Author: अनंत पांगारकर
गुरुवार, २६ सप्टेंबर राहाता – माझ्यावर समन्यायीचा आरोप करणारे तेव्हा कुठे होते? मंत्रिमंडळात तुम्हीही होता मग का नाही बोललात? संगमनेरमधून आम्ही भूमिका घेत समन्यायीबद्दल विरोध दर्शविला. महसूलमंत्री असताना आम्ही खोट्या केसेस करून लोकांना जेलमध्ये टाकले नाही. असं स्पष्ट करत गणेश कारखान्यात इतिहास का घडला हे विसरू नका, कारण जर आपण ते विसरलो तर पुन्हा सगळं जैसे थे होईल अशी टीका माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांवर केली. गणेश सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा कार्यस्थळावर पार पडली. यावेळी माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात बोलत होते. व्यासपीठावर सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष, युवानेते विवेक कोल्हे, कृषी भूषण…
शेतकऱ्याकडे मागितले दीड हजार रुपये कृषी अधिकाऱ्यांच्या पत्राची कंपनीने दखल घेत पैसे मागणाऱ्या प्रतिनिधीवर केली कारवाई गुरुवार, २६ सप्टेंबर पिक विमा असल्याने शेतातील पिकाचा पंचनामा करण्यासाठी संबंधित इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधीने शेतकऱ्याकडे दीड हजार रुपयांची मागणी करण्याचा धक्कादायक प्रकार संगमनेरमधून समोर आला आहे. या संदर्भात शेतकऱ्याने कृषी विभागाकडे केलेल्या तक्रारीनंतर कृषी विभागाच्या पत्राची दखल घेत संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील शेतकरी विश्वास दातीर यांनी इन्शुरन्स कंपनीकडे खरीप हंगाम २०२४-२५ अंतर्गत पिक विमा काढला होता. पिक विम्यास पात्र असल्याने त्यांनी संबंधित कंपनीकडे ऑनलाइन तक्रार केली होती. त्यानंतर संबंधित कंपनीने आपला प्रतिनिधी पिकाच्या पंचनाम्यासाठी…
गुरुवार, २६ सप्टेंबर “पंतप्रधान गणपतीचे मोदक खायला सरन्यायाधीशांकडे जातात. मग भ्रष्टाचाऱ्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या आमच्या सारख्या लोकांना न्याय कसा मिळेल? हे अपेक्षितच होतं. अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं होतं की न्यायव्यवस्था कोणाची तरी रखेल झाली आहे, हे स्पष्ट दिसतंय. आम्ही त्या कोर्टाचा आदर करतो, आम्ही नक्की वरच्या कोर्टात जाऊ”, असे सांगत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि न्यायव्यवस्थेवर टीका केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर मेधा सोमय्या यांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. या प्रकरणात माझगाव कोर्टाने त्यांना दोषी ठरवले असून त्यांना १५ दिवसांची शिक्षा सुनावली आहे. तर, त्यांना न्यायालयाने २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला असून ही रक्कम मेधा यांना…
गुरुवार, २६ सप्टेंबर मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अब्रुनुकसानीच्या खटल्या प्रकरणी संजय राऊत यांना न्यायालयाने १५ दिवसांचा तुरुंगवास आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. वकील विवेकानंद गुप्ता यांनी या संदर्भात माहिती दिली. संजय राऊत यांनी डॉ. मेधा सोमय्या आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला होता. हा आरोप खोटा असल्याचा दावा करत मेधा सोमय्या यांनी माजगावच्या न्यायालयात संजय राऊत यांच्यावर १०० करोड रुपये अब्रुनुकसानीचा दावा केला होता. काय होता आरोप? मीरा भाईंदरमध्ये शौचालय बांधकामात १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. या विरोधात मेधा सोमय्या यांनीच…
प्रांताधिकारी, तहसीलदारांनीही केली ठेकेदाराची कान उघाडणी, तरीही पडेना फरक संगमनेर – अनंत पांगारकर नासिक-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत संगमनेर तालुक्यातील साकुर फाटा येथे सध्या महत्त्वाच्या ठिकाणी साईड रस्ते आणि साईड गटारी काढण्यात येत असून ही कामे अतिशय निकृष्ट दर्जाची होत असल्याचा गंभीर आरोप हिवरगाव पठार भागातील नागरिकांनी केला आहे. सध्या सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे रस्त्यावरील पाणी नागरिकांच्या घरामध्ये, दुकानांमध्ये शिरले आहे. यामुळे घरातील संसार उपयोगी वस्तूंचे व दुकानातील मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या कामाकडे संबंधित ठेकेदार दुर्लक्ष करत असल्याने या विरोधात महामार्गावरच आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. साईड गटाराचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. या संदर्भात…
असा आहे तुमचा आजचा दिवस मेष – एखाद्या मित्राकडून तुमचा विश्वासघात होऊ शकतो. मनात चढ-उतार असतील. आत्मविश्वासाची कमतरता देखील असेल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. वृषभ – अनावश्यक राग आणि वादविवाद टाळा. व्यवसायात वाढ होईल. लाभाच्या संधी मिळतील. मनात शांती आणि आनंद राहील. मिथुन – शैक्षणिक कार्यात रस राहील. नोकरीच्या ठिकाणी बदल होऊ शकतो. नवीन व्यवसाय सुरू होऊ शकतो. उत्पन्न वाढेल. तीर्थयात्रेला जाता येईल. कर्क – लोकांशी बोलताना संयम बाळगा. मन अस्वस्थ होऊ शकते. अनावश्यक राग आणि वादविवादापासून दूर राहा. सरकारकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. सिंह – वाणीच्या प्रभावामुळे सर्व कामे पूर्ण होतील. कपडे वगैरे भेटवस्तू म्हणून…
विशेष लेख राज्यातील महिलांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे, कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे, गरीब महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करणे, महिलांचे सक्षमीकरण करणे तसेच पर्यावरणाची हानी टाळणे याबाबींचा विचार करुन राज्य शासनाच्या सन २०२४-२५ या वर्षाच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेअंतर्गत महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या सुमारे ५२ लाख १६ हजार लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्यात येईल. या योजनेचा १ जुलै २०२४ पासून प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांची पात्रता… योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅसजोडणी महिलेच्या…
बुधवार, २५ सप्टेंबर अहमदनगर – नगर जिल्ह्यात एका तालुक्याच्या ठिकाणी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिसाने खाकी वर्दीचा धाक दाखवत आपल्या पत्नीला पळवून नेल्याची तक्रार श्रीगोंदे येथील व्यक्तीने केली आहे. या पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मुलांसह उपोषण करण्याचा इशारा या महिलेच्या पीडित पतीने दिला आहे. यासंबंधीचे निवेदन महिलेच्या पतीने पोलीस अधीक्षकांना दिले आहे. २७ सप्टेंबरपासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर पीडित पती मुलांसह उपोषणास बसणार असल्याची माहिती समोर आली आहे. कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्याने पीडित महिलेच्या पतीवर ही दुर्दैवी वेळ ओढविली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या निवेदनात पिडीत पतीने म्हटले आहे की, या घटनेमुळे घरातील लहान मुले आईच्या प्रतिक्षेत…
बुधवार, २५ सप्टेंबर पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुली, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या एन्काऊंटरची घटना ताजी असतानाच आता पुण्यातून एका ८५ वर्षीय वृद्ध महिलेचे तोंड दाबून फरफटत नेत २३ वर्षीय नराधमाने केलेल्या बलात्काराचा प्रकार समोर आला आहे. नराधम आरोपीला पोलिसांनी अटक केली असली तरी या प्रकाराने पुण्यात खळबळ उडाली आहे. २३ सप्टेंबरला संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास म्हाळुंगेतील एका उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार घडला. पीडित वृद्धेच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पुण्यातील हिंजवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम आरोपी ओम जयचंद पुरी (वय वर्षे २३, सध्या रा. साखरेवस्ती, मूळ रा.…
बुधवार, २५ सप्टेंबर नाशिक – अपील आदेशाची प्रत देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. राजेंद्र भागवत केदारे (वय ५७) लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात ते कार्यरत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, लाच लुचपत विभागाकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराच्या भावाची पत्नी महिला बचत गटाची अध्यक्ष असून त्यांना नाशिकच्या जिल्हा पुरवठा विभागाकडून स्वस्त धान्य दुकान मंजूर झाले आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात अपील दाखल करण्यात आले असून या अपीलाचा निकाल तक्रारदाराच्या वहिनीच्या बचत गटाच्या बाजूने लागला होता. या अपीलाच्या आदेशाच्या निकालाची प्रत देण्यासाठी राजेंद्र केदारे यांनी पंधरा…
