Author: अनंत पांगारकर
शेतकऱ्यांचे गेट बंद आंदोलन, दोघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पिकअप गाडी पुढे-मागे घेण्याच्या कारणावरुन संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी दुपारी व्यापारी आणि त्याच्या नातेवाईकाकडून मारहाण करण्याची घटना घडली. तालुक्यातील रणखांब येथील शेतकरी किरण बारवे यांना झालेल्या मारहाणीमूळे शेतकऱ्यांनी संबधितांवर कारवाईसाठी दोन तास कृषी उत्पन्न बाजार समितीचे गेटबंद आंदोलन केले. पोलीस प्रशासनाने केलेली कारवाई आणि राजकीय पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेतले गेले. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे नाशिक-पुणे मार्गावर वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला होता. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटना घडली त्यावेळी वाहतुक पोलिसांनी प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. त्यामुळे घटनास्थळी पोलिसांना पाचारण करावे लागले. शेतकऱ्याला…
अध्यक्ष बाबा ओहोळ यांचे प्रतिपादन आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकासाची वाटचाल महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क थोरात कारखाना ही तालुक्याची कामधेनु आहे. सहकाराबरोबर ग्रामीण विकास व आर्थिक चक्र तालुक्यात फिरत आहे. ही संगमनेरात विकासाची संस्कृती आहे. काँग्रेस नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुका सर्व क्षेत्रात अग्रगण्य आहे. यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला, त्यामुळे कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त ऊसाची लागवड करावी. असे प्रतिपादन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी केले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा सन 2022 – 2023 या गळित हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदिपन समारंभावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे,…
भल्या पहाटेच्या कारवाईत उत्तर जिल्हाप्रमुख मौलानाला पोलिसांनी घेतले ताब्यात महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क दहशतवादी संघटनांशी निगडीत असलेल्या पॉप्युलर फ्रंन्ट ऑफ इंडिया ‘पीएफआय’ या संघटनेच्या कार्यकर्त्यांचे धागेदोरे आता संगमनेरपर्यत येऊन पोहचले आहेत. या संघटनेशी निगडीत असल्याच्या कारणावरुन नगर जिल्ह्यात दोघांना ताब्यात घेण्यात आले असून यात संगमनेरमधील एका मौलानाचा समावेश आहे. मंगळवारी भल्या पहाटे स्थानिक पोलिसांनी केलेल्या या कारवाईत केंद्रीय तपास यंत्रणादेखील कार्यरत होती. संगमनेर शहरालगतच्या संगमनेर खुर्द येथे आणि नगर शहरात ही कारवाई करण्यात आली. नगरमधून या संघटनेशी निगडीत असलेल्या विभागीय अध्यक्षाला तर संगमनेर खुर्द येथून उत्तर जिल्हाप्रमुख असलेल्या एका मौलानाला ताब्यात घेण्यात आले. या दोघांविरोधात सुरु असलेल्या कारवाईबद्दल गोपनीयता बाळगली…
उपअधीक्षकांच्या पथकाला अवघ्या दिड दिवसांत यश महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अल्पवयीन मुलीला धाक दाखवत तिचे अपहरण करुन तिला घेवून तीन दिवस पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यास पोलीस उपअधीक्षकांचे पथक यशस्वी ठरले आहे. अवघ्या दीड दिवसात पथकाने जिल्ह्याच्या श्रीगोंद्यात ही यशस्वी कामगिरी केली आहे. घारगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या गुन्ह्याची उकल करण्यास स्थानिक पोलीस अयशस्वी ठरले असतांना उपअधीक्षकांच्या पथकाने केलेल्या कामगिरीमुळे मुलगी सुखरुप पालकांच्या ताब्यात मिळाली आहे. साकुर येथील एका महिलेची अल्पवयीन मुलगी महाविद्यालयीन शिक्षण घेत असून तिला आरोपी अमोल बापू खेमनर याने पंधरा दिवसांपूर्वी पळवून नेत पून्हा घरी आणून सोडले होते. त्यावेळी मुलीच्या नातेवाईकांनी आरोपीला चांगलीच तंबी दिली होती.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शेअर मार्केट मधील व्यवहारात तोटा आल्याने त्याची जबाबदारी स्वीकारत मुंबईतील मुलुंडमध्ये राहणाऱ्या लेखापरीक्षकाने दिलेला धनादेश न वटल्याने संगमनेरच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी लेखा परीक्षक असलेल्या आरोपीस एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. याशिवाय फिर्यादीस 16 लाख 12 हजार 500 रुपये देण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले. संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा येथील सविता कानवडे यांनी आपल्या ओळखीच्या असलेल्या मुंबई येथील राजेश मुलजीभाई रूपारेल या लेखापरीक्षकाच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली होती. संबंधित महिलेचे ट्रेडिंग अकाउंट आरोपी राजेश रूपारेल यांनी हाताळले होते. शेअर मार्केटच्या या व्यवहारात कानवडे यांना तोटा सोसावा लागला. त्यामुळे रूपारेल यांनी कायदेशीर रक्कम देण्याची जबाबदारी स्वीकारत…
संगमनेर, महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क गरजू आणि योग्य लाभार्थ्यांना अन्नधान्याचा लाभ मिळण्यासाठी अपात्र शिधापत्रिकाधारक आणि उच्च गटातील लाभार्थ्यांनी अन्नधान्य योजनेतून बाहेर पडण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे, या योजनेतून मुदतीत बाहेर न पडल्यास त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येणार असल्याचे संगमनेरचे तहसिलदार अमोल निकम यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे म्हटले आहे. गरजू आणि योग्य लाभार्थ्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळण्यासाठी “राज्य सरकारने अन्नधान्याच्या योजनेतून बाहेर पडा” ही योजना एका शासन निर्णयाच्या आधारे सुरु केली आहे. अपात्र रेशनकार्डधारक, उच्च गटातील लाभार्थ्यांनी बाहेर पडणे आवश्यक आहे. असे लाभार्थी मुदतीत बाहेर पडले नाही तर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे. शहरी भागासाठी ५९०००/- रुपये आणि…
