Author: अनंत पांगारकर
मुंबई, दि. २२ फेब्रुवारी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्रीतपणे सामोरे जाणार आहे. महाविकास आघाडीची सातत्याने चर्चा होत असून जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. जागा वाटपावरून मविआत कोणतेही मतभेद नाहीत. काँग्रेस राज्य निवड मंडळाच्या बैठकीनंतर २७ व २८ फेब्रुवारीला मविआची बैठक होत आहे, त्या बैठकीत जागा वाटपाचा अंतिम निर्णय होईल, अशी माहिती प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे. राज्य निवड मंडळाच्या बैठकीआधी प्रसार माध्यमांशी बोलताना प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले, महाराष्ट्रात मविआ आघाडी मजबूत आहे, आम्ही एकत्रपणे निवडणुका लढवत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्व मित्र पक्षांशी सातत्याने चर्चा सुरु आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा…
संगमनेर – सत्तेसाठी वारंवार पक्ष बदलणाऱ्या विखे घराण्याचा पक्ष बदलांचा इतिहास मोठा आहे. त्यामुळे दल बदलून प्रसिद्ध असलेल्या मंत्री विखे यांनी पक्षनिष्ठेबाबत इतरांना न शिकविता स्वतः आत्मपरीक्षण करावे. आत्तापर्यंत काँग्रेसच्या जिवावर मोठ्या झालेल्या विखेंनी ज्या आईने वाढविले तिला शिव्या देण्यासारखे काम केले असल्याचे टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केली आहे. दिवटे म्हणाले, काँग्रेस, समाजवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, भाजपा असा वेगवेगळ्या पक्षांचा प्रवास करणाऱ्या विखेंनी पक्षनिष्ठा किंवा विचार याबाबत राज्यात कुठेही बोलू नये. कारण पक्षबदलूमध्ये राज्यात पहिला क्रमांक हा विखे घराण्याचा लागतो. २०१९ पर्यंत भाजपा व मोदी यांच्यावर विखे टीका करत होते मात्र असा त्यांना कोणता साक्षात्कार झाला की आज…
संगमनेर – तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे श्रीक्षेत्र देवगड यात्रे निमित्ताने शनिवारी (ता. २४ फेब्रुवारी) सारंगखेडा नंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा अश्व बाजार, अश्व प्रदर्शन व अश्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती अश्वप्रेमी असोसिएशनचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी दिली. देशमुख म्हणाले, सारंगखेडापाठोपाठ संगमनेरमध्ये होत असलेले हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे अश्वप्रदर्शन आणि अश्व बाजार आहे. प्रदर्शनाचे हे सातवे वर्ष असून या कार्यक्रमासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात, कर्नाटक राज्याचे माजी मंत्री आमदार विनय कुलकर्णी, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, जयहिंदचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, इंद्रजीत थोरात, हिवरगाव…
एका शिक्षकाने आपल्या वर्गातील प्रत्येक मुलाला एक-एक छानस चॉकलेट दिले आणि नंतर एक विचित्र अट घातली. मुलांनो! मी दहा मिनिटांत प्राचार्यांना भेटून परत येतो. तोपर्यंत तुम्ही तुमची चाॅकलेटस् खायची नाहीत, असे सांगून ते शिक्षक वर्गातून बाहेर गेले. नंतर वर्गात काही क्षण शांतता होती. प्रत्येक मुल त्याच्या हातातल्या चाँकलेटकडे पहात होते आणि प्रत्येक क्षणी स्वत:ला चॉकलेट खाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करीत होते. दहा मिनिटे संपली आणि शिक्षकाने वर्गात प्रवेश केला. आणि आपण वर्गात वाटलेल्या चॉकलेटचा आढावा घेतला. संपूर्ण वर्गात अशी सात मुले होती, की ज्यांच्या हातात चाॅकलेट जसेच्या तसे होते, तर इतर सर्व मुले चाॅकलेट खात होती आणि त्याच्या रंग आणि चवीबदल भाष्य करीत…
मुंबई :- नासिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाच्या रेखांकनात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले असून यामुळे या मार्गाच्या अंतरात देखील मोठी वाढ होणार आहे. संगमनेर मार्गे जाणारी ही रेल्वे आता शिर्डीहून जाणार आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गाच्या रेखांकनात कोणत्याही स्वरूपाचा बदल नको. रेल्वे मार्ग प्रस्तावित असल्याप्रमाणेच संगमनेर मधील मेला जावा अशी आग्रही मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मंगळवारी केली. गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या या प्रश्नात तांबे यांनी लक्ष घातले आहे. हाय स्पीड रेल्वेचे घोंगडे गेल्या अनेक वर्षापासून भिजत पडले असून आता या मार्गात सत्ताधाऱ्यांकडून नव्यानेच पुन्हा बदल सुचवत ही हायस्पीड…
संगमनेर – राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज बुधवारी (ता. २१ फेब्रुवारी) विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने संगमनेर दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्या दरम्यान विखे यांच्या हस्ते म्हाळुंगी नदीवरील खचलेल्या पूलाच्या कामासाठी भूमिपूजन होत आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसापासून रखडलेल्या या पुलाचे काम सुरू व्हावे या मागणीसाठी म्हाळुंगी पूल बचाव समितीच्या कार्यकर्त्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे उपोषणकर्त्यांवर प्रशासनाकडून दडपशाही सुरू असून उपोषणकर्त्यांचा मंडप हटविण्यात आला आहे. पूलासाठी आवश्यक निधीची उपलब्धता न करता सुरू असलेल्या विकास कामांचा निधी संबंधित काम बंद करून या पुलासाठी वर्ग करण्यात आला आहे. पूलासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे श्रेय घेणाऱ्या भारतीय जनता…
अहमदनगर – सोनईजवळ चर्चच्या धर्मगुरूने दोन अल्पवयीन मुलींच्या अंगात सैतान आल्याचे सांगत या मुलींवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर नगर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. दरम्यान राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रूपवते यांनी मंगळवारी पीडित अल्पवयीन मुली आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच सोनई पोलीस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांना पुढील तपासा संदर्भात सूचना केल्या. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा महिला बालकल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. रूपवते यांनी बालिका आणि महिलांवर होणारे अशा प्रकारचे आघात संतापजनक असल्याचे सांगत अतिशय हालाखीच्या परिस्थितीत जगत असलेल्या व झाल्या प्रकाराने हादरलेल्या पीडित गरीब दोन्ही अल्पवयीन मुलींना लवकरात लवकर जिल्हा बालकल्याण समिती पुढे नेण्याचे व संरक्षणाची आवश्यकता असल्याचे सांगितले.…
नाशिक – पोलीस निरीक्षकाने पोलीस ठाण्यातच स्वतःच्या डोक्यात सर्विस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेत आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली. अशोक नजन (वय ४० वर्ष) असे आत्महत्या केलेल्या पोलीस निरीक्षकांचे नाव असून नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते. गोळी झाडून घेतल्यानंतर त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले मात्र तत्पूर्वीच त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. नजन काल रात्री शिवजयंतीचा बंदोबस्त करून उशिरा घरी परतले होते. सकाळी साडेनऊ वाजता अंबड पोलीस ठाण्यात आलेल्या नजन यांनी आपल्या केबिनमध्ये स्वतःच्या सर्विस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याचा प्रकार त्यांच्या केबिनमध्ये गेलेल्या हजेरी मास्टरच्या लक्षात आला. नजन…
संगमनेर – शहर आणि लगतच्या उपनगरांना जोडणारा तसेच गंगामाई घाटाकडे जाणारा स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिरा दरम्यानचा म्हाळुंगी नदीवरील पूल खचून दोन वर्षाचा कालावधी होत आहे. स्थानिक नागरिकांसह संगमनेरकर पूल दुरुस्तीसाठी सातत्याने आंदोलन करत आहे, मात्र या पुलाचे बांधकाम भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमुळेच रखडल्याचा व नागरिकांच्या त्रासाला पालकमंत्री विखे पाटीलच जबाबदार असल्याचा आरोप संगमनेर नगर परिषदेतील माजी युवा नगरसेवक शैलेश कलंत्री यांनी केला आहे. या संदर्भात कलंत्री म्हणाले, ऑक्टोंबर २०२२ मध्ये म्हाळुंगी नदीला आलेल्या पुरामुळे नदीवरील पूल खचल्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी तातडीने परिस्थितीची पाहणी केली. या पुलाच्या बांधकामासाठी निधी…
संगमनेर – नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे ‘एक्स’द्वारे आभार मानले आहे. तांबे सोमवारी संगमनेरमध्ये असताना त्यांनी आपल्या मागणीचा पुनरुचार केला. शिक्षक बांधवांना विद्यार्थांना ज्ञानदान करण्याचं काम सोडून इतर शिक्षणेत्तर कामांत जुंपवल्यास हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. ही भूमिका मी वारंवार मांडत आलो आहे. आज राजसाहेब ठाकरेंनी सुद्धा शिक्षक बांधवांच्या या मागणीला दुजोरा दिला, त्याबद्दल त्यांचे आभार ! काय म्हणाले तांबे… ऐका व्हिडिओ… जे विद्यार्थी उद्याचा उज्ज्वल भारत घडवणार आहेत, त्यांच्या हिताचा विचार करून राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा आणि शिक्षण प्रक्रियेत महत्त्वाचा वाटा असलेल्या शिक्षक बांधवांना ज्ञानदानाचं सोडून इतर कामांतून कायमस्वरूपी दिलासा…
