Author: अनंत पांगारकर

रविवार २१ जुलै  विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी शनिवारी संध्याकाळी नगर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. वादग्रस्त ठरलेल्या नगर एलसीबीच्या उपनिरीक्षक सोपान गोरे यांचा समावेश असून या शाखेत मोठे फेरबदल करण्यात आले आहे. तर जिल्हा पोलीस अधीक्षकांनीदेखील प्रशासकीय बदल्यांची कार्यवाही शनिवारी सुरू केली. शनिवारी पोलीस मुख्यालयात प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती दरम्यान जिल्ह्यातील कार्यकाळ संपलेल्या २१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या दुसऱ्या जिल्ह्यात करण्यात आल्या आहे. खासदार निलेश लंके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या कारभाराच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असून या मागणीसाठी ते सोमवारपासून उपोषण करणार आहे. लंके यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षकांमार्फत…

Read More

महाराष्ट्रात सध्या जनलाचारीचा महिमा सुरू आहे. लोकांना काय पाहिजे याचा विचार न करताच राज्यातल्या शिंदे सरकारने आपला खजिना रिता करण्याचा खेळ सुरू केला आहे. आवश्यकता नसूनही तो आम्ही देणार अशा मानसिकतेत सरकारने आपली पोतडी खुली केली आहे. एखाद्या जपान वा स्वीस देशाने करावी अशी ही खिराफत महाराष्ट्रातील लोकांच्या वाट्याला आली आहे. एव्हाना आर्थिक धोरणाविषयी भली मोठी व्याख्यानं झोडणार्‍यांना जे जमलं नाही ते एकनाथ शिंदेंच्या सरकारने करून दाखवलं आहे. कमाईपेक्षा खर्च वाढला की घर चालवणं अवघड जातं. मग कर्ज आणि कर्ज. ते भरणं अवघड झालं की संकट आलंच म्हणून समजा. घरासारखीच अवस्था देशाची होत असते. देश रसातळाला जाऊ नये, म्हणून राज्यांवर…

Read More

शनिवार २० जुलै केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (यूपीएससी) अध्यक्ष मनोज सोनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी आपल्या वैयक्तिक कारणास्तव हा राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, पूजा खेडकर प्रकरणामुळे सोनींनी राजीनामा तर दिला नाही ना, याबाबतदेखील आता अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. सोनी यांनी गेल्यावर्षीच यूपीएससीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला होता. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ आणखी चार वर्षांनी २०२९ मध्ये संपणार होता. परंतु, त्यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच अचानकपणे राजीनामा दिल्याने यूपीएससी चर्चेत आली आहे. या राजीनाम्याचा अर्थ खेडकर प्रकरणाशीही लावला जात असल्याने खळबळ उडाली आहे. सोनी २०१७ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या घटनात्मक मंडळाचे सदस्य झाले.…

Read More

खासदारांच्या एलसीबी विरोधातील लेटर बॉम्बकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठांचे दुर्लक्ष अहमदनगर पोलीस दलात नेमकं काय सुरू आहे? एलसीबीला नेमका आशीर्वाद कोणाचा? एलसीबीतील हप्तेखोरांची नावानिशी तक्रार करून अद्यापही दखल नाही शनिवार २० जुलै | अनंत पांगारकर  अहमदनगर पोलीस दलातील विशेषत: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील (एलसीबी) भ्रष्टाचारा विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे खासदार निलेश लंके यांनी एका पत्राद्वारे तक्रार करून देखील आठवडा उलट झाला तरी दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे सोमवारपासून (२२ जुलै) लंके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे स्पष्ट केले. अहमदनगर एलसीबीच्या विरोधात…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई पक्ष फुटीचे अनेक दरवाजे ओलांडणारे काँग्रेसचे बांद्रा येथील आमदार बाबा सिद्धिकी यांचे पुत्र झिशान सिद्धिकी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून बांद्रा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून दबावतंत्राचा वापर सुरु केला आहे. उमेदवारी न मिळाल्यास महाविकास आघाडीला सांगलीप्रमाणे धडा शिकवू असा इशारा दिला आहे. महिन्याभरापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत सांगली जागेवरून वाद झाल्यानंतर काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला होता, याची आठवण झिशानने करून दिली आहे. माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडत अजित पवार गटात समावेश केला आहे. त्यामुळे बाबा सिद्दीकी यांचे पुत्रे झिशान सिद्दीकी हे एकटे पडले…

Read More

शनिवार २० जुलै  चोरीच्या गुन्ह्यात कडक कायदेशीर कारवाई न करता तक्रारदाराला मदत करून त्याच्याकडून बक्षीसापोटी पाच हजार रुपयांची लाच घेणार्‍या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. पंचासमक्ष पाच हजारांची लाच घेताना पकडण्यात आलेल्या कळंब पोलीस ठाण्यातील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र किसन बहुरे व त्याचा साथीदार पोलीस हवालदार महादेव तात्याराव मुंढे या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील येरमाळा गावानजीक उपळाई पाटी आहे. या ठिकाणी तक्रारदाराचे दिनेश नावाचे व्हेज-नॉनव्हेज रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटसमोर काही दिवसांपूर्वी ३ शेळ्या व बोकड बेवारस अवस्थेत पोलिसांना आढळून आले. शेळ्या आणि बोकड तक्रारदाराच्या ताब्यात असताना पोलिसांनी त्याच्या विरोधात चोरीचा गुन्हा नोंद न करता…

Read More

प्रवीण पुरो | मुंबई महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या पराभवाला कारण ठरलेल्या काँग्रेसच्या सात फुटीर गद्दारांविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्याच्या पक्षांतर्गत हालचाली सुरू झाल्या आहेत. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेचे निवडणुकीत काँग्रेसची मत फुटल्याचे समोर आले आहे. हे सगळे आमदार काँग्रेस पक्षाचे आहेत. फुटलेल्या सातही आमदारांची पक्षातून हकालपट्टी होणार असून त्यांना निलंबित करण्याची कारवाई दोन दिवसात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. येत्या दोन दिवसात मल्लिकार्जुन खर्गे आणि के. सी. वेणुगोपाल या कारवाईची घोषणा करणार आहेत. विधानपरिषदेत निवडणुकीत ज्या आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केलं आहे, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वाची…

Read More

शुक्रवार, १९ जुलै आपापसातील वाद तडजोडीने मिटविण्यासाठी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे शनिवारी (२७ जुलै) जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी दिली. या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये मोटार वाहन अपघात प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, वीज वितरण कंपनीचे प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, फौजदारी प्रक्रिया संहितेतील तडजोड करण्यायोग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणे (उदा. चोरीची प्रकरणे, किरकोळ मारहाणीची प्रकरणे), चेक बाऊन्सची प्रकरणे, प्रलंबित प्रकरणे तसेच बँक व वीज वितरण कंपनीचे दाखल पूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय व ग्राहक तक्रार निवारण मंचाचे प्रकरणे…

Read More

गुरुवार १८ जुलै  संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असूनही प्रत्येक गाव व वाडी वस्तीवर काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी विकासाच्या योजना राबवल्या आहेत. त्याचबरोबर जास्तीत जास्त योग्य व पात्र नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा याकरता यशोधनच्या माध्यमातून पाठपुरावा केला जात असून अनेक दिवस रखडलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या बैठकीकरता जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्यानंतर आज बैठकीला सुरूवात झाली. आमदार थोरात यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना योग्य व पात्र लाभार्थींना मिळाव्यात यासाठी यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून जनसेवकांच्या मार्फत तळागाळापर्यंत योजना पोहोचविल्या आहेत. या अंतर्गत संगमनेर तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नागरिक, वृद्ध, निराधार, अपंग, विधवा, परीतक्त्या अशा अनेक पात्र व्यक्तींचे फॉर्म भरून तहसील कार्यालयात जमा…

Read More

गुरुवार १८ जुलै  गडकिल्ल्यांच्या नावाखाली गैरप्रकारातून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या तसेच ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा परिसरात गणेश मंदिरात आसरा घेण्यासाठी गेलेल्या महिलेवर मंदिरातील पुजाऱ्यांनी अत्याचार करत तिघा समाज विघातक आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी संगमनेरमध्ये संविधान प्रेमी भारताचे नागरिक, ह्यूमन इनोवेशन ऑर्गनायझेशन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मुस्लिम समाजासह इतर धर्मियांनी प्रांताधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणाच्या नावाखाली हिंसाचारासंदर्भात गुन्हेगारांवर तसेच ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा परिसरात गणेश मंदिरामधे महिलेवर केलेल्या अत्याचारासंदर्भात आरोपींना कठोर शासन केले जावे या मागणीसाठी निवेदन देण्यात आले आहे. समाजकंटकांच्या जमावाने त्याच ठिकाणाहन सात ते आठ किलोमीटर अंतरावरील गजापुर गावातील स्थानिक नागरिकांच्या घरावर तलवारी, काठ्या, कोयते, घातक शस्त्र घेऊन विशिष्ट…

Read More