Author: अनंत पांगारकर
रविवार, २५ ऑगस्ट भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावर पुण्यात कोयता गॅंगने कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना रविवारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या रामटेकडी भागात घडली आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. रत्नदीप गायकवाड असे हल्ल्यात जखमी झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव असून दोन्ही हल्लेखोर आरोपी अल्पवयीन आहे. दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी आहे. यातील एकावर वीस तर दुसऱ्यावर चौदा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पुण्याच्या रामटेकडी भागात दोन टोळ्यांमध्ये हाणामारी सुरू होती. या हाणामारीची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड घटनास्थळी गेले होते. गुंडांना पकडत असताना अचानकपणे…
रविवार, २५ ऑगस्ट कल्याणवरून संगमनेरमध्ये यात्रेसाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी एसटी बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्याने लांबविण्याचा प्रकार समोर आला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे. अधिक माहिती अशी, पश्चिम कल्याण येथील कौशल्या हरी शिंदे (वय ६० वर्ष) ही महिला संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथील आशापीर बाबा यात्रेला जाण्यासाठी कल्याण येथून बुधवारी (२१ ऑगस्ट) संगमनेरमध्ये आली होती. दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास संगमनेर बस स्टैंडवर पारेगाव बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने या महिलेला पाठीमागून धक्का देत तिच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे पेंडल असलेले सोन्याची साखळी लंपास केली. संबंधित…
रविवार, २५ ऑगस्ट भटके विमुक्त व आदिवासी समुदायाच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संवाद यात्रा पुण्यातून २८ ऑगस्टला निघत आहे. २३ सप्टेंबरला मुंबईत या यात्रेचा समारोप होईल. यादरम्यान ४ सप्टेंबरला ही यात्रा संगमनेरला येत असून यासाठी भटके विमुक्त, आदिवासी संयोजन समितीची नियोजन बैठक शासकीय विश्रामगृहात पार पडली. ७२ या विमुक्त दिनानिमित्त भटके विमुक्त, आदिवासींच्या हक्कासाठी राज्यव्यापी संवाद यात्रा काढली जात आहे. संगमनेरमध्ये यात्रा आल्यानंतर यात्रेच्या स्वागत आणि समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यात भटके विमुक्त आणि आदिवासींच्या प्रश्नांवर चर्चा करून स्थानिक खासदार व आमदारांना पत्र घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संवादयात्रा भटक्या विमुक्त आदिवासींच्या वसाहतींना भेट देऊन, त्यांच्याशी संवाद साधून, भटके…
रविवार, २५ ऑगस्ट प्रवरा नदीला आलेल्या पूर परिस्थितीची पाहणी करत काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी नदीकाठच्या नागरिकांशी संवाद साधत प्रशासनाला सतर्कतेबाबत सूचना केल्या. भंडारदरा, निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. दोन्ही धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्याने नदीपात्रात धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे प्रवरेला पूर आला आहे. तर भोजापुर धरण देखील भरल्याने म्हाळुंगी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. आढळेलादेखील पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे रविवारी दुपारी थोरात आणि तांबे यांनी एकत्रितपणे प्रवरा आणि म्हाळुंगी नदीकाठी पाहणी करत या परिसरात असलेल्या साईनगर, नाईकवाडपुरा भागातील रहिवाशांची संवाद साधला.या परिसरातील…
एखाद्या सत्तेसाठी इतके लाचार झालेले पोलीस महाराष्ट्राने आजवर कधीच पाहिले नाहीत. यंत्रणा जेव्हा अशी लाचार बनते तेव्हा लोकं रस्त्यावर उतरतात. कायदा हातात घेतात. मग त्यांना दोष द्यायला सत्ता मोकळी असते. बदलापूरच्या घटनेने महाराष्ट्राला हेच दाखवून दिलं आहे. सत्तेचा माज आणि मी म्हणजे सत्ता, अशा तोर्यातील सरकारची लाज अखेर उच्च न्यायालयाला काढावी लागते, याचा अर्थ ज्यांनी त्यांनी घ्यावा. पण काळ सोकावतो तेव्हा जे घडायचं ते घडतं आणि राज्य वेठीस धरलं जातं. एका पोलीस अधिकार्याच्या मुर्खपणाची ही फळं महाराष्ट्र भोगतो आहे. उच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले म्हणून हे थांबेल अशा भाबड्या मनस्थितीत कोणी राहू नये. कारण न्यायालयाला गृहित धरणारे सरकारमध्ये आणि सरकारच्या…
आजचे राशीभविष्य रविवार २५ ऑगस्ट २०२४ मेष— कर्म करत रहा. विजय तुमचाच आहे. आज मनातील गोष्ट कुणालाही सांगु नका. वृषभ— जोडीदार समजुतदारपणा दाखवेल. नवीन वास्तु प्रवेशाचा योग. मिथुन— बुद्धिवादात अग्रेसर रहाल. हुशारीने आज आर्थिक फायदा वाढवत रहाल. कर्क— आज खिसा पाकीट सांभाळा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. आज कोणालाही जामीन राहू नका. सिंह— वादावादीत जिंकण्याचा दिवस. आज कामानिमित्ताने दिवसभर प्रवास घडेल. कन्या— पत्नीबरोबर वादावादी होण्याची शक्यता. नोकरीच्या ठिकाणी सुद्धा कटकटीचा दिवस. तुळ— अतिशय आनंदी दिवस. मानसन्मान वाढविणारा दिवस. दुपारनंतर मात्र निराशावादी व्यक्तीच्या भेटीमुळे उदासी जाणवेल. वृश्चिक— बाहेरचे खाणे टाळा. पोटदुखीने हैरान व्हाल. आर्थिक विवंचनेचा दिवस. धनु— आज एखादा जमिनीचा व्यवहार यशस्वी…
★ आठवडाभरात अत्याचाराच्या अनेक घटना ★ राज्यात महिला, मुली सुरक्षित नाहीत ★ कायदा व सुव्यवस्था ढासळली ★ बदलापूर प्रकरणात मंत्रालयातून दबाव होता काय? ★ संस्थाचालकांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला ★ बहिणीकडून राख्या बांधून फोटोसेशन तर दुसरीकडे त्यांचे रक्षण करण्यास सरकार अपयशी ★ मंत्रालय टक्केवारीत गुंतले ★ राज ठाकरेंचे पवारांवरील आरोप चुकीचे शनिवार, २४ ऑगस्ट गेल्या आठवडाभरात महिला, मुलींवर अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहे. राज्यात महिला, मुली सुरक्षित नाहीत. प्रशासनाचा धाक राहिला नसून या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली असून अनागोंदी वाढली आहे. महिला व बालिका असुरक्षित असल्याने या सरकारने तातडीने सत्तेवरून पायउतार व्हावे किंवा…
शनिवार, २४ ऑगस्ट बदलापूर शाळेतील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक छळ प्रकरणी राज्यात महाविकास आघाडीने सरकार विरोधात जोरदार भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने बंद बेकायदेशीर ठरविल्याने मविआने निषेध आंदोलन केले. संगमनेरमध्ये काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शनिवारी बस स्थानक चौकात तोंडाला काळ्या पट्ट्या लावत मौन आंदोलन केले. त्यांच्यासोबत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. जयश्री थोरात सहभागी झाले होते. बदलापूरसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडलेल्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांचा व असंवेदनशील सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीच्यावतीने आज शनिवारी (२४ ऑगस्ट) महाराष्ट्र बंदची…
शनिवार, २४ ऑगस्ट जमिनीचे कायदेशीर निर्वाणीकरण झालेले नसताना न्यायालयाला अंधारात ठेवून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि तथाकथित लाभार्थ्यांनी संगनमत करून संगमनेर तालुक्यातील जवळेकडलग गावातील राखीव वन जमीनीचे वाटप करून टाकण्याचा बेकायदेशीर प्रताप करून ठेवला असल्याचा आरोप करीत, इतर शेतकऱ्यांचे, वनविभागाचे, पर्यावरणाचे त्यामुळे नुकसान होत आहे म्हणून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या या तक्रारीची गंभीर दखल घेत वनविभागाच्या प्रधान सचिवांना त्वरित चौकशी करून दहा दिवसात अहवाल सादर करावा असे आदेश मंत्री मुनगंटीवार यांनी दिले आहेत. संगमनेर तालुक्यातील जवळेकडलग येथील राखीव वन जमीन (रिझर्व फॉरेस्ट)…
शनिवार, २४ ऑगस्ट बदलापूरसह राज्यात आणि देशात घडत असलेल्या अल्पवयीन मुली आणि महिलांवरील अत्याचाराविरोधात ‘लाडक्या लेकीच्या सन्मान आणि संरक्षणासाठी’ संगमनेरमध्ये काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते हातात काळे झेंडे घेत, तोंडाला काळी पट्टी बांधून बस स्थानकासमोर ११ वाजता करणार आंदोलन करणार आहे. महिला अत्याचाराविरोधात समाजातील जनभावना लक्षात घेत महाविकास आघाडीने शनिवारी महाराष्ट्र बंदचे आयोजन केले होते. मात्र या विरोधात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह इतर काही जणांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत बंदला विरोध दर्शविला होता. न्यायालयाने देखील बंद बेकायदेशीर ठरवत बंद करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. भारतीय न्यायव्यवस्था संविधानिक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून शनिवारचा बंद…
