Author: अनंत पांगारकर
संगमनेर, दि. ५ मार्च – प्रतिनिधी संगमनेर शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने आता संगमनेरात पान टपऱ्यांवर गांजा मिळू लागल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले आहे. या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला पकडले आहे. गेल्या काही दिवसांपासून संगमनेरमध्ये अवैध धंद्यांनी उच्छाद मांडला आहे. या धंद्यांवर कारवाया होत नसल्याने तसेच संबंधितांचे आर्थिक लागेबांधे असल्याने आता हे धंदे चोरून लपून नव्हे तर उघड्यावर राजरोसपणे सुरू आहे. पान टपरी मधून गांजा बाळगणाऱ्या आणि त्याची विक्री करणाऱ्या एकाला संगमनेर शहर पोलिसांनी पकडले असून या कारवाईमुळे अवैधरित्या अमली पदार्थ विक्रेत्यांनी पुन्हा डोके वर काढले असल्याचे दिसत आहे. यामुळे पोलिसांच्या कारवाई देखील फार्स…
संगमनेर, दि. ५ मार्च – प्रतिनिधी संगमनेर नगर परिषदेजवळ असलेल्या माळीवाडा येथे असलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता यांचा मंत्र देणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या जागी महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभा केला जाणार आहे. यासाठी सरकारकडे एक कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली असल्याची माहिती नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी दिली. तांबे म्हणाले, येत्या काही दिवसात संगमनेरच्या हायटेक बसस्थानकासमोर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सध्याच्या पुतळ्याच्या जागी देखील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा होणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सध्याच्या पुतळ्याच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज महायुती सरकारच्या काळात राज्यात लाडक्या बहिणी सुरक्षित नसल्याचे समोर येत आहे. सरकारमधील मंत्र्याने विकृतीचा कळस गाठला असून मुख्यमंत्र्यांचे लाडके मंत्री संबोधल्या जाणाऱ्या जयकुमार गोरे यांनी स्वतःचे विवस्त्र अवस्थेतील फोटो एका महिलेला पाठविल्याचे समोर आले आहे. ऑनलाइन सामनाने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. यात म्हटले आहे की, पीडित महिलेने राज्यपालांना पत्र पाठवून मंत्री जयकुमार गोरे यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी १७ मार्चपासून विधानभवनासमोर उपोषण करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. राज्यपालांना पाठविलेल्या पत्राची प्रत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षातील नेत्यांना पाठविण्यात आली आहे. पीडित महिलेने संपूर्ण घटनाक्रम पत्राद्वारे मांडत आपली व्यथा मांडली आहे.…
संगमनेर, दि. ५ मार्च – प्रतिनिधी सहकारातील दिशादर्शक आणि आदर्श ठरलेल्या तसेच संगमनेर तालुक्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्पाचा शुभारंभ, कारखान्यात उत्पादित झालेल्या ८ लाख ७७७ साखर पोत्यांचे पूजन माजी मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते रविवारी (९ मार्च) होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी दिली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने उभारलेल्या साडेपाच हजार मेट्रिक टन क्षमतेचा कारखान्यातून गेल्या तीन वर्षापासून दहा लाख मेट्रिक टना पेक्षा अधिक ऊस गाळप झाले आहे. यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात…
मुंबई, दि. ५ मार्च विधान परिषदेची उमेदवारी आणि कॅबिनेट मंत्रीपद या अटीवर काँग्रेसमधील बडे नेते असलेले विजय वडेट्टीवार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद न मिळाल्याने वडेट्टीवार नाराज असल्याचे बोलले जाते. त्यांच्या काही समर्थकांनी नुकताच मुंबईत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षात प्रवेश केला असून हे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्याची चिन्हे आहेत. पुढील आठवड्यात विजय वडेट्टीवार अजित पवारांच्या पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं आहे. त्यानंतर आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावर देखील टांगती तलवार आहे. अशावेळी…
विशेष प्रतिनिधी / मुंबई बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अखेर ज्यांच्यावर सूत्रधार वाल्मिक कराडचा समर्थक समजल्या जाणाऱ्या धनंजय मुंडे यांना अखेर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. विधिमंडळाच्या अर्थसकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाधीन केला. मुख्यमंत्र्यांमार्फत पाठविण्यात आलेला राजीनामा राज्यपालांनी देखील स्वीकारल्याने मुंडे आता मंत्री नसतील. संतोष देशमुख यांच्या मृतदेहाची क्रूर विटंबना करणारी छायाचित्रे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी समाज माध्यमातून बाहेर आली. याची राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि अखेर मुंडे पायउतार झाले. प्रसिद्ध झालेली छायाचित्रं समोर आली, त्यात क्रूरतेचा कळस गाठला गेला. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारीच असल्याने राज्यभरात या छायाचित्रांमुळे आक्रोश व्यक्त होत…
विशेष प्रतिनिधी / मुंबई समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी मुघल शासक औरंगजेबाची भलामण केलेल्या वक्तव्यापासून माघार घेत आपलं वक्तव्य मागे घेत असल्याचं जाहीर केलं. आझमी यांनी औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी टीकेची झोड उठवली होती. आज त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आमदारांनी अबू आझमी यांच्या विधानावरून सभागृहात गोंधळ घातला. परिणामी, विधीमंडळाचं आजचं कामकाज तहकूब करण्यात आलं. अबू आझमी यांनी आज विधानसभेत सत्ताधारी आमदारांनी व्यक्त केलेल्या संतप्त प्रतिक्रिया पाहून मवाळ भूमिका घेत आपलं वक्तव्य मागे घेतलं आहे. ते म्हणाले, मी कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं नाही, माझ्या…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संतोष देशमुख हत्येप्रकरणी माहिती लपवली, राज्य सरकारलाही सहआरोपी करा पाशवी बहुमताच्या आधारे सरकार सभागृह चालू देत नाही मुंबई, दि. ४ मार्च २०२५ बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रुरपद्धतीने केली, याची गृहखात्याकडे माहिती नव्हती का? असा संपप्त सवाल करत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती लपवली आणि आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची माहिती सभागृहाला न देता थेट प्रसार माध्यमांना दिली, हा सभागृहाचा अपमान आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर उद्या हक्कभंग आणू, असा इशारा ज्येष्ठ काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिला आहे. विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी प्रोटोकाल सोडून अजित पवार यांच्या शासकीय बंगल्यावर…
संगमनेर, दि. ४ मार्च अपघातात मृत्यू पावलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या दोघा संचालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या कुटुंबीयांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. शेतकरी व सभासदांचे हित जोपासताना सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने संगमनेर तालुक्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सध्याच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनामुळे थोरात कारखान्याने सुरक्षितता म्हणून सर्व सभासदांचा प्रत्येकी दोन लाख रुपयांचा अपघाती विमा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून उतरविला आहे. आश्वी बुद्रुक येथील जाखोजी राणू पिलघर यांचा काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर-मनमाड मार्गावर अपघाती मृत्यू झाला होता. तर वडगाव पान येथील साहेबराव…
मुंबई, दि. ४ मार्च – प्रतिनिधी नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेमार्ग सरळ मार्गानेच झाला पाहिजे, यासाठी मुंबईत झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकवटले आहे. बैठकीत सरळ मार्गाचा पाठपुरावा करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि रेल्वे मंत्रालय यांच्या सोबत बैठक घेण्याचा निर्णय उपस्थित लोकप्रतिनिधींनी घेतल्याची माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे. पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गाच्या प्रस्तावित बदलांना विरोध करण्यासाठी आज (४ मार्च) मुंबईत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत रेल्वेमार्गाच्या प्रस्तावित बदलांवर सखोल चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यात आली. तसेच, सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गातील सर्व लोकप्रतिनिधी पक्षीय मतभेद विसरून एकत्र आले. या भागाच्या विकासासाठी सर्वांनी…
