Author: अनंत पांगारकर
सोमवार, दिनांक १० जून २०२४ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकारी केंद्रीय मंत्र्यांचा रविवारी शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात केरळमधील भाजपाचे एकमेव व पहिलेच खासदार सुरेश गोपी यांनी देखील राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. काल केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेणाऱ्या गोपी यांनी आज मंत्रिपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कोण आहेत सुरेश गोपी… २०२२ पर्यंत राज्यसभेवर खासदार असलेले सुरेश गोपी लोकसभा निवडणुकीत त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवार व्ही. एस. सुनीलकुमार यांचा पराभव करुन निवडून आले आहेत. केरळमधून निवडून येणारे ते भाजपचे पहिले खासदार ठरले आहे. त्यामुळे त्यांना…
सोमवार, दिनांक १० जून २०२४ मराठा आंदोलनासाठी शनिवारपासून उपोषण सुरू केलेले मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षण व समाजावर बोलू नये अन्यथा काँग्रेसच्या विधानसभेच्या त्यांच्यासह सर्व जागा पाडेन, असा थेट इशारा दिला आहे. जालन्याच्या आंतरवली सराटी येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षणासाठी च्या मनोज जरांगे यांच्या उपोषणास नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे यांनी आज सोमवारी भेट दिली. यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना जरांगे यांनी वडेट्टीवार यांना हा थेट इशारा दिला. जरांगे म्हणाले, आमची मुले मोठी झाली पाहिजेत, त्यांच्यासाठी आमचे प्राण पणाला लावत आहोत. सरकारने आम्ही दिलेल्या व्याख्यानुसार सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, असे झाले नाही…
सोमवार, दिनांक ११ जून २०२४ मोबाईल दुकानात काम करणाऱ्या तरुणाने सहा-सात महिन्यांपूर्वी एका तरुणीशी झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत तिला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संकेत सतीश अंकाराम (रा. दिल्लीगेट, तोफखाना, अहमदनगर) या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी समोर आलेली अधिक माहिती अशी, फिर्यादी तरुणी अहमदनगर शहरांमध्ये राहत असून तिच्या मित्राची सावेडीतील प्रोफेसर चौकात मोबाईल शॉपी आहे. तेथे संकेत अंकाराम हा कामास असून त्याची पाच-सहा महिन्यांपूर्वी या फिर्यादी तरुणीशी ओळख झाली होती. या ओळखीतून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यातून त्यांच्या गाठीभेटी होत असत. २० नोव्हेंबर २०२३ रोजी संकेत याने फिर्यादी तरुणीला…
सोमवार दि. १० जून रविवारी सायंकाळी नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासह ७१ खासदारांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. यात देशातील २४ राज्यांना सामावून घेण्यात आले आहे. त्यांच्या मंत्रीमंडळात उत्तरप्रदेशला प्रथम स्थान तर त्यापाठोपाठ बिहार, महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटकला संधी देण्यात आली आहे. मोदींच्या रालोआ सरकारमध्ये सर्वाधीक ९ मंत्री उत्तरप्रदेश, ८ मंत्री बिहार, ६ मंत्री महाराष्ट्र, ५ मंत्री गुजरात, प्रत्येकी ४ मंत्री राजस्थान व मध्यप्रदेश, प्रत्येकी ३ मंत्री आंध्र प्रदेश, ओडीसा व हरियाणा राज्यातील असून याशिवाय हिमाचल १, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तेलंगणा व झारखंड प्रत्येकी २, पंजाब, गोवा, जम्मू काश्मीर, दिल्ली, उत्तराखंड, अरुणाचल, तामिळनाडू व छत्तीसगड मधून प्रत्येकी एका…
सोमवार दि. १० जून २०२४ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी स्थानापन्न झालेल्या तिसऱ्या ‘रालोआ’ सरकारमध्ये महाराष्ट्राला उत्तरप्रदेश, बिहार पाठोपाठ संधी मिळाली आहे. मोंदीच्या नव्या मंत्रीमंडळाता सर्वाधिक नऊ मंत्री उत्तरप्रदेशमधील असून त्यापाठोपाठ बिहारमधूून आठ व महाराष्ट्रातून सहा जणांना संधी देण्यात आली आहे. यात भाजपचे चौघे तर मित्रपक्षाच्या दोघांचा समावेश आहे. मोंदींच्या नव्या मंत्रीमंडळात शपथ घेणाऱ्यात भाजपकडून पीयुष गोयल, नितीन गडकरी, रक्षा खडसे व मुरलीधर मोहोळ, शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रतापराव जाधव व आरपीआय (आठवले) कडून रामदास आठवले यांचा समावेश आहे. भाजपाचे जेष्ठ नेते नागपुरचे खासदारर नितीन गडकरी, उत्तर मुंबईतून निवडून आलेले खासदार पीयुष गोयल या दोघांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे. तर…
रविवार दिनांक ९ जून २०२४ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी पंतप्रधान पदाची व गोपनीयतेची शपथ दिली. तिसऱ्यांदा मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. पंडित नेहरू यांच्यानंतर तिसऱ्यांदा शपथ घेणारे मोदी दुसरे पंतप्रधान ठरले आहे. देश विदेशातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. असे आहे मोदींचे नवे मंत्रिमंडळ… नरेंद्र मोदी – पंतप्रधान यांनी घेतली कॅबिनेट मंत्री पदाची शपथ… राजनाथ सिंग अमित शहा नितीन गडकरी जगत प्रकाश नड्डा शिवराज सिंग चौहान निर्मला सीतारमन डॉ. सुब्रमण्यम जयशंकर मनोहर लाल खट्टर एच. डी. कुमारस्वामी पियुष गोयल धर्मेंद्र प्रधान जितनराम मांझी राजीव रंजन सिंग सर्वानंद सोनोवाल डॉ. वीरेंद्र कुमार किंजरापू राम मोहन नायडू…
https://www.youtube.com/live/Uz4rSjiXUI0?si=U-DsVsqMVmOcoQgb
रविवार, दिनांक ९ जून २०२४ केंद्रात सत्ता स्थापन करण्याची वेळ अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत केंद्रात एनडीएचे (NDA) सरकार स्थापन करत आहे. राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू पंतप्रधान आणि नव्या मंत्र्यांना राजभवनात शपथ देतील. पंतप्रधान मोदींनी बहुमताचा आकडा गाठत आपले संख्याबळ २९३ वर नेले आहे. यात एकट्या भाजपच्या खासदारांची संख्या २४० एवढी असून त्या खालोखाल भाजपाचे मित्र पक्ष असलेल्या टीडीपी आणि जेडीयु खासदारांची संख्या आहे. एक नजर भाजपाच्या मित्र पक्षांच्या खासदार संख्येवर… यांच्या बळावर मोदी पंतप्रधान भाजपा – २४० टीडीपी – १६ जेडीयु – १२ शिवसेना (शिंदे) – ०७ एलजेपी (आर) – ०५…
रविवार, दिनांक ९ जून २०२४ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या पर्वाला आज सुरुवात होत आहे. आज सायंकाळी मोदी रालोआ सरकारमध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेत असून त्यांच्यासोबत अन्य काही मंत्र्यांचा शपथविधी समारंभ होणार आहे. काही तासांवर येऊन ठेपलेल्या या शपथविधी सोहळ्यात राज्यातील सहा जणांना संधी मिळण्याची चिन्हे असून दोघा मंत्र्यांना डच्चू दिल्याचे बोलले जात आहे. यांचा पत्ता कट … मोदी सरकार – २ मध्ये लघु आणि सूक्ष्म उद्योग खाते असलेले मंत्री नारायण राणे यांना नव्या सरकारमध्ये संधी मिळणार नसल्याचे समोर येत असल्याने त्यांची मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता मावळली आहे. राणे यांच्यासोबतच अर्थ राज्यमंत्री असलेले भागवत कराड यांना देखील नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची चिन्हे…
रविवार, दिनांक ९ जून २०२४ बारावी पास झाल्याने शाळा सोडल्याच्या दाखल्याची दुय्यम प्रत देण्यासाठी केजच्या रामराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकाला तीन हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहे. बीडच्या लाचलुचपत शाखेच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. धनराज सखाराम सोनवणे असे लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव आहे. तक्रारदाराने बारावी पास शाळा सोडल्याच्या दाखल्याची दुय्यम प्रत मिळण्यासाठी शाळेकडे अर्ज केला होता. या अर्जावरून शाळा सोडल्याच्या दाखल्याची दुय्यम प्रत देण्यासाठी मुख्याध्यापक सोनवणे यांनी तक्रारदाराकडे तीन हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने केलेल्या तक्रारीवरून लाच लुचपत शाखेचे बीडचे पोलीस निरीक्षक युनूस शेख यांच्या नेतृत्वाखाली सुरेश सांगळे, श्रीराम गिराम, हनुमंत…
