Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरचा विकास व शांतता काहींना पहावत नसल्याने जातीय तेढ निर्माण करून समाजात अशांतता निर्माण करणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आज जमावबंदीचा आदेश मोडून आ. बाळासाहेब थोरात यांच्या प्रतिमेची छेडछाड करण्याच्या निषेधार्थ संगमनेर तालुक्यात तीव्र संतापाची लाट उमटली असून या सर्व लोकांविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करावे, अशी मागणी संगमनेरकर व काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. राज्यघटना व सर्वधर्मसमभाव हा विचार जोपासत पुरोगामी व वारकरी संप्रदायाचे पाईक असलेल्या आमदार थोरात यांनी संगमनेरमध्ये बंधुभाव व सामंजस्याचे वातावरण राहावे, यासाठी सातत्याने काम केले आहे. मात्र काही समाज विघातक शक्तींनी याला जातीयतेचे रूप देत स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – नगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये कोणत्याही नेत्याने दुसऱ्याच्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करायचा नाही, असा अलिखित करार आहे. ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि भारतीय जनता पार्टीच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी गणेश कारखान्याच्या निवडणुकीत एकत्र येत हा करार मोडला आहे. त्यांचे पुढे काय करायचे हे ठरवू, असा सूचक इशारा महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी (ता. १७) मतदान होत आहे. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी या निवडणुकीत लक्ष घातले आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनल विरोधात त्यांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहरातील भारतनगरमध्ये असलेल्या सरवर हाजी याच्या पत्राच्या शेडमध्ये गोवंश जनावरांची कत्तल केली जात असल्याची टीप पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना मिळाली. निरीक्षक मथुरे यांनी तातडीने कारवाईचे आदेश देताच पोलीस पथकाने घटनास्थळी केलेल्या कारवाईत 1,87,500 रुपये किमतीचे गोवंश जनावरांचे कत्तल केलेले गोमांस मिळून आले आहे. कारवाईची चाहूल लागताच कत्तलखाना चालक सरवर हाजी तेथून पसार झाला. अनेकदा झालेल्या कारवायानंतर देखील संगमनेरमधील बेकायदेशीर कत्तलखान्यातून दररोज शेकडो गोवंश जनावरांच्या कत्तली सुरूच असल्याचे अनेकदा पोलीस कारवायानंतर समोर आले आहे. कत्तलखाने नामशेष करण्यास प्रशासनाला अपयश आल्याचे दिसते. संगमनेरातील कत्तलखान्यातून दररोज मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याने येथील कत्तलखान्यांची राज्यात बदनामी झाली आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज औरंगाबाद – प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहे. लिंगभेदावर भाष्य करणे महाराजांच्या अंगलट आले असून आता न्यायालयाच्या निर्णयामुळे इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ झाली आहे. इंदोरीकर महाराजांनी कीर्तनाच्या एका कार्यक्रमादरम्यान लिंगभेद भाष्य करत सम आणि विषम तारखेला शरीर संबंध ठेवल्यास मुलगा आणि मुलगी होत असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या विधानावरून राज्यभरात गदारोळ उडाला होता. तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणी न्यायालयात देखील धाव घेतली होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेल्या तक्रारीची दखल घेत कनिष्ठ न्यायालयाने इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर इंदुरीकर यांच्यावतीने जिल्हा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज असं म्हणतात, “मारने वाले से बचाने वाला हमेशा बड़ा होता हैं ” या उक्तीची प्रचिती पुन्हा एकदा संपूर्ण जगाने घेतली आहे. ही घटना आहे कोलंबिया देशात घडलेली. ज्या घटनेने संपूर्ण जगाला एक नवीन प्रेरणा मिळाली आहे. १ मे २०२३ रोजी एक आई आपल्या ४ मुलांना घेऊन कोलंबिया देशामधल्या अमेझॉनच्या जंगलात असलेल्या अराराकुआरा या गावातून सॅन जोस डेल ग्वाविअरे इकडे एका प्रायव्हेट विमानाने निघाली. १ पायलट, १ लोकल लिडर आणि १ या मुलांची आई मॅग्डालेना मुकुटुय व्हॅलेन्सिया अशी ३ प्रौढ माणसं आणि तिच्या सोबत असलेली ४ मुलं ज्यात १३ वर्षाची लेस्ली जेकोबॉम्बेअर मुकुटुय आणि तिची ९ आणि ४…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या कामातून संगमनेर तालुका व शहर हे देशासाठी विकासाचे मॉडेल ठरले आहे. म्हाळुंगी नदीवरील पुलासाठी आमदार थोरात यांनी 30 नोव्हेंबर 2022 रोजी दिलेले पत्र व केलेल्या पाठपुराव्यातून या पुलासाठी 4 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मिळाला असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी दिली आहे. दिवटे म्हणाले, ऑक्टोबर 2022 मध्ये म्हाळुंगी नदीवरील पूर पाण्याने खचला होता. हा पूल घोडेकर मळा, पंपिंग स्टेशन, ओहरा महाविद्यालय, गंगामाई घाट, साईनगर या सर्वांकरता अत्यंत महत्त्वाचा होता. हा पूल खचल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज बँकेने साधलेली प्रगती, संचालक मंडळ आणि बँकेच्या कर्मचार्‍यांनी हातात हात घालून केलेल्या सांघीक कामाचा परिपाक म्हणून नूतन संचालक मंडळाची निवडही बिनविरोध झाल्याने बँकेच्या प्रगतीला सोन्याची झळाळी प्राप्त झाली असल्याचे प्रतिपादन व्यापारी एकता मंडळाचे प्रमुख, उद्योगपती राजेश मालपाणी यांनी केले. संगमनेरच्या उद्योग क्षेत्राची कामधेनू समजल्या जाणार्‍या संगमनेर मर्चन्ट्स बँकेच्या संचालकांची निवड बिनविरोध झाली, त्या निमित्त सभासदांचे ऋण व्यक्त करण्यासाठी व्यापारी एकता मंडळाने आभार सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी मालपाणी बोलत होते. व्यासपीठावर बँकेच्या गेल्या 58 वर्षांच्या इतिहासात चेअरमनपद भूषविलेल्या माजी संचालकांची उपस्थिती होती. मालपाणी म्हणाले, मागील काही दिवसांत जिल्ह्यातील काही मोठ्या बँका अवसायनात गेल्या. काहींवर रिझर्व्ह बँकेने दंडात्मक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – अनेक दिवसांच्या परिश्रमातून कालव्यांची कामे पूर्ण झाली आहेत. निव्वळ उद्घाटनाच्या हौसेपायी पाण्याची उशिरा चाचणी करावी लागली. कालव्यांमधून पाणी सुटले आणि दुष्काळी भागातील जनतेमध्ये मोठा आनंद निर्माण झाला. कालव्यांच्या शेजारी जमिनी असलेल्या अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या काही अडचणी असतील तर त्यांची समजूत काढून, उपाययोजना करून हे पाणी सुरू ठेवता आले असते. मात्र असे काहीही न करता घाईघाईने कालव्यांमधील पाणी बंद करण्याचे कारण काय? असा सवाल निळवंडे धरण व कालव्यांचे जनक, जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. निळवंडे कालव्यांमधील पाणी बंद केल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करताना काँग्रेस नेते आमदार थोरात म्हणाले की, निळवंडे धरण व कालव्यांची कामे…

Read More

राहात्यामध्ये प्रचंड विराट सभा गणेश परिसराच्या विकासाचा प्रामाणिक हेतू : थोरात महाराष्ट्र संवाद न्यूज ज्यांना स्वतःचा कारखाना नीट चालवता येत नाही ते गणेश चांगला कसा चालवणार. त्यांची दडपशाही झुगारून सभासद व जनतेचा मोठा पाठिंबा या निवडणुकीत मिळवला असून ही निवडणूक गणेश परिसरातील शेतकऱ्यांची अस्मिता व स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आहे. आमचा हेतू हा स्वच्छ व प्रामाणिक असून शेतकरी व कामगारांच्या विकासासाठी कटिबद्ध असून या परिसरातील हुकूमशाही हटवण्यासाठी परिवर्तन आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. तर स्वर्गीय शंकररावजी कोल्हे यांचा छावा सदैव तुमच्यासोबत असेल असे युवा नेते विवेक कोल्हे यांनी म्हटले आहे राहता येथे श्री गणेश परिवर्तन पॅनलच्या प्रचारार्थ सभेत ते…

Read More

खासदार सदाशिव लोखंडे यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विशेष प्रयत्नातून संगमनेरमधील बहुचर्चित ठरलेल्या म्हाळुंगी नदीवरील पुलासाठी आणि नगरपालिका क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यासाठी ७ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. मागील वर्षी पावसाळ्यात म्हाळुंगी नदीवरील पूल पूर्णपणे वाहून गेला होता. त्यामुळे शहरातील साईनगर पंपिंग स्टेशन, घोडेकर मळा या भागात जाण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत होते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी म्हाळुंगी नदीवरील पूल होण्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे पूल बांधण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर खासदार लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरमधील प्रतिक सुखदेव इल्हे याची बुधवारी डेन्मार्क येथील Maersk या अत्यंत नामांकित कंपनीत प्लेसमेंट झाली. प्रतिकने NRTI Badoda Gujarat (गतिषक्ती विश्व विद्यालय) या नामांकित भारत सरकारच्या शासकीय कॉलेजमधून सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये एमबीए पदवी घेतली आहे. अतिशय उच्च दर्जाच्या समजल्या जाणाऱ्या या कॉलेजमध्ये शिकणारा प्रतिक हा नगर जिल्ह्यातील पहिलाच विद्यार्थी आहे. भारतातून फक्त शंभर मुलांची दरवर्षी या अभ्यासक्रमासाठी निवड होते. भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाअंतर्गत हे एकमेव विश्व विद्यालय आहे. अभ्यासक्रमदेखील तुलनेत खूप अवघड असतो. प्रतिकने उत्तम गुण मिळवत सदर अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. प्रतीक उत्तम खेळाडू असून स्केटिंग प्रकारामध्ये त्याने राज्य तसेच देशपातळीवर अनेक पदके मिळविली आहेत. B.Sc.Agri…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज वैविध्यपूर्ण विषयांवरील वाचनीय आणि दर्जेदार पुस्तके प्रकाशित करणार्‍या ‘चपराक’ प्रकाशनने आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. नाशिक येथील युवा कवी आणि गीतकार प्रशांत केेंदळे यांचे ‘विठु नाम’ हे भक्तीगीत वारीच्या निमित्ताने प्रदर्शित केले आहे. सध्याचा आघाडीचा गायक गौरव चाटी यांनी ते आर्त आणि सुमधुर स्वरात सादर केले आहे. कोल्हापूरच्या प्रवीण ऐवळे यांनी ते संगीतबद्ध केले आहे. पदार्पणातीलच या गीताला रसिक श्रोत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे प्रकाशक आणि निर्माते घनश्याम पाटील यांनी सांगितले. चपराक प्रकाशनने राज्यभरातील नव्या-जुन्या लेखकांची पुस्तके प्रकाशित केली. 2002 सालापासून ‘साहित्य चपराक’ हे वाङमयीन मासिक प्रकाशित होते. या मासिकातील निवडक कथा, लेखांच्या अभिवाचनाचे व्हिडिओ चपराकच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज आमच्या पोळ्या करणाऱ्या बाईला कणिक भिजवता भिजवता मध्येच फोन आला म्हणून हात धुवून त्या फोनवर दोन-तीन मिनिटं बोलल्या आणि मग पुढील बराच वेळ भिंतीकडे तोंड करून WhatsApp वर मेसेजेसची देवाणघेवाण करत होत्या. दहा-बारा मिनिटं होऊनही त्यांचं परत कामाकडे वळण्याचं चिन्ह दिसेना, तेव्हा आजींनी त्यांना विचारलं, “इंदू, काय झालं गं, सर्व ठीक आहे ना?” इंदूने चेहरा आजीकडे केला तेव्हा कळलं की डोळ्यातून पाणी वाहत होतं. पुढील काही वेळात कळलं ते असं, त्यांच्या लातूर येथे राहणाऱ्या मावस भावाच्या साडेचार वर्षाच्या मुलाला ऑपरेशनच्यावेळी भूल दिल्यानंतर झालेल्या कॉम्प्लिकेशन्समुळे त्याच्या फुफुसांवर परिणाम होऊन त्याचं श्वसन धोकादायक पातळीवर कमी झालं होतं. त्या जोडप्याचं…

Read More

कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार : जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर : कृषी विभागामार्फत निरीक्षकांनी केलेल्या तपासणीमध्ये दोषी आढळून आलेल्या ४ बियाणे विक्री केंद्राचे व २ किटकनाशके विक्री केंद्रांचे परवाने निलंबीत करण्यात आले आहेत. निविष्ठा उत्पादकांनी किंवा जिल्हयामधील निविष्ठा विक्री केंद्र चालकांनी कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन करु नये अन्यथा त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे यांनी म्हटले आहे. खरीप हंगाम सुरु झालेला असुन बाजारामध्ये शेतक-यांची बि-बियाणे, खते व इतर कृषि निविष्ठा खरेदीसाठी लगबग सुरु झालेली आहे. खरीप हंगाम सन २०२३-२४ साठी शेतक-यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिकच्या दोन शिक्षणाधिकाऱ्यांचे लाचेचे प्रकरण ताजे असतानाच राज्याचा शिक्षण विभाग दिवसेंदिवस लाचखोरीने ग्रासल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहे. आता तर चक्क चेकनेच 75 हजार रुपयांची लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार एसीबीच्या कारवाईत समोर आला आहे. तिघा लाचखोरांवर एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाचखोरीचे विविध प्रकार समोर येत असतानाच आता चेकद्वारे लाच खाणारे तिघेजण एसीबीच्या जाळ्यात अडकले आहे. यात शिक्षण संस्थेच्या अध्यक्षासह मुख्याध्यापक आणि लिपिकाचा समावेश आहे. यासंदर्भात अँटी करप्शन ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार विनोद शंकर जाधव (वय 42 वर्ष, मुख्याध्यापक, महात्मा फुले हायस्कूल, एरंडोल) नरेंद्र उत्तम वाघ (वय 44 वर्ष, कनिष्ठ लिपिक, महात्मा फुले हायस्कूल,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मित्रा….!!! ‘ते’ भडकवतील , तुला राहावणार नाही , तरीही जागचा हलू नकोस , तुला शपथ आहे पुस्तकांची , तू दगड उचलू नकोस !! धर्म कधीच संकटात नसतो, तुझा ही धर्म धोक्यात नाही,! कुण्या भुरट्यांमुळे तुझ्या आदर्शांचा अपमान होत नाही,!! कर बळकट भावनांना, वारंवार दुखू देवू नकोस,! कर दुर्लक्ष थोड इकडं तिकडं लक्ष देऊ नकोस,!! तुझ स्वतःच मत असावं, दुसऱ्याने पढवलेल बोलू नकोस,! तुला शपथ आहे पुस्तकांची, तू दगड उचलू नकोस !! दोनेक वर्षा नंतर , सुटेल सारं कोड ! निवडणुका जवळ आहेत ओळखून घे थोडं !! हे बघ ही सर्व मतांची समीकरणं आहेत ! एका आड एक…

Read More

बुधवारी सकाळी पर्यावरण प्रेमींनी पुन्हा जाळल्या वाळूच्या गोण्या! अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळू तस्करी रोखण्यासाठी राज्यात नवे वाळू धोरण आणले असले तरी या धोरणाला तिलांजली देण्याचे काम त्यांचे विशेष लक्ष असलेल्या संगमनेर शहरात होत आहे. वाळू धोरणाची पायमल्ली होत असताना संगमनेरमधील महसूलचे अधिकारी नेमके करतात तरी काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शहरातून वाहणाऱ्या प्रवरा नदीतून वाळू तस्करी सुरू असल्याचा प्रकार पर्यावरण प्रेमींनी बुधवारी सकाळी पुन्हा एकदा समोर आणला आहे. प्रवरा नदी परिसरात गंगामाई घाटावर फिरायला जाणाऱ्या पर्यावरण प्रेमींनी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नदी काठावरील पायऱ्यांवर वाळूने भरलेल्या गोण्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सेवानिवृत्त डीवायएसपी असलेल्या सासऱ्याने आपल्या मुलाच्या अपरोक्ष मुलीसमान असलेल्या सुनेवर लैंगिक अत्याचार करून सासरा-सुनेच्या नात्याला काळिमा फासल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पत्नीने पतीला सांगितल्यानंतर पतीनेही नराधम वडिलांची बाजू घेत पीडित पत्नीला मारहाण करून माहेरी हाकलून दिले. याप्रकरणी सोलापूरच्या विजापूर नाका पोलीस ठाण्यात बापलेकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. सेवानिवृत्त डीवायएसपीच्या शिक्षक असलेल्या मुलाबरोबर पीडित तरूणीचा विवाह गेल्याच वर्षी झाला होता. विवाह झाल्यानंतर तिची महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची इच्छा होती. त्यानुसार तिने महाविद्याविद्यालयात प्रवेश घेतला होता. पती शिक्षक असल्यामुळे त्यास दररोज शाळेत जावे लागायचे. त्यामुळे त्याने पत्नीला शिक्षणासाठी महाविद्यालयात नेण्या-आणण्याची जबाबदारी वडिलांवर सोपविली होती. त्यामुळे सासरा कधी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिलेल्या धमकी प्रकरणी अटक केलेल्या सागर बर्वे याला मुंबईच्या महादंडाधिकारी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी बर्वे यांच्याकडून हस्तगत केलेला लॅपटॉप आणि मोबाईल यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीची चौकशी करावयाची आहे. तसेच या प्रकरणात अन्य संशयित आरोपींचा सागर बर्वे यांच्याशी काही संबंध आहे का? याचा देखील तपास करावयाचा आहे. आरोपीने आक्षपार्ह टिपणी करून दोन समूहात किंवा समाजात विविध समूहामध्ये कलह निर्माण केल्याच्या आरोपामुळे तपास होणे आवश्यक असल्याचे न्यायालयाला सांगत पोलिसांकडून दोन दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. मात्र न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली. आरोपी सागर बर्वे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी राज्यात शिर्डी आणि चिमूर येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यात येणार असून याबाबतचा अतिशय महत्त्वाचा ठराव आज मंत्रीमंडळ बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला आहे‌, अशी माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी‌ दिली आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. जिल्हा प्रशासनाचे बळकटीकरण करण्याच्या तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी व चंद्रपूर जिल्हयातील चिमूर येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणे बाबतचा प्रस्ताव राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रीमंडळ बैठकीत मांडला. शिर्डी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात…

Read More