Author: अनंत पांगारकर

संगमनेर, दि. १८ फेब्रुवारी – संगमनेर तालुक्यातील समनापुर येथे सुरू असलेल्या कादर शहावली संदल दरम्यान दोन गटात झालेल्या दगडफेकीत एक जण जखमी झाला असून सात जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील समनापूर येथे सुरू असलेल्या यात्रे दरम्यान दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास समनापुर येथील मारुती मंदिरासमोरील मोकळ्या पटांगणात घडली. ज्यावेळी दोन्ही गटात दगडफेक करण्यात आली. यासंदर्भात शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गॅरेज व्यवसाय करणारा पंकज गोरक्षनाथ नेहे (वय ३२, रा. चांडे वस्ती, निळवंडे रोड, समनापुर ता. संगमनेर जि. अहिल्यानगर) हा तरुण सोमवारी (१७…

Read More

मुंबई, दि. १८ फेब्रुवारी – नऊ आयएएस अधिकाऱ्यांच्या राज्य सरकारने मंगळवारी बदल्या केल्या. यात आहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचा समावेश असून त्यांच्यावर पुण्यात आता मोठी जबाबदारी टाकण्यात आली असून ते पुण्याचे नवे साखर आयुक्त असतील. सालीमठ यांच्या रिक्त झालेल्या जागेवर अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी म्हणून अद्याप नवीन नियुक्ती करण्यात आलेली नाही. राज्य सरकारने या अधिकाऱ्यांच्या केल्या बदल्या… १) डॉ. विजय सुर्यवंशी (IAS: NON-SCS:2006) आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई यांची विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. २) डॉ. राजेश देशमुख (IAS:SCS:2008) विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई यांना आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. ३)…

Read More

अहिल्यानगर, दि. १८ फेब्रुवारी – खांबावर जाहिरात फलक लावल्याप्रकरणी संगमनेरमधील अकॅडमी चालकाविरुद्ध अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रस्त्यावरील जाहिरात फलकांचा (फ्लेक्स) विषय चर्चेत आला आहे. अहिल्यानगर पुणे रस्त्यावर उड्डाणपुलाच्या खांबाला जाहिरातीचा फलक लावल्याप्रकरणी संगमनेर येथील आर्य अकॅडमी चे सुनील खंडेराव फटांगरे (रा. सायखिंडी, ता. संगमनेर) यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपीकरणास प्रतिबंध अधिनियम २९९६ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अहिल्यानगर महापालिकेचे प्रभाग अधिकारी राकेश कोतकर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवारी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी अहिल्यानगर पुणे रस्त्यावरील उड्डाणपुलाखालील रस्त्यावर स्वच्छता करत होते. यावेळी…

Read More

संगमनेर, दि. १८ फेब्रुवारी –  सकल मराठा समाजाच्यावतीन गेल्या दहा वर्षापासून १९ फेब्रुवारीला संगमनेर बस स्थानकाच्या प्रवेशद्वारापाशी शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. यावर्षी मात्र या उत्सवाला गालबोट लागले आहे. काही मंडळींनी दादागिरी करून हा जयंती उत्सव रद्द करण्यास सकल मराठा समाजाला भाग पाडल्याची माहिती समोर येत आहे. शिवजयंती उत्सवावरून संगमनेरमध्ये राजकारण तापलेले आहे. महायुतीच्यावतीने यावर्षी शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे, पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार हा उत्सव संध्याकाळी मिरवणुकीने साजरा होणार होता. दरम्यान सकाळच्या सत्रात सकल मराठा समाजाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बसस्थानकाच्या दरम्यान शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार होता.  यामध्ये सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन, मॅरेथॉन, मर्दानी खेळ, लाईट शो, आरोग्य…

Read More

संगमनेर दि. १८ फेब्रुवारी –  वेळेत आपल्या कामात सुधारणा करा नाहीतर बदल्या करून घ्या, माझ्या मतदारसंघात हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा महावितरण कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा देत येथून पुढे जर विजेचे रोहित्र जळाले तर ग्रामस्थांनी वर्गणी काढायची नाही तसेच तीन दिवसाच्या आत अधिकाऱ्यांनी वीज रोहित्र उपलब्ध करून देण्याचे निर्देश संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. पठार भागातील साकुर उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या साकुर, मांडवे, कर्जुले पठार, डोळसणे, घारगाव, खांबे या महावितरणच्या उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या गावांची आढावा बैठक खताळ यांच्या उपस्थितीत सोमवारी पार पडली. या बैठकीत ग्रामस्थांनी महावितरणच्या कारभाराविरोधातील तक्रारींचा पाढाच आमदार खताळ यांच्यासमोर मांडला.  यावेळी बाबासाहेब…

Read More

मंगळवार, दि. १८ फेब्रुवारी –  नव्या कायद्याअंतर्गत ज्ञानेश कुमार यांची भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. ते सध्याचे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची जागा घेतील. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या केंद्रीय निवडणूक आयोगातील कार्यकाळाला एक वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांना बढती मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. निवृत्तीनंतर त्यांना १४ मार्च २०२४ ला लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्त म्हणून घेण्यात आलं होतं. ज्ञानेश कुमार यांनी १४ मार्चला पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १५ मार्चला लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या होत्या. ज्ञानेश कुमार हे १९८८ बॅचचे केरळ कॅडरचे…

Read More

संगमनेर, दि. १७ फेब्रुवारी –  अनेक गावांसाठी गैरसोयीच्या ठरणाऱ्या आश्वी बुद्रुक येथील अपर तहसील कार्यालयाचा वाद चांगलाच पेटला आहे. तालुक्याचा विकास रोखण्यासाठी व तालुक्याची तोडफोड करण्यासाठी सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी कुटील डाव करत आश्वी बुद्रुक येथे अपर तहसील कार्यालय नियोजित केले आहे. हा अन्यायकारक निर्णय तातडीने रद्द करावा अन्यथा तालुका पेटून उठेल, असा आक्रमक इशारा कृती समितीने निवेदन देत प्रशासनाला दिला आहे. सोमवारी (१७ फेब्रुवारी) नव्याने होऊ घातलेल्या आश्वी बुद्रुक अपर तहसील कार्यालयात समाविष्ट करण्यात येणाऱ्या ६२ गावांच्या प्रतिनिधींनी तहसीलदार धीरज मांजरे यांच्या कार्यालयासमोर ‘जबाब दो’ म्हणत आंदोलन केले. यावेळी आर. बी. राहणे, भाऊराव रहाणे, शांताराम कढणे, सुभाष गुंजाळ, अरुण गुंजाळ, सिताराम…

Read More

अहिल्यानगर, दि. १७ –  जिल्हा नियोजन समितीने डॉ. झाकिर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना २०२४-२५ अंतर्गत मदरशांमध्ये मूलभूत आणि आधुनिक सुविधा पुरवण्यासाठी प्रस्ताव मागविले आहेत.  इच्छुक मदरशांनी २२ फेब्रुवारी २०२५ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा डॉ. झाकिर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेचे सदस्य सचिव दीपक दातीर यांनी केले आहे. मदरसा आधुनिकीकरण योजनेचा लाभ राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असलेल्या मदरशांना मिळेल. एसपीक्यूईएम या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत लाभ मिळणाऱ्या मदरशांना ही योजना लागू राहणार नाही.  मदरशांमध्ये विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी व इंग्रजी इत्यादी विषयांचा अभ्यासक्रम राज्यशासनाच्या अन्य शाळांप्रमाणे राहील. तसेच, शिक्षकांचे प्रतिदिन ५ तासिका याप्रमाणे…

Read More

मुंबई, दि. १७ फेब्रुवारी –  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पदग्रहण सोहळा उद्या मंगळवारी (१८ फेब्रुवारी) मरीन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात दुपारी १ वाजता होणार आहे. या कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळ हे नाना पटोले यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतील.   काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, ज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया व कम्युनिकेशन विभागाचे चेअरमन पवन खेरा, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष खा. इम्रान प्रतापगडी प्रदेश कार्याध्यक्ष व काँग्रेस वर्किंग…

Read More

संगमनेर – आमदार सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये झालेल्या “आय लव संगमनेर चळवळ” अंतर्गत युथोत्सव नोकरी मेळाव्यात जिल्हाभरातून ७२९० तरुणांनी सहभाग नोंदवला. या नोकरी मेळाव्यात सहभागी झालेल्या ९१ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधून २०१९ विद्यार्थ्यांची थेट नोकरीसाठी निवड झाली आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात आय लव संगमनेर लोक चळवळीच्यावतीने आयोजित युथोत्सव नोकरी मेळावा रविवारी पार पडला. राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आयोजक आमदार सत्यजित तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, हर्ष मालपाणी, प्रज्वल भळगट, किरण रहाणे आदींसह विविध कंपन्यांचे एच आर मॅनेजर यावेळी उपस्थित होते. या नोकरी मेळाव्यात, कॅम्पस इंटरव्यू, रोजगार, व्यवसाय मार्गदर्शन, शासकीय योजनांची माहिती असे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संगमनेर…

Read More