Author: अनंत पांगारकर

एसटी कर्मचारी कृती संघटनेकडून मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत गुरुवार, ०५ सप्टेंबर मुंबई : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना एप्रिल २०२० पासून मुळ वेतनामध्ये ६५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी घेतला. या निर्णयाचे एसटी कर्मचारी कृती संघटनेने स्वागत करीत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. ऐन गणपती उत्सवाच्या काळात एसटी संपामुळे सामान्यांना झालेल्या त्रासाबद्दल मुख्यमंत्र्यांनी संघटनांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी संघटनांची बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, अपर मुख्य सचिव विकास खारगे,…

Read More

असा असेल आजचा तुमचा दिवस!  मेष – षष्ट स्थानी असलेले चंद्रशेखर की आज तब्येतीच्या दृष्टीने जराशी हानिकारक असेल. प्रवासाचे योग येतील, मात्र आज प्रवास टाळा. वृषभ – आज पंचमेष चतुर्थ स्थानी पंचमेषा बरोबर आहे. पंचमस्थान सुद्धा बलवान असल्याने अचानक आर्थिक फायदा संभवतो. वास्तू योग दर्शवतो. मिथुन – आज आपला दिवस अतिशय कटकटीचा असेल. आर्थिक समस्या उद्भवतील. संध्याकाळ नंतर मात्र आनंददायी दिवस. कर्क – आज आपल्याला कसलेही भान राहणार नाही. कारण आजचा दिवस आपला आहे. भरपूर मेहनत करायला लावणारा दिवस. सिंह – आज आपल्या बुद्धीची कसोटी लागेल. आपण आज कोणालाही जुमानणार नाही. कन्या – आनंद-दुःख ऊन-सावलीसारखे आज आपल्याशी खेळतील. समाधान ही…

Read More

महोत्सव बचत गटातील महिलांना स्वयंरोजगारासाठी व्यासपीठ निर्माण करणारा दोन दिवसात ३५ हजार महिलांचा सहभाग बुधवार, दि. ०४ सप्टेंबर  इंदिरा महोत्सवातून अनेक महिलांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी मोठे व्यासपीठ निर्माण झाले आहे. बचत गटाच्या महिलांना रोजगार, स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देत त्या कुटुंबाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी हा प्रयत्न आहे. बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित मालाच्या मार्केटिंगसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास जगाच्या पाठीवर पोहोचता येईल. यासाठी इंदिरा महोत्सव मानबिंदू ठरेल, असा आशावाद काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. संगमनेरमध्ये आयोजित इंदिरा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात थोरात बोलत होते. धुळ्याच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ,…

Read More

बुधवार, दि. ०४ सप्टेंबर मुंबई – महिला आणि अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांचा खून करणाऱ्या नराधमांना सर्वोच्च न्यायालयात आरोप सिद्ध होऊन फाशीची शिक्षा सुनावली तरी त्यांना राष्ट्रपती यांच्याकडे दयेचा अर्ज करण्याचा अधिकार आहे. अशा अर्जावर राष्ट्रपती कार्यालयाकडून दीर्घ काळ निर्णय घेतला जात नाही, पर्यायाने अशा गुन्हेगारांची फाशी लांबते. त्यामुळे अशा घटनेतील पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी राष्ट्रपतींनी असे दयेचे अर्ज नाकारावे आणि अर्जावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना केली. राष्ट्रपतींनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला, अशी माहिती डॉ. गोऱ्हे यांनी दिली. विधान परिषदेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाच्या समारोपानंतर…

Read More

बुधवार, दि. ०४ सप्टेंबर सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुंबईच्या रिक्त पदी असलेल्या मुख्य अभियंता पदी गेल्या काही दिवसापासून पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेल्या राजेंद्र रहाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राहणे यांनी नव्या पदाचा पदभार त्वरित स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहे. राज्य सरकारने बुधवारी त्यांच्या बदलीचे आदेश काढले आहे. राहणे गेल्या काही दिवसापासून नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. अखेरीस त्यांची सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंतापदी मुंबईत नियुक्ती करण्यात आली आहे.

Read More

बुधवार, दि. ०४ सप्टेंबर महाराष्ट्रात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले असून दररोज नवीन घटना समोर येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले नगरपंचायतीच्या नगरसेवकानेच बारा वर्षीय अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक असलेल्या हितेश कुंभार याला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने गुरुवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दररोजच्या अत्याचाराच्या आणि गुन्हेगारीच्या घटनांमुळे महाराष्ट्रात नेमकं चाललय तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नगर जिल्ह्यातील अकोले येथे नगरसेवकानेच अल्पवयीन मुलीची छेड काढत तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. आरोपी जबाबदार नागरिक आणि नगरसेवक असल्याने त्याच्या विरोधात जनमानसात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे महायुतीचे सरकार राज्यात ‘मुख्यमंत्री…

Read More

बुधवार, दि. ०४ सप्टेंबर  पोलीस प्रशासनाच्या भूमिकेमुळे सातत्याने वादात सापडणाऱ्या शांतता समितीच्या बैठकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शांतता समितीचे नेमके सदस्य कोण असा प्रश्न उपस्थित करत या बैठकीला जाणीवपूर्वक डावल्याचा आरोप आरपीआय आठवले गटाचे शहराध्यक्ष कैलास कासार यांनी केला आहे. मंगळवारी (ता. ३ सप्टेंबर) यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनाच्या सभागृहात पोलीस प्रशासनाच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. यावर्षी संगमनेर शहराची, येथील सण उत्सवाची कोणतीही पार्श्वभूमी माहीत नसलेल्या अधिकाऱ्यांच्या (बढतीवर बदली झालेल्या पोलीस उपअधीक्षकांचा अपवाद वगळता) हातात गणेशोत्सवाची सूत्रे गेल्याने काही ठराविक लोकांनाच त्या बैठकीचे निमंत्रण दिले गेले. अचानक तणावात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास पोलीस खात्याचे अधिकारी समाजातील…

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विभागीय, जिल्हा प्रशासनाला सूचना बुधवार, दि. ०४ सप्टेंबर मुंबई : विशेषतः मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यासह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या विदर्भासह इतर भागातील जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये नुकसानीचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. पिकांचे झालेले नुकसान, घरांची पडझड, पशुधनाची हानी अशा सर्व बाबींची माहिती घेण्यात यावी, यासंदर्भात त्वरित पंचनामे करण्यात यावेत. अतिवृष्टीमुळे तात्पुरते स्थलांतर केलेल्या लोकांना सर्व आवश्यक सुविधा देण्यात याव्यात. त्यांना आवश्यक ती सर्व मदत त्वरित उपलब्ध करून द्यावी. विभागीय आयुक्त, जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, स्थानिक नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायती, पोलीस प्रशासन…

Read More

असा असेल आजचा आपला दिवस… मेष – बाहेरगावी जाण्याचे योग. आर्थिक लाभ होण्याचा दिवस. पोटाचे आजार संभवतील. वृषभ – रागावर नियंत्रण ठेवा. आज तुमची कामे संथ गतीने होतील. वाहन चोरीची शक्यता, वाहन सांभाळा. मिथुन – जितका लाभाचा तितकाच खर्चाचा दिवस. चिडचिड, संतापावर नियंत्रण ठेवा. कर्क – आजचा दिवस अतिशय फायदेशीर असा आहे. जिथे जाल तिथे तुमचा सन्मान केला जाईल. मात्र भाऊबंदकीपासून चार हात दूर राहा. सिंह – अतिशय प्रेमळ आणि आपुलकी जपणारी व्यक्ती आज तुमच्या आयुष्यात येत आहे, तिला मान द्या. पैसा जास्त खर्च करू नका. कन्या – रडका आणि रडविणारा असा आजचा दिवस आहे. आज मित्रांपासून सावध राहा. कोणतेही…

Read More

मंगळवार, दि. ०३ सप्टेंबर विशेष प्रतिनिधी / मुंबई ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्य परीवहन महामंडळ म्हणजेच एसटी कर्मचारी संघटनांनी संप पुकारला आहे. एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्यावतीने आजपासून बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत. आज एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा पहिलाच दिवस असून याचा एसटीच्या महसूलावर मोठा परिणाम झाला आहे. संपामुळे अंदाजे १४ ते १५ कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक, वेतनवाढीच्या दराचा फरक तसेच ४८४९ कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप आणि नुकत्याच मुळ वेतनात जाहीर केलेल्या पाच हजार, चार हजार आणि अडीच हजार रुपयांऐवजी…

Read More