Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याला मिळत असलेल्या भावामुळे शेतकऱ्यांचा ओढा बाजार समितीकडे वाढला आहे. बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असून मंगळवारी (5 सप्टेंबर) उच्च प्रतीच्या एक नंबर कांद्याला 2200 ते 2601 रुपयांचा भाव मिळाला. असे होते बाजारभाव: मंगळवारी झालेल्या कांदा लिलावात दोन नंबर कांद्याला 1700 ते 2000 रुपये, तीन नंबर कांद्याला 1000 ते 1700 रुपये तसेच गोल्टी कांद्याला 200 ते 900 रुपये भाव मिळाला आहे. टोमॅटो डाळिंबालाही उच्चदर: बाजार समितीत टोमॅटोला पन्नास ते दीडशे रुपये पर्यंत भाव मिळाला असून डाळिंबाची देखील मोठ्या प्रमाणात आवक झाली. एक नंबर डाळिंबास प्रति किलो 251 ते…
शासनाला अन्नदात्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायला भाग पाडू: अमर कतारी नाफेड मार्फत कांदा खरेदीसाठी अटी शर्ती शिथिल करा: भाऊसाहेब हासे महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संगमनेर शिवसेना (ठाकरे) आक्रमक झाली आहे. पावसाने पाठ फिरविल्याने तालुक्यात शेतीचे प्रश्न गंभीर बनले त्यामुळे तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची व टंचाईग्रस्त गावांना तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. अशी आहे स्थिती: संगमनेर तालुक्यात पावसाने पाठ फिरविल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने बाजरी, सोयाबीन, मका, कापूस, भुईमूग ही पिके पूर्णपणे जळाली असून जनावरांचा चारासुद्धा खाण्यायोग्य राहिला नाही. तालुक्यात पाण्याची देखील टंचाई निर्माण झाली असून टंचाईग्रस्त गावांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अकलापूर देवस्थान विकासाकरिता जिल्हा परिषदेअंतर्गत 65 लाख रुपयांची कामे मार्गी लागली असून अकरा लाखाच्या निधीतून अद्यावत व्यासपीठ निर्माण केले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अजय फटांगरे यांनी दिली. फटांगरे म्हणाले, श्री दत्त देवस्थान अकलापूर हे पठार भागासह जुन्नर व संगमनेर तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या देवस्थानच्या विकासाकरता काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 65 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. या निधीमधून देवस्थानकडे येण्याकरता रस्ते, पेव्हींग ब्लॉक इत्यादी कामे करण्यात आली. स्वतंत्र व्यासपीठ: याचबरोबर सहकारातील दीपस्तंभ सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज पिंपरी चिंचवड – दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साळी समाजाच्यावतीने भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव चिंचवडगाव येथे मंचर येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. मोहन साळी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध उपक्रम: यावेळी आरोग्य शिबिर, तज्ञ डॉक्टरांचा सन्मान, विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या समाजातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच समाजातील तरुण तरुणींच्या युवा मंचची स्थापना करण्यात आली. या मान्यवरांची होती उपस्थिती: रविवारी 3 सप्टेंबरला चिंचवडगाव येथील प्रभू रामचंद्र सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश माथेसुळ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. याशिवाय लोणावळा नगर परिषदेचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज लोणी (शिर्डी) – गोदावरीच्या पाण्याच्या आवर्तन काळात अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून नियोजन करावे. तसेच निळवंडे धरणातून पाणी सोडण्याबाबत काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. लोणीत बैठक: मंत्री विखे यांच्या उपस्थितीत लोणी येथे गोदावरी आणि निळवंडे धरण आवर्तनाच्या नियोजना संदर्भात आढावा बैठक झाली. या अधिकाऱ्यांची उपस्थिती: यावेळी नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली शहाणे, अधीक्षक अभियंता आमले, नगरचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर, नाशिकचे उपविभागीय पोलिस आधिकारी गोकावे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज जालना – राजकारण्यांच्या विनाकारण नादी लागू नका. सरकारनं तुम्हाला वेडं केलं आणि रस्त्यावर आणलं. या लोकांना फक्त तुमची मतं पाहिजेत. तुमच्यासाठी काही करायचं नाही. आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या नेत्यांना मराठवाड्यात येऊ देऊ नका, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर हल्ला चढवत आंदोलकांना पाठिंबा दिला यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखी पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. का आले होते: जालन्यामध्ये एक सप्टेंबरला मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला यामध्ये आंदोलकांसह आणि पोलीसही जखमी झाले या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी (4 सप्टेंबर) जालना येथे मराठा आंदोलकांची भेट घेतली. राजकारण पेटलं: जालन्यातील घटनेनंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा…
मास्टरमाईंड भाऊसाहेब कुटेसह मुख्य आरोपी अद्यापही बाहेरच! महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शेकडो ठेवीदारांच्या कष्टार्जित 81 कोटींच्या ठेवींना चुना लावणाऱ्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहारामुळे संगमनेरच्या विश्वासार्ह सहकार विश्वाला मोठा धक्का पोहोचला आहे. 81 कोटी रुपयांचा अपहार हा दोन राजकीय कुटुंबीयांभोवती केंद्रित झाला असून ठेवीदारांच्या ठेवीतून वाहणाऱ्या दूध गंगेत हात धुवून घेणाऱ्या, राजकीय वरदहस्त असलेल्या व जिल्हा परिषदेसह संगमनेरातील अन्य संस्थांमध्ये पदाधिकारी राहिलेल्या भाऊसाहेब कुटेसह मुख्य आरोपींपर्यंत पोलीस अद्याप पोहोचू शकलेले नसल्याने पोलीस तपासाबद्दल संशयाची सुई निर्माण होताना दिसत आहे. पाच आरोपींच्या अटकेनंतर अटक सत्र थांबले: गुन्ह्याचे स्वरूप मोठे असल्याने आणि तत्कालीन तपास अधिकारी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी सुरुवातीलाच…
महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष @ प्रवीण पुरो गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या सत्तेतील धुसफूस वाढत असलेल्या बातम्या कानावर येऊ लागल्या आहेत. या सत्तेतील एक मुख्यमंत्री दुसर्या उपमुख्यमंत्र्याच्या म्हणण्याप्रमाणे काम करतो तर दुसरा उपमुख्यमंत्री मनाला येईल ते निर्णय घेतो. स्वार्थी सत्तेत आपले सारेच लाड पुरवले जात नसतात. स्वार्थापोटी भाजपबरोबर सत्तेत गेलेल्या एकनाथ शिंदेंची सत्ता राबवताना जी अवस्था होते आहे तशीच अजित पवारांचीही झालेली आहे. घरचं स्वातंत्र्य आणि परघरचा सासुरवास यातला फरक या दोन्ही नेत्यांना कळला असेल. आपल्याला जड होणार्या व्यक्तीचा काटा काढण्याचं कारस्थान अशा सत्तेत दिसून येतं. एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या निर्णयांवर जसा भाजपचा आक्षेप असतो तसं अजित पवारांविषयीही सुरू आहे. त्यांच्यापुढे…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – ठेवीदार आणि संगमनेरकरांचे लक्ष लागून असलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे आणि त्याच्या कुटुंबीयांना शनिवारी या प्रकरणाची सुनावणी होऊन पुढील आदेश होईपावेतो अटक न करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. त्यामुळे आरोपींना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. अंतरिम जामीन अर्ज: संगमनेरच्या आदर्श सहकाराला छेद देत शेतकऱ्यांची कामधेनू ठरलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या तब्बल 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी मुख्य आरोपी, जिल्हा परिषदेचा माजी सदस्य असलेल्या भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या कुटुंबीयांनी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात ॲड. एस. यु. कवडे यांच्यामार्फत अंतरीम जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. अटकेचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – जालना येथील घटने संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपली भूमिका एका ट्विटद्वारे स्पष्ट केली आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्या बाबतीत त्यांनी स्पष्टपणे आपले मत व्यक्त केले. ठाकरे म्हणाले, जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार पण झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी ह्याचा निषेध नोंदवतो. कालपासून लक्ष ठेवून: ह्या घटनेवर मी कालपासून लक्ष ठेवून आहे, आणि ह्या घटनेवर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहत होतो. मुळात मराठा समाजाने आरक्षणासाठी जी आंदोलनं केली, त्या आंदोलनांचा इतिहास बघितला, तर मी माझ्या…
