Author: अनंत पांगारकर
मंगळवार, ०८ ऑक्टोंबर संगमनेर – संगमनेर बसस्थानकावरील प्लँटफार्मवर बस लावत असताना पुढील टायरखाली सापडून वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. सखुबाई महादू चव्हाण (वय ८४ रा आश्वी खुर्द) असे मयत महीलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, नाशिक-पारनेर बस (क्रमांक एम. एच. ११ बी. एल. ९४०९) नाशिकहून संगमनेर बसस्थानकावर आली होती. याचवेळी सखुबाई चव्हाण ही जेष्ठ महीला आपल्या मुलीबरोबर बसस्थानकावर चालली होती. याच दरम्यान बसचालक प्लँटफार्मवर प्रवाशांची चढ उतार करण्याकरिता बस लावत असतांना अचानक ती पुढील बाजुच्या टायर खाली सापडली. यात टायर महिलेच्या…
मंगळवार, ०८ ऑक्टोंबर राहुरी : श्रीरामपूरचे माजी आमदार व अशोक ऊद्योग समुहाचे अध्यक्ष भानुदास मुरकुटे यांच्या विरोधात सोमवारी रात्री एका महिलेने केलेल्या तक्रारीवरून राहुरी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून मुरकुटे यांना रात्रीच त्यांच्या श्रीरामपूर मधील निवासस्थानातून पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली असल्याची माहिती समोर येत आहे. या संदर्भात पोलिसांकडून अधिकृत माहिती संध्याकाळी दिली जाणार आहे. दरम्यान मुरकुटे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करणारी पिडीता बँक कर्मचारी असल्याचे समजते. पीडित महिलेने सोमवारी संध्याकाळी राहुरी पोलीस ठाण्यात अत्याचार प्रकरणी फिर्याद दिली होती. या दरम्यान कामानिमित्ताने मुरकुटे सोमवारी मुंबईत होते. ते रात्री उशिराने घरी परतल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. मुरकुटे यांच्यावरील…
सोमवार, ०७ ऑक्टोबर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियांना सरकारने पुन्हा स्थगिती दिली आहे. यापूर्वी सरकारने ३० सप्टेंबर पर्यंत या निवडणुकांना स्थगिती दिली होती. आता ही मुदत ३१ डिसेंबर पर्यंत लांबविण्यात आली आहे. यासंबंधीचे आदेश सोमवारी काढण्यात आले. दरम्यान न्यायालयाने आदेश दिलेल्या संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू राहणार असल्याने त्यांना या निर्णयातून वगळण्यात आले आहे. २०२४-२०२५ या वर्षात राज्यातील २९,४२९ सहकारी संस्थांची निवडणूक प्रलंबित आहे. त्यापैकी ७,१०९ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू होती. राज्यातील पावसाची परिस्थिती लक्षात घेत सरकारने या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या होत्या. आता या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचे…
असा असेल तुमचा आजचा दिवस मंगळवार, दि. ०८ ऑक्टोंबर मेष – प्रकृतीची अपेक्षित साथ मिळेल. आज दिवस आनंदात घालवावा आवडत्या मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. मित्र- मैत्रिणींबरोबर मनोरंजनासाठी खर्च करावा लागेल. वृषभ – आर्थिक नियोजनाचे फायदे होतील. खर्च वाढणार आहे. मनासारखी खरेदी पण कराल. आर्थिक प्राप्तिपण त्याच प्रमाणात राहील. मात्र विनाकारण प्रवास टाळा. मिथुन – आज आपण आनंदी व उत्साही रहा ल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नका. स्वतः लक्ष देऊन काम करा निश्चित पूर्ण होतील. तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव जाणवेल. कर्क – नोकरी-व्यवसायात समाधानकारक परिस्थिती राहणार आहे. नवीन संधी येतील कोणत्या विचारपूर्वक स्वीकारा यामधील करार नीट आहेत की नाही ते तपासून पाहावे…
इंदापूरमधून उमेदवारीही झाली निश्चित, पारंपरिक लढत रंगणार! सोमवार, ०७ ऑक्टोंबर काँग्रेस सरकारमधील तत्कालीन माजी मंत्री आणि इंदापुरातील बडे प्रस्थ असलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी अखेर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी हाती घेतानाच त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. आता इंदापूरमधून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेचे उमेदवार असतील. इंदापूर शहरातील जुन्या बाजार समितीच्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार रोहित पवार आदींच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांनी पक्षप्रवेश केला. प्रवेशानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यासपीठावरच हर्षवर्धन पाटील यांची विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली.…
सोमवार, ०७ ऑक्टोंबर मुंबई : उद्योगपती रतन टाटा यांना प्रकृती बिघडल्यानं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. रविवारी रात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष असलेल्या रतन टाटा यांचं वय ८६ वर्षे इतकं आहे. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णलयात उपचार केले जात आहेत. त्यांचा रक्तदाब खूपच कमी झाला होता, अशी माहिती समजते. रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून अद्याप प्रकृतीबाबत काही अपडेट समोर आलेले नाहीत. रतन टाटा यांच्यावर हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शाहरुख असपी गोळवाला यांच्या निरीक्षणाखाली उपचार केले जात आहेत.
सोमवार, ०७ ऑक्टोबर असुरक्षित बनलेल्या संगमनेरमध्ये महिलांच्या गळ्यातील दागिने लांबविण्याची मालिका नव्या पोलीस निरीक्षकांच्या कार्यकाळात अद्यापही सुरूच आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी महिलेच्या गळ्यातील दागिने लांबविल्यानंतर शनिवारीदेखील एसटी बसमध्ये चढत असताना महिलेच्या गळ्यातील सुमारे दीड लाखाचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात दागिने घालून घराबाहेर पडणाऱ्या महिला असुरक्षित बनल्या असून दागिने चोरांना लगाम घालण्यात संगमनेर शहर पोलीस यशस्वी होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात दिवसा आणि रात्री पोलिसांनी गस्त वाढविण्याची, सतर्क राहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. निर्मला जयराम आंबरे (वय ७१ वर्ष रा. शिवाजी चौक, अकोले, ता. अकोले जि. अहमदनगर) या वृद्ध…
राशिभविष्य – सोमवार, ०७ ऑक्टोंबर मेष- परिस्थिती प्रतिकूल आहे. दुखापत होऊ शकते. तुम्ही काही अडचणीत येऊ शकता. जगा आणि पार करा. आरोग्य मध्यम. प्रेम आणि मुलांची स्थिती देखील मध्यम आहे. तुमचा व्यवसाय चांगला चालला आहे. सूर्याला पाणी देत राहा. वृषभ – तुम्हाला तुमच्या जीवनसाथीकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आरोग्य सौम्य आणि उबदार राहील. प्रेम आणि मुलांची स्थिती खूप चांगली आहे. व्यवसाय खूप चांगला आहे. मिथुन – शत्रू नुकसान करण्याचा प्रयत्न करतील पण विजय तुमचाच होईल. आरोग्य मध्यम. प्रेम, मुलांची स्थिती चांगली आहे. व्यवसायही चांगला आहे. लाल वस्तू दान करा. कर्क – भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील.…
रविवार, ०६ ऑक्टोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी आपल्या पक्षाचा दुसरा उमेदवार जाहीर केला आहे. नगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघातून पवार यांनी विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे यांची पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. अजित पवार यांची जनसन्मान यात्रा रविवारी अकोला येथे पोहोचली होती. येथील सभेत बोलताना विधानसभा निवडणुकीत काही ठिकाणी घड्याळ, काही ठिकाणी धनुष्यबाण तर काही ठिकाणी भाजपच्या कमळाचे चिन्ह असेल, असे सांगत त्यांनी या मतदारसंघात घड्याळ चिन्ह असल्याचे स्पष्ट करत लहामटे यांच्या नावाची घोषणा करत त्यांना दुसऱ्यांदा संधी देण्यास सांगितले. पवार म्हणाले, मागच्या पाच वर्षाच्या कालावधीत केवळ तीन वर्षे काम करायला मिळाले. या काळात तुमच्या बहाद्दर आमदाराने माझ्या मागे…
रविवार, ०६ ऑक्टोबर अकोले – अकोले तालुक्यातील सर्व गाव-वाड्या, वस्त्यांमध्ये दळणवळणाची सुविधा सक्षम करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिली. अकोले शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार डॉ. किरण लहामटे, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक सिताराम गायकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे, अकोले नगरपंचायत मुख्याधिकारी पंकज गोसावी आदी उपस्थित होते.उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, गरिबांना आरोग्यसेवा देण्यासाठी आयुष्यमान भारत योजनेतून पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत केले जातात. उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून या योजनेचा फायदा अकोलेतील नागरिकांना होणार आहे. आदिवासी बांधव हे लोक परंपरा, संस्कृतीचे जतन करतात. आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात…
