Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज कळस – हिंदु तरुणांना धर्मरक्षणासाठी एकत्र करण्याचे काम देवस्थानांनी केले पाहिजे. यासाठी व्यायामशाळा व वाचनालय सुरु करावे. तेच युवक आपले मंदिरे वाचवतील, असे मत कालीचरण महाराज यांनी व्यक्त केले. कळस बुद्रुक येथील कळसेश्वर देवस्थान येथील प.पू. सुभाष पुरी महाराज व माता वैष्णवी देवी दर्शन घेण्यासाठी आले. त्यावेळी कालीचरण महाराज यांनी भाविकांशी संवाद साधला. कळसेश्वर टेकडीचा प.पू. सुभाष पुरी महाराज यांनी केलेला कायापालट पाहून कालीचरण महाराज भारावले. यावेळी ईश्वरदास महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल महाराज वाकचौरे, सरपंच राजेंद्र गवांदे, भाजप सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे पाटील, सचिव गोपीनाथ पाटील ढगे, ट्रस्टचे उपाध्यक्ष विष्णु वाकचौरे, विश्वस्त प्रदीप वाकचौरे आदी उपस्थित होते. कालीचरण…
महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर सन 2023-24 या आर्थिक वर्षांमध्ये सर्वसाधारण लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने साडेचारशे कोटीचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे वितरित केला आहे. या निधीतून लाभार्थ्यांना अनुदान वाटप केले जाणार असले तरी राज्यातील अहमदनगर जिल्हा आणि मुंबई शहराच्या वाट्याला एक रुपयाचाही निधी वितरित करण्यात आलेला नाही. राज्याच्या महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यातच या योजनेचे लाभार्थी निधीपासून वंचित राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. विधानसभा कामकाजा दरम्यान 22 ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना तातडीने वेळेवर पैसे देण्याचे निर्देश दिले गेले असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता या संदर्भात शासन निर्णय झाला असून या निधीचे वाटप करण्याचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज राहाता : शिर्डी विधानसभा मतदार संघात शासकीय योजनांचा पुरता बोजवारा उडालेला आहे. ज्येष्ठ नागरिक, अपंग, विधवा, परित्यक्ता यांच्यासह विविध योजनांच्या लाभार्थ्यांना गेल्या चार महिन्यांपासून अनुदान मिळालेले नाही, पालकमंत्र्यांनी शेजारच्या तालुक्यात जाऊन गुरगुर करण्यापेक्षा राहता तालुक्यातल्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असे मत राहाता तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. पंकज लोंढे यांनी व्यक्त केले. राहाता तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने शासकीय योजना मिळविण्यात लाभार्थ्यांना येत असलेल्या अडचणी संदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात लोंढे यांनी भूमिका मांडली. लोंढे म्हणाले, पालकमंत्री नेतृत्व करत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात विविध शासकीय योजनांचा बोजवारा उडालेला आहे, त्याचा मनस्ताप हकनाक लाभार्थ्यांना सहन करावा लागतो. संजय गांधी निराधार योजना, श्रावण…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – अहमदनगरच्या विळद घाटामध्ये असलेल्या डॉ. विखे पाटील महाविद्यालयाच्या वसतिगृहातील खोलीमध्ये एका वीस वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. अश्विनी सोमनाथ जाधव (वय २० वर्ष, रा. ढोकी चिंचोली, जि. लातूर) असे या युवतीचे नाव असून ही दुर्दैवी घटना मंगळवारी (ता. ३ ऑक्टोंबर) घडली. अश्विनी जाधव डॉ. विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत होती. ती वसतिगृहाच्या खोलीत राहत असे. मंगळवारी तिने आपल्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार काही विद्यार्थिनींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याची माहिती वस्तीगृहाच्या प्रशासनाला दिली. त्यानंतर तिला तातडीने उपचारासाठी विखे पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच तिचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा माजी महसूल व कृषी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांची आर्थिक कामधेनु असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेस राष्ट्रीय स्तरावरील बँको या संस्थेचा ब्ल्यू रिबन सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार दमण येथील शानदार कार्यक्रमात प्रदान करण्यात आला देल्टीन रिसॉर्ट दमन या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमामध्ये रिझर्व बँक ऑफ इंडियाचे निवृत्त चीफ जनरल मॅनेजर पी. के. अरोरा यांच्या हस्ते पुरस्कार अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, व्हाईस चेअरमन ॲड. नानासाहेब शिंदे, संचालक राजेंद्र काजळे, श्रीकांत गिरी तसेच बँकेचे सीईओ अंबादास वाणी यांनी स्वीकारला. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्त व विचारांवर बँकेची वाटचाल सुरू…
रविवार विशेष @ प्रवीण पुरो सत्ता मनसोक्त भोगता आली पाहिजे, यासाठीचे प्रयत्न फोल ठरू लागले की राजाला काही सूचत नसत. तो कासावीस होई. ज्यांच्या सहकार्याने सत्ता राबवायची प्रसंगी त्यांचेच गळे त्याने घोटले. असे गळे घोटत मध्यवर्ती सरकारच्या राजाने सहकार्यांचं अस्तित्वच नाकारलं. एकेका राजकीय पक्षाची पाळेमुळे नेस्तनाबुत झाल्यावर राजाने बोरुबहाद्दरांच्या मुळावर घाव घालायला सुरुवात केली. विरोधकांची मुस्कटदाबी करून कोणीही मान वर करणार नाही, असा प्रयत्न राजाने करून पाहिला. त्यात तो यशस्वीही झाला. अनेक हौसे, नवसे, गवसे राजाला जाऊन मिळाले. राज्यातल्या सत्ता त्याने मस्तीच्या जीवावर आपल्याकडे घेतल्या. तरी राजा समाधानी नव्हता. अपेक्षित असलेला सत्तेचा फायदा मिळू न शकल्याने प्रजाही नाराज होती. दिलेला…
कॅशियर उत्तम लांडगे याला ११ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्था घोटाळा प्रकरणी तपासात फारसी प्रगती होत नसतानाच या घोटाळ्यातील एक आरोपी पोलिसात हजर झाल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळण्याची चिन्हे आहेत. मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे याच्या अडचणीत यामुळे आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान पोलिसांनी उत्तम शंकर लांडगे (रा. वडगाव लांडगा, ता. संगमनेर) याला संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ११ ऑक्टोंबर पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तब्बल ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे हा आपल्या कुटुंबीयांसह फरार आहे. तर पंधरा मुख्य आरोपींपैकी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – हिवरगाव पावसा टोल नाक्याजवळ वाहतूक नियमन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला जोराची धडक देऊन जखमी केल्याच्या कारणावरून आरोपीला संगमनेरच्या जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने कोर्ट ऊठेपर्यंत व पंधरा हजार रुपये नुकसान भरपाई जखमी पोलीस कर्मचाऱ्याला देण्याची शिक्षा ठोठावली आहे. अमोल मारुती शिंदे वय 29 वर्ष (रा. मनोली, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. शिंदे याच्या विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय बडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय दंड संहिता कलम 333, 353, 279, 337, 338, मोटार वाहन अधिनियम कलम 184, 134 (अ) (ब) सह 177 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. फिर्यादी पोलीस हेडकॉन्स्टेबल…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीशी मैत्री करत तिच्यावर वारंवार अत्याचार प्रकरणी पोलिसांनी आणखी एका सह आरोपी असलेल्या कॅफे मॅझिकच्या मालकाला अटक केली असून त्याला न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. कन्हैया दिलीप सोनवणे (वय 27 वर्षे, रा. काझीगढी, शितलादेवी मंदिर, अमरधाम रोड नाशिक, हल्ली रा. कासारवाडी रोड, संगमनेर ता. संगमनेर) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. संगमनेर शहरालगत राहावयास असलेल्या एका अंदाजे १७ वर्षे वयाच्या मुलीवर संगमनेर, शिर्डी, पेमगिरी, विठ्ठल कडा, कऱ्हे घाट येथे आशिष नानासाहेब राऊत (वय २० वर्ष) व किरण सोपान राऊत (वय ३० वर्ष, दोघे रा. मालुंजकर मळा, घुलेवाडी, ता. संगमनेर,…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – जिल्ह्याचे पालक मंत्री म्हणून विखे पाटील यांनी एक वर्षापुर्वी जबबादारी स्विकारली, तुम्ही तर चाळीस वर्षे तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहात. प्रत्येक प्रश्नाचे खापर विखे पाटील यांच्यावर फोडल्याने तुमचे अपयश झाकले जाणार आहे का? असा सवाल अमोल खताळ यांनी माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात केला आहे. यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात अमोल खताळ यांनी म्हणले आहे की, मालदाड रस्त्याचा प्रश्न एका दिवसात निर्माण झालेला नाही. मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याची समस्या आहे. पण लोकप्रतिनीधीनी तालुक्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहीले नसल्यानेच ग्रामीण भागातील रस्त्यांचे सर्वच प्रश्न ऐरणीवर आले आहेत. प्रश्न सोडविता न आल्याची उतर जनता आता आ. थोरांताकडे मागू लागल्याने केवळ…
