Author: अनंत पांगारकर
मंगळवार दिनांक 4 जून अहमदनगर लोकसभा मतदारसंघात 12 हजारापेक्षा अधिक मताधिक्य घेऊन आघाडीवर असलेल्या भाजपाच्या सुजय विखे यांना विजयापासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) निलेश लंके निकराचा लढा देत आहे. विखे यांनी घेतलेले मताधिक्य तोडण्याच्या दिशेने लंके मतमोजणी पुढे जाताना दिसत आहे. विखे यांचे मताधिक्य घटना ते आता 2457 वर आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या दोन्ही उमेदवारात चुरशीचा सामना असल्याचे समोर येत आहे. या मतदारसंघाचा खासदार विखे की लंके हे निवडणूक निकालानंतर समोर येणार असले तरी सध्या सुरू असलेल्या मतमोजणीने दोन्ही प्रमुख उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
मंगळवार दिनांक 4 जून अहमदनगर लोकसभा आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे मतमोजणी वेग घेत असून या दोन्ही मतदारसंघातून अनुक्रमे भाजपच डॉक्टर सुजय विखे पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर आहे. अहमदनगर मधून डॉक्टर सुजय विखे पाटील 12624 तर शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे 28191 मतांनी आघाडीवर आहे. शिर्डी आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे (स्त्रोत केंद्रीय निवडणूक आयोग)
मंगळवार दिनांक ४ जून अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू असून महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या सुरुवातीपासूनच सुरूच दिसत असून या मतदारसंघातून सुजय विखे पाटील यांनी 9733 मतांची आघाडी घेतली आहे. या मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांना पडलेली मते पुढील प्रमाणे…. (स्त्रोत केंद्रीय निवडणूक आयोग)
मंगळवार दिनांक ४ जून लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. आतापर्यंत राज्यातील ४८ पैकी ३१ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आपल्या प्रतिस्पर्धी महायुतीच्या उमेदवारांपेक्षा पुढे आहे. तर सत्ताधारी महायुतीने १६ जागांवर आघाडी घेतली आहे. १ जागेवर काँग्रेस पुढे आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच राज्यातील मुंबई, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागातून महाविकास आघाडीला मोठे यश मिळवताना दिसत आहे. काही ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत सुरू आहे. हजार पाचशे मतांच्या फरकाने काही ठिकाणी उमेदवार झुंज देत असून काही ठिकाणी ५० हजाराच्या पुढे मताधिक्य मिळाले आहे. महाविकास आघाडीतील मित्र पक्षांच्या जागांमध्ये मोठी वाढ होताना दिसत असतानाच दुसरीकडे महायुतीतील मित्र…
मंगळवार दिनांक ४ जून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे मतमोजणी सुरू असून शिर्डीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे १७३८४ मतांनी आघाडीवर असून त्यांना आणि त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेना शिंदे गट सदाशिव लोखंडे यांच्यासह प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे…. (स्त्रोत केंद्रीय निवडणूक आयोग)
मंगळवार, दि. ४ जून गेल्या काही दिवसापासून लोकशाहीचा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीचे सातही टप्पे पार पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी सुरू झाली आहे. मतमोजणीनंतर देशात सत्ता कोणाची हे स्पष्ट होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महाविकास आघाडी व सत्ताधारी महायुतीमध्ये तर, देशात इंडिया व सत्ताधारी एनडीएमध्ये लढत झाली. लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर त्या त्या मतदारसंघात राज्यात आणि देशात कोणाचे वारे होते याविषयी मतदारात चर्चा सुरू होती. दरम्यान देशातील सातवे टप्प्याचे मतदान संपल्यानंतर पाठोपाठ विविध सर्वेक्षणाचे एक्झिट पोल समोर आले. आज मात्र या एक्झिट पोलसह सर्वच उमेदवारांचे परीक्षा होणार असून त्याचे निकाले लगेच समोर येणार आहेत. एक्झिट पोल किती खरे किती…
सोमवार, दि. ३ जून मंगळवारी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले असून दोन दिवसांसाठी व्हाट्सअप ग्रुपचे सेटिंग ‘Only admin’ करण्याची नोटीस पोलीस प्रशासनाने काढली असून व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास संबंधित ग्रुपच्या ॲडमिनवर देखील कारवाई केली जाणार आहे. भारतीय दंड विधान संहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत संबंधितांवर कठोर कारवाई होऊ शकते, असा इशारा संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसात व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून राजकीय पक्षाच्या नेत्यांवर विविध प्रकारे खालच्या पातळीवर टीकाटिप्पणी सुरू आहे. संगमनेरमध्येदेखील अशा टीकाटिप्पणीतून वाद उद्भवल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात…
सोमवार, दि. ३ जून नाशिक विभागाच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू डॉ. राजेंद्र एकनाथराव विखे पाटील यांनी सोमवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे या मतदारसंघात आता एकूण पाच उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. भाजप नेते विवेक कोल्हे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत या मतदारसंघात वेगळी लढत करण्याचे संकेत दिले. कोल्हे यांच्यासह आता भाजपाच्या महसूलमंत्र्यांच्या बंधूंनी अपक्ष दाखल केलेल्या उमेदवारीमुळे या मतदारसंघात भाजपच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. सोमवारी भाजपने नाशिक वगळता उर्वरित तीनही विधानपरिषद मतदारसंघाचे उमेदवार जाहीर केले असताना या मतदारसंघात आता महायुतीची भूमिका काय आहे हे स्पष्ट होईल. कोल्हे-विखे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे…
सोमवार, दि. ३ जून पुणे सीमा शुल्क विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने तब्बल २ कोटी २० लाख रुपये किमतीचा ८८३ किलो गांजा जप्त केला आहे. एका आयशर ट्रकद्वारे ओरिसा राज्यातून हा गांजा महाराष्ट्रात येत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. देशभरात गांजा विक्रीला बंदी असली तरी सर्वत्र मुबलक गांजा मिळत असल्याचे चित्र सर्रासपणे दिसते. गांजाची राज्यात मोठी बाजारपेठ असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे आता पकडलेला गांजा महाराष्ट्रात कोठे वितरित होणार होता याचा देखील शोध पथकाला घ्यावा लागणार आहे. ओरिसा येथून एका आयशर ट्रकद्वारे हा गांजा महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती सीमा शुल्कच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. यानंतर पुणे सीमा शुल्क विभागाच्या एका…
सोमवार, दि. ३ जून (अनंत पांगारकर) लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडले असून उद्या मंगळवारी देशभरात मतमोजणी होत आहे. ही रणधुमाळी आटोपत असतानाच राज्यातील विधान परिषदेच्या चार जागांवर निवडणूक होत आहे. महायुतीत बिघाडी झाल्याचे चित्र समोर येत असून नाशिक वगळता उर्वरित तीन मतदारसंघात भाजपने आपले उमेदवार सोमवारी जाहीर केले. ट्विस्ट… कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघासाठी निवडणूक होत असून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दुसरा दिवस होता. दुसऱ्या दिवसाअखेर नासिक पदवीधर मतदारसंघात मोठा ट्विस्ट बघायला मिळत असताना नाशिक वगळता उर्वरित तीन जागांवर भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहे. यांना संधी… कोकण पदवीधर मतदार संघात भाजपाने…
