Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – बुधवारी (दिनांक 9 ऑगस्ट) सकाळी क्रांती दिनानिमित्त संगमनेरमध्ये काँग्रेस पक्षाच्यावतीने पदयात्रा, भव्य रॅली काढण्यात येणार असून त्यानंतर यशोधन कार्यालयाच्या प्रांगणात भव्य आदिवासी जनजागृती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यांनी दिली माहिती : यासंदर्भात आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, बाळकृष्ण गांडाळ व काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी माहिती दिली असून यावेळी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात उपस्थित राहणार आहे. असे आहे नियोजन : आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत बुधवारी क्रांती दिनानिमित्त सकाळी 8 वाजता नेहरू चौक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – कोविड घोटाळा प्रकरणी कोणाला सोडणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी कालच विधानसभेत दिल्यानंतर आज शनिवारी मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना (ठाकरे) गटासाठी हा मोठा धक्का असून पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. काय आहे आरोप : कोविड सेंटर कथीत घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आग्रापाडा पोलीस ठाण्यात पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात हा गुन्हा दाखल केला असून पेडणेकर महापौर असताना हा घोटाळा झाला होता. कोविड उपचाराच्या औषधांची खरेदी वाढीव दराने करण्यात आली होती. तसेच बॉडीबॅग खरेदीचाही घोटाळा झाला होता. दोन हजार रुपये किमतीची बॉडीबॅग सहा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – महसूल प्रशासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना, त्यासाठीचे अर्ज व विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे विविध दाखले आता ऑनलाइन स्वरुपात उपलब्ध आहेत. या सर्व योजना समाजासोबत युवकांपर्यंत अधिकाधिक प्रमाणात पोहोचण्यासाठी युवा पिढी व महसूल विभाग यांच्यात सुसंवाद असला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले. जिल्हाधिकारी कोठे बोलले : महसूल विभागाच्यावतीने राज्यात १ ऑगस्ट ते ८ऑगस्ट दरम्यान सप्ताहाचे आयोजन शासनाच्यावतीने करण्यात आले आहे. या सप्ताह अंतर्गत संगमनेर महाविद्यालयात आयोजित ‘युवा संवाद’ कार्यक्रमात जिल्हाधिकारी बोलत होते. यांची होती उपस्थिती : शिर्डीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर -सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या स्थळ सीमेत सर्वत्र महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37(1) व 37(3) अन्वये 14 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. यासाठी असेल बंदी : या आदेशानुसार नमूद कालावधीत कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे. शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणे. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. याचाही आहे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – प्रसिद्ध व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांचे स्वलिखित आणि स्वचित्रित ‘सासू व्हर्सेस सून’ या पुस्तकास जिल्हास्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. नुकतीच या पुरस्काराची सुनील गोसावी यांच्याकडून घोषणा करण्यात आली आहे. सासू आणि सुनेच्या नात्यातील विविध प्रकारचे कौटुंबिक विनोदाचे मजेशीर प्रसंग व्यंगचित्रातून आणि मार्मिक शब्दातून व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांनी या पुस्तकात  मांडले आहेत. पंधरावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन लवकरच होणार असून त्यामध्ये पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. स्मृतिचिन्ह , सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे. अरविंद गाडेकर यांची व्यंगचित्रे व्यंगचित्राच्या माध्यमातून दैनिक, साप्ताहिक, मासिक, दिवाळी अंक, सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध होत असून आतापर्यंत त्यांनी अकरा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक – जगातील अग्रगण्य वाईन ब्रँडमध्ये समावेश असलेल्या नाशिकच्या सुला विनयार्ड कंपनीला राज्य उत्पादक शुल्क मंत्र्यांनी नोटिस पाठवली असून ११६ कोटींचा दंड भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, या नोटिसला सुला विनयार्डस कंपनीकडून न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. यापूर्वीही दिली होती नोटीस : सुला विनयार्ड कंपनीला अशीच नोटीस सन २०१८ मध्येही देण्यात आली होती. मात्र, त्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यानं राज्य सरकारनं स्थगिती दिली होती. मात्र आता हे स्थगिती उठवत उत्पादन शुल्कमंत्र्यांनी कंपनीला पुन्हा एकदा नोटीस पाठविली आहे. या आधारे बजावली नोटीस : राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांनी महाराष्ट्र बिअर आणि वाईन उत्पादन नियम 1966 नुसार सुला विनयार्ड…

Read More

विरोधकांनी कायदा व सुव्यवस्थेवरच ठेवले होते बोट… महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : पावसाळी अधिवेशनाचा शुक्रवारचा शेवटचा दिवस आहे. अधिवेशन काळात विरोधकांनी बेपत्ता महिला मुलींसंदर्भात प्रश्न उपस्थित करत गृह खात्याला धारेवर धरले होते. अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात ‘महिला सुरक्षित नाही’ असा नेरेटिव्ह सेट करु नका, असे सभागृहात सांगत महिलांच्या गुन्ह्यांची आणि बेपत्ता झालेल्या महिला-मुलींना परत आणल्याची आकडेवारीच मांडली. अधिवेशनादरम्यान विविध प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. राज्यातील अनेक घटनांचे दाखले देत महिला मुलींच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी कायदा व सुव्यवस्थेवरच बोट ठेवले होते. एकूणच राज्यात महिला, मुली सुरक्षित नसल्याचे विरोधकांनी या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना पद्म पुरस्काराने गौरविले जाते. पद्म पुरस्कारांसाठी या नावांची शिफारस करण्याकरिता महाराष्ट्रात समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे सुधीर मुनगंटीवार यांची निवड करण्यात आली आहे. यांचाही आहे समितीत समावेश : मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीत दिलीप वळसे पाटील, दादा भुसे, चंद्रकांत पाटील, धनंजय मुंडे, उदय सामंत आणि राजशिष्टाचार विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांचा समावेश आहे. कधीपासून दिले जातात हे पुरस्कार : अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे वितरण 1954 पासून केंद्र सरकार करते. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – गुरुवारी (ता. 03 ऑगस्ट) संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या कांदा लिलावात एकुण 9577 गोण्या कांद्याची आवक झाली. लिलावात चांगल्या दर्जाच्या एक नंबर कांद्याला 1500 ते 1825 रुपये भाव मिळाला. याच लिलावात दोन नंबर कांद्याला 1200 ते 1400 रुपये, तीन नंबर कांद्याला 800 ते 1100 रुपये इतका भाव मिळाला तसेच गोल्टी कांदा 500 ते 700 रुपये भावाने विकला गेला. टोमॅटोलाही मिळाला असा भाव : तसेच टोमँटो या शेतमालाची एकुण 14700 क्रेटस आवक झाली. त्यास 1000 ते 2500 रुपयांचा भाव मिळाला. डाळींबाचीदेखील 1881 क्रेटस आवक झाली असून 1 नंबर डाळीबास 111 ते 135 रुपये प्रति किलो,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज आज 4 ऑगस्ट ज्येष्ठ तमाशा कलाकार कलाभूषण रघुवीर खेडकर यांचा वाढदिवस. रघुभाऊ माझे मानस बंधु… एक तरल मनाचा मनस्वी कलाकार, 1961 मध्ये आजच्या दिवशी मुंबईत जन्मलेल्या रघुभाऊचा तमाशा रंगभूमीवर पहिला प्रवेश झाला तो वयाच्या पाचव्या दिवशी. तमाशामहर्षि तुकाराम खेडकर आणि कान्ताबाई सातारकर यांच्या पोटी जन्मलेल्या रघुभाऊच्या रक्तातच तमाशा आहे. वयाच्या नवव्या वर्षापासुन स्टेज गाजवत हम भी कुछ कम नही हे भाऊने दाखवुन दिले. 1980 च्या दरम्यान भाऊने आई कांताबाईच्या तमाशाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. मागील 300-350 वर्षाच्या काळात तमाशाने अनेक संकटांशी सामना केला आहे. दर शतकात 2-3 वेळा तमाशात मोठमोठे बदल झाले. 80 चे दशकही असेच होते.…

Read More