Author: अनंत पांगारकर
गुरुवार १९ डिसेंबर मुंबई – अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या राज्य, जिल्हा आणि ब्लॉकस्तरीय सर्व समित्या तत्काळ प्रभावाने विसर्जित करण्यात आल्या आहेत. संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्यातील महिला काँग्रेसच्या सदस्यत्व मोहिमेला गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षापदी संध्या सव्वालाखे या कायम राहून नवीन समित्या स्थापन करण्याच्या प्रक्रियेचे नेतृत्व करणार आहेत. राज्यातील महिला काँग्रेसची सदस्य मोहीम पुढे नेण्यासाठी आणि नारी न्याय सभासदत्व सत्कार समारंभ आयोजित करणे आणि महाराष्ट्रातील महिला काँग्रेस संघटनेच्या उभारणीसाठी संध्या सव्वालाखे यांच्या सोबत खालील विधानसभा क्षेत्रातील महिला पदाधिकारी सहकार्य करणार आहेत. १) दिपाली लालाजी…
गुरुवार १९ डिसेंबर मुंबई – विधान परिषदेच्या सभापतीपदी अपेक्षेप्रमाणे महायुतीकडून भाजपचे प्रा. राम शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिंदे यांच्या निवडीचे औपचारिक घोषणा केली. शिंदे यांच्या रूपाने अहिल्यानगर जिल्ह्याला दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे तसेच विरोधकांचे आभार मानले. विधान परिषदेच्या सभापती निवडणुकीसाठी राम शिंदे यांनीच एकमेव अर्ज दाखल केला होता, त्यामुळे त्यांची निवड निश्चित मानली जात होती. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांची ७ जुलै, २०२२ रोजी मुदत संपली होती. तेव्हापासून विधान परिषदेचे सभापतीपद रिक्त होते. राम शिंदे यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून निवड करण्यात यावी…
बुधवार १८ डिसेंबर मुंबई – गेटवे ऑफ इंडियापासून एलिफंटा आयलंडकडे जात असलेल्या बोटीच्या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये १० प्रवाशी आणि तीन नेव्ही कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या अपघातात दोन गंभीर जखमींवर नौदलाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची चौकशी आता मुंबई पोलिस आणि नौदलाकडून करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघातासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, सध्याची आकडेवारी संध्याकाळी साडेसात पर्यंत उपलब्ध होती आणि अंतिम आकडेवारी गुरुवारी सकाळी जाहीर केली जाईल. यावेळी फडणवीस यांनी यावर सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले असून, मुंबई पोलिस आणि नौदलाकडून या प्रकरणाची तपासणी करण्यात येणार आहे. “अद्याप काही…
बुधवार १८ डिसेंबर सिन्नरचे माजी उपनगराध्यक्ष नामदेव लोंढे यांच्या मुलावर हल्ला करण्यात आल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. हल्लेखोरांनी सागर लोंढे यांच्या पाठीवर, डाव्या हातावर, डोक्यावर कोयत्याने वार केल्याने गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले आहे. दुकानात शिरून हल्ला – सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील रस्त्यावर वावी वेस जवळील दोस्ती ट्रेडर्स या स्टीलच्या दुकानात आय ट्वेंटी या चार चाकी कारमधून आलेल्या चौघांपैकी तिघांनी दुकानाचे संचालक सागर नामदेव लोंढे (वय २८) यांच्यावर दुकानात शिरून हा हल्ला केला. सागर यांच्यावर कोयत्याने हल्ला केल्याने गंभीर जखमी झाल्याने आसपासच्या नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलविले. हल्लेखोर संगमनेरच्या दिशेने – हल्ल्यादरम्यान चार चाकी वाहनात थांबून असलेल्या एकाने हवेत…
बुधवार १८ डिसेंबर संगमनेर – मोमीनपुरा ते राजस्थान चौक या भागात महिलांच्या वस्तू विक्रीचे दुकाने उघडण्यात आली आहे. या दुकानदारांकडून महिलांचे नंबर घेतले जात असून यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा प्रकारचे मेसेज समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियातील अशा मेसेज मुळे सामाजिक स्वास्थ बिघडण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. या मेसेज मागील सत्य सायबर सेल आणि पोलिसांनी समोर आणण्याची मागणी होत आहे. यंत्रणांनी या मेसेज मागील सत्यतेची खात्री करून वस्तुस्थिती समोर आणण्याची गरज निर्माण झाली आहे अन्यथा व्हायरल होणाऱ्या मेसेजमधून दोन धर्मियांमध्ये तेढ देखील निर्माण होण्याची शक्यता आहे. निवडणूक काळात देखील धार्मिक तेढ निर्माण होणारे…
बुधवार १८ प्रतिनिधी नाशिक – परदेशात अत्यंत महागडी समजली जाणारी व कर्करोग उपचारावर महत्वाची असलेली ‘कार-टी सेल’ (CAR-T) थेरपी भारतीय संशोधनानंतर सवलतीत उपलब्ध झाली आहे. या सवलतीचा फायदा सर्वसामान्य रुग्णांना होण्यास सुरुवात झाली आहे. ही थेरपी नुकतीच एसएमबीटी हॉस्पिटलच्या कॅन्सर इन्स्टीट्युटमध्ये १७ वर्षीय रुग्णावर यशस्वी पार पडली. या रुग्णाचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले असून हा रुग्ण पूर्णपणे कर्करोगमुक्त झाला आहे. ही थेरपी ल्युकेमिया आणि लिम्फोमा यांसारख्या बी-सेल कर्करोगांवर (रोगप्रतिकारक प्रणालीच्यापेशींमध्ये तयार होणारा कर्करोगाचा प्रकार) उपचार करण्यासाठी महत्वाची असल्याचे एसएमबीटी हॉस्पिटलचे रक्तविकार कर्करोगतज्ञ डॉ. गिरीश बदरखे यांनी सांगितले. कार-टीसेल थेरपी ही मुंबई आयआयटीचे शास्रज्ञ डॉ. राहुल पूरवार आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे…
विशेष प्रतिनिधी / नागपूर राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांच्या याचिकेवर निर्णय प्रलंबित असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळात राज्यपालांनी सात जणांना विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्त केले. ही नियुक्ती बेकायदा असून, या नियुक्त केलेल्या आमदारांची नियुक्ती रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोल्हापूर शहराध्यक्ष सुनील मोदींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. यातील सुनावणीत न्यायालयाने नियुक्त झालेल्या सातही आमदारांना प्रतिवादी म्हणून नोटीसा बजावण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्यासमोर या याचिकेची सुनावणी मंगळवारी मंगळवारी झाली. चित्रा वाघ, विक्रांत…
बुधवार १८ डिसेंबर छत्रपती संभाजीनगर : आईसोबत शेतात गेलेल्या दोघा सख्ख्या भावांचा खेळताना कठडे नसलेल्या विहिरीत पडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना काल मंगळवारी (१७ डिसेंबर) पैठण तालुक्यातील रजापूर शिवारात घडली. गाळ्यात फसलेल्या चिमुकल्यांच मृतदेह अग्निशामक दलाच्या पथकाने बाहेर काढले. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात आली. प्रणव कृष्णा फणसे (वय ६) आणि जय कृष्णा फणसे (वय ९, दोघेही रा. आडूळ ता. बुद्रुक पैठण) अशी मृत पावलेल्या दोन चिमुकल्यांची नावं आहेत. या प्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा विठ्ठल फणसे यांची रजापूर शिवारात गट क्रमांक २८ मध्ये दोन एकर शेती आहे. दरम्यान, काल मंगळवारी कृष्णा यांची पत्नी वर्षा या कामानिमित्त शेतात…
मंगळवार १७ डिसेंबर संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले गावाच्या जवळ असलेल्या बेलसोंडावाडीमध्ये मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेच्या घराला लागलेल्या आगीमध्ये घरातील संसार उपयोगी सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत. दरम्यान याची माहिती मिळताच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयाकडून संबंधित महिलेला संसारोपयोगी वस्तूंची मदत करण्यात आली आहे. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास लाईट नसल्याने मंगल सिताराम घुले या महिलेने आपल्या घरात तेलाचा दिवा लावला होता. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या घुले एकट्याच घरात राहावयास आहे. घरात तेलाचा दिवा लावून घुले शेजारी गेल्या असताना तेलाचा दिवा अचानकपणे खाली पडल्याने संपूर्ण घराणे हळूहळू पेट घेतला. हा प्रकार लक्षात येईपर्यंत आग मोठ्या प्रमाणात…
मंगळवार १७ डिसेंबर संगमनेर – शहरामध्ये नगरपालिकेच्यावतीने सध्या गटारी आणि आणखी काही कामे सुरू आहे. मात्र या कामांसाठी अचानकपणे रस्ते बंद करण्यात आल्याने संगमनेरकर नागरिकांची मोठे गैरसोय होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित भागातील रस्ते, चौक बंद करताना नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच संबंधित रस्ते किती कालावधीसाठी बंद राहणार आहे याची माहिती नागरिकांना देण्याची मागणी संगमनेर नगर परिषदेच्या पथ विक्रेता समितीचे सदस्य दीपक साळुंके यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते मोमीनपुरा या परिसरात, कवी अनंत फंदी नाट्यगृहापाशी, बाजारपेठेत नगर परिषदेच्यावतीने काम सुरू आहेत. त्यामुळे या परिसरातील रस्ते बंद करण्यात आले आहे. मात्र रस्ते बंद…
