Author: अनंत पांगारकर

गुरुवार, ०१ ऑगस्ट मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी बुधवारी (३१ जुलै) राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये झालेल्या समारंभात राज्यपालपदाची शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना शपथ दिली. राज्यपालांच्या पत्नी श्रीमती सुमथी आर., मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, राज्यपाल राधाकृष्णन यांचे कुटुंबीय आदी यावेळी उपस्थित होते. प्रारंभी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी राज्यपालांच्या…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई  शिवसेना (उबाठा) गटाच्या मुंबईतील शाखाप्रमुखांची बैठक आज बुधवारी पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘एकतर तू तरी राहशील, नाहीतर मी तरी राहीन,’ असे खुले आव्हान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. लोकसभेमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला चांगले यश मिळाले आहे. त्यानंतर आता त्यांच्याकडून विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी आज मुंबईतील शाखाप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला संबोधित करत असताना उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. लोकसभेत आपण जी कामगिरी केली, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई  महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत असलेल्या यशश्री शिंदे हत्या प्रकरणात मोठी अपडेट आली आहे. यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला काल (मंगळवार) अटक करण्यात आली होती. तसेच त्याच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आज पनवेल सेशन्स कोर्टाकडून त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनविण्यात आली आहे. यशश्री शिंदेच्या हत्या प्रकरणाने राज्याला हादरवून ठेवले आहे. तसेच आरोपीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, यासाठी रविवारी उरणमध्ये नागरिकांनी आंदोलन केले होते. यशश्री एका खासगी कंपनीत कार्यरत होती. गुरुवारी सकाळी घरातून बाहेर पडताना आपण आपल्या मैत्रिणीच्या घरी चाललो आहोत, असे तिने तिच्या घरात सांगितले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत ती घरी आलीच…

Read More

बुधवार, ३१ जुलै  गुन्ह्यातील सहभागाबद्दल स्वतंत्र असा सबळ पुरावा पोलिसांनी उपलब्ध न केल्याने संगमनेरमधील एका खून प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीला तब्बल दोन महिन्यानंतर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाय. पी. मनाठकर यांनी जामीन मंजूर केला आहे. मोहम्मद इम्रान निसार सिद्दिकी असे न्यायालयाने जामीन मंजूर केलेल्या आरोपीचे नाव आहे. गेल्या आठवड्यात न्यायालयाने हा जामीन मंजूर केल्याची माहिती समोर आली. संशयित आरोपी मोहम्मद इम्रान निसार सिद्दिकी याच्या विरोधात आहतेशाम अन्सारी यांच्या खुनाचा आरोप असून त्याच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३०२, १२०बी, २०१, ५०६ सह ३४ नुसार गुन्हा दाखल आहे. २४ एप्रिलला संगमनेर शहरालगत असलेल्या मालदाड येथील जंगलात…

Read More

बुधवार, ३१ जुलै घारगाव प्रकरणातील आरोपी युसुफ दादा चौघुले याच्या पोलीस कोठडीत बुधवारी ३ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी शादाब रशीद तांबोळी याच्यासह कुणाल विठ्ठल शिरोळे व आयाज अजीम पठाण हे अद्यापही फरार आहेत. फिर्यादी अल्पवयीन असल्याची माहिती असतानादेखील घटनेतील मुख्य आरोपी शादाब तांबोळी याच्यासोबत सलगी करण्यासाठी कुणाल शिरोळे, युसुफ चौगुले यांच्या मदतीने शादाब तांबोळी याने वेळोवेळी फिर्यादी मुलीचा पाठलाग करत तिला प्रेमाचे अमिष दाखवून तिच्यासोबत सलगी केली. तसेच शादाब तांबोळी व युसुफ चौघुले यांनी फिर्यादी तरुणीला फसवून मंचर येथे बोलावून घेत युसुफ चौघुले याच्या कारमधून फिर्यादीला पाण्यात गुंगीकारक औषध देऊन अर्धवट बेशुद्ध झाली असताना…

Read More

बुधवार ३१ जूलै महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने उभारल्या जाणाऱ्या डिफेन्स क्लस्टर उद्योग समूहात शिर्डी एमआयडीसीची निवड झाली असून सवलतीच्या दरात जागा देण्याचा निर्णय उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज दिला. तसेच या औद्योगिक नगरीच्या रस्ते आणि वीज विकासासाठी १०० कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली. यामुळे आता शिर्डी एमआयडीसीचा विकास जलद गतीने होऊन शिर्डीची देवस्थानाबरोबर आता औद्योगिक नगरी म्हणून नवी ओळख तयार होणार असल्याचा विश्वास अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. डिफेन्स क्लस्टर अंतर्गत उभारल्या जाणाऱ्या उद्योगासाठी १००० कोटींची गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना सवलतीच्या दरात २०० एकर जमीन देण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घेतला आहे. यासंदर्भात आज…

Read More

बुधवार, ३१ जुलै गोदावरी कालव्यांच्या नूतनीकरणासाठी २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली असून याबाबत लवकरच निर्णय करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे. ब्रिटीश कालवे म्हणून गोदावरी कलव्याची ओळख वर्षानूवर्ष जुन्या झालेल्या या कालव्यांना एकदाच नाबार्डच्या माध्यमातून निधी उपलब्धता करून देण्यात आला होता. त्यानंतरही दुर्लक्षित झालेल्या गोदावरी कालव्यांची दुरूस्ती होत नसल्याने गोदावरी धरण समूहातून सोडण्यात येणारे आवर्तन लाभक्षेत्रातील शेवटच्या गावापर्यत पोहचण्यास मोठा कालावधी लागतो. यावरून पाण्याचे संघर्षही निर्माण होत असून शेतकऱ्यांचा संपूर्ण रोष विभागावर आणि सरकारवर येतो ही वास्तविकता मंत्री विखे यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. कालव्याच्या…

Read More

बुधवार, ३१ जुलै  भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून यामुळे धरणात पाण्याची आवक होत आहे. बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत धरणाचा पाणीसाठा ९१ टक्केपर्यंत गेल्याने धरणातून प्रवरा नदी पात्रात पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. बुधवारपासून धरणात एक हजार क्युसेकने पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे भंडारदरा धरण ते निळवंडे धरणापर्यंतच्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक देखील सुरू आहे. धरणाचा पाणीसाठा नियंत्रित राखण्यासाठी अहमदनगर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीची माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी व आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन कक्षाला कळविण्यात आली आहे. बुधवारी सकाळी सहा…

Read More

बुधवार, ३१ जुलै  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. बैठकीत झालेले निर्णय पुढीलप्रमाणे… १) गृह विभाग महाराष्ट्रातील कारागृहे होणार अद्ययावत सुधारणांसाठी अध्यादेश काढणार महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवेसाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. केंद्र सरकारने कारागृहातील बंद्यांमध्ये सुधारणा व पुनर्वसनाचा विचार करून मॉडेल प्रिझन्स ॲक्ट २०२३ तयार केला आहे. तसेच सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशानी देखील या संदर्भात आवश्यक वाटतील त्या सुधारणा करण्याचे म्हटले आहे. या अनुषंगाने कारागृह विभागाच्या प्रमुखाचे नामाभिधान महासंचालक, कारागृह व सुधारसेवा…

Read More

मंगळवार, ३० जुलै विशेष प्रतिनिधी / मुंबई उरण हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी दाऊद शेखला कर्नाटकातील गुलबर्गा येथून अटक केली. दाऊदचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दाऊदचे मित्र, नातेवाईकांची मदत घेतल्याचं अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी पत्रकारांना सांगितलं. मुख्य संशयित आरोपी दाऊदच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके कर्नाटकात पाठवण्यात आली होती. उरणमध्ये एका २२ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी संशयित आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन त्याला कसं पकडलं याची माहिती दिली. यासह पीडितेची हत्या कशी झाली, यावरही पोलिसांनीही भाष्य केल. तरुणी तसंच आरोपी यांच्यात मैत्री होती. मृत तरुणीचा आरोपीशी गेल्या तीन-चार वर्षांपासून संपर्क नव्हता. त्यातूनच…

Read More