Author: अनंत पांगारकर

गुरुवार, दि. २३ मे पुण्याच्या ड्रंक अँड ड्राईव्ह मधील अल्पवयीन आरोपीला न्यायालयाने जामीनावर सोडल्यानंतर त्याचा नवा कारनामा समोर आला आहे. बड्या बापाच्या या दिवट्याने आता रॅप सॉंग तयार करत लोकांना अश्लील शिवीगाळ केली असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मद्यप्राशन करून भरधाव वेगाने किमती कार चालवत दोन जणांचा बळी घेणाऱ्या या दिवट्याविरोधात सर्वत्र संतापाचे वातावरण असतानाच त्याच्या या कृत्यामुळे आता त्याला नेमके कोणाचे आशीर्वाद आहे. असा प्रश्न निर्माण झाला आहे. एक दिन मे मुझे मिल गयी बेल… फिर से दिखाऊंगा सडक पे खेल, पुण्यातील बिल्डरपुत्राचा माज, अपघातानंतर चीड आणणारं कृत्य, बेल मिळाल्यानंतर शिवीगाळ करणारं रॅप साँग ऐका…. (महाराष्ट्र संवाद न्यूज या…

Read More

गुरुवार, दि. २३ मे  संगमनेरमधील पतसंस्था विश्वातील सर्वात मोठा आर्थिक ठरलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील तब्बल ८१ कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार असलेला प्रतिष्ठित राजकीय नेता, माजी जिल्हा परिषद सदस्य व दूधगंगा संस्थेचा अध्यक्ष भाऊसाहेब दामोदर कुटे पोलिसांच्या ताब्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून, न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यापासून गेल्या नऊ महिन्यांपासून कुटे फरार होता. कुटे गुरुवारी दुपारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात हजर झाल्याची माहिती समोर येत असून त्याला पोलीस ठाण्याच्या वरच्या मजल्यावर बसविण्यात आले होते. कुटे याला ताब्यात घेतल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला कळविण्यात आले असून आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी संगमनेरमधून त्याला ताब्यात घेत अटक करतील अशी माहिती समजते.…

Read More

गुरुवार, दि. २३ मे इगतपुरीच्या भावली धरणात पाच जणांचा, उजनी धरणाच्या बॅक वॉटर मध्ये वादळी वाऱ्यामुळे प्रवासी बोट बुडाल्याने पाच जणांचे मृतदेह हाती आल्याची घटना ताजी असतानाच आता अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील सुगावमध्ये प्रवरा नदीपात्रात बुडालेल्या दोघा तरुणांच्या शोधासाठी गेलेली एसडीआरएफ (SDRF) पथकाची बोट बुडून पथकातील तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुडालेल्यापैकी एका तरुणासह तिघा जवानांचे मृतदेह हाती लागले आहे. तर अद्यापही दोघे सापडले नसून दोघांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ला दिली आहे. अशी आहे घटना … सागर पोपट जेडगुले (वय २५ वर्ष, रा. धुळवड ता. सिन्नर) व अर्जुन रामदास…

Read More

गुरुवार, दि. २३ मे  दिवसेंदिवस व्याप्ती वाढत चाललेल्या नगर अर्बन बँकेच्या २९१ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील कर्जदार आरोपी अमित वल्लभराय पंडितला औरंगाबाद उच्च न्यायालयाचे सुट्टीतील न्यायाधीश संजय देशमुख यांनी बुधवारी अंतरीम जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे दोन महिन्यापासून अटकेत असलेल्या पंडितचा कोठडीतून सुटण्याचा मार्ग मोकळा झाला. या अटींवर जामीन मंजूर… १ लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर तीन महिन्यांसाठी जामीन. आरोपी पंडित याला जामिनावर मुक्त होताच १५ दिवसाच्या आत २ कोटी तर त्यानंतरच्या ३ महिन्याच्या कालावधीत ८ कोटी ६४ लाख ३३ हजार ०४७ रुपये भरावे लागणार आहेत. पासपोर्ट जमा करावा लागेल. ट्रायल कोर्टाच्या परवानगीशिवाय देश सोडता येणार नाही. जामिनावर सुटताच ईमेल आयडी…

Read More

बुधवार, दि. २२ मे वाळू तस्करांकडून श्रीरामपूरमध्ये पोलिसाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच आता सहाय्यक पोलीस अधीक्षकांच्या पथकाला धक्काबुक्की करून दमदाटीने वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे एका पोलीस पाटलानेच हे ट्रॅक्टर पळवून लावण्यात वाळू माफियांना मदत केली असल्याचे समोर आले आहे. श्रीरामपूर येथील सहाय्यक पोलीस अधिक्षक जीवन बेनीवाल यांना महांकाळ वडगाव शिवारात गोदावरी नदीपात्रात एक ट्रॅक्टर अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस अधिक्षक बेनीवाल यांनी सोमवारी पोलीस कॉन्स्टेबल रोहिदास आंधळे, पोलीस नाईक अनिल शेंगाळे, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी…

Read More

मंगळवार, दि. २१ मे  रिक्षातून फिरण्यासाठी धरणावर गेलेल्या एकाच कुटुंबातील ५ पाच जणांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृतांमध्ये दोन तरुण आणि तीन तरुणींचा समावेश असून हे सर्वजण नाशिकच्या नाशिक रोड येथील गोसावीवाडीतील रहिवाशी आहेत. इगतपुरीच्या भावली धरणात मंगळवारी सायंकाळी या सर्वांचा बुडून मृत्यू झाला. समजलेल्या माहितीनुसार अनस खान दिलदार खान (वय १५), नाझिया इमरान खान (वय १५), मीजबाह दिलदार खान (वय १६), हनीफ अहमद शेख (वय २४), ईकरा दिलदार खान (वय १४) अशा तीन मुली व दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. इगतपुरी पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने कडक उन्हापासून…

Read More

मंगळवार, दि. २१ मे  लोकसभा निवडणुकीच वारं शिर्डी लोकसभा मतदारसंघात थंडावलं असलं तरी समाज माध्यमात मात्र अद्यापही त्याचे पडसाद उमटत आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रात छेडछाड करून ते छायाचित्र समाज माध्यमात आक्षेपार्ह मेसेजच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आले. त्यामुळे शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्याच्या कारणावरून मंगळवारी भाजपाचे जिल्हा पदाधिकारी असलेल्या दीपक भगत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. संगमनेर शहर पोलीस समाज माध्यमातून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान प्राथमिक उपाययोजना करताना पोलिसांनी संबंधित व्हाट्सअप ग्रुपच्या ॲडमिनला नोटीस बजावली असल्याची माहिती मिळते. राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमधील सोशल…

Read More

मंगळवार, दि. २१ मे  गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात केलेल्या एका वक्तव्याप्रकरणी न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यामध्ये हजर राहण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने समन्स काढले आहे. यामुळे राहुल गांधी यांना रांचीच्या न्यायालयात उपस्थित राहावे लागणार आहे. काय आहे प्रकरण… कोणताही खुनी व्यक्ती काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकत नाही. काँग्रेसवाले अशा व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून स्वीकारू शकत नाही, हे फक्त भाजपमध्येच शक्य आहे. असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २०१८ मध्ये झालेल्या दिल्लीतील अधिवेशनात म्हटले होते. गांधी यांच्या या वक्तव्याला अपमानास्पद ठरवत भारतीय जनता पक्षाचे नेते नवीन झा यांच्या वतीने राहुल गांधी यांच्या विरोधात रांचीच्या दिवाणी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात…

Read More

मंगळवार, दि. २१ मे  संगमनेर तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना ६० लाखाचा न वटणारा धनादेश देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी संगमनेर न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर जिल्हाध्यक्ष प्रवीण कुमार उर्फ बाळासाहेब बन्सीलाल नाहटा यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर न्यायालयाने काढलेल्या या आदेशामुळे नाहटा यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. नहाटा यांनी संगमनेरमधील दीपक काशिनाथ जाधव, मधुकर किसन ससाने, सुरेश संपतराव सावरे व भाऊसाहेब रामचंद्र वाघचौरे या चौघा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांकडून डाळिंबाची खरेदी केली होती. या बदल्यात त्यांनी दि. ५ एप्रिल २०२३ रोजीचा चौघांचा एकत्रित स्टेट बँक ऑफ इंडियाचा (शाखा लोणी व्यंकनाथ) ६० लाखाचा धनादेश दीपक काशिनाथ जाधव यांच्या नावाने…

Read More

मंगळवार, दि. २१ मे अकोले तालुक्याला मानवतावादी, उदात्त विचारांचा राजकीय-सामाजिक- सांस्कृतिक वैभवशाली वारसा लाभला असला तरी सध्या राजकारणाचा घसरलेला स्तर खूपच चिंताजनक असून यात तालुक्याचे नुकसान होत आहे. यात तातडीने सुधारणा होऊन सामाजिक सौहार्द टिकवून एकोप्याची भावना वाढीस लावण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम आखण्याची आणि त्याची सर्वांनी काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. सामाजिक सौहार्द, एकोप्याची भावना वाढीस लावण्यासाठी अकोल्यात सर्वपक्षीय नेते-कार्यकर्ते एकवटल्याचे सकारात्मक आणि आशादायी चित्र बघायला मिळाले. यांची उपस्थिती… अकोले तालुक्यातील सामाजिक सौहार्द आणि राजकारणाचा घसरलेला स्तर याबाबत विचार विनिमय करण्यासाठी रविवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात विशेष बैठक झाली. ज्येष्ठ नेते दशरथ सावंत अध्यक्षस्थानी होते.…

Read More