Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज “आगामी निवडणुकीत आपण कोणतेही बॅनर किंवा पोस्टर लावणार नाही. कोणालाही लक्ष्मी दर्शन करणार नाही. मी कधीही लाच घेतली नाही, कोणाला घेऊही देणार नाही. इतकच काय आपण कोणालाही चहा पाजणार नसल्याचं” केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केल आहे. यांची उपस्थिती : यावेळी खासदार भावना गवळी, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार राजेंद्र पाटणी, लखन मलिक, अमित झनक, तानाजी मुटकुळे यांच्यासह जिल्हाधिकारी एस. भुवनेश्वरी आदी उपस्थित होते. नितीन गडकरी यांनी भाजपा चंद्रशेखर बावनकुळेंना घरचा आहेर दिल्याची चर्चा यामुळे केली जात आहे. लोकार्पण सोहळा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते वाशीम येथे 3655 कोटी रुपयांच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – अहमदनगर जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम ३७ (१) व ३७(३) अन्वये १२ ऑक्टोबर,२०२३ पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार नमूद कालावधीत कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे… शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणे. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना हॅलोजन लावत असताना अचानकपणे वायरमनला विजेचा धक्का बसला आणि तो वायरला चिकटला. गर्दीमुळे हा प्रकार कोणाच्याच लक्षात आला नाही मात्र विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी थांबलेल्या सारिका दावणपल्लीच्या प्रसंगावधानामुळे या वायरमनचा जीव वाचला. काय होती घटना: गुरुवारी संगमनेरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुक चालु असताना नगरपालिकेसमोर एका दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर वायरमन हॅलोजन लावायचे काम करत असताना शॉक लागून तो वायरला चिटकला. सारिकाच्या लक्षात आला प्रकार: मदत मिळण्यासाठी खुप प्रयत्न करीत होता पण मिरवणुकीच्या धाम-धुमीमुळे कोणाच्याच ते लक्षात आले नाही. मिरवणुक बघण्यासाठी महाराणा प्रताप महिला मंडळाच्या सदस्या सारिका दावनपल्ली नगरपालिकेजवळ आपल्या परिवाराबरोबर उभी होती. सारिकाचे लक्ष…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील सुमारे 81 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराने संगमनेरातील पतसंस्थांचे अर्थकारण धोक्यात आले आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दूधगंगा पतसंस्थेचा चेअरमन आणि राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठित असलेला पुढारी भाऊसाहेब कुटे याच्यासह तब्बल 21 जणांविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल झाला असला तरी यामागील मुख्य सूत्रधार, मास्टरमाईंड हा भाऊसाहेब कुटेच असल्याचे दिसते. चेअरमन असलेल्या कुटे याच्या दहशत आणि दबावाला संस्थेतील अधिकारी कर्मचारी बळी पडल्याचे दिसते. “विना सहकार नाही उद्धार” याप्रमाणे चालणारा सहकार हा संगमनेरच्या अर्थकारणाचा पाया आहे. भाऊसाहेब थोरात यांनी रुजविलेल्या सहकाराचे रोपटे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात सर्वत्र फोपावले. येथील सहकार राज्यासाठी दिशादर्शक ठरला…

Read More

संगमनेर पंचायत समितीचा महिला शिक्षिकांसाठी उपक्रम महाराष्ट्र संवाद न्यूज कोविड कालावधीनंतर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी भ्रमणध्वनी देणे आवश्यक झाले आहे. एकदा स्मार्टफोन हातात आला की, त्यावर इंटरनेटच्या माध्यमातून येणारी माहिती आणि त्यातून कळत नकळत घडलेल्या सायबर चुकांचा मोठा परिणाम भोगावा लागू शकतो. म्हणूनच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे गांभीर्य समजावून सांगत त्याचे धडे देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन संगणक तज्ञ वैशाली खैरनार यांनी केले. उपक्रमशील गटविकास अधिकारी अनिल नागणे यांच्या पुढाकारातून संगमनेर पंचायत समितीमध्ये गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थी व महिलांसाठी सायबर सुरक्षा या विषयावरील कार्यशाळेत खैरनार बोलत होत्या. अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड होते. यावेळी सहाय्यक लेखाधिकारी प्रदीप वर्पे, राजेंद्र भालारे उपस्थित होते. अशोक देशमुख यांच्या ताण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सध्या सार्वजनिक गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सर्रासपणे दारू पिऊन धिंगाणा घालण्याचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर पोलिसांकडून हा उपद्रव थांबवण्यासाठी गुरुवारी अवैध दारू विक्रेत्यांची धरपकड करण्यात आली. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 68 खाली या सर्वांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती संगमनेरचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी दारू दुकाने बंद असली तरी अवैध विक्री करणाऱ्यांकडून मध्य प्राशन करणाऱ्यांना दारू उपलब्ध होत असते. दारू पिणारे लोक दारू पिऊन मिरवणुकांमध्ये गैरवर्तन करतात. त्यामुळे गणपती मंडळाची देखील बदनामी होते. शिवाय विविध प्रकारचे गुन्हे देखील घडतात. या गैरप्रकाराना प्रतिबंध होऊन सार्वजनिक गणपती मंडळाच्या मिरवणूक शांततेमध्ये पार पाडाव्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – अन्य सर्व मार्ग बंद झाल्याने गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीवर जाण्यासाठी केवळ अकोले रोड कडून मालपाणी हेल्थ क्लब मार्गे गंगामाई घाटाकडे जाणारा एकमेव रस्ता सुरू असल्याने गणेश भक्तांचे मोठे हाल झाल्याचे बघावयास मिळाले. मुख्य मानाच्या गणेश विसर्जन मार्गावरील प्रवरा नदीकडे जाणाऱ्या परदेशपुऱ्यातील मठाजवळील रस्ता रस्त्यावर इतर गणेश भक्तांना परवानगी नसल्याने बंद असतो. त्यामुळे स्वामी समर्थ मंदिराजवळील पुलावरून प्रवरा नदीवरील गंगामाई घाटाकडे जाणारा, अकोले रोड मार्गे मालपाणी हेल्थ क्लबच्या बाजूने गंगामाई घाटाकडे जाणारा रस्ता गणेश विसर्जनाकरिता खुला असतो. या दोन मार्गाने विसर्जन केले जाते. मात्र गेल्या वर्षभरापासून स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिरा दरम्यानचा पूल खचल्यामुळे वाहतुकीसाठी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मानाच्या पहिल्या श्री सोमेश्वर मित्र मंडळाच्या श्री गणेशाची आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पूजा आणि आरती करून संगमनेरच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार धीरज मांजरे, प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, मनीष मालपाणी, सोमेश्वर मंडळाचे किशोर पवार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. धार्मिक विद्वेष आणि अशांतता बाजूला ठेवून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विसर्जनाच्या दिवशी सकाळी आठ वाजता गणरायाची पूजा करून मिरवणुकीला प्रारंभ होतो. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही गेले 21 वर्ष विसर्जन मिरवणुकीला उपस्थित राहण्याची परंपरा…

Read More

गुन्हा दाखल होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला तरी आर्थिक गुन्हे शाखा एकाही आरोपीला ताब्यात घेऊ शकलेली नाही महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर व्हाईट कॉलर क्रिमिनल आणि दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष असलेला भाऊसाहेब कुटे आणि त्याच्या कुटुंबीयांचा अटकपूर्व जामीन अर्ज संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाने फेटाळून चार दिवसांचा कालावधी उलटत आहे. तरीदेखील तपास यंत्रणा कुटे आणि त्याच्या परिवारापर्यंत अद्यापही पोहोचत नसल्याने याप्रकरणी तपास यंत्रणेवर असलेले संशयाचे सावट अधिक गडद झाले आहे. दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या 81 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात अडकलेल्या आरोपींसह तपास यंत्रणा आणि ज्यांच्यावर या सर्व कारभारावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी होती त्या सहकार विभागाबद्दल आता संशयाचे वातावरण निर्माण झाले…

Read More

पकडलेल्या आरोपीकडून दोन खुनाचा उलगडा; पीडित मुलीसोबत पैशासाठी आईचीही हत्या केल्याचे निष्पन्न महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर संगमनेरमधील जुन्या आणि निर्जन असलेल्या चंदनापुरीच्या घाटात 24 सप्टेंबरला एका अल्पवयीन मुलीचा विद्रूप अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. प्राथमिकदृष्ट्या घातपात असल्याचे स्पष्ट करणाऱ्या या घटनेत पोलिसांसमोर या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान असताना अवघ्या काही तासात पोलिसांनी केवळ मृत मुलीची ओळखच पटविली नाही तर आरोपीदेखील गजाआड केला. यातील कौतुकास्पद बाब म्हणजे आरोपीने एक नव्हे तर दोन खून केल्याची उकल करण्यात पोलीस यशस्वी झाल्याची माहिती संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. दारू पाजून अल्पवयीन मुलीची हत्या:  अल्पवयीन पीडित मुलीची डोक्यात दगड टाकून…

Read More