Author: अनंत पांगारकर
संगमनेर, प्रतिनिधी- महाराष्ट्राला लाभलेल्या समृद्ध परंपरेचा भाग असलेल्या पायी दिंडी सोहळ्यातील संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे संगमनेर तालुक्यात सोमवारी आगमन झाले आहे. या निमित्ताने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि इतर विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, यामुळे वारकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि इंद्रजीत थोरात यांनी तिचे स्वागत केले. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पालखीचे अध्यक्ष ॲड. सोमनाथ घोटेकर यांच्यासह गावकरी आणि वारकऱ्यांशी संवाद साधला. वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसएमबीटी सेवाभावी संस्थेच्यावतीने दोन रुग्णवाहिका, २५ डॉक्टरांचे पथक आणि परिचारिकांसह आरोग्य सेवा पुरवण्यात…
संगमनेर, प्रतिनिधी – “ज्ञानोबा माऊली तुकाराम” च्या गजरात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीचे संगमनेर तालुक्यात सोमवारी संध्याकाळी उत्साहात स्वागत करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यातील पारेगाव बुद्रुक येथील अश्विनाथ महाराज गडावर पालखी पोहोचताच, संगमनेरचे आमदार अमोल खताळ आणि प्रशासनाच्या वतीने शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी भक्तिमय वातावरणात पालखीचे पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. पारेगाव ग्रामस्थांनी पालखीवर जेसीबीतून पुष्पवृष्टी केली. आमदार अमोल खताळ यांनी स्वतः पालखीतील बैलजोडीचा दोर धरून भक्तिभाव व्यक्त केला. त्यांनी गळ्यात वीणा घातला होता, तर त्यांच्या पत्नी नीलम डोईवर तुळशी वृंदावन घेऊन “विठ्ठल-नाम” च्या जयघोषात पायी चालत सहभागी झाल्या होत्या. यावेळी, निवृत्तीनाथ महाराज पालखी…
संगमनेर, १७ जून पावसाळ्याला सुरुवात होताच संगमनेर विद्युत महामंडळाचा (महावितरण) गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. शहरातील अनेक उपनगरे आणि गावठाण भागांत विजेचा लपंडाव सुरू असून, यामुळे नागरिक आणि विशेषतः छोटे व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. शिवसेना शहरप्रमुख रवींद्र उर्फ पप्पू कानकाटे यांनी महावितरणच्या या निष्क्रियतेवर तीव्र संताप व्यक्त करत, अधिकाऱ्यांना गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे. कानकाटे यांनी आरोप केला आहे की, वादळ, वाऱ्यामुळे झाडे पडून किंवा तारा तुटून वीजपुरवठा खंडित होणे नागरिकांना समजण्यासारखे आहे. मात्र, दर शनिवारी शहरातील जवळपास ७०-७५ टक्के भागात दिवसभर वीज गायब असते. रविवारी कोणतेही कारण नसतानाही विजेचा ये-जा करण्याचा खेळ सुरू होता. महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या या हलगर्जीपणामुळे अनेक…
अहिल्यानगर, १७ जून – अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दरोडा टाकणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीला जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील विळद येथील दरोड्याबरोबरच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गुन्हेही उघडकीस आले आहेत. पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ३ लाख ४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भैय्या कडू काळे (वय १८, रा. शिरोडी, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर), ताराचंद विरूपन भोसले (वय ३५, रा. गाजगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर), किसन उर्फ विजय गौतम काळे (वय २३, रा. पानसवाडी, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर), नागेश विरूपन भोसले (वय २०, रा. गाजगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर),…
संगमनेर, प्रतिनिधी – शेकडो वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे आज (सोमवारी, १६ जून) अहिल्यानगर जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात आगमन झाले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत उद्योग समूहाने वारकऱ्यांसाठी आवश्यक सर्व सोयी-सुविधा पुरविल्या. रिमझिम पाऊस आणि भक्तीमय वातावरणात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि इंद्रजीत थोरात यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी या पालखीचे अभूतपूर्व स्वागत व पूजन केले. पारेगाव बुद्रुक येथे पंढरपूरकडे निघालेल्या या पालखीमध्ये सुमारे २० हजार वारकरी सहभागी झाले होते. यावेळी डॉ. तांबे आणि थोरात यांनी पालखीचे पूजन केले. या प्रसंगी निवृत्तीनाथ देवस्थानचे अध्यक्ष ॲड. सोमनाथ घोटेकर, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय पोलीस…
संगमनेर, प्रतिनिधी: आईवडील लग्न समारंभासाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधत नातेवाईकाने तेरा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा व त्यातून ती गर्भवती राहिल्याचा प्रकार समोर आल्यानंतर संगमनेर तालुका पोलिसांनी तात्काळ कारवाई करत यातील मुख्य आरोपीला अटक केली. अटक केलेल्या आरोपीला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने २० जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पंडित हिरामण वैराट असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान या प्रकारातील अन्य तीन आरोपींचा अजूनही शोध सुरू असून सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास काळे याप्रकरणी पुढील तपास करत आहे. रविवारी ही धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातून समोर आली होती. घटनेतील पीडित मुलीवर जवळच्या नातेवाईकाने आई-वडील घरी नसल्याचे संधी साधत बलात्कार केला…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीवर नव्याने बांधलेल्या पुलाचे श्रेय माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचेच असल्याचा दावा काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केला आहे. तसेच, सत्तांतरानंतर सत्ताधाऱ्यांनी केवळ राजकारणासाठी पुलाचे काम रखडवल्याचा आरोप करत त्यांनी पुलाच्या कामाचे श्रेय घेऊ पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा आरसा दाखवला. या संदर्भात दिवटे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात पुलाच्या रखडलेल्या कामाचा घटनाक्रम विशद करत म्हटले आहे की, २०२२ मध्ये म्हाळुंगी नदीला आलेल्या पुरामुळे साईनगरकडे जाणारा जुना पूल खचला होता. पूल वाहतुकीला बंद झाल्याने परिसरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात आणि नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी तातडीने पाहणी केली होती. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर…
संगमनेर, प्रतिनिधी – “अभिधान सार्थ हे व्हावे, हिंदुस्थान म्हणुनिया जिवाचे ज्यांनी केले रान, त्याचीच तपस्या हे सिंहासन वंद्य” या ओळींनी सुरू होणारा हिंदू साम्राज्य दिनाचा पवित्र सोहळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने उत्साहात साजरा होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून देणारा आणि हिंदू समाजाला ‘स्वत्वा’ची जाणीव करून देणारा हा प्रेरणादायी दिवस उद्या मंगळवारी (१७ जून) सायंकाळी ७ वाजता, मदन कुलकर्णी सभागृह, दिगंबर गणेश सराफ विद्यालय, घास बाजार, संगमनेर येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ॲड. श्रीकांत गोंगे भूषविणार असून प्रमुख वक्ते म्हणून महेश शेळके सर (महाविद्यालयीन विद्यार्थी प्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, उत्तर नगर जिल्हा) यांचे मार्गदर्शन होणार आहे. हिंदवी स्वराज्याच्या…
संगमनेर, प्रतिनिधी: शहरातील स्वामी समर्थ नगर ते संतोषी माता मंदिर दरम्यान म्हाळुंगी नदीवर नव्याने बांधण्यात आलेला पूल जनतेसाठी खुला करण्यात आला आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण झाले. शाळा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने विद्यार्थी आणि स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. चार वर्षांपूर्वी हा पूल कोसळल्याने विद्यार्थी आणि नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला होता. स्थानिक नागरिकांनी अनेकदा आंदोलने केल्यानंतर या पुलाच्या कामास सुरुवात झाली होती. यावेळी बोलताना आमदार अमोल खताळ यांनी सांगितले की, पूर्वी या पुलाचे बांधकाम स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्या निधीतून झाले…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याच व पीडित मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असल्याचा हा घृणास्पद प्रकार समोर आला. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दोन महिलांसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेरनजीक कोकणगाव येथे सकाळी झालेल्या भीषण अपघाताच्या घटनेला काही तास उलटत नाहीत तोच हा अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, पंडित हिरामण वैराट, संगीता पंडित वैराट, संग्राम उर्फ शेरू पंडित वैराट आणि माधुरी पंडित वैराट (सर्व रा. कळस, ता. अकोले, जि. अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे…
