Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: अधिकार नसताना देखील निष्काळजीपणा करत अपूर्णपणे गर्भपात करून गर्भ पिशवीत मांसाचा तुकडा शिल्लक ठेवून अयोग्य पद्धतीने उपचार करून महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा कारणावरून अकोले तालुक्यातील राजुर येथील डॉ. बाबासाहेब तुकाराम गोडगे यांच्या विरोधात राजुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टरवर गुन्हा दाखल झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. राजुर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जैनुद्दीन शेख यांच्या फिर्यादीवरून डॉ. गोडगे यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता 1860 कलम 304 अ तसेच वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 कलम 5 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे. अधिक माहिती अशी, अकोले तालुक्यातील शेणीत येथील…
महाराष्ट्र संवाद न्यूज नवी दिल्ली: राजस्थान आणि मध्य प्रदेशातील निवडणूक प्रचारा दरम्यान झालेल्या सभांमध्ये काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘पनवती’ आणि ‘जेबकतरा’ असा केला. यामुळे निवडणूक आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. गांधी यांना या नोटीसला शनिवारी सायंकाळपर्यंत उत्तर देण्याचे आदेश आयोगाने दिले. निवडणूक प्रचार सभांमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे भाजपने त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. अशा प्रकारची भाषा वापरणे अशोभनीय असल्याचे या तक्रारीत त्यांनी म्हटले. त्यामुळे या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने गांधी यांना नोटीस पाठविली. ‘आदर्श आचारसंहिता नेत्यांना आपल्या प्रतिस्पर्ध्यावर असत्यापित आरोप करण्यास मनाई…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर: जिल्ह्यात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हा तसेच तालुका स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात विनानोंदणी तसेच अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर विनाविलंब कारवाई करत त्यांच्यामध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्याचे सक्त निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बोगस वैद्यकीय व्यावसायिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रंसगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. यावेळी महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, अशासकीय सदस्य गणेश बोऱ्हाडे यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख…
25 कोटी रुपयांची साखर विनापरवानगी विकली; ज्येष्ठ नेते गंगाधर पाटील चौधरी यांचे गंभीर आरोप महाराष्ट्र संवाद न्यूज राहाता : गणेश कारखान्यात प्रवरेच्या नेतृत्वाने भांडवली गुंतवणूक केली, असे म्हणणे निव्वळ धुळफेक आहे. कारखान्याची क्षमता तुमच्या नेत्यांनी वाढवली असे तुम्ही म्हणत असाल तर मग, कारखान्याच्या जिंदगीत वाढ का झाली नाही? उलट जाता-जाता तुमच्या नेत्यांनी 25 कोटी रुपयांची साखर विनापरवानगी विकून सभासद आणि शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, असा गंभीर आरोप ज्येष्ठ नेते गंगाधर पाटील चौधरी यांनी केला. चौधरी म्हणाले, गणेश बंद करणे हाच प्रवरेच्या नेतृत्वाचा मुख्य उद्देश होता. त्यामुळे प्रवरेच्या नेत्यांनी गणेशमध्ये भांडवली गुंतवणूक केली, असे म्हणणे हा निव्वळ खोटेपणा आहे. भांडवली गुंतवणूक सोडा,…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : राज्यात वितरित होणाऱ्या दुधापैकी 30 टक्के दुधात भेसळ असल्याची स्पष्ट कबुली दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी (21 नोव्हेंबर) दूध उत्पादकांच्या बैठकीत दिली आहे. या संदर्भातील वृत्त दैनिक महानगरने दिले आहे. दूध भेसळ शोधण्याची जबाबदारी सध्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे आहे. पण आता दुधातील भेसळ रोखण्याचे काम दुग्धविकास विभागावरच सोपवण्याच्या हालचाली सुरु आहेत. मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दूध दर आणि दूध उत्पादकांच्या प्रश्नाबाबत मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात राज्यस्तरीय बैठक पार पडली. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे डॉ. अजित नवले, महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: राज्यात कालपर्यंत 32 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. या आधारे प्रमाणपत्र देण्याचे कामही सुरू आहे. याचा फायदा मराठा समाजातील जवळपास दोन कोटी लोकांना होणार असल्याचे स्पष्ट करत मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत मी गप्प बसणार जीव गेला तरी चालेल मात्र सरकारच्या छाताडावर बसून आम्ही आरक्षण घेऊ असा सज्जड इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला. मराठा समाजाला एकत्र करत वज्रमुठ आवळणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची बुधवारी सायंकाळी संगमनेरमध्ये जाणता राजा मैदानावर सभा झाली यावेळी जरांगे पाटील बोलत होते. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जरांगे पाटील म्हणाले, आत्तापर्यंत मराठ्यांना आरक्षण समजू दिले नाही. सत्तर वर्षांपूर्वीच मराठा…
महाराष्ट्र संवाद न्यूज रात्रीच्या वेळी संशयास्पद अवस्थेत फिरताना ताब्यात घेतलेल्या दोघा संशयित आरोपींना सुट्टीकालीन न्यायालयासमोर नेण्यासाठी अर्धा तासाचा उशीर करणाऱ्या पोलीस हवालदार आणि हेड कॉन्स्टेबलला शिस्तभंगाचा ठपका ठेवत न्यायालयाने शिक्षा सुनावली. दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना परिसरातील गवत छाटण्याची शिक्षा देण्यात आली. परभणी जिल्ह्यातील मानवत पोलीस ठाण्यातील हे दोघे पोलीस कर्मचारी रविवारी रात्री २२ ऑक्टोंबरला रात्रीच्या गस्तीवर होते. पहाटेच्या वेळी या दोघा कर्मचाऱ्यांनी मानवत येथे दोघाजणांना संशयास्पद रित्या फिरताना ताब्यात घेत त्यांना अटक केली होती. अटकेतील या दोन्ही संशयित आरोपींना सकाळी ११ वाजता सुट्टी कालीन न्यायालयासमोर हजर करण्यात येणार होते. मात्र संशयित दोघा आरोपींसह हे दोन्ही कर्मचारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास न्यायालयात…
महाराष्ट्र संवाद न्यूज नवी दिल्ली: पतंजलीने त्यांच्या सगळ्या खोटी आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती थांबवाव्यात, अन्यथा न्यायालय त्यांना गांभीर्याने घेईल असा इशारा देत एखाद्या विशिष्ट आजाराला बरं करण्याचा चुकीचा दावा केला गेल्यास पतंजलीच्या प्रत्येक उत्पादनावर एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याचा कडक इशारा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी पतंजलीला दिला आहे. योग गुरु रामदेव बाबा यांच्यावर लसीकरण मोहीम आणि आधुनिक औषधांच्या विरोधात प्रचार केल्याचा आरोप करणाऱ्या आयएमएच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय आरोग्य मंत्रालय, आयुष मंत्रालय आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड यांना नोटीस बजावली होती. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या पीठाने सुनावणी घेतली. सुनावणी दरम्यान या याचिकेवर न्यायमूर्तींनी महत्त्वाची…
तेव्हा तोडणीसाठी जादा पैसे, उसालाही कमी भाव; आता नुकसान भरपाई देणार का? महाराष्ट्र संवाद न्यूज राहाता : गणेश अडचणीत आला होता की प्रवरेच्या नेतृत्वाने जाणीवपूर्वक अडचणीत आणला होता, हे राहाता तालुक्याला पक्के माहित आहे. दडपशाही करून आणि जेलचा धाक दाखवून तुम्ही कारखाना चालवायला घेतला होता. कारखाना चांगला चालवणे तुमची जबाबदारी होती. गणेशवर सूड उगवण्याच्या नादात प्रवरेच्या नेतृत्वाने गणेश परिसराच्या अन्नात माती कालवली, त्याची नुकसान भरपाई तुम्ही आता करणार का? असा सवाल गणेश चे उपाध्यक्ष विजयराव दंडवते यांनी उपस्थित केला. प्रसिद्धी पत्रकात दंडवते म्हणाले, प्रवरा साखर कारखान्याने गणेश कारखाना कराराने चालवण्यासाठी घेतलेला होता, त्यामुळे गुंतवणूक करून कारखाना व्यवस्थित चालवणे ही त्यांची…
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे : संगमनेरच्या दुय्यम कारागृहातून चार कैदी एकाच वेळी पळून जाण्याची घटना ताजी असताना आता येरवडा तुरुंगातूनही खुनाच्या प्रकरणातील शिक्षा भोगत असलेला कैदी पळाल्याचे समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील सर्वात संवेदनशील आणि कडक सुरक्षेसाठी ओळखल्या जाणाऱ्या येरवडा कारागृहातूनच एका खुनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड आशिष जाधव हा पोलिसांना चकवा देऊन पळून गेल्याच समोर आलं. यामुळे संगमनेरतील घटनाही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कुख्यात गुंड आशिष जाधवच्या पळून जाण्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आशिष जाधव हा वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका खुनाच्या गुन्हात 2008 पासून येरवडा…
