Author: अनंत पांगारकर
विशेष प्रतिनिधी / मुंबई बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. देशमुख यांची निर्घृण हत्या आणि सुरू असलेल्या खंडणीखोरीच्या कारवायांमुळे बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात राहिलेली नाही, असा आरोप शिष्टमंडळाने केलाय. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा, अशी प्रमुख मागणी यावेळी शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केलीय. माजी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना भेटलेल्या या सर्वपक्षीय शिष्टमंडळात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर, ज्योती मेटे यांचा…
सोमवार, ०६ जानेवारी संगमनेर – नाशिक-पुणे मार्गावर बस स्थानकानजीक दारूच्या नशेत तर्र झालेल्या मद्यपी तरुणाने सोमवारी संध्याकाळच्या सुमारास विश्रामगृहासमोर चार मुलींची छेडछाड केली. त्यामुळे नागरिकांनी या मद्यपी तरुणाला पकडत चांगलाच चोप देत त्याला पोलिसांच्या हवाली केले. मद्यपी तरुणाने मुलींची छेडछाड केल्याने येथे काही वेळ नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. सोमवारी संध्याकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. नाशिक पुणे मार्गावरून शासकीय विश्रामगृहापासून शहरातील चार मुली जात असताना या ठिकाणी असलेल्या व अकोले तालुक्यातील रहिवासी असलेल्या एका मद्यपी तरुणाने या मुलींची छेड काढली. घाबरलेल्या मुलींनी आरडाओरडा केल्याने स्थानिक नागरिकांनी या मद्यपी तरुणाला पकडले. छेड काढणाऱ्या या तरुणाची नागरिकांनी चांगलीच धुलाई…
विशेष प्रतिनिधी / मुंबई मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदानासाठी दिल्या जाणाऱ्या सन २०२४ या वर्षीच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांची घोषणा आज मंत्रालयात करण्यात आली. प्रतिष्ठेचा कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार श्रीमती प्रतिमा जोशी यांना जाहीर झाला आहे. उत्कृष्ट पत्रकार (मुद्रित) राज्यस्तरीय पुरस्कारासाठी लोकमत ‘सातारा’च्या प्रतिनिधी श्रीमती प्रगती पाटील यांची तर वृत्तवाहिनी उत्कृष्ट पत्रकार (दृकश्राव्य) पुरस्कारासाठी ‘एबीपी माझा’चे पुणे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांची निवड करण्यात आली आहे. वार्ताहर संघाचा उत्कृष्ट सदस्य पुरस्कार ‘पुढारी’चे राजन शेलार यांना जाहीर झाला आहे. ६ जानेवारीला पत्रकार दिनाचे औचित्य साधून आज या पुरस्कारांची घोषणा संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे आणि सरचिटणीस प्रवीण पुरो यांनी केली. …
संगमनेर – विधानसभा निवडणुकीत संगमनेरात सत्ता बदल झाल्यानंतर येथील राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. लोकविकास आघाडीच्या माध्यमातून तिसरा पर्याय उभा राहत असून होऊ घातलेल्या नगरपरिषद जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढविली जाणार असून या संदर्भातील कृती कार्यक्रमाची घोषणा लवकरच केली जाणार असल्याचे रजत अवसक व दत्ता ढगे यांनी दिली. स्वातंत्र्य सैनिक साथी भास्करराव दुर्वे स्मारक प्रतिष्ठानमध्ये लोकशाही समाजवादी विचारांच्या नागरिकांची व्यापक बैठक पार पडली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व ज्ञानज्योती फातिमामाई शेख यांना अभिवादन करून बैठकीची सुरुवात झाली होती. बैठकीत भारतीय संविधानाला अभिप्रेत असणाऱ्या लोकशाही समाजवादी विचारांचे राजकीय सामाजिक व सांस्कृतिक काम उभे करण्याचा निर्धार करण्यात आला तसेच लोकविकास आघाडीच्या…
संगमनेर – संगमनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरू तालुक्यातील समनापुर येथील सुरू असलेल्या पोक्सो संदर्भातील विशेष खटल्यात न्यायालयाने ६ महिलांसह ३ पुरुष आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. अवघ्या दोन वर्षात निकाली निघालेल्या या खटल्याकडे लक्ष लागले होते. समनापुर (संगमनेर) येथे फिर्यादी व तिच्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या जमिनीवरून चुलत भाऊ व भावांसोबत न्यायालयात वाद सुरू होते. २ जुलै २०२२ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या घराचा पाया खोदण्याचे काम सुरू होते. त्यावेळी संगणमताने आलेल्या आरोपींनी फिर्यादीला पाया खोदण्यास मनाई केली. फिर्यादी व तिच्या बहिणींना शिवीगाळ, दमदाटी केली. यावेळी आरोपीपैकी एकाने जवळच पडलेली व बांधकामासाठी आणलेली वीट उचलून फिर्यादीच्या पाठीत फेकून मारली. तर…
संगमनेर – शहरातील दिल्ली नाका येथे झालेल्या हाणामारी प्रकरणी अखेर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी मध्यरात्री पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. अखेरीस गुन्हा दाखल झाल्याने आता या गुन्ह्याच्या तपासाकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या जखमी विकास दीपक गायकवाड (रा. निळवंडे, संगमनेर) याच्या जबाबावरून भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११९(१), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ३५२, ३५१(१) नुसार लकी पान स्टॉल दुकानातील इसम व अनोळखी १५ ते २० जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तक्रारीत म्हटले आहे की, फिर्यादी त्यांच्या दोन मित्रांसोबत पान…
मुंबई – ०५ जानेवारी शिवसेना नेते व माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पत्नी मेघनाताईं यांचे रविवारी !दिनांक ५ जानेवारी) अल्पश: आजाराने दु:खद निधन झाले. शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी मेघनाताईंच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन अंत्यदर्शन घेतले. यावेळी डॉ.गोर्हे यांनी गजानन कीर्तिकर, अमोल, गौरी, हर्षदा, सुप्रिया यांचे सांत्वन केले.
रविवार, ०५ जानेवारी संगमनेर – परस्पर विरोधी तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्याने अंतर्गत मतभेद आता पोलिसांपर्यंत पोहोचले असल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या दौऱ्यावेळी घडलेल्या प्रकारामुळे हा दौरा वादग्रस्त ठरला आहे. रविवारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात सुयोग पंढरीनाथ गुंजाळ (रा. गुंजाळवाडी, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक भगत व साहेबराव वलवे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११५, ३५२, ३५२(२) प्रमाणे पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. परस्पर विरोधी तक्रारीमुळे पोलिस आता याप्रकरणी काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान नववर्षाच्या प्रारंभी २ जानेवारीला शनिशिंगणापूर येथून त्रंबकेश्वर येथे जात असताना काही काळ संगमनेरमध्ये…
कफल्लक देशाला वळणावर आणणारे पंतप्रधान म्हणून ज्यांचा सर्वदूर उल्लेख होतो त्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या दु:खद निधनाच्या कळा प्रामाणिक देशभक्तांसाठी आजही कष्टप्रद आहेत. डॉ. सिंग यांनी देशाला घालून दिलेली अर्थव्यवस्थेची घडी नादान सत्तेमुळे आता पुरती विस्कटून गेली आहे. देशभक्तीचं स्तोम माजवणार्या आजच्या सत्ताधार्यांनी डॉ. सिंग यांच्या दु:खद निधनाचं राजकारण करून निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. धार्मिक अधिष्ठानात मनुष्य प्राण्याला मरणांती परमेश्वराचं रूप दिलं आहे. मनमोहन हे तर देशासाठी अशाच परमेश्वराचं रूप असताना त्यांच्या वाट्याला मात्र या सत्ताधार्यांनी राजकारण आणलं आणि महान व्यक्तीच्या मृत्यूचंही भांडवल करत आपण किती नालायक आहोत, हे जगाला दाखवून दिलं. संकटात देशाला आणि देशवासीयांना जगण्याचा मार्ग ज्या महान…
संगमनेर – केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान संगमनेर मार्गे त्रंबकेश्वरकडे जात असताना येथील शासकीय विश्रामगृहावर थांबले होते. संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी यावेळी त्यांचे स्वागत केले. चौहान यांच्या दौऱ्यादरम्यान भारतीय जनता पक्षाचे ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक भगत यांना आमदार समर्थक असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण करण्याचा प्रकार समोर आला होता. मारहाणीत जखमी झालेल्या भगत यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबानंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आमदार खताळ समर्थक असलेल्या सुयोग गुंजाळ आणि राहुल भोईर या दोघांविरोधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान आणि संगमनेरचे आमदार अमोल खताळ हे शासकीय विश्रामगहावर उपस्थित असताना भाजपच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला खताळ समर्थकांनी धक्काबुक्की…
