Author: अनंत पांगारकर
शनिवार, २६ ऑक्टोबर मुंबई – शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दुसरी यादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे. पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलेल्या या यादीत २२ उमेदवारांचा समावेश आहे. अहिल्यानगर शहरमधून अभिषेक कळमकर यांना तर अकोले मतदारसंघातून अमित भांगरे यांना संधी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीने जिल्ह्यात सर्व जागांवर उमेदवार जाहीर केले असून शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर या तीन जागांवर काँग्रेस, नेवासे व श्रीगोंदा या दोन जागांवर शिवसेना व उर्वरित विधानसभा मतदारसंघात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असल्याचे स्पष्ट झाले. महायुतीच्या उमेदवारांचा अद्यापही घोळ सुरूच आहे. अद्याप ज्या जागांवरील उमेदवार शिल्लक आहे त्यांची यादी आज रात्री किंवा उद्या सकाळी पत्रकार…
शनिवार, २६ ऑक्टोबर संगमनेर – सुसंस्कृत राजकारणाची राज्याला दिशा देणाऱ्या संगमनेर तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुजय विखे यांनी सभा घेऊन भडक वक्तव्य केली. यातूनच काही लोकांना प्रोत्साहन मिळाल्याने युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्यासह महिला भगिनींविरुद्ध अत्यंत गलिच्छ भाषेत वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुख व सुजय विखे यांना तातडीने अटक करा या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर उतरले याचबरोबर सुजय विखे यांना संगमनेर तालुका प्रवेश बंदी करण्याचा एकमुखी ठराव करण्यात आला. महिलांचा अपमान करणारे वसंत देशमुख व सुजय विखे यांना तातडीने अटक करा, या मागणीसाठी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याबाहेर मोठे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी…
शनिवार, २६ ऑक्टोबर माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या धांदरफळ खुर्द येथील युवा संकल्प मेळाव्यात बोलताना वसंत देशमुख यांनी काँग्रेस नेत्या जयश्री थोरात यांच्याविषयी खालच्या पातळीवर आक्षेपार्ह विधान करून वाद ओढवून घेतला. ही संगमनेरच्या राजकारणाची संस्कृती नसून या घटनेचा निषेध करत असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे संगमनेर शहर प्रमुख कैलास कासार यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’शी बोलताना कैलास कासार म्हणाले, निवडणूक अथवा कार्यक्रमांच्या व्यासपीठावरून एकमेकांवर टीकाटिप्पणी करण्याचा, कामांबद्दल प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार राज्यघटनेने सर्वच नागरिकांना दिला आहे. मात्र ही टीकाटिप्पणी करताना कुठल्याही महिला संदर्भात बोलताना शब्दांचा संयम बाळगणे गरजेचे आहे. माइक हातात आला म्हणून…
शनिवार, २६ ऑक्टोबर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता काही तासांचा अवधी उरला असताना काँग्रेसने आपली २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार लहू कानडे यांचे तिकीट कापले असून श्रीरामपूरमधून आता हेमंत उगले काँग्रेसचे उमेदवार असतील. काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत माजी मंत्री विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांना संगमनेरमधून तर काँग्रेसवासी झालेल्या प्रभावती घोगरे यांना शिर्डीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. दुसऱ्या यादीत आता श्रीरामपूरमधून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत महाविकास आघाडी जिल्ह्यात काँग्रेसच्या वाट्याला तीन जागा मिळाल्या आहेत. गेला काही दिवसापासून श्रीरामपूरमधून कोणाला उमेदवारी मिळते याची उत्सुकता होती.…
शनिवार, २६ ऑक्टोबर संगमनेर – भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील सभेत अध्यक्ष स्थानी असलेल्या वसंत गुंजाळ याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने राज्यभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमनेर तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात संतप्त वातावरण निर्माण झाले असून विजय विखे पाटील आणि वसंत देशमुख यांच्या अटकेसाठी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यासमोर कार्यकर्त्यांना रात्रभर ठिय्या दिला असून शनिवारी दुपारपर्यंत कार्यकर्ते भाषणातून आपला रोष व्यक्त करत होते. दरम्यान काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील मध्यरात्री आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट करत या घटनेचा…
शनिवार, २६ ऑक्टोबर २०२४ मेष – रोजची दैनंदिन कामे लवकर पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील. उत्साह व उमेद वाढल्यामुळे आपल्या महत्वाच्या कामांना वेळ देऊ शकाल. व्यवसायात काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. वृषभ – नोकरीमध्ये हाताखालील लोकांचे तसेच वरिष्ठांचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे मिळेल. केलेल्या नियोजनात काही बदल करावे लागतील. प्रवासात आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेणे जरुरीचे. मिथुन – कुटुंब परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाहमधील अडथळे दूर होतील. तसेच संततीचे असलेले प्रश्न मार्गी लागतील. आप्तेष्ट व नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. हितशत्रूवर विजय मिळवाल. कर्क – नियोजनाद्वारे हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. परंतु त्यासाठी कार्यमग्न राहणे आवश्यक ठरेल. तसेच कोणाबरोबरही वाद- विवाद करू नयेत. कलहसदृश्य घटनांपासून…
सभा आटोपती घ्यावी लागली, महिलांसह ग्रामस्थांचा सभास्थानी ठिय्या.. सुजय विखेंनी राजकारणाची घाणेरडी पातळी गाठली, वसंत देशमुखला भाऊसाहेब थोरात यांनी चांगलाच सरळ केला होता. आता परत वेळ आली आहे अशा नीच लोकांना त्यांची जागा दाखविण्याची – आमदार सत्यजित तांबे शुक्रवार, २६ ऑक्टोबर संगमनेर – सुसंस्कृत तालुका अशी ओळख असलेल्या संगमनेरमध्ये विधानसभा निवडणुकीला गालबोट लागले आहे. निवडणुकीच्या निमित्ताने थेट खालच्या पातळीवर माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने संगमनेरमध्ये माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या युवा संकल्प मेळाव्यात महिलांचा संताप दिसून आला. विखे-थोरात वाद विकोपाला गेला असून वाहनाची देखील जाळपोळ, तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार समोर येत…
शुक्रवार, २६ ऑक्टोबर संगमनेर विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी आणखी पाच इच्छुक उमेदवारांनी १० उमेदवारी अर्ज नेले आहे. त्यामुळे आत्तापर्यंत ३१ इच्छुकांनी ६३ उमेदवारी अर्ज नेले असून मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. शनिवार, रविवारची सुट्टी वगळता शेवटच्या दोन दिवसात प्रमुख उमेदवारांचे अर्ज नेले जाणार असून लगेचच त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल होण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी जाहीर झाली असून अद्याप त्यांनी देखील उमेदवारी अर्ज नेलेला नाही. तर महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळते याची उत्सुकता आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी मिळालेल्या अजिज व्होरा यांनी देखील अद्याप उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. व्होरा आज उमेदवारी अर्ज…
शुक्रवार २५ ऑक्टोंबर अहिल्यानगर – भरारी पथकाने अहिल्यानगर शहरात दोन ठिकाणी वाहतूक करण्यात येत असलेली रोकड पंचनामा करुन ताब्यात घेतली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली. विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने अवैध मद्य, रोकड वाहतुकीला प्रतिबंध घालण्यासाठी तसेच आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी अहमदनगर विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी चेकपोस्ट, आठ भरारी व स्थाई पथके नेमण्यात आली आहेत. भरारी पथकाने १६ ऑक्टोबरला रात्री ८ वाजता नालेगाव भागातील अमरधाम येथे ३ लाख ८४ हजार ३०० रुपये एवढी रोख रक्कम दोन पंचासमक्ष पंचनामा करुन ताब्यात घेतली. याबाबतचा तपास कोतवाली पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक करीत आहेत. तर कायनेटीक चौक येथे २४…
शुक्रवार, २५ ऑक्टोंबर संगमनेर – बाहेरचे लोक तालुक्यात येऊन हावभाव करत भाषणे करत आहे. त्यांच्यासारखी भाषणे ही आपली संस्कृती नाही, ते घाबरले असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मी जशी शांत, संयमी बाळासाहेब थोरातांची कन्या आहे, तशीच भाऊसाहेब थोरातांची नात देखील आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा, अशा थेट शब्दात काँग्रेस नेत्या जयश्री थोरात यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या टीकाकारांना उत्तर दिले आहे. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली युवा संवाद यात्रा गुरुवारी रात्री संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे आली होती. घुलेवाडी येथील यात्रेत काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात देखील सहभागी झाले होते. डॉ. थोरात म्हणाल्या, विस्ताराने मोठा असलेला संगमनेर तालुका आमदार बाळासाहेब…
