Author: अनंत पांगारकर
२० जानेवारीपासून दुकानासमोर बानोबी शेख करणार उपोषण संगमनेर – संगमनेर नगर परिषदेच्या मालकीच्या मिळकतीवर अवैधरित्या सुरू असलेले दारू विक्रीचे दुकान बंद करण्याची मागणी करण्यात आली असून यासंदर्भात पालिका व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून देखील दखल घेतली जात नसल्याने येत्या सोमवारपासून (२० जानेवारी) दुकान समोरील रस्त्यावर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला असून या उपोषणात सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक सहभागी होणार आहे, अशी माहिती तक्रारकर्त्या बानोबी शेख यांनी दिली आहे. दरम्यान या विषयावरून दोन दिवसांपूर्वी संगमनेर नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेवेळी या परिसरातील नागरिक, माजी नगरसेवकांनी मुख्याधिकारी तसेच पोलीस प्रशासनाला घेराव घालत संबंधित दुकानावर कारवाई करण्याची मागणी केली…
अहिल्यानगर ता. १७ – ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला चालना मिळून गावकऱ्यांना सक्षम करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या स्वामित्व योजनेंतर्गत ५० लाख मालमत्ता पत्रकाचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात येणार आहे. शनिवारी (१८ जानेवारी) रोजी दुपारी १२-३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या योजनेअंतर्गत भूमी अभिलेख विभागामार्फत आतापर्यंत ३ लाख १७ हजार गावांमधून ड्रोनद्वारे सर्व्हेचे काम पूर्ण करण्यात आले असुन १ लाख १९ हजार गावांमधून २ कोटी १९ लाख मालमत्ता पत्रक तयार करण्यात…
महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक-पुणे महामार्गावर शुक्रवारी (१७ जानेवारी) सकाळी झालेल्या तीन वाहनांच्या भीषण अपघातामध्ये नऊ जणांचा करुण अंत झाला आहे. तर सात जण गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिकमधील दुर्दैवी घटनेत आत्तापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला. आता त्या पाठोपाठ नारायणगाव जवळ झालेल्या या अपघातामुळे महाराष्ट्र हळहळला आहे. एसटी बस, ट्रक आणि मॅक्झिमो व्हॅनमध्ये हा मोठा अपघात झाला. देबुबाई दामू टाकळकर (वय ६५ वर्ष, रा. वैशखखेडे ता. जुन्नर जि. पुणे), विनोद केरूभाऊ रोकडे (वय ५० वर्ष, रा. कांदळी ता. जुन्नर जि. पुणे), युवराज महादेव वाव्हळ (वय २३ वर्ष, रा. १४ नंबर कांदळी ता. जुन्नर…
संगमनेर – १२ गायी आणि २ वासरांची संगमनेरच्या बेकायदेशीर कत्तलखान्यात कत्तल होण्यापूर्वीच पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने गुरुवारी संध्याकाळी या गोवंश जनावरांना जीवदान दिले आहे. संगमनेर शहरातील मदिना नगर येथे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात हा प्रकार समोर आला. संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांना मदिनानगरमधील एका काटवणामध्ये कत्तलीसाठी जिवंत गोवंश जनावरे बांधून ठेवले असल्याची माहिती मिळाली होती. सोनवणे यांनी यासंदर्भात आपल्या पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांना माहिती देत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पोलीस उपाधीक्षकांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे व पोलीस नाईक राहुल डोके यांचे घटनास्थळी जात मिळालेल्या माहितीच्या आधारे मदिनानगरमध्ये जात पाहणी केली असता पथकाला चौदा…
मुंबई – गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्य निवडणूक आयुक्तपदाच्या उमेदवाराची शिफारस करण्याचे सर्वाधिकार देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. याबाबतची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. यापूर्वी, राज्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाला राज्य निवडणूक आयुक्तपदासाठी मुख्यमंत्र्यांकडे नावाची शिफारस करण्याचे अधिकार होते, त्यानंतर मुख्यमंत्री ते नाव राज्यपालांकडे पाठवायचे. पण मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे आता मुख्यमंत्री राज्यपालांना थेट उमेदवाराची शिफारस करतील. राज्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर सध्या प्रशासक आहेत. तसेच येत्या काही महिन्यांत या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयाला महत्व प्राप्त झाले आहे. दरम्यान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाद्वारे घेण्यात येतात. स्थानिक स्वराज्य संस्थांवर…
मुंबई, दि. १६ : राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यासाठीची ऑनलाईन प्रणाली विकसीत करा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (१६ जानेवारी) राज्य मंत्री परिषदेची बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कॅबिनेट आणि राज्य मंत्री उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील विविध विभागांच्या ९६९ सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी आपले सरकार पोर्टल वर ५३६ सेवा उपलब्ध आहेत. ९० सेवा संबंधित विभागांच्या पोर्टलवर उपलब्ध आहेत. मात्र सुमारे ३४३ सेवा ऑफलाईन पध्दतीने दिल्या जातात. मात्र या सर्वच सेवा आपले…
मुंबई : महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावला आहे. वेगवेगळे निर्णय घेत प्रशासनावर एकहाती अंमल बसवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अशातच त्यांच्या एका नवीन निर्णयामुळे पुन्हा एकदा महायुतीच्या मंत्र्यांमध्ये खळबळ उडाली आहे. नव्या सरकारमध्ये मंत्री आस्थापनेवर खासगी सचिव अथवा विशेष कार्य अधिकारी अशा महत्त्वाच्या पदांवर खासगी व्यक्तीच्या नियुक्तीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मंत्र्यांना धक्का बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी महायुतीच्या आमदारांची शाळा घेतली. त्यावेळेस त्यांनी या सर्व आमदारांना महत्त्वाचा कानमंत्र दिला. सरकारी अधिकाऱ्यांसोबत नम्रपणे बोला, बदली आणि दलाली अशा कामापासून…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेला सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतर देखील यात सहभागी असलेल्या बेरोजगार तरुणांना अद्यापही या योजनेचे मानधन मिळालेले नाही. या मानधना संदर्भात प्रांताधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शास्त्र भारतीय संघटनेच्यावतीने निवेदन पाठविण्यात आले आहे. सहभागी बेरोजगार तरुणांना मानधन न मिळाल्यास छात्र भारती संघटनेच्यावतीने राज्यभर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. युवा वर्गाचे शिक्षण पूर्ण झाल्यांनतर वेळेत योग्य मार्गदर्शन आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी भांडवल उपलब्धता शासन विविध योजनांच्या माध्यमातून करून देत आहे. रोजगार इच्छुक युवक-युवती आणि रोजगार देणाऱ्या विविध आस्थापना यांच्यामध्ये संवाद आणि समन्वय साधून उद्योग क्षेत्राला आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ आणि युवा वर्गाला रोजगाराच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज शेतात आईवडील कापुस वेचत असताना जवळच शेतात खेळत असलेल्या ९ वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वैजापूर तालुक्यातील कविटखेडा येथे बुधवारी (ता. १५ जानेवारी) रोजी घडली आहे. या घटनेने परिसरातील शेतकऱ्यात खळबळ उडाली आहे. महेश सिद्धार्थ आखडे असे घटनेत मुत्यु झालेल्या शेतमजूर मुलांचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, गोरख चव्हाण यांच्या कविटखेडा शिवारातील गट क्रं १३३ मध्ये सकाळी ११ वाजेच्या दरम्यान घडली. कविटखेडा शिवारात शेतातील कामे करण्यासाठी मध्यप्रदेश येथील शेतमजूर सकाळी कापूस वेचणीसाठी गेले होते. दरम्यान, त्यांचा ९ वर्षांचा मुलगा महेश हा शेतातच खेळत असताना दडी धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप…
संगमनेर – राज्यात बिबट्यांची संख्या वाढत असून त्यांचे मानवी वस्तीवरील हल्ले चिंतेचा विषय ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर बिबट्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी त्यांची नसबंदी करण्याची मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली होती. त्यासंदर्भातील निवेदनदेखील त्यांनी सरकारला दिले होते. बिबट्यांच्या नसबंदीबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. मात्र यासाठी केंद्र सरकारची परवानगी लागत असल्याने तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात येईल, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी १४ जानेवारीला पत्रकार परिषदेत सांगितले. ऊस तोडल्यानंतर बिबट्यांचा अधिवास संपतो आणि ते मानवी वस्तीत जातात. मग मानवी वस्तीतील कुत्रे, शेतात काम करणारे शेतकरी यांच्यावर हल्ला होण्याचे प्रकार घडतात. आमदार सत्यजित तांबे यांनी चार दिवसांपूर्वी बिबट्यांच्या नसबंदीबाबत पत्र दिले आहे.…
