Author: अनंत पांगारकर
मुंबई: राज्यातील अवैध गौण खनिज आणि वाळू उपशाच्या विरोधात राज्य सरकारने अत्यंत आक्रमक पाऊल उचलले असून वाळूमाफियांना आळा घालण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली आहे. यापुढे केवळ वाळूमाफियांवरच नव्हे, तर त्यांच्याशी संगनमत करून त्यांना पाठीशी घालणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवरही थेट फौजदारी आणि कडक दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, अवैध वाळू वाहतूक व उत्खनन करणाऱ्या आणि शासकीय अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ले करणाऱ्या संघटित गुन्हेगारांवर आणि त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ‘एमपीडीए’ सारखी कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. गडचिरोली येथे अवैध गौणखनिज तस्करी करणाऱ्यांनी नायब तहसीलदारांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्याबाबत विधानसभेत आमदारांनी…
ॲड. श्रीनिवास बिक्कड रामाच्या नावाने उभारलेल्या या भव्य मंदिराभोवती जर भ्रष्टाचार, अपारदर्शकता आणि आर्थिक अनियमिततेच्या सावल्या दिसू लागल्या, तर त्याची चौकशी आणि सत्य समोर येणे हे लोकशाही तसेच धार्मिक उत्तरदायित्वाच्या दृष्टीने अपरिहार्य ठरते. अयोध्येतील राम मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर कोट्यवधी भारतीयांच्या श्रद्धा, भावना आणि सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक आहे. प्रभू श्रीराम भारतीय जनमानसात सत्य, न्याय, त्याग, कर्तव्यनिष्ठा आणि मर्यादा यांचे आदर्श मानले जातात. त्यामुळे राम मंदिराशी संबंधित प्रत्येक निर्णय, प्रत्येक व्यवहार आणि प्रत्येक रुपयाचा हिशोब हा केवळ प्रशासकीय किंवा आर्थिक बाब नसून जनतेच्या विश्वासाशी निगडित विषय ठरतो. अशा परिस्थितीत मंदिरासाठी भक्तांनी अर्पण केलेल्या देणग्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांनी,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन छत्रपती संभाजीनगर: संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक आणि ‘एमपीआयडी’ गुन्ह्यातील मुख्य आरोपी भाऊसाहेब दामोदर कुटे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नियमित जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती सिद्धेश्वर एस. ठोंबरे यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने प्रामुख्याने आरोपीची गंभीर वैद्यकीय प्रकृती आणि न्यायालयीन अटींचे केलेले पालन या दोन महत्त्वाच्या बाबींवर आपले निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने आपल्या निरीक्षणात स्पष्ट केले की, नाशिकच्या सिव्हिल सर्जन यांनी सादर केलेल्या वैद्यकीय अहवालानुसार आरोपी भाऊसाहेब कुटे यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून ते सध्या नाशिकमधील खासगी रुग्णालयात ऑक्सिजन आणि ‘एनआयव्ही’ सपोर्टवर उपचार घेत आहेत. त्यांना सध्याच्या स्थितीत…
आजचे राशिभविष्य मेष : आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने काहीसा चढ-उतारांचा राहू शकतो. जुने शारीरिक आजार पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता असल्याने आहाराची आणि विश्रांतीची काळजी घ्या. महत्त्वाचे आर्थिक व्यवहार करताना कमालीची सावधानता बाळगा, अन्यथा नुकसान होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना संयम ठेवावा लागेल, कारण मतभेदांचे प्रसंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत. वृषभ : तुमच्यासाठी आजचा दिवस सकारात्मक आणि प्रगतीकारक ठरेल. विशेषतः व्यापार आणि व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी अत्यंत अनुकूल काळ आहे. संसर्गजन्य किंवा साथीच्या आजारांपासून स्वतःचे रक्षण करणे गरजेचे आहे. कौटुंबिक आघाडीवर वातावरण प्रसन्न राहील आणि जीवनसाथीसोबतचे नाते अधिक मधूर होऊन आनंदात वेळ बगेल. मिथुन : आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक आणि…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली नागरिकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करण्यात आली असून प्राथमिक तपासात ६ कोटी ६५ लाख रुपयांची मोठी आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी विजय तबाजी काळे याला आता २९ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी (PCR) सुनावण्यात आली आहे. अहिल्यानगर येथील आर्थिक गुन्हे शाखेने आरोपीच्या १० दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. संगमनेर येथील विशेष तथा सत्र न्यायालयात यावर सुनावणी झाली असता, जिल्हा न्यायाधीश मंदार नेरलेकर यांनी आरोपीला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणात सरकारच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला. या प्रकरणाची सविस्तर पार्श्वभूमी अशी…
सोनई : सोनई शहर आणि परिसरातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अल्पवयीन मुली व तरुणी बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. अनेक हतबल कुटुंबांनी आपल्या मुली हरवल्याच्या तक्रारी पोलिसांकडे नोंदवल्या आहेत, मात्र दिवस उलटूनही पोलिसांकडून कोणताही ठोस तपास केला जात नसल्याचा गंभीर आरोप पालकांकडून होत आहे. या संवेदनशील प्रकरणात सोनई पोलीस स्टेशनचे अधिकारी वारंवार ‘एफआयआर’ (FIR) दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत असल्याने नागरिकांमधील असंतोष अधिकच वाढला आहे. मुली गायब होण्याच्या या वाढत्या घटनांमुळे संपूर्ण तालुक्यात पालकांमध्ये कमालीचे भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांची तपासाची गती अत्यंत मंद असून प्रशासन या गंभीर विषयाकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: डिलिव्हरी लॉजिस्टिक कंपनीची फ्रँचायझी मिळवून देण्याचे आमिष दाखवून संगमनेर येथील एका ४६ वर्षीय वैद्यकीय (मेडिकल) व्यावसायिकाची ५ लाख ५० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अहिल्यानगरच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पावबाकी रोड परिसरात राहणाऱ्या पीडित व्यावसायिकाला एका नामांकित डिलिव्हरी लॉजिस्टिक कंपनीची फ्रँचायझी घ्यायची होती. यासाठी त्यांनी इन्स्टाग्रामवर पाहिलेल्या एका जाहिरातीतील फॉर्म भरून आपली माहिती दिली. हीच माहिती सायबर चोरांच्या हाती लागली आणि फसवणुकीच्या जाळ्याला सुरुवात झाली. फॉर्म भरल्यानंतर मयांक गुप्ता, परमार आणि प्रियांका नावाच्या महिलेने पीडित व्यावसायिकाशी मोबाईलद्वारे संपर्क साधला…
आजचे राशिभविष्य मेष: आजचा दिवस अत्यंत शुभ आणि प्रगतीकारक ठरेल. जुने प्रलंबित स्वप्न पूर्ण होण्याचा सुंदर योग असून नोकरीच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहील. आर्थिक क्षेत्रातील गुंतवणुकीतून उत्तम धनलाभ संभवतो आणि कायद्याच्या कचाट्यातून तुमची सुटका होऊ शकते. कौटुंबिक कारणांमुळे काहीसा खर्च वाढेल, परंतु मानसिक आनंद टिकून राहील. वृषभ: आज तुमचा कल प्रामुख्याने मनोरंजनाकडे आणि कलात्मक गोष्टीकडे राहील. समाजात किंवा कामाच्या ठिकाणी एखाद्या महत्त्वपूर्ण व्यक्तीशी भेट होण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायातील नव्या योजनांबाबत सावधगिरी बाळगा आणि कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. आरोग्य उत्तम राहील आणि जुन्या शत्रूंपासून होणारा त्रास पूर्णपणे नष्ट होईल. मिथुन: आजचा दिवस आर्थिक आणि कौटुंबिक दृष्टीने संमिश्र फळ देणारा…
https://x.com/i/status/2069734732120612878 महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेवर नवरा-नवरीच्या नावापुढे जन्मतारीख छापणे बंधनकारक करण्याच्या राज्य शासनाच्या संभाव्य विचारावर आमदार सत्यजीत तांबे यांनी तीव्र शब्दांत आक्षेप घेतला असून, असा निर्णय घेणे पुरोगामी महाराष्ट्रासाठी हास्यास्पद ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी यासंदर्भात एक ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, एका बाजूला बालविवाह रोखण्यासाठी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे, सक्षम यंत्रणा उभारणे आणि व्यापक स्तरावर जनजागृती करणे यांसारखे अनेक ठोस आणि प्रभावी मार्ग उपलब्ध आहेत. असे असताना शासन अशा केवळ प्रतीकात्मक आणि वरवरच्या उपायांवर भर देत आहे, जे अजिबात योग्य नाही. इतर काही राज्यांच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: चेक बाऊन्स प्रकरणात संगमनेर न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्याचा चेक घेऊन फौजदारी खटला दाखल करणे फिर्यादीला चांगलेच महागात पडले आहे. कायदेशीर त्रुटींमुळे न्यायालयाने आरोपी संभाजी पांडुरंग पवार यांची निर्दोष मुक्तता केली आहे. फिर्यादी डॉ. अमोल संताजी कर्पे आणि आरोपीचा मुलगा डॉ. विक्रम पवार हे दोघेही एकाच व्यवसायातील असल्याने त्यांची ओळख होती. वायनरी व्यवसाय सुरू करण्यासाठी आरोपी व त्यांच्या मुलाने डॉ. कर्पे यांच्याकडून ५ लाख रुपये उसने घेतले होते. त्यातील दीड लाख रुपये परत केल्यानंतर, उर्वरित ३ लाख ५० हजार रुपयांच्या वसुलीसाठी फिर्यादीला एक चेक देण्यात आला. हा चेक बँकेत…
