Author: अनंत पांगारकर
शुक्रवार, ०९ ऑगस्ट दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सुमारे ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात आरोप पत्र दाखल झाल्यानंतर पहिल्याच तारखेला आरोपी भाऊसाहेब कुटेने न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल करतानाच माझ्याविरुद्ध सक्षम पुरावा नसल्याने मला आरोपातून मुक्त करण्याची मागणी केली आहे. या दोन्ही अर्जांवर न्यायालयाने सरकारी वकिलांचे म्हणणे मागविले आहे. दरम्यान गुरुवारी (८ ऑगस्ट) न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाऊसाहेब गुंजाळ व भाऊसाहेब कुटे या दोघांसह लहानु गणपत कुटे, उत्तम शंकर लांडगे, उल्हास रावसाहेब थोरात, सोमनाथ कारभारी सातपुते व अमोल प्रकाश क्षीरसागर हे आरोपी न्यायालयात उपस्थित होते. भाऊसाहेब कुटेच्यावतीने न्यायालयात ॲड. राहुल जामदार यांनी वकीलपत्र दाखल केले असून आरोपीला नियमित जामीन मिळावा तसेच फौजदारी…
गुरुवार, ०८ ऑगस्ट संगमनेरमधील एचडीएफसी बँकेतून काढलेले दोन लाख रुपये अल्टो कारमधून लंपास करण्याची घटना घडवून आठ दिवसांचा कालावधी उलटला असून संगमनेर पोलिसांना अद्यापही चोरट्यांचा शोध लावण्यात अपयश आले आहे. शहरातील चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांचे गुन्हेगारांवरील नियंत्रण संपले असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून संगमनेरमध्ये अवैध धंद्यांना उधाण आले असून दागिने दुचाकी आणि रोकड रकमेच्या चोऱ्या देखील वाढल्या आहेत. पोलिसांना गुन्ह्यांचा छडा लावण्यात अपयश येत आहे. दुचाकी चोर, धूम स्टाईल दागिने पळविणारे आणि रोकड लंपास करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध लागत नसल्याने गुन्हेगारांचे फावले आहे. २ ऑगस्ट रोजी वरवंडी येथील प्रवीण सोन्याबापु वर्पे हे आपला मित्र प्रमोद भाऊसाहेब शिंदे याच्यासोबत संगमनेर…
गुरुवार, ०८ ऑगस्ट पुण्य कर्म करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अक्षय कुमारने राम मंदिरासाठी तब्बल तीन कोटी रुपयांची देणगी दिली होती. आता अक्षय कुमारने मुंबईतील हाजी अली दर्ग्यात दर्शनासाठी गेल्यानंतर दर्ग्याच्या नूतनीकरणासाठी करोडोंची दिलेली देणगी चर्चेत आली आहे. सध्या अक्षय कुमार त्याच्या ‘खेल खेल में’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अक्षय कुमारने हाजी अली दर्ग्यात दर्शन घेतले. यावेळी अक्षयने दर्ग्याच्या नूतनीकरणासाठी १.२१ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. त्याचे दर्ग्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या हाजी अली दर्ग्यात नूतनीकरणाचे काम सुरू आहे. अक्षय कुमारने दिलेल्या देणगीनंतर दर्गा ट्रस्ट टीम आनंदी आहे.…
गुरुवार, ०८ ऑगस्ट अकोले तालुक्यातील एका खून खटल्यात संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाने आरोपीला निर्दोष मुक्त करताना गंभीर दुखापत करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तीन वर्ष कारावास आणि १००० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दोन पैकी एका आरोपीचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला तर दुसऱ्या आरोपीला न्यायालयाने दोषी ठरविले. नामदेव रामा सारोक्ते व नामदेव इंद्रभान सारोक्ते (रा. सोमलवाडी, ता. अकोले) यांनी केलेल्या मारहाणीत बुळेवाडी, (ता. अकोले) येथील ५५ वर्षीय प्रभाकर रामभाऊ गंभीरे यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी राजुर (अकोले) पोलीस ठाण्यात मृत प्रभाकर गंभीरे यांची सासू यमुनाबाई तुळशीराम सारोक्ते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपीं विरोधात खून केल्याप्रकरणी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक…
विशेष विमानांद्वारे बाधीत देशवासियांना आणणार परत मदतीसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याची परराष्ट्र मंत्र्यांची माहिती गुरुवार, ०८ ऑगस्ट बांगलादेशात अडकलेले राज्यातील विद्यार्थी, अभियंते ईत्यादींना मदत करणे आणि त्यांना मायदेशात परत आणण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या सुटकेसाठी सर्व उपाययोजना करण्यात येतील. यासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्यात येईल, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले. बांगलादेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची तसेच अभियंते आदी बाधित लोकांची त्यांच्या लोकेशनसह माहिती परराष्ट्र मंत्रालयाला देण्यात आली आहे. त्यांना तातडीने मायदेशात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी महत्त्वाची पावले उचलली आहेत. परराष्ट्रमंत्री एस.…
बुधवार, ०७ ऑगस्ट वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आलेल्या एका विद्यार्थिनीवर देवदुताची उपाधी मिळालेल्या डॉक्टरनेच तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित डॉक्टर व रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपुर तालुक्यातील घटना घडली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुलींच्या वसतीगृहावर असतांना ताप तसेच हातपाय दुखत असल्याने रेक्टर व मैत्रीण अशा आम्ही तिघी डॉ. कुटे हॉस्पीटल येथे वैद्यकीय तपासणीसाठी गेलो. तेथे असलेल्या कर्मचारी महिलेने तरुणीला ओपीडीत नेले. तेथे डॉ. रवींद्र कुटे आले. त्यांनी विचारपूस केली व झोपण्यास सांगीतले. तपासणी करत असताना डॉ. कुटे…
बुधवार, ०७ ऑगस्ट चार मजली इमारतीचे दोन मजले अवैध असल्याने त्यावर निष्काशनाची कारवाई न करण्यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांची लाच मागणाऱ्या व त्यापोटी ७५ लाखाचा पहिला हप्ता स्वीकारणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निर्देशित अधिकाऱ्यासह आणखी दोन खासगी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदार अशोक तारी, (निर्देशित अधिकारी, के पूर्व विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, अंधेरी पूर्व मुंबई), मोहम्मद शहजादा मोहम्मद यासिन शहा (प्रॉपर्टी इस्टेट एजंट) आणि प्रतीक विजय पिसे (कंत्राटदार) असे गुन्हा दाखल झालेल्या तिघा आरोपींची नावे आहे. मंगळवारी (६ ऑगस्ट) ही कारवाई करण्यात आली असून या तिघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ७ आणि ७ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
बुधवार, ०७ ऑगस्ट भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकासाठी अंतिम सामन्यात भाग घेण्यापूर्वीच अपात्र ठरवण्यात आले आहे. विनेश ५० किलो वजनी गटातील अंतिम स्पर्धेतून बाहेर पडली आहे. त्यामुळे विनेशला यापुढे ऑलिम्पिकमध्ये कोणतेही पदक जिंकता येणार नाही. असे म्हटले जात आहे की सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी विनेश फोगटचे वजन ५० किलोग्रॅमपेक्षा १०० ग्रॅम जास्त होते. मंगळवारी विनेशने प्री-क्वार्टर फायनलमध्ये जगातील नंबर वन खेळाडूचा आणि सेमीफायनलमध्ये क्युबाच्या खेळाडूचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला. यानंतर पॅरिस ऑलिम्पिकमधील ५० किलो वजनी गटात विनेश फोगटचे किमान रौप्य पदक निश्चित झाले. पॅरिसमध्ये उपस्थित असलेल्या पीटीआय या वृत्तसंस्थेचे वार्ताहर अमनप्रीत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनेशचे वजन जास्त…
बुधवार, ०७ ऑगस्ट सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील १६ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मंगळवारी बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये पोलीस अधीक्षक, उपयुक्त श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या समावेश असून छत्रपती संभाजीनगर, ठाणे, मुंबई या शहरातील अधिकाऱ्यांच्या प्रामुख्याने बदल्या करण्यात आल्या आहे. बदल्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे कंसात बदलीचे ठिकाण… ★ संदीप पालवे – पोलीस अधीक्षक दहशतवाद विरोधी पथक छत्रपती संभाजी नगर (पोलीस अधीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड) ★ संदीप भाजीभाकरे – पोलीस उपायुक्त लोहमार्ग मुंबई (उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग नागपूर) ★ विवेक विठ्ठल मासाळ – समादेशक, राज्य राखीव पोलीस दल, गट क्रमांक १३, गडचिरोली…
गणेश कारखान्याला कर्ज नाकारणाऱ्या जिल्हा बँकेविरोधात सभासदांचा हल्लाबोल, सोमवारी काढणार निषेध मोर्चा
मंगळवार, ०६ ऑगस्ट राहाता – सलग दुसर्या हंगामासाठी जिल्हा सहकारी बँकेने राजकिय दबावापोटी श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याचे कर्ज नाकारले, याचा निषेध व्यक्त करण्यासाठी सभासद व शेतकर्यांच्यावतीने जिल्हा बँकेच्या राहाता शाखेवर येत्या सोमवारी (१२ ऑगस्ट) सकाळी १० वाजता भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ संचालक अॅड. नारायणराव कार्ले पाटील यांनी दिली. या आंदोलना बाबतचे निवेदन सर्व संबंधितांना पाठविल्याचे सांगत अॅड. कार्ले म्हणाले, श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याला मागील हंगामात जिल्हा सहकारी बँकेने ४० कोटी रुपये कर्ज मंजुर केले होते. तसे पत्रही जिल्हा बँकेने कारखान्याला दिले होते. परंतु मंजुर केलेले कर्ज राजकिय सुडबुध्दीने बँकेने नाकारले.…
