Author: अनंत पांगारकर
विशेष प्रतिनिधी / मुंबई शनिवार, २४ ऑगस्ट महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्यावरुन जोरदार चर्चा सुरू आहे. राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीसह महाविकास आघाडीकडूनही तयारी केली जात असताना शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाहून पहिलं लक्ष्य हे युतीचं सरकार पदच्युत करणं हे पाहिलं ध्येय असेल असं म्हटलं आहे. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाबाबत एकमत होत नाहीे, अशी चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याची मागणी लावून धरली आहे. शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा, माझा पूर्ण पाठिंबा असेल, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. मुख्यमंत्रीपदाबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया आली आहे. आम्हाला…
जाणून घ्या… आपलं शनिवारच (२४ ऑगस्ट) राशिभविष्य मेष— राशीस्वामी आज स्वस्थानी असल्याने अचानक धनलाभ दर्शवतो. स्वतःचा इगो बाजुला सारुन आपले काम करुन घ्या. वृषभ— व्ययातील चंद्र आज प्रवासामधुन आर्थिक लाभ दर्शवतो. आज आपण अतीशय हुशारीने समोरच्याकडून आपले काम करुन घ्याल. मिथुन— व्ययातील गुरु मंगळ हर्षल अतीशय मेहनत करायला लावेल तर अन् तरच आपले आज कल्याण होईल नाहीतर अपमान होण्याचीच शक्यता जास्त आहे. कर्क— कर्मस्थानी असलेला राशीस्वामी आज मेहनतीचा पुरेपूर मोबदला मिळवुन देईल. सिंह— व्ययातील बुध व धनातील केतु कोर्ट कचेरीच्या कामात अडकवून ठेवतील. पुर्वी केलेल्या चांगल्या कर्मामुळे आज कोर्ट केसमधून सुटकारा मिळेल. कन्या— आज अपमानित होण्याचा दिवस. साठविलेले पुण्य आज…
शुक्रवार, २३ ऑगस्ट नाशिक रोड जलकुंभाला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी म्हाळुंगी नदीपात्रात लिकेज झाल्याने या जल कुंभावरून उपनगरात होणारा पाणीपुरवठा एक दिवसाआड करण्यात येणार असल्याची माहिती संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली आहे. धरणाच्या लाभक्षेत्रांमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यातच भोजापूर धरण भरल्यामुळे म्हाळुंगी नदीपात्रात देखील मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने शहरातून वाहणाऱ्या म्हाळुंगी नदीला मंगळवारी पूर आला होता. या पुराच्या पाण्यामुळे नाशिकरोड जलकुंभाला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी म्हाळुंगी नदीपात्रात लिकेज झाली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाला आहे. संगमनेरकर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नगरपरिषदेने या जलकुंभाला पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली आहे. लिकेज झालेली…
शुक्रवार, २३ ऑगस्ट महाराष्ट्र बंद संदर्भात मुंबई हायकोर्टाचा निर्णय समोर आल्यानंतर महाविकास आघाडीतील बडे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पवार यांनी यासंदर्भात आपल्या एक्स अकाउंटवर ही भूमिका स्पष्ट केली आहे. पवार म्हणाले, सदर निर्णयाविरूद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. X वर पवार यांनी म्हटले आहे की, बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद…
शुक्रवार, २३ ऑगस्ट कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर तसा कुणी प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करा, असे आदेश शुक्रवारी मुंबई हायकोर्टाने दिले आहे. बदलापुरात दोन चिमुकल्या मुलींवर घडलेल्या अत्याचाराच्या तसेच महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर या बंदच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणावर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने धक्का देणारा निर्णय देताना बंद बेकायदेशीर ठरवला आहे. मुंबई हायकोर्टाने निकाल देतांना म्हटले आहे की, कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा व्यक्तीला महाराष्ट्र बंद पुकारण्यास परवानगी नाही. जर तसा कुणी प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करा. महाधिवक्ता देवेंद्रकुमार ऊपाध्याय…
शुक्रवार, २३ ऑगस्ट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शनिवारी (२४ ऑगस्ट) महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंद संदर्भात माहिती दिली. महाराष्ट्र बंद मधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. पत्रकार परिषदेत ठाकरे नेमकं काय म्हणाले…
डिजिटल प्रमाणपत्रांची ऑनलाईन पडताळणी करून घेण्याचे शिर्डीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांचे आवाहन शुक्रवार, २३ ऑगस्ट शिर्डी – महाऑनलाईन प्रणालीद्वारा वितरित डिजिटल जात प्रमाणपत्रात फेरफार केल्याप्रकरणी एका सेतू चालकावर शिर्डी पोलीस ठाण्यात व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांसाठी जोडलेल्या उत्पन्न प्रमाणपत्रात फेरफार केल्याप्रकरणी तिघांविरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून महाऑनलाईन प्रणालीद्वारा डिजिटल जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येते. डिजिटल वितरीत करण्यात आलेल्या जात प्रमाणपत्रामध्ये फेरफार करून अनधिकृत खोटा दाखला वितरीत केल्याप्रकरणी शिर्डी पोलीस स्टेशन येथे सेतूचालक विशाल नागेश दवंगे (रा. कोपरगाव) यांचेविरूध्द भा.द.वि. कलम ४२०, ४०६, ४६५, ४६६, ४६७, ४६८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात…
शुक्रवार, २३ ऑगस्ट नाशिक – नाशिकच्या पंचवटीत पोलीस पुत्राच्या हत्येची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी अवघ्या पाच तासात या प्रकरणी चौघांना पकडले असून हत्येसाठी महिलेने दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याचे उघड झाले. मयत युवक हा सेवानिवृत्त पोलिसांचा मुलगा आहे. पंचवटीत दिंडोरी रोडवरील मेरी वसाहतीतील पंजाबराव देशमुख वसतिगृहामागे बुधवारी पहाटे २५ वर्षाच्या युवकाची हत्या करण्यात आली. गगन प्रवीण कोकाटे (२५) असे मयत युवकाचे नाव आहे. पंचवटीत राहत असलेला गगन कोकाटे (२५) आणि भावना कदम (३९) यांची मैत्री होती. मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. पुढे गगन हा भावना हिला सातत्याने त्रास देऊ लागला. पंचवटी परिसरातील पंजाबराव देशमुख वसतिगृहामागे गगन याला बुधवारी…
आजचे राशीभविष्य शुक्रवार २३ ऑगस्ट २०२४ मेष— बाहेरगावी जाण्याचे योग. आर्थीक लाभ होण्याचा दिवस. पोटाचे आजार संभवतील. वृषभ— रागावर नियंत्रण ठेवा. आज सर्व काम संथगतीने होतील. आज वाहन सांभाळा, चोरी होण्याची शक्यता. मिथुन— जितका लाभ तितकाच खर्चिक दिवस. चिडचिड, संताप यावर नियंत्रण ठेवा. कर्क— अतिशय फायदेशीर दिवस. जिथे जाल तिथे तुमचा सत्कार केला जाईल. भावबंदकीपासुन चार हात लांब रहा. सिंह— अतीशय प्रेमळ आपुलकीने जपणारी व्यक्ती आज आयुष्यात येत आहे, तिला मान द्या. पैसा जास्त खर्च करु नका. कन्या— रडका, रडविणारा दिवस. मित्रांपासून सावध रहा. पैशाचे व्यवहार करु नका. तुळ— मामाकडुन आर्थिक भेट मिळण्याचा दिवस. जे बोलाल ते खर होणारा दिवस,…
प्रवीण पुरो | मुंबई बदलापूर येथील नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर राज्यभर मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. बदलापूरच्या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटत असताना तीन पक्षांच्या युती सरकारच्या काळात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्याचं वास्तव पुढे आलं आहे. बदलापूरमध्ये एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद मुंबईसह राज्यभर उमटताहेत. अत्याचाराच्या घटना वाढत असून घृणास्पद कृत्य करणाऱ्यांच्या मनात कायद्याची भीती राहिली नाही असं उघडपणे बोललं जातं. आजवरच्या अशा घटना भाजपाशी संबंधित व्यक्ती आणि संस्थांचा सहभाग असल्याने गुन्हे दाखल करताना पोलीस आखडतं घेत असल्याच्या तक्रारी केल्या जातं होत्या. …
