Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यातून निर्दोष सुटलेल्या पोलिसाला सद्यस्थितीचा अहवाल देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागणारा पालघरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयातील सरकारी वकील एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. सुनील बाबुराव सावंत (वय 51 वर्ष, सध्या रा. शालिनी अपार्टमेंट, रूम नंबर 5, लक्ष्मीनारायण मंदिराच्या पाठीमागे, माहीम रोड, पालघर) असे लाच लुचपत विभागाने पकडलेल्या लोकसेवकाचे नाव असून ते अतिरिक्त सत्र न्यायालय पालघर येथे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता- वर्ग 1 या पदावर कार्यरत आहे. सरकारी वकील सावंत यांच्या विरोधात पालघर लाचलुचपत विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. पालघर जिल्हा पोलीस आस्थापनेमध्ये पोलीस नाईक या पदावर कार्यरत असलेल्या तक्रारदाराविरोधात सन 2015 मध्ये तारापूर पोलीस ठाणे येथे…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : स्वार्थ विरहीत सेवा हे ब्रिद समोर ठेऊन शहरात कार्यरत असलेल्या इनरव्हील क्लब ऑफ संगमनेर व रोटरी क्लब संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात व तालुक्यात ‘फुलझडी’ या दिवाळी मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. फुलझडीचे हे पहिलेच वर्ष असून सणासुदीच्या दिवसांमध्ये गरजेच्या सर्व वस्तू एकाच छताखाली मिळाव्यात, बाहेरगावातील तसेच शहरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना एकाच छताखाली व्यासपीठ मिळावे या हेतूने फुलझडी मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष सुनिता गाडे यांनी दिली. फुलझडी दिवाळी मेळ्यात सुमारे 110 स्टॉल असून यामध्ये दिवाळी सणाशी संबंधीत सर्व व्यावसायिकांचा समावेश व्हावा यासाठी आयोजकांनी प्रयत्न केले आहेत. लेटेस्ट फॅशनमधील महिलांचे व…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : वारकरी संप्रदायाला मोठा धक्का पोहोचणारी बातमी समोर आली आहे. आपल्या अनोख्या कीर्तन शैलीने लाखो जनतेवर गारुड करणाऱ्या ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. कीर्तनकार बाबा महाराज सातारकर गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. नवी मुंबईतील नेरूळ येथे त्यांनी गुरुवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातारकर यांनी बांधलेल्या नेरूळ जिमखानाच्या समोरील विठ्ठल रखुमाई मंदिरात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर नेरूळच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. निळकंठ ज्ञानेश्वर गोरे हे बाबा महाराज सातारकर यांचे मूळ नाव असून ५ फेब्रुवारी १९३६ रोजी त्यांचा जन्म नामवंत…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील सात पैकी दोन ग्रामपंचायती उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी बिनविरोध झाल्या. ग्रामपंचायत स्थापनेनंतर प्रथमत:च निवडणूक लागलेल्या ढोलेवाडीसह ग्रामपंचायत पठार भागातील बोरबन येथील ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी महिला कारभारणींची वर्णी लागली असून ढोलेवाडीच्या सरपंचपदी शालिनी ढोले तर बोरबनच्या सरपंचपदी अरुणा गाडेकर बिनविरोध निवडून आल्या आहे. ‘एक तालुका एक परिवार’ ही संकल्पना जपताना संगमनेरमध्ये होत असलेल्या सातही ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस पक्षाचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांमध्येच लढत होत आहे. ढोलेवाडी ग्रामपंचायतीत संगमनेर पंचायत समितीच्या माजी उपसभापती शालिनी ढोले यांची सरपंचपदी तर निशा दत्तात्रय…
√ शिर्डी श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शन व पूजा √ मंदिरातील नवीन दर्शनरांग संकुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन √ निळवंडे धरण प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे जलपूजन करून लोकार्पण √ राज्यातील ८६ लाखांहून अधिक शेतकरी लाभार्थ्यांना लाभ देणाऱ्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेची सुरूवात √ महाराष्ट्रातील सुमारे ७५०० कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या, २६ ऑक्टोंबर २०२३ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या भेटीत प्रथम श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शन आणि पूजा करतील. यावेळी मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटनही ते करणार आहेत. अकोले तालुक्यातील…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : मोबाईल नंबर ब्लॉक केला या कारणावरून संगमनेरमध्ये दोघाजणांनी महिलेवर कोयत्याने वार करून तिला गंभीर जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे. एकीकडे दसऱ्याच्या दिवशी शस्त्र पूजन सुरू असताना दुसरीकडे मात्र कोयत्यासारख्या शस्त्रानेच महिलेवर वार करण्याच्या प्रकारामुळे शहरात पोलिसांचा धाक उरला नसल्याचे दिसत आहे. संगमनेर शहर पोलिसांनी राजेश जंबूकर व वैभव दांदे (रा. ढोलेवाडी, संगमनेर) या दोघांविरुद्ध महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. दसऱ्याच्या दिवशी शस्त्र पूजन केले जाते. मात्र संगमनेरात शस्त्राचा वापर करीत एका माहीलेला जखमी करण्यात आले आहे. मोबाईल नंबर ब्लॉक का केला याचा राग येत आरोपीने थेट फिर्यादीला कोयत्यानेच मारहाण केली. फिर्यादी ही मित्र…
माझा माणूस उन्हात असताना मी सत्तेच्या सावलीत कशी राहू शकते ? महाराष्ट्र संवाद न्यूज भगवान भक्ती गड (बीड) : माझ्या कारखान्यावर रेड झाली तेव्हा तुम्ही दोन दिवसांत 11 कोटी जमा केले. पण आज माझ्याकडे तुम्हाला बसण्यासाठी अंथरायला सतरंजीसुद्धा नाही. तुम्ही उन्हात म्हणून मी पण उन्हात आहे. माझा माणूस उन्हात असताना मी सत्तेच्या सावलीत कशी राहू शकते असे म्हणत माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कारखान्यावर झालेल्या कारवाईबाबत खुलासा केला. सावरगाव येथील भगवान बाबा भक्ती गडावर पोहचल्यावर पंकजा मुंडे भगवान बाबांचे दर्शन, आरती, कन्या पूजन करून व्यासपीठावर आल्या. पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे आणि यशश्री मुंडे या तिघी बहिणी यावेळी एकत्र होत्या.…
महाराष्ट्र संवाद न्यूज मतिमंद २१ वर्षीय मुलीला घरातून जवळच्या जंगलात नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने दहा वर्ष सक्तमजुरी व २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेतून १० हजार रुपये पीडितेला देण्याचे आदेश न्यायालयाने सोमवारी दिले आहेत. अर्जुन अण्णासाहेब जोशी (रा. पट्टेवाडी, जवळे बाळेश्वर, ता. संगमनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. अत्याचारित महिला मतिमंद असल्याने अतिशय गुंतागुंतीच्या ठरलेल्या या खटल्यामध्ये सहाय्यक सरकारी वकिलांनी अतिशय कौशल्याने आरोपी विरोधात गुन्हा सिद्ध करत आरोपीला शिक्षेपर्यंत नेले. दरम्यान या प्रकरणी तपासातील काही कमकुवत बाबी देखील समोर आल्या असून न्यायालयाने याबाबत आपले निष्कर्ष नोंदविले आहेत. त्यामुळे हे निष्कर्ष…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सत्ताधारी काँग्रेस पक्षाने संगमनेर नगर परिषदेत गेल्या ३० वर्षात केले नाही ते आता आम्ही नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये करून दाखविणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार यांनी म्हटले आहे. जहागीरदार यांनी म्हटले आहे की, गेल्या ३० वर्षांपासून संगमनेर नगर परिषदेमध्ये आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता आहे. संगमनेर नगरपलिकेत दर चार वर्षानी मालमत्तेचे (घरपट्टी) रिव्हिजन होते. रिव्हिजनचा अर्थ असा होतो की, नगरपलिका हद्दीतील जी मालमत्ता आहे त्यात काही बदल झाल्यास, नवीन इमारती, जुन्या इमारतीच्या जागेवर नवीन इमारत, जागेत बदल झाल्यास त्याचे फेर…
महाराष्ट्र संवाद न्यूज ९ ते १२ जून २०२४ या कालावधीत अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील क्लार्क काउंटीत असलेल्या कोलंबिया नदीच्या उत्तर तीरावरील व्हँकुव्हर या शहरात होणाऱ्या जागतिक विमा परिषदेत एचडीएफसी लाईफ इ्शुरन्स कंपनीची अभिकर्ता धनश्री सुनील कडलग ही तरुणी सहभागी होत आहे. येथील एचडीएफसी लाईफ इ्शुरन्स कंपनीची अभिकर्ता असलेल्या धनश्री कडलगला विमा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा एमडीआरटी हा सन्मान प्राप्त झाला आहे. यामुळे ती अमेरिकेत होणाऱ्या जागतिक विमा परिषदेत सहभागी होत आहे. धनश्री हिला एमडीआरटी होण्यासाठी तिचे वडील ‘कडलग इन्व्हेस्टमेंट’चे संस्थापक सुनील कडलग यांच्यापासून प्रेरणा मिळाली. सुनील कडलग हे गेल्या २७ वर्षापासून म्युच्युअल फंड वितरक, जीवन व मेडिक्लेम विमा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. येथील…
