Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शासनाच्या विविध खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त असून या जागांच्या भरतीसाठी विविध विभागांमधून सध्या जाहिराती दिल्या जात आहेत. यामुळे राज्यातील तरुणांमध्ये काहीसा आशावाद निर्माण झाला मात्र शासनाने कंत्राटी पद्धतीने विविध विभागांमध्ये नव्याने नियुक्तीचा घेतलेला निर्णय हा अत्यंत चुकीचा असून यामुळे नियुक्त झालेल्या युवकांच्या भवितव्याचे काय असा प्रश्न नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी उपस्थित केला आहे. तांबे म्हणाले, राज्यातील विविध विभागांमध्ये हजारो जागा रिक्त आहेत. गेली अनेक वर्ष नव्याने नोकर भरती न झाल्याने अनेक सुशिक्षित बेरोजगार या भरतीची वाट पाहत होते. मात्र पात्रता असतानाही कंत्राटी पद्धतीने भरतीमुळे त्यांचे भवितव्य काय असेल? असा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक – नाशिक जिल्हा न्यायालयातील एका न्यायाधीशांविरोधात नाशिकच्या वकिलांनी एल्गार दिला आहे. कामकाजावेळी अरेरावी करणे, अपमानास्पद वक्तव्य करणे, उद्घटपणे वर्तणूक करणे अशा स्वरूपाचे वर्तन हे न्यायाधीश महोदय करत असल्याने त्यांची त्वरित बदली करण्याची मागणी वकिलांनी केली आहे. अन्यथा त्यांच्या समोरील कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रधान न्यायाधीशांना निवेदन: वकिलांनी नाशिक बार कौन्सिलच्या वतीने आपल्या मागणीचे निवेदन प्रधान जिल्हा न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांना दिले. एका न्यायाधीशांच्या विरोधात वकिलांनी उघड-उघड भूमिका घेत त्यांच्या समोरील कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्याने हा विषय राज्यभर चर्चेचा ठरला आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाकडे तक्रार: संबंधित न्यायाधीशांची जिल्हा विधी प्राधिकरणामध्ये बदली…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – तहसीलदारांना केलेले फोन उचलले नाही म्हणून थेट तहसीलदारांच्या घरी जाऊन शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार सोमवारी रात्री पावणे बारा वाजता संगमनेरमध्ये घडला. संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थोरात विरोधात गुन्हा दाखल: शुभम थोरात (पूर्ण नाव माहित नाही) रा. मालदाड रोड, संगमनेर असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात संगमनेर शहर पोलिसांनी भारतीय दंड विधान संहिता कलम 452, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. रात्री घडली घटना: सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झोपेत असलेल्या तहसीलदार मांजरे यांच्या मोबाईलवर दहा ते बारा कॉल…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचा विचार जन माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने प्रभाग 1, 3, 4, 11, 12 व 14 मध्ये झालेल्या जनसंवाद यात्रेस उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी दिली. यांचा सहभाग: संगमनेर शहरात झालेल्या पदयात्रेत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, मनोज पुंड, बाळासाहेब पवार, सुनंदाताई दिघे, मुन्ना कडलग, किशोर टोकसे, शाकिब बागवान, जीवन पंचारिया, सुभाष दिघे, निखिल पापडेजा, शैलेश कलंत्री, अंबादास आडेप, गणेश गोडसे, गौरव डोंगरे, चंद्रकांत काळंग, अशोक जाधव, संजय पुंड, श्याम करपे, संजय पुरी, हरी भोसले, सचिन पाबळकर, सचिन सोनवणे,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – आपली भाषा समृध्द असली की जाणीवा समृध्द होतात. संगमनेर महाविद्यालयातर्फे चालवल्या जाणाऱ्या पदव्युत्तर पदविका पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या माध्यमातून केवळ पत्रकारितेचे विविध पैलूंच शिकविले जात नाहीत तर जाणीवा समृध्द केल्या जातात, असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी केले. यांची उपस्थिती: संगमनेर महाविद्यालयाच्यावतीने चालवल्या जाणाऱ्या पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात मालपाणी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्योजक कैलास सोमाणी, महाविद्यालयाचे कार्यकारणी सदस्य मधुसूदन नावंदर, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. अरूण गायकवाड, पत्रकारिता अभ्यासक्रमाचे प्रमुख डॉ. संतोष खेडलेकर उपस्थित होते. मालपाणी म्हणाले, संगमनेर महाविद्यालयात मागील बारा वर्षांपासून चालविल्या जाणाऱ्या या अभ्यासक्रमात विद्यार्थी, गृहिणी, डॉक्टर्स, पत्रकार,…

Read More

घोलप यांच्या पाठोपाठ शिर्डीतून पदाधिकारी ही राजीनाम्याच्या तयारीत! महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक – त्या ४० लोकांनी बंडखोरी केली, ते आमदार, खासदार पुन्हा निवडून येता कामा नये, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यासाठी त्यांनी मला अमरावती किंवा शिर्डी यापैकी एका लोकसभा मतदारसंघाची निवड करायला सांगितले होते. मी शिर्डीची निवड केली, पण तिथे गद्दार वाकचौरेंना उमेदवारी जाहीर केली. त्यांना उमेदवारी द्यायची होती, मग मला का तयारी करायला सांगितले? असा सवाल करीत माजीमंत्री घोलप यांनी आपली नाराजी जाहीर केली. उपनेतेपदाच्या राजीनाम्याची घोषणा: बबनराव घोलप यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत मी शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिलेला असल्याचे जाहीर केले. ३५ शाखांची स्थापना: शिर्डी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक – उपनेते आणि शिर्डीचे संपर्कप्रमुख माजी मंत्री बबनराव घोलप यांनी पुनर्बांधणी केलेल्या आणि विजयाची खात्री असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात ठाकरे यांना रविवारी मोठा धक्का बसला. ठाकरेंनी शिर्डीत केलेल्या बदलानंतर उपनेते बबनराव घोलप यांनी आपला राजीनामा ठाकरे यांना पाठविला असल्याची माहिती समोर येत आहे. नाराजी: एकीकडे जळगावच्या दौऱ्यावर असलेल्या ठाकरे यांना दुसरीकडे शिर्डीतून हा मोठा धक्का मानला जात आहे. ठाकरे संगमनेर-शिर्डी दौऱ्यावरून जळगावमध्ये जात नाही तोच शिर्डीत नव्या संपर्कप्रमुखांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय शिवसेनेसोबत गद्दारी करत काँग्रेस, भाजपची साथ केलेल्या माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा शिवसेनेत प्रवेश देऊन उमेदवारी देण्याचे निश्चित मानले जात असल्याने बबनराव…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर संगमनेर तालुक्याच्या विकासाचा पाया सहकारावर आधारित आहे. सहकाराच्या माध्यमातून या तालुक्याने भरारी घेत राज्यात दिशादर्शक काम केले आहे. दिवंगत माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील, दिवंगत स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात या प्रमुख नेत्यांसह सहकारात काम करणाऱ्या अनेकांनी तालुक्यात सहकाराचा पाया रोवला. या सहकारातून समृद्धीची राज्यालाच नव्हे तर देशाला दिशा दिली. समाजाच्या प्रगतीचे उद्दिष्ट समोर ठेवून तत्कालीन धुरीनांनी हा सहकार जसा वाढवला, जोपासला तसाच तो संपविण्याचे काम आता पांढऱ्या कपड्यातील लुटारू करीत असल्याचे दिसून येत आहे. सहकारात अपप्रवृत्ती: संगमनेर तालुक्यात पतसंस्थांची चळवळ जोमात उभी राहिली आहे. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी येथील…

Read More

रविवार विशेष @ प्रवीण पूरो  कोणतीही अपेक्षा नसताना मनोज जरांगे पाटलांनी सार्‍यांनाच जमिनीवर आणून ठेवलं आहेे. विशेषत: भारतीय जनता पक्षाने आणि त्यांच्या नेत्यांनी केलेला खोटारडेपणा जरांगे पाटलांच्या उपोषणाने असा काही जिरला की यापुढे या पक्षाची माणसं खोटी बोलणार नाहीत अशी अपेक्षा आहे. इतकं होऊनही ती खोटारडेपणा करू लागली तर त्यांची अवस्था काय होईल, हे कोणीही सांगू शकत नाही. मराठा जरांगे पाटलांच्या सुरू असलेल्या आंदोलनाने दिलेली सबक हा सर्वच राजकीय पक्षांना मिळालेला धडा आहे. ज्यांनी मराठा आरक्षणाचं निमित्त करत राजकीय पोळी भाजून घेतली त्यांच्यासाठी तर तो मोठा धक्का आहे. यामुळेच अशी खोटी आश्‍वासनं देताना सर्वांनाच सावध राहण्याची आवश्यकता आहे.  विशेष म्हणजे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातील कामांच्या त्रुटी दुरुस्त करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम पूर्ण होताच धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. थोरातांनी केली होती मागणी: तीन-चार दिवसांपूर्वी माजी मंत्री, काँग्रेस नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळग्रस्त भागासाठी निळवंडे धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. या मागणी पाठोपाठ पालकमंत्र्यांनी पाणी सोडण्याचे घोषणा केल्याने निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून दुष्काळग्रस्तांना पाणी मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. मंत्री विखेंच्या सूचना: गत आठवड्यामध्ये पालकमंत्र्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचे गांभीर्याने नियोजन…

Read More