Author: अनंत पांगारकर
मुंबई – उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यासाठी महत्वाच्या असलेल्या अनेक विषयांवर गेले अनेक दिवस विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे पाठपुरावा करत आहे. यातील अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत, अनेक प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर तांबे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा नव्याने पदभार स्वीकारलेल्या देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मागण्यांसंदर्भात त्यांच्याशी चर्चा करत निवेदन दिले. संगमनेरसह राज्यातील विविध प्रश्नांसाठी आमदार तांबे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या भेटी घेत आहेत. संबंधित मंत्र्यांकडून विविध विषयांचा पाठपुरावा त्यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू केला आहे. आपल्या कामाचे प्रगती पुस्तक मांडणारे ते राज्यातील एकमेव आमदार आहेत. सभागृहात आणि सभागृहाबाहेर केलेल्या कामांचा आढावा ते आपल्या मतदारांना समाज…
संगमनेर – थोर स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरीत क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त रविवारी (१२जानेवारी) दुपारी साडेबारा वाजता होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्याची जय्यत तयारी यशोधन शेजारील मैदानावर सुरू असून या तयारीची माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाहणी केली. यशोधन जनसंपर्क कार्यालयाशेजारील मैदानावर प्रेरणा दिनानिमित्त होणाऱ्या जयंती महोत्सव कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांचा जयंती महोत्सव हा उत्तर महाराष्ट्रातील मोठा सांस्कृतिक महोत्सव असतो. यानिमित्त भव्य दिव्य पुरस्कार वितरण सोहळ्यासह दरवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी रविवारी कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज व विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या…
शुक्रवार, १० जानेवारी छत्रपती संभाजीनगर: जन्मदात्या आईवर बलात्कार करणाऱ्या आरोपी मुलास सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. तांबोळी यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ही घटना जालना जिल्ह्यातील पारेगाव येथे १ मे २०२३ रोजी रात्री घडली. आरोपी राहुल गौतम गोवकवाड (२७, रा. पारेगाव, ता. जि. जालना) याला न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची शिक्षा व ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. पीडिता व आरोपी हे नात्याने मायलेक असून, १ मे २०२३ रोजी रात्री ८ वाजता आरोपी व पीडिता हे जेवण करून घराबाहेर अंगणात झोपलेले होते. आरोपीने घरात जाऊन घरातील लाईट बंद करून अंधार केला. मोबाईलची बॅटरी…
विशेष प्रतिनिधी / मुंबई अवादा कंपनीनं मे महिन्यांपूर्वी वाल्मिक कराडविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी कारवाई का केली नाही? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, माजी मंत्री अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिकांवर ऐकीव माहितीवर ‘ईडी’कडून कारवाई करण्यात आली, याकडे सुप्रिया सुळे यांनी लक्ष वेधले आहे. त्या मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या, काळा पैसा रोखण्यासाठी काँग्रेसच्या आघाडी सरकारने ‘पीएमएलए’ कायदा आणला होता. खंडणीचा गुन्हा हा ‘पीएमएल’ कायद्याअंतर्गत येतो. वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. मग, ईडी आणि ‘पीएमएलए’अंतर्गत महाराष्ट्र आणि केंद्र सरकारनं कारवाई का केली नाही. अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब…
विशेष प्रतिनिधी/ मुंबई राज्यपाल नामनिर्देशित विधानपरिषदेच्या बारा आमदारांच्या नियुक्तीबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरेंची शिवसेना आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. कॅबिनेट बैठकीत यादी मागे घेण्याचा निर्णय कायदेशीर असल्याचं म्हणत उच्च न्यायालयानं ठाकरेंच्या शिवसेनेची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे महायुती सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या लहरी निर्णयाची न्यायालयाने पाठराखण केल्याचा विरोधकांनी दावा केला आहे. महायुती सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका ठाकरेंच्या शिवसेनेचे कोल्हापूर शहराध्यक्ष सुनील मोदी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोषारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये विधान…
श्रीरामपूर : तालुक्यातील गोंडेगाव-पुणतांबा रस्त्यावर अवैधपणे गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन जणांकडून ३ लाख ५२ हजार ६०० रुपये किंमतीचा ३५.२६ किलो गांजा जप्त करण्यात आला. सदर कारवाई तालुका पोलीस व अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालय यांच्या एकत्रित पथकाकडून करण्यात आली. तालुका पोलीस निरिक्षक दशरथ चौधरी यांना दोन इसम पिकअप (क्र. एमएच ४३ एडी ८२१८) मध्ये गांजासदृश अंमली पदार्थ घेवून मध्यप्रदेशकडून कोपरगाव पुणतांबा मार्गे श्रीरामपूरला येत असल्याची गुप्त माहीती मिळाली. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीस निरिक्षक दशरथ चौधरी, पोलीस उप-निरिक्षक संदिप मुरकुटे, सहाय्यक फौजदार सतिष गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र लवांडे, प्रशांत रणनवरे, साजीद पठाण, श्रीकांत वाबळे, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस हेड कॉन्स्टेबल…
मुंबई – राज्यातील नागरिकांना आवश्यक त्या सेवा सुलभतेने उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ‘आपले सरकार सेवा पोर्टल’द्वारे सद्यस्थितीत ५३६ ऑनलाईन सेवा दिल्या जात आहेत, त्याचा नागरिकांना व्यापक प्रमाणात उपयोग होत आहे. या पार्श्वभूमीवर या ऑनलाईन सेवांमध्ये वाढ करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सेवा हक्क आयोगाची बुधवारी आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे पार पडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकार्यांना महत्त्वाचे निर्देश दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गतिमान पारदर्शक कार्यपद्धतीच्या दृष्टीने लोकांना उपयुक्त ठरत असलेल्या ‘आपले सरकार सेवा पोर्टल’द्वारे ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होते. अधिक सक्रियतेने आणि सुलभरित्या व्यापक स्वरुपात…
संगमनेर – वडगाव पान (ता. संगमनेर) येथे असलेल्या मिळकती संदर्भात सुरू असलेल्या वादात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ होत असल्याच्या कारणावरून येत्या २६ जानेवारीला कुटुंबीयांसह उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा संगमनेरमधील रहिवाशी गणेश अनंत रासने यांनी दिला आहे. या संदर्भात दिलेल्या उपोषणाच्या नोटीसमध्ये रासने यांनी म्हटले आहे की, त्यांच्या मालकीची वडगाव पाण्याचे सर्वे नंबर १३/१ जुना सर्वे नंबर १३/१ (अ) क्षेत्र ०.६१ आर ही मिळकत असून या मिळकतीशी दुरान्वये कोणताही संबंध नसलेले जनार्दन साधू गायकवाड यांच्यासह अन्य काही जणांनी रासने यांच्या मालकीच्या मिळकतीत वहिवाटीस हरकत, अडथळा सुरू केला होता. तसेच दक्षिण उत्तर बांधून रासने यांच्या मालकीचे क्षेत्र…
मुंबई, दि. ९ : शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी अधिकाधिक सेवा अद्यावत करून त्या अधिक दर्जेदार द्याव्यात. वैद्यकीय शिक्षण अंतर्गत असलेल्या सर्व शैक्षणिक संस्थांचे बळकटीकरण करा. औषध व अन्नपदार्थ मधील भेसळीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना करावी. भविष्यातील आव्हाने ओळखुन प्रशासन गतिमान करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन व सामान्य प्रशासन विभाग यांच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने बैठक झाली, या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री योगेश कदम यावेळी उपस्थित होते.…
मुंबई – नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेरशी संबंधित विविध प्रश्न हिवाळी अधिवेशनात उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधले होते. या अनुषंगाने तांबे यांनी पुन्हा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तांबे यांनी या भेटीत पुन्हा एकदा संगमनेरशी संबंधित मागण्यांचा राज्यातील जनतेच्या हिताच्या प्रश्नांसंदर्भात सविस्तर चर्चा केली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व मागण्या ऐकून घेत याविषयी सकारात्मक पावलं उचलली जातील असा विश्वास दिला असल्याचे म्हटले आहे. या प्रश्नांवर तांबे यांनी केली उपमुख्यमंत्र्यांची चर्चा… 📌 नाशिक-पुणे औद्योगिक महामार्गाचे काम लवकरात लवकर तडीस नेण्यासह या महामार्गाच्या रेखांकनात संगमनेर शहरासाठी इंटरचेंज प्रस्तावित करा. 📌 संगमनेर शहरातील अतिक्रमणीत झोपडपट्टी भागात व भाड्याच्या…
