Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज –  उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) म्हणजेच इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल उद्या, (सोमवार ५ मे) जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. मंडळाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, निकालाची घोषणा पत्रकार परिषदेत केली जाईल. त्यानंतर, विद्यार्थी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपली गुणपत्रिका डाऊनलोड करू शकतील. उत्तरपत्रिका पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी संधी: ऑनलाईन निकालानंतर, विद्यार्थ्यांना त्यांच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विषयात मिळालेल्या गुणांची पडताळणी, उत्तर पत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याची सोय मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थी यासाठी ६ मे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर तालुक्यात निळवंडे धरणाच्या पाण्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. कालव्यातून पाणी घेण्यासाठी टाकलेले पाईप जलसंपदा विभागाने पोलीस बळाचा वापर करून काढण्यास सुरुवात केल्याने संतप्त शेतकरी संतप्त झाले असून “पहिले आम्हाला गोळ्या घाला, मग पाणी कुठे घेऊन जायचे तिकडे घेऊन जा,” अशा शब्दांत आपला आक्रोश व्यक्त केला आहे. संगमनेर तालुक्यातील निमगाव बुद्रुक येथे मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाले असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. निळवंडे उजवा कालव्याचे उप विभागीय अभियंता प्रमोद माने यांच्यासह जलसंपदा विभागाचे अनेक अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याची गरज वाढली आहे. चाऱ्याची…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर  “काँग्रेसने नेहमीच सर्वधर्मसमभावाचा विचार जपला आहे. जातीनिहाय जनगणना व्हावी, ही काँग्रेसची जुनी मागणी आहे. जातीनिहाय जनगणनेमुळे दुर्लक्षित आणि वंचित घटकांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. हा निर्णय काँग्रेसच्या सततच्या पाठपुराव्याचे यश आहे,” युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी म्हटले आहे. जातीनिहाय जनगणना या निर्णयाचे संगमनेरमध्ये युवक काँग्रेसने जोरदार स्वागत केले. यशोधन कार्यालयाच्या मैदानावर युवक काँग्रेस अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसने जातीनिहाय जनगणनेचा जल्लोष केला. यावेळी निखिल पापडेजा, डॉ. विजय पवार, शरद पावबाके, प्रीतम साबळे, रमेश गफले, शुभम शिंदे, रमेश नेहे, वैष्णव मुर्तडक, शुभम काळे यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. जातीनिहाय जनगणनेच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज –  दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर होणार आहेत. मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता बारावीचा निकाल १५ मे २०२५ पर्यंत, तर इयत्ता दहावीचा निकाल साधारणपणे ५ ते १० जून २०२५ दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले की, दहावी आणि बारावीच्या परीक्षा नेहमीपेक्षा १० दिवस लवकर झाल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक योजनांसाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी निकालाची प्रक्रिया देखील वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. सध्या सर्व विभागीय मंडळांकडून आलेल्या…

Read More

पहेलगाममध्ये गेल्या मंगळवारी घडलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या धार्मिक राजकारणाने घेतलेली पातळी अत्यंत घातक आणि देशाला खड्डयात घालणारी ठरू लागल्याने सारीच अस्वस्थता आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे, हे दाखवून देण्यासाठी जे काही करायला हवं त्याऐवजी नको ते करण्याचा हट्ट सध्या केंद्रातल्या सरकारकडून आणि भाजप प्रणित राज्य सरकारांकडून अवलंबला जातो आहे. मुस्लिमांशिवाय काश्मीर आणि भारत अशी मानसिकता या मंडळींची आहे. पंतप्रधान मोदी यांचं त्यांना खतपाणी आहे. मोदी सरकार केंद्रात अस्तित्वात आल्यापासून मुस्लिमांविषयी ओकली जाणारी आग, त्या धर्मातील बांधवांना ज्या प्रकारे एकाकी पाडलं जातं, मॉब लिंचिंग सारख्या घटनांमधून मुस्लिमांना गाठून ठेचणं, त्यांच्या दुकानांवर बहिष्कार घालणं असे…

Read More

विशेष प्रतिनिधी/ मुंबई शिर्डीच्या साई संस्थानला धमकीचा मेल आल्याने खळबळ उडाली आहे. साईबाबा मंदिर पाईप बॉम्बने उडवून देण्याची धमकी मेलद्वारे साई संस्थानला देण्यात आली आहे. अजित जक्कुमोल्ला या नावाने हा मेल साई संस्थानाला पाठवण्यात आला असून याचा आईपी कर्नाटकमधील असल्याचं सांगितलं जातं आहे. काल २ मे रोजी धमकीचा मेल साई संस्थानला प्राप्त झाल्यानंतर साई संस्थाननं आपली सुरक्षा दक्ष केली आहे. या धमकीच्या मेलमध्ये प्रामुख्यानं फर्स्ट पहलगाम नेक्स्ट शिर्डी, असं लिहिलं आहे. तामिळनाडूमधील जफ्फार सादीक आणि जफ्फार सईद यांची गुन्हातून मुक्तता करण्यात यावी, असंही लिहिलं आहे. दरम्यान, साई संस्थानाला आलेल्या या धमकीच्या मेलची पुष्टी संस्थान प्रशासनाकडून करण्यात आली असून याबाबत शिर्डी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – अकोले  राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज (०३ मे) अकोले तालुक्यात अवैध मद्य विक्री करणाऱ्या केंद्रांवर मोठी कारवाई केली आहे. श्रीरामपूर येथील भरारी पथक क्र. २ आणि संगमनेर विभागाच्या संयुक्त पथकाने केलेल्या या धडक कारवाईत सात ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून १ लाख ९ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारवाई करण्यात आलेले सुनील लक्ष्मण देशमुख, विक्रम अशोक घाटकर, राहुल अदालतनाथ शुक्ला, किसन सुरेश चोथवे, दत्तात्रेय दशरथ भालेराव, मुनीर जलाउद्दीन शेख आणि विकी ज्ञानदेव रहाणे (सर्व आरोपी रा. राजूर ता. अकोले, जि. अहिल्यानगर) येथील रहिवासी आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने हिवरगाव आंबरे, विरगाव…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – छत्रपती संभाजीनगर समाज कल्याण विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून तब्बल ७४६ कोटी रुपये ‘लाडकी बहीण’ योजनेकडे वळवल्याने, मंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “हे कृत्य बेकायदा आणि अन्यायकारक आहे. या निधी वळवण्याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. शिष्यवृत्ती कशाला द्यायची? वसतिगृहे कशाला चालवायची?” असा संतप्त सवाल शिरसाट यांनी केला. “पूर्वीही माझ्या खात्यातून सात हजार कोटी रुपये वळवले गेले, याची मला कल्पनाही नव्हती. जर समाज कल्याण खात्याची गरज नसेल, किंवा निधीच द्यायचा नसेल, तर ते खाते बंद केले तरी चालेल,” असे शिरसाट म्हणाले. असा निधी वळवणे नियमबाह्य आहे. पण अर्थ खात्याला जे वाटते तेच खरे, त्यांची…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर “चाळीस वर्षे अविश्रांत काम करून दुष्काळग्रस्तांसाठी निळवंडे धरण आणि कालवे पूर्ण केले. आपल्या तालुक्याला आणि सहकारी संस्थांना आमदारकीचे संरक्षणाचे कवच होते. मात्र, जाती-धर्माच्या नावाखाली पसरवलेल्या खोट्या भूलथापांना बळी पडून जनतेने हे कवच गमावले आहे. आता तालुक्याचे हक्काचे पाणी मिळवण्यासोबतच तालुक्याला जपण्यासाठी संघटित होऊन संघर्ष करणे गरजेचे आहे,” असे स्पष्ट प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.संगमनेर खुर्द येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकरी युवक आणि कार्यकर्त्यांच्या स्नेहसंवाद मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी माधवराव कानवडे, बाबा ओहोळ, रणजितसिंह देशमुख, इंद्रजित थोरात, संपतराव डोंगरे, पांडुरंग पा. घुले, आर. बी. रहाणे, अर्चना बालोडे, नवनिर्वाचित…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज –  पुण्यात एका पोलीस उपनिरीक्षकाने एका २८ वर्षीय तरुणीची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी पोलीस उपनिरीक्षकाने तरुणीसोबत नोंदणी पद्धतीने विवाह केला, मात्र पाच वर्षांनंतर तिला पत्नी म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करताना २०२० मध्ये त्याची पीडित तरुणीशी ओळख झाली होती. या ओळखतून त्यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाले त्यानंतर दोघांनी नोंदणी विवाह केला होता. मात्र, त्याने हा विवाह कुटुंबीय आणि मित्रपरिवारापासून लपवून ठेवला. तसेच, समाजातही तिला पत्नी म्हणून ओळख दिली नाही. आरोपीने ‘घरी लग्नाबद्दल सांगतो’ असा विश्वास तरुणीला दिला आणि तिच्याकडून…

Read More