Author: अनंत पांगारकर

रविवार, दि. ५ मे  महायुतीचे आपले सरकार सर्वांना सोबत घेऊन जाणारे आहे. विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवत आहोत. जिथे जातो तिथे जनता बाळासाहेबांच्या विचारांना आणि विकासाला मत देणार असल्याचे सांगते. त्यामुळे येथेदेखील धनुष्यबाणाच्या खटक्यावर बटन दाबून जनता उबाठाचा टांगा पलटी घोडे फरार करेल, निवडणुकीत मशालीची चिलीम होईल अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. शनिवारी मुख्यमंत्री कोल्हापूरमधील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, धनुष्यबाणाशी गद्दारी करणाऱ्यांना तुम्ही माफ करणार का? बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणारांना माफ करणार का? विकास करताना जातीभेद केला नाही. या राज्यातील नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत. कोल्हापुरातील टोल बंद…

Read More

रविवार, दि. ५ मे  राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांना सत्ता बदलाचे वारे लवकर कळतात, असा टोला लगावत ‘त्यांना पक्षात घेताना निश्चितपणे मला विचारले जाईल’, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पाथर्डी (अहमदनगर) मधील एका सभेत शनिवारी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे व त्यांचे पुत्र सुजय विखे दोन वेळा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना भेटल्याचा तारीख आणि वेळेनिशी दाखला देत बाळासाहेब थोरात यांच्यासाठी ही वॉर्निंग बेल असल्याचे व थोरात यांचा आता तोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता बळावली असल्याचे म्हटले होते. या संदर्भात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी नगरमध्ये आलेल्या थोरात…

Read More

रविवार, दि. ५ मे प्रत्येकाच्या बँक खात्यावर पंधरा लाख, दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना नोकऱ्या, अच्छे दिन असे खोटी आश्वासने देत सत्तेवर आलेल्या भाजपने आश्वासने न पाळता देशात महागाई, बेरोजगारी, महिला असुरक्षिततेसह अनेक प्रश्न निर्माण केल्याचा आरोप करत देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास गरीब कुटुंबातील महिलांना वार्षिक एक लाख रुपये देणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेत्या डॉ. जयश्री थोरात यांनी केले. महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी थोरात तालुक्यात निमज, चिकणी, राजापूर, निमगाव भोजापूर, खांडगाव, रायते या गावांमध्ये वाड्या-वस्त्यांवर घोंगडी बैठका घेत प्रचार करत आहे. गावोगावी झालेल्या बैठकांमध्ये त्या म्हणाल्या, सध्या देशभरात महागाईचा आगडोंब उसळला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती साडेचारशे रुपयावरून बाराशे…

Read More

रविवार, दि. ५ मे  असंख्य कारवायानंतर देखील संगमनेरमधील बेकायदेशीर कत्तलखाने सुरूच आहे. शहरात मदिना नगर भागात संगमनेर अकोल्याचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत शनिवारी दुपारी तीन लाख रुपये किमतीचे दीड हजार किलो गोमांस पोलिसांनी पकडले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक राहुल कचरू डोके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साहील इजराइल कुरेशी (वय २० वर्षे रा. मदिनानगर) व हाश्मी नशीर कुरेशी उर्फ बुड्डी (वय ३२ वर्षे रा. मदिनानगर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. अधिक माहिती अशी, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना शनिवारी शहरातील मदिना नगर भागात असलेल्या गौसिया मज्जिद शेजारी…

Read More

अंतिम भाग | प्रवीण पुरो देशाचा चौकीदार म्हणून स्वत:ची पाठ थोपटणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक नुकसान कोणाचं केलं असेल तर ते महाराष्ट्राचं. देशाच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राला गेल्या दहा वर्षांत बसलेला विविध मार्गातील फटका लक्षात घेतला तर या राज्याने, राज्यातल्या जनतेने विशेषत: बेरोजगारांनी मोदी नावाच्या चौकीदाराला कदापि माफ करायला नको. दुर्देवाने सुर्याजी पिसाळांच्या अवलादी याच महाराष्ट्रात जन्मल्याने चौकीदार शांत बसेलच याची खात्री देता येत नाही. सत्ता हा त्यांचा मतलब राहिला आणि चौकीदाराने केलेली लूट या पिसाळांनी राज्यातल्या जनतेच्या बोकांडी मारली. देशावर नोटबंदी लादताना चौकीदाराने सारी थोतांडं हातोहात पुढे केली. भ्रष्टाचार थांबेल, दहशतवाद संपेल, काळापैसा बाहेर येईल आणि रोजगाराला चालना मिळेल, असल्या…

Read More

शनिवार, दि. ४ मे  भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत, गेल्या दहा वर्षात १७ लाख हिंदू कुटुंबीयांनी देश सोडत दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेतले आहे. ख्रिश्चन मुसलमानांपेक्षा जास्त अन्याय हिंदूंवर झाले. राज्यसभेत समोर आलेली ही माहिती छापण्याची गोदी मीडियाची हिम्मत नसल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर शनिवारी श्रीरामपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वंचितचे पदाधिकारी उपस्थित होते. आंबेडकर म्हणाले, पंतप्रधानांचे कार्यालय हे मानवतेचे कार्यालय असायला हवं, मात्र ते मानवतेच न राहता वसुलीच कार्यालय झाल आहे. मोदींनी इन्कम टॅक्स,…

Read More

शनिवार, दि. ४ मे गेल्या दहा वर्षाच्या काळात पंतप्रधान मोदींनी आपल्या देशाला आर्थिक संकटामध्ये नेण्याचे पाप केल आहे. १० वर्षात मोदींनी काढलेले कर्ज कुठे गेले? त्याचा वापर कोणी केला? हे आता त्यांनी सांगावे, देश टिकविण्यासाठी आता आपल्याला या बाबींचा विचार करावाच लागेल असे सांगत भाजपाचे राधाकृष्ण विखे उघडपणे काँग्रेसच्या नेत्यांना भेटायला जातात, ही काँग्रेसचे आमदार थोरात यांच्यासाठी धोक्याची घंटा असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारार्थ आंबेडकर नगरमध्ये झालेल्या सभेत बोलत होते. यावेळी वंचितचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. आंबेडकर म्हणाले, पंतप्रधान मोदींचा राजकारण हे अतिशय भयानक असून काँग्रेस पक्षाने त्यांना २०१२ मध्ये…

Read More

शनिवार, दि. ४ मे | अनंत पांगारकर शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक नऊ दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र प्रमुख उमेदवारांचा प्रचार अद्यापही थंडच आहे. अपवाद वगळता पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये अद्यापही निरुत्साह दिसत असून उमेदवारांच्या भूमिका मतदारांसह कार्यकर्त्यांना देखील संभ्रमात पाडणाऱ्या आहे. निवडून जाणारा आणि पराभूत होणारा उमेदवार आता तरी आहे त्या पक्षात एकनिष्ठ राहत दिल्या घरी सुखी राहणार की पुन्हा पदाच्या लालसेने पक्ष बदलणार याची गॅरंटी मात्र कोणीही देताना दिसत नाही.  आजी-माजी खासदारांसह या मतदारसंघात प्रथमताच प्रमुख महिला उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. या महिला उमेदवारामुळे सुरुवातीची दुरंगी वाटणारी लढत आता तिरंगी बनली आहे. यामुळे सुरुवातीपासूनच विजयाच्या हवेत असलेल्या आजी-माजी खासदारांचे भवितव्य टांगणीला…

Read More

शुक्रवार, दि. ०३ मे गेल्या काही दिवसांपूर्वी पोट व यकृत (लिव्हर) संबंधित आजार असलेल्या रुग्णांना इतरत्र जाऊन उपचार घ्यावे लागत होते. रुग्णसंख्येचा वाढता आलेख यामुळे रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी नुकताच एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये पूर्णवेळ पोटविकार विभाग सुरु करण्यात आला आहे. याठिकाणी एन्डोस्कोपी, कोलोनोस्कोपी व ईआरसीपी प्रक्रियांना सुरुवात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पोटविकार विभागाची बाह्यरुग्ण सेवा आठवड्यातून दोन दिवस नाशिक येथील क्लिनिकमध्येही सुरु करण्यात आली असून याठिकाणी रुग्णांना उपचार घेता येणार आहेत. याबाबतची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली आहे. इगतपुरी तालुक्यातील धामणगाव-घोटी येथील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये नाशिकसह जळगाव, भुसावळ, नंदुरबार, धुळे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बुलढाणा, जालना, भंडारा गोंदियासोबतच ठाणे, पालघर व मुंबईच्या…

Read More

शुक्रवार, दि. ३ मे  लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त सुरू असलेल्या छबिना मिरवणुकीत तरुणावर झालेल्या सशस्त्र हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. नगर जिल्ह्यातील शेवगावमधील शहर टाकळी येथे गुरुवारी (दि. २) रात्री ही घटना घडली. अक्षय संजय आपशेटे (वय २४ वर्ष, रा. शहर टाकळी, शेवगाव) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. यासंदर्भात मृत तरुणाचा भाऊ संकेत संजय आपशेटे याने दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात अजय दावीद कोल्हे, किरण उत्तम चव्हाण, पंकज लक्ष्मण कोल्हे, अविनाश साईनाथ पवार व विकास संजय कोल्हे या पाच आरोपींविरुद्ध खुनासह विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकेत आपशेटे ज्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २ मे रोजी रात्री…

Read More