Author: अनंत पांगारकर
अहिल्यानगर, दि. १ – मुख्यमंत्री सचिवालयाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत केंद्राचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात आज उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांना लाभ देण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा व उपचारांची व्यापक प्रसिद्धी करण्यात यावी, अशा सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी दिल्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागराज चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूराव नागरगोजे, जिल्हा कक्ष अधिकारी तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. नीळकंठ ठाकरे आदी उपस्थित होते. पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, “शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना,…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर राज्यात आणि देशात धार्मिक तेढ वाढीस लावण्याचे प्रयत्न सुरू असताना, संगमनेरने एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवून सामाजिक सलोख्याचे उदाहरण दिले आहे. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि काँग्रेस अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘समतेची मिसळ’ या सर्वधर्मीय कार्यक्रमाला गुरुवारी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात तब्बल १३ हजारांहून अधिक संगमनेरकरांनी एकत्र येत समतेच्या मिसळीचा आस्वाद घेतला आणि एकतेचा संदेश दिला. संगमनेर बस स्थानकासमोर, नवीन नगर रोड येथे संगमनेर तालुका युवक काँग्रेस आणि शहरातील विविध सामाजिक घटकांनी एकत्रितपणे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ‘समतेची मिसळ’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब…
महाराष्ट्र संवाद न्यूज घारगाव (संगमनेर) पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात आज गुरुवारी सकाळपासून वाहतूक कोंडीने अक्षरश: थैमान घातले. सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू झालेली वाहतूक कोंडी दुपारी उशिरापर्यंतही निवळली नव्हती, यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. रखडलेले सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम तातडीने सुरू करावे, अन्यथा तीव्र स्वरूपाचे रस्ता रोको आंदोलन केले जाईल, असा संतप्त इशारा वाहनधारकांसह ग्रामस्थांनी दिला आहे. परिसरात सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामामुळे या महामार्गावर वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. सकाळपासूनच प्रचंड उष्णता जाणवत असताना, रखरखत्या रस्त्यावर तासनतास उभे राहणे वाहनचालकांसाठी असह्य ठरत आहे. त्यातच रस्त्याच्या दुतर्फा झाडे नसल्याने प्रवाशांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत…
महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी भागात राहणाऱ्या एका २२ वर्षीय युवतीच्या नावाने अज्ञात व्यक्तीने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून तिची समाजात बदनामी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या बनावट खात्यावरून युवतीच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना आक्षेपार्ह मेसेज पाठवण्यात आले, यामुळे तिची आणि तिच्या कुटुंबाची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. या गंभीर प्रकारणी पीडित युवतीने मंगळवारी (२९ एप्रिल) येथील सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३५६ (२) (अब्रुनुकसानी) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (सी) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. युवतीने आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, एका अज्ञात व्यक्तीने तिच्या नावाने…
महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सादर झालेल्या चौकशी अहवालावरून राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी कारखान्याच्या कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्याची तयारी दर्शवली आहे. विखे म्हणाले, “२०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की, या प्रकरणात कोणताही फौजदारी गुन्हा दाखल होत नाही. त्यामुळे आम्हाला कोणतीही चिंता नाही. आमच्या दृष्टीने हे प्रकरण संपले आहे. तरीही, नव्याने चौकशी झाल्यास आम्ही त्याला सामोरे जाण्यास तयार आहोत.” कारखान्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याच्या आरोपांवर विखेंनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “सन २००४ मधील हे प्रकरण विरोधकांनी २०१४ मध्ये उकरून काढले.…
महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर रिझर्व्ह बँकेने व्यवसाय परवाना रद्द केल्यानंतर अवसायनात असलेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या आणखी चार शाखा येत्या २३ मे पासून बंद होणार आहेत. बँकेचा दैनंदिन खर्च कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अवसायक गणेश गायकवाड यांनी दिली आहे. बंद होणाऱ्या शाखांमध्ये संगमनेर, बेलापूर, नगर मार्केट यार्ड आणि केडगाव (इंडस्ट्रियल इस्टेट) यांचा समावेश आहे. या सर्व शाखांचे कामकाज आता नगरच्या मुख्य शाखेतून चालणार आहे. बँकेने या शाखांमधील खातेदार आणि लॉकरधारकांना त्यांच्या लॉकरमधील वस्तू काढून घेऊन लॉकरच्या चाव्या बँक प्रशासनाकडे जमा करण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी बँकेने काही शाखा बंद केल्या आहेत. अवसायक गायकवाड यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर मालपाणी उद्योग समूहाने सामाजिक बांधिलकी जपत आयोजित केलेल्या भव्य सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये ३५ जोडप्यांनी हजारो पाहुण्यांच्या साक्षीने आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात केली. या सोहळ्याने आकर्षक सजावट, उत्कृष्ट व्यवस्थापन आणि उत्साही वातावरणाने उपस्थितांची मने जिंकली. अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून संगमनेर येथील मालपाणी लॉन्स येथे आयोजित या सोहळ्याच्या प्रवेशद्वारापासून विवाहस्थळापर्यंत केलेली नेत्रदीपक सजावट लक्ष वेधून घेत होती. आलेल्या सात हजारांहून अधिक पाहुण्यांसाठी उत्तम भोजन व्यवस्था आणि मनोरंजनासाठी संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. या शुभप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, डॉ. जयश्री थोरात, यांच्यासह मालपाणी परिवारातील…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर पुणे-नाशिक महामार्गावर घारगावजवळ पोलिसांनी मोठी कारवाई करत गोमांसाची वाहतूक करणारी एक अलिशान कार पकडली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 28 एप्रिल) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी या कारवाईत 5 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोघा आरोपींविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांकडून खात्रीलायक माहिती मिळाली होती की संगमनेरहून पुणेच्या दिशेने एका अलिशान कारमधून गोमांसाची वाहतूक होणार आहे. या माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक पुजारी यांनी तात्काळ कार्यवाही करत पोलीस हेड कॉन्स्टेबल दिवटे, पोलीस कॉन्स्टेबल गाडेकर…
महाराष्ट्र संवाद न्यूज – अकोले: येथील आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेली सॉफ्टबॉल खेळाडू फिजा सय्यद हिची अहिल्यानगर जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी निवड झाली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी खुरगे यांनी याबाबत पत्राद्वारे माहिती दिली आहे. या पत्रानुसार, फिजा सय्यद हिने सॉफ्टबॉल या क्रीडा प्रकारात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत, तिला सन २०१९-२० या वर्षाचा प्रतिष्ठित जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. फिजाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळ कौशल्याची छाप सोडली आहे, आणि याच योगदानाचा गौरव म्हणून तिला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या शुभदिनी अहिल्यानगर येथे एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभात जिल्ह्याचे पालकमंत्री…
महाराष्ट्र संवाद न्यूज – लोणी (अहिल्यानगर) लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंप्रीनिर्मळ गावात रविवारी (२७ एप्रिल) सायंकाळी ५:४५ ते रात्री १०:१५ च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी एका बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी केली. या घटनेत चोरट्यांनी घरातून सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. चोरी झालेल्या वस्तूंमध्ये १८ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, ४ ग्रॅमची सोन्याची अंगठी, अर्धा ग्रॅमची सोन्याची नथ, फ्रीज, टीव्ही आणि होम थिएटर यांचा समावेश आहे. चोरट्यांनी घरातील सामानाची तोडफोड देखील केली आणि घराबाहेर लावलेली स्कुटी गाडीचेही नुकसान केले. या प्रकरणी किरण उर्फ करण विलास कोळगे यांनी लोणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल…
