बिबवे आणि शिक्षक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – कळस (प्रतिनिधी) अकोले तालुक्यातील कळस गावची सुकन्या कुमारी किरण कैलास वाकचौरे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले आहे. त्यांची नुकतीच नाशिक येथील पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) कार्यालयात वरिष्ठ लिपिक पदावर निवड झाली आहे. किरण या कळस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक कैलास वाकचौरे यांच्या कन्या आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण कळस बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शिक्षण कळसेश्वर विद्यालयात झाले. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. कळसेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने पोलीस निरीक्षक मोहन बोरसे आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे यांच्या हस्ते किरण यांचा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर कश्मिरातील पहलगाम येथे जिहादी आतंकवाद्यांनी हिंदू पर्यटकांवर धर्म विचारून, कलमा पढायला लावून व कपडे उतरवून विटंबना करत निर्घृण गोळीबार केला. या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ पठार भागातील बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व सकल हिंदू समाज यांच्यावतीने भव्य हिंदू जनसभेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी झालेल्या या जनसभेमध्ये पाकिस्तानातील अतिरेक्यांचा व साकुर येथील पाकिस्तान समर्थक जिहादी प्रवृत्तीचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पाकिस्तानी आतंकवाद्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला तुटलेल्या चपलांचा हार घालून, जोड्यांनी मारून जाहीर निषेध केला व पुतळ्याचे दहन करण्यात आले. यानंतर सर्व राष्ट्रभक्त हिंदूंनी घारगाव पोलिस ठाण्यात जात पोलिस…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर “संगमनेर तालुक्यातील सहकारी संस्थांमध्ये पठारभागातील कार्यकर्त्यांनी मला नेहमीच खंबीर साथ दिली आहे. मग ते साखर कारखाना असो, दूध संघ, शेतकी संघ, जिल्हा परिषद असो किंवा जिल्हा बँक; या प्रत्येक संस्थेत मला मिळालेले सहकार्य मी कधीही विसरू शकत नाही,” असे उद्गार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले. आंबीखालसा येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सभासद व युवक हितचिंतकांसाठी एका स्नेहसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना थोरात यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी ज्येष्ठ संचालक पांडुरंग घुले, लक्ष्मण पावडे, सभापती शंकर खेमनर, अजय फटांगरे, बबन कुर्‍हाडे, अरूण वाघ, विजय राहणे,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर शहरात हनुमान जयंती रथोत्सवादरम्यान उसळलेल्या दोन गटांतील वादामुळे ऐतिहासिक मिरवणुकीला गालबोट लागले होते. या घटनेनंतर तब्बल तीन दिवसांनी शहर पोलिसांनी काही तरुणांविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. आता, या प्रकरणी पोलिसांनी आणखी एक महत्त्वपूर्ण कारवाई करत घटनेच्या पंधरा दिवसांनंतर दुसरा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात शहरातील दोन वकिलांसह एकूण दहा जणांचा समावेश आहे, यामुळे या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे. १२ एप्रिल रोजी झालेल्या हनुमान जयंतीच्या रथोत्सवात पोलीस आणि जबाबदार नागरिकांच्या उपस्थितीत वाद निर्माण झाला होता. यानंतर, रामनवमी आणि हनुमान जयंती उत्सव समितीचे उपाध्यक्ष कमलाकर विश्वनाथ भालेकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ११ जणांविरुद्ध प्रथम गुन्हा…

Read More