Author: अनंत पांगारकर
बुधवार, दिनांक ५ जून २०२४ संगमनेरात मटक्यासारखे अवैध व्यवसाय बंद असल्याचा पोलिसांचा दावा त्यांच्याच कारवायांमुळे खोटा ठरत आहे. संगमनेरातील मटका व्यावसायिक अश्रफअली जहागीरदार चालवत असलेल्या मटका अड्ड्यांवर एलसीबी आणि स्थानिक पोलिसांनी आठवडाभराच्या आत तीन कारवाया केल्या असून या तिन्ही गुन्ह्यात सय्यद याच्यासह आणखी पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कारवाई १ – विशेष म्हणजे बुधवारी दाखल झालेल्या गुन्ह्यात मटका व्यावसायिक अश्रफअली जहागीरदार हा फरार दाखविण्यात आला आहे. तर बुधवारी दुपारी शहरालगतच्या समनापुरमध्ये एका पत्राच्या शेडमध्ये टाकलेल्या छाप्यात पोलिसांना टाईम बाजार नावाचा मटका सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या कारवाईत राज मोहम्मद अरीफ सय्यद (वय ४० अलकानगर, संगमनेर) याला पकडत…
बुधवार, दिनांक ५ जून २०२४ सहाय्यक पोलीस निरीक्षकासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना न्यायालयात पैरवी कर्मचारी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावत रंगेहाथ पकडले आहे. यामुळे पोलिसांचा लाचेचा नवा कारनामा समोर आला. सागर कुमार टकले (वय ३७ वर्ष, कोपरखैरणे पोलीस स्टेशन, नवी मुंबई) व प्रज्ञेश नरेंद्र कोठेकर (वय ४२ वर्ष, कोपरखैरणे पोलीस स्टेशन, नवी मुंबई) अशी लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस नाईक असलेल्या अधिकाऱ्यांची नाव आहेत. कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रारदाराच्या चुलत्यांवर दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये पोलीस कोठडीत असलेल्या चुलत्याला कोठडीची मुदत संपल्यानंतर जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान वेळेत म्हणणे (Say) देण्यासाठी तसेच उर्वरित गुन्ह्याच्या तपासात मदत करण्याकरिता सहाय्यक…
बुधवार, दि. ५ जून २०२४ नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाची मोठी पीछेहाट झाली आहे. महाविकास आघाडीने राज्यात भाजपाचा मोठा पराभव केल्याने या पराभवाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली. ही जबाबदारी स्वीकारून त्यांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी वरिष्ठांकडे दाखवली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. भारतीय जनता पक्षाला दिल्लीतील आपल्या एकहाती सत्तेसाठी महाराष्ट्रात मोठ्या विजयाची अपेक्षा होती. त्यामुळे महायुतीने राज्यात ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले होते. मात्र निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर महायुतीने निराशाजनक कामगिरी केल्याचे स्पष्ट झाले. राज्यात सत्ताधारी महायुतीला अवघ्या १७ जागांवर समाधान मानावे लागले. तर विरोधी असलेल्या महाविकास आघाडीला राज्यात अपेक्षेपेक्षा…
बुधवार, दिनांक ५ जून २०२४ लोकसभा निवडणुकीचा उत्सव संपला आहे. येता काही दिवसात देशात नवे सरकार सत्तारूढ होईल. दरम्यान नासिकसह चार विधान परिषद मतदार संघाची निवडणूक येत्या २६ जूनला होत आहे. नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीबाबत निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी मतदानाच्या वेळेत बदल करण्याचा मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती देण्यात आली आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी मतदानाची वेळ याआधी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ठेवण्यात आली होती. मात्र या वेळेत आता बदल करण्यात आला आहे. नव्या बदलानुसार आता २६ जूनला मतदान सकाळी ७ वाजता सुरू होणार असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालणार आहे, अशी माहिती…
मंगळवार दिनांक 4 जून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) निलेश लंके यांनी भाजपचे विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने धक्कादायक पराभव केला आहे. विखे यांचा विजयाचा आत्मविश्वास या मतदारसंघात मतदारांनी धुडकावून लावला. राज्यातील लक्षवेधी लढतीमध्ये अहमदनगर दक्षिणचा समावेश होता. महाविकास आघाडीने या मतदार संघात विखे यांचा पराभव करण्यासाठी आपली ताकद पणास लावली होती. भल्याभल्यांचे अंदाज या मतदारसंघात फोल ठरले. निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार सायंकाळी 7:50 वाजेपर्यंत निलेश लंके आपले प्रतिस्पर्धी उमेदवार सुजय विखे यांच्यापेक्षा 22 हजार 245 मतांनी आघाडीवर होते. त्यामुळे लंके यांचा विजय अंतिम मानला जात आहे. ते 29 हजार 314 मतांनी…
मंगळवार दिनांक ४ जून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी ५० हजाराहून अधिक मतांनी विजय मिळविला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार वाकचौरे यांना विजयी करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास दर्शविला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे या मतदारसंघात पुन्हा एकदा मूळ शिवसेनेची (ठाकरे गट) मशाल पेटली आहे. नवे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विषयी मतदारांमध्ये फारशी सहानुभूती नसली तरी राज्यात घडलेले फोडाफोडीचे राजकारण शिर्डीतील मतदारांना मानवले नाही. अनेक पक्ष बदलून शिवसेनेत पुन्हा प्रवेश केलेल्या वाकचौरे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर विद्यमान खासदाराविरोधात असलेल्या नाराजीचा फायदा वाकचौरे यांना झाला आहे. उद्धव ठाकरे…
मंगळवार दिनांक 4 जून लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येत असून राज्यात महाविकास आघाडीला मोठे यश मिळताना दिसत आहे. त्यातही काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येत आहे. काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी, अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राज्यात महाविकास आघाडीला यश मिळाले. जनतेने विखे यांच्या दहशतीचे झाकण उडवले असून अजून काही बाकी आहे तेही उडणार … देश पातळीवर भाजपाकडून होत असलेले द्वेष भावनेचे राजकारण आणि राज्यांमध्ये चुकीचा पायंडा पाडून आलेले सरकार हे जनतेला मान्य झाले नसून याविरुद्ध जनतेने कौल दिला आहे. महाविकास आघाडीला भक्कम साथ दिली असून सरकार विरोधी रोष व्यक्त केला असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते…
मंगळवार दिनांक 4 जून अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने बिछडे वर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) निलेश लंके यांनी सुजय विखे यांनी मिळविलेले मताधिक्य तोडत मोठे मताधिक्य घेऊन आता विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. पराभवाच्या छायेत आलेल्या सुजय विखे यांनी मतमोजणी केंद्र सोडले असून लंके यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली आहे. तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीपासूनच मताधिक्य मिळवत आघाडीवर असलेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांचे मताधिक्य तोडण्यात महायुतीच्या सदाशिव लोखंडे यांना देखील अपयश आल्याने या मतदारसंघातून भाऊसाहेब वाकचौरे यांनी देखील विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. विद्यमान दोन्ही खासदारांच्या पराभवा मागे बाळासाहेब थोरात ठरले किमयागार… त्यामुळे नगर आणि…
मंगळवार दिनांक 4 जून अहमदनगर लोकसभा मतदारसंघात 12 हजारापेक्षा अधिक मताधिक्य घेऊन आघाडीवर असलेल्या भाजपाच्या सुजय विखे यांना विजयापासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) निलेश लंके निकराचा लढा देत आहे. विखे यांनी घेतलेले मताधिक्य तोडण्याच्या दिशेने लंके मतमोजणी पुढे जाताना दिसत आहे. विखे यांचे मताधिक्य घटना ते आता 2457 वर आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या दोन्ही उमेदवारात चुरशीचा सामना असल्याचे समोर येत आहे. या मतदारसंघाचा खासदार विखे की लंके हे निवडणूक निकालानंतर समोर येणार असले तरी सध्या सुरू असलेल्या मतमोजणीने दोन्ही प्रमुख उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
मंगळवार दिनांक 4 जून अहमदनगर लोकसभा आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे मतमोजणी वेग घेत असून या दोन्ही मतदारसंघातून अनुक्रमे भाजपच डॉक्टर सुजय विखे पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर आहे. अहमदनगर मधून डॉक्टर सुजय विखे पाटील 12624 तर शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे 28191 मतांनी आघाडीवर आहे. शिर्डी आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे (स्त्रोत केंद्रीय निवडणूक आयोग)
