Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज शेतात आईवडील कापुस वेचत असताना जवळच शेतात खेळत असलेल्या ९ वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वैजापूर तालुक्यातील कविटखेडा येथे बुधवारी (ता. १५ जानेवारी) रोजी घडली आहे. या घटनेने परिसरातील शेतकऱ्यात खळबळ उडाली आहे. महेश सिद्धार्थ आखडे असे घटनेत मुत्यु झालेल्या शेतमजूर मुलांचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, गोरख चव्हाण यांच्या कविटखेडा शिवारातील गट क्रं १३३ मध्ये सकाळी ११ वाजेच्या दरम्यान घडली. कविटखेडा शिवारात शेतातील कामे करण्यासाठी मध्यप्रदेश येथील शेतमजूर सकाळी कापूस वेचणीसाठी गेले होते. दरम्यान, त्यांचा ९ वर्षांचा मुलगा महेश हा शेतातच खेळत असताना दडी धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप…

Read More

संगमनेर – राज्यात बिबट्यांची संख्या वाढत असून त्यांचे मानवी वस्तीवरील हल्ले चिंतेचा विषय ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर बिबट्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी त्यांची नसबंदी करण्याची मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली होती. त्यासंदर्भातील निवेदनदेखील त्यांनी सरकारला दिले होते. बिबट्यांच्या नसबंदीबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. मात्र यासाठी केंद्र सरकारची परवानगी लागत असल्याने तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात येईल, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी १४ जानेवारीला पत्रकार परिषदेत सांगितले. ऊस तोडल्यानंतर बिबट्यांचा अधिवास संपतो आणि ते मानवी वस्तीत जातात. मग मानवी वस्तीतील कुत्रे, शेतात काम करणारे शेतकरी यांच्यावर हल्ला होण्याचे प्रकार घडतात. आमदार सत्यजित तांबे यांनी चार दिवसांपूर्वी बिबट्यांच्या नसबंदीबाबत पत्र दिले आहे.…

Read More

जामखेड – शहरालगत असणाऱ्या जांबवडी रस्त्यावर बुधवारी भीषण अपघात घडला आहे. या अपघातात बोलेरो वाहन रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे नियंत्रण सुटून विहिरीत पडले. या दुर्दैवी घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. अशोक विठ्ठल शेळके (वय २९), रामहरी गंगाधर शेळके (वय ३५), किशोर मोहन पवार (वय ३०), चक्रपाणी सुनील बारस्कर (वय २५) अशी ह्या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहे. हे चौघेही अपघातग्रस्त बोलेरोमधून प्रवास करत होते. अपघातग्रस्त बोलेरो जांबवडी गावाच्या दिशेने जामखेडकडे येत असताना रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खडीवरून गेल्याने बोलेरो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बोलेरो गाडी रस्त्यालगत असलेल्या विहिरीत जाऊन पडली. या घटनेमुळे अपघातस्थळी एकच खळबळ उडाली. अपघाताची माहिती मिळताच सामाजिक…

Read More

संगमनेर दि. १५ – एका गावाहून दुसऱ्या गावी थेट मटणाचे जेवण करण्यासाठी गेलेल्या दोघा जणांनी मटन खाताना मटणाचे पीस हे बोकड मटण नसून दुसऱ्या प्राण्याचे पीस आहे, असा संशय घेतल्याने हाणामारी आणि जातीवाचक शिवीगाळ झाल्याची तक्रार झाल्यानंतर एकमेकाविरोधात ॲट्रॉसिटी आणि इतर गुन्हे दाखल करण्याची घटना घडली आहे. संगमनेर तालुक्यातील पठार भागात असणाऱ्या साकूर येथील हॉटेल आसरा या ठिकाणी संगमनेर तालुक्यातीलच अंभोरे गावातून आदिनाथ तुकाराम मोरे (वय २४ वर्ष, धंदा मजुरी, रा. अंभोरे, ता. संगमनेर) हा मित्र केतन याच्यासमवेत आसरा हॉटेलमध्ये मटणाचे जेवण करण्यासाठी गेले होता. जेवणात दिलेले मटणाचे पीस हे बोकडाचे नसल्याचे संशय आला व त्यामुळे मित्राला उलट्या झाल्या. या…

Read More

संगमनेर – राज्यभरात अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या सहकारमहर्षी T- 20 क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण व अंतिम सामन्यासाठी शुक्रवारी (१७ जानेवारी) दुपारी चार वाजता भारताचा माजी कसोटी कर्णधार तथा संगमनेर तालुक्याचा सुपुत्र अजिंक्य रहाणे उपस्थित राहणार आहे. याशिवाय माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती स्पर्धेचे संयोजक आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे. जयहिंद लोकचळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे एक जानेवारीपासून राज्यस्तरीय टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेचे हे २५ वे वर्ष असून यामध्ये ३२ संघांचा सहभाग आहे. यावर्षी या स्पर्धेत रणजी…

Read More

अहिल्यानगर दि. १५- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २२ जानेवारी २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Read More

शिर्डी, दि. १५ – शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात सोडण्यास बंदी घालण्याचे आदेश शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी जारी केले आहेत. शिर्डी विमानतळ येथे दिवसा व रात्री वेगवेगळ्या विमान कंपन्यांची विमाने व हेलिकॉप्टर उतरत असतात आणि उड्डाण करीत असतात. रात्रीच्यावेळी वैमानिकांना दिशा आणि ठिकाण निश्चित करण्यासाठी धावपट्टीवर आणि हवाई वाहतूक नियत्रंण (एटीसी) टॉवरद्वारे लाईटचा उपयोग केला जातो. शिर्डी विमानतळ परिसरातील २५ किलोमीटर परिघात उच्च शक्तीच्या लेझरमुळे वैमानिकांचे लक्ष विचलित होणे आणि संभाव्य अक्षमतेमुळे विमानाच्या कार्यप्रणालीत गंभीर अडथळे येऊ शकतात. सहज हाताळता येणाऱ्या (हॅंड हेल्ड लेझर) उपकरणाची कमी किंमत व बाजारातील सहज उपलब्धतेमुळे अशा…

Read More

मुंबई – मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी संदर्भात महायुतीचे नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत, महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी मोठ वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत निवडणुकीआधी सरकारने बहिणींना २१०० रुपये देण्याची घोषणा केली होती. ही घोषणा प्रत्यक्षात येण्यापूर्वीच आता सुमारे ६० लाख महिलांचे या योजनेतील अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. माजी मंत्री भुजबळ यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अपात्र असलेल्या महिलांना स्वतःहून नावे मागे घेण्यास सांगितले होते. जर बहिणींनी स्वतःहून या योजनेतून नाव काढले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही भुजबळ यांनी म्हटले होते. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण…

Read More

मुंबई – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना नेत्यांच्या बैठकीमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हटविण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी दिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या औचीत्यावर शिवसेनेचा मेळावा आयोजित केला जाणार आहे. शिवसेनेचे खासदार आणि आमदार या मेळाव्याला उपस्थित राहतील, असं कदम यांनी म्हटलं आहे. शिंदे गटाच्या या मागणीमुळे पुन्हा एकदा शिंदे व ठाकरे गटामधील वाद उफाळून येण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असलेले आमदार प्रसाद लाड यांनी नोव्हेंबर २०२२…

Read More

संगमनेर – संक्रांतीच्या पूर्वसंध्येला प्राण घातक ठरू शकणाऱ्या नायलॉन मांजा विक्रेत्यावर संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने कारवाई करत सुमारे साडेसात हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केला. नायलॉन मांजामुळे पक्षी, प्राणी व मानवी जीवितास इजा होण्याची शक्यता असल्याने याची जाणीव असताना देखील संगमनेरमध्ये नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांना मिळाली होते. त्यांनी आपल्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे, पोलीस नाईक राहुल डोके, महिला पोलीस कॉन्स्टेबल ताई शिंदे यांना संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिले. पथकाने बाजारपेठेतील गृह वस्तू भंडाराजवळील तेली खुंट परिसरात मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकला असता तेथे जहीर रऊप…

Read More