Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – बनावट कागदपत्रांच्या आधारे राज्यात 14 लाख 28 हजार शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या ‘पीएम किसान’ योजनेवर डल्ला मारला असल्याचे समोर आले आहे. यातून या शेतकऱ्यांनी 1754 कोटी रुपयांची केंद्राची मदत लाटली आहे. केंद्र सरकारच्या आदेशानंतर आता राज्य सरकारने शेतकऱ्याकडून या रकमेची वसुली सुरू केली असून आत्तापर्यंत एक लाख शेतकऱ्यांकडून 93 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या धरतीवर राज्य सरकार देखील शेतकऱ्यांसाठी येत्या ऑगस्ट महिन्यापासून ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजना लागू करण्यापूर्वीच हा घोटाळा समोर आला आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. ऑगस्ट पासून राज्य सरकार देखील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर- रविवारी पहाटे पोलिसांनी जमजम कॉलनी परिसरात केलेल्या कारवाईत साडेसहाशे किलो गोमांस आढळून आले. यावेळी चार जिवंत गोवंश जनावरे देखील कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी या जनावरांची कत्तल होण्यापूर्वीच मुक्तता केली आहे. रविवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे साडेपाच लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. एका वाहनातून गोमांस वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षकांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस पथकाने जमजम कॉलनी परिसरात जात मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई केली असता त्यांना एम.एच. 06 जी 3431 या क्रमांकाच्या मॅक्स पिकअप मध्ये मोठ्या प्रमाणावर गोमांस आढळून आले. जवळच कत्तलीच्या उद्देशाने बांधलेले चार गोवंश जनावरे देखील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेत येताच महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेतलेल्या विकास कामांना दिलेली स्थगिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उठविली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने प्रस्तावित केलेल्या विकास कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले सत्तेवर आल्यानंतर या सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेतलेल्या विकास कामांना स्थगिती दिली होती. अद्यापही ही स्थगिती कायम होती. स्थगिती उठवितांना दिलेल्या निधीमध्ये पुन्हा एकदा अजित दादांची ‘दादागिरी’ कायम राहिली आहे. राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपूर्वी महत्त्वाच्या घडामोडी घडल्या होत्या. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर त्यांच्यासोबतच्या आठ आमदारांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे – पोलीस दलातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमरावती पोलीस दलात सहाय्यक आयुक्त असलेल्या भरत गायकवाड यांनी आपली पत्नी आणि पुतण्याची गोळी घालून सोमवारी पहाटेच्या वेळी हत्या केली. त्यानंतर त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली असल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस दलात या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. अमरावती पोलीस दलात सहाय्यक आयुक्त असलेले गायकवाड पुण्यातील बाणेर परिसरात कुटुंबियासह वास्तव्यास आहे. या घटनेचे कारण अद्याप समोर आलेले नाही. गायकवाड यांनी सोमवारी पहाटे चार वाजता पत्नी मोनी गायकवाड (वय 44 वर्षे) व त्यापाठोपाठ दीपक गायकवाड (वय 35 वर्ष) या पुतण्याची गोळी झाडून हत्या केली. दोघांची हत्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुक्यातील तलाठ्यांच्या अनागोंदी कारभाराने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतीशी निगडित नोंदीला हजारो रुपयांची मागणी केली जात असून पैसे न दिल्यास नोंद होत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांना तलाठी, मंडळ अधिकारी, भूमी अभिलेख कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्याने मानसिक व आर्थिक नुकसान होत आहे. तरी तलाठ्यांना, मंडळ अधिका-यांना सूचना करून गावागावात शिबिर आयोजित करून शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी शिवप्रतिष्ठाण संघटनेचे संस्थापक, प्रदेशाध्यक्ष राहुल ढेंबरे यांनी निवेदनाद्वारे संगमनेरच्या तहसीलदारांकडे केली. यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांसह तहसील कार्यालयासमोर आंदोलनं करणार असल्याचा इशारा दिला आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात बहुतांश गावातील तलाठी आपल्या सज्जामध्ये प्रामुख्याने हजर राहत नाहीत. तर त्यांचे हाताखालील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – जलजीवन मिशन अंतर्गत गावोगावी सुरु असलेल्‍या पाणी पुरवठा योजनांवर लोकांचा अधिकार आहे. या योजनेच्‍या कामाची पूर्तता करताना नागरिकांना विश्‍वासात घेऊन ग्रामस्‍थांच्‍या सूचनांप्रमाणे योजनेच्‍या आराखड्यात पुन्‍हा बदल करा. योजनेच्‍या यशस्‍वितेसाठी अधिकाऱ्यांनी सुध्‍दा जबाबदारीने काम करावे. केवळ ठेकेदारांवर विसंबून योजनेची अंमलबजावणी नको. जिल्‍हाधिकारी, मुख्‍य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कामाच्‍या ठिकाणी अचानक भेटी देवून वस्‍तुस्थिती पहावी, अशा स्‍पष्‍ट शब्दात राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी रविवारी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना धडे दिले. राहाता, श्रीरामपूर, संगमनेर आणि राहुरी तालुक्‍यात सुरु असलेल्‍या जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांच्‍या कामांचा आढावा महसूलमंत्री विखे पाटील यांनी घेतला. माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून त्यांनी सुरू केलेले पर्यावरण संवर्धनाचे दंडकारण्य अभियान हे राज्यासाठी दिशादर्शक ठरले आहे. झाडे लावणारा माणूस हे पुस्तक वाचून त्यांनी हे वृक्षारोपणाचे मिशन सर्वांना दिले. मागील सतरा वर्षात उघडे-बोडके डोंगर हिरवीगार दिसू लागले असून यावर्षीही जेथे जागा असेल तेथे झाडे लावा. वृक्ष संवर्धन संस्कृती आपल्या तालुक्यात वाढली आहे. वृक्ष जपणे हे प्रत्येकाचे मूलभूत कर्तव्य असून वनराई असेल तर जीवनात खऱ्या अर्थाने समृद्धी निर्माण होईल, असे प्रतिपादन काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. पिंपळगाव कोंझिराच्या काळा खडक येथील डोंगरावर जयहिंद लोकचळवळ व अमृतवाहिनी उद्योग समूहाच्या विद्यमाने आयोजित…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज नवनवीन घडामोडी घडत आहे. शिवसेनेतून अनेक जण बाहेर पडून गद्दार मिंधे गटात सामील झाले असले, तरी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. उलट ती दिवसेंदिवस वाढत आहे. याचा फटका निवडणुकीत बसणार असल्याचे समोर दिसत असल्याने राज्यातील भाजपचे सरकार कोणत्याही निवडणुका घेत नाही. उलट निवडणुका घेण्यासाठी टाळाटाळ करत आहे, असे असले तरी आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युवा सेनेने देखील काम सुरू केल्याचे सांगत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोधकांवर संगमनेरात तोफ डागली. उद्धव ठाकरे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले. संगमनेरमध्ये शिवसेना प्रणित युवा सेनेचा युवा संपर्क…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष लेख | प्रवीण पुरो कर्माचं फळ काय असतं, हे किरीट सोमय्या यांना आज कळून चुकलं असेल. ते कसं पचवावं याच्या चिंतेत ते गर्क असतील. ते या संकटातून सहीसलामत सुटोत, अशी सदिच्छा त्यांना आपण देऊयात. ही मराठी महाराष्ट्राची संस्कृती आहे. संकटात माणसाला मदतीचा हात द्यावा. त्याला आणखी खायित लोटू नये, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती ही अशी आहे. वर्षानुवर्ष महाराष्ट्रात राहून जी किरीट सोमय्या या माणसाला कधी कळलीच नाही. कारण डोक्यात अहंकार होता महाराष्ट्राच्या बदनामीचा. महाराष्ट्राच्या बदनामीत या माणसाने इतकं टोक गाठलं की जगातला भ्रष्ट कारभार हा एकट्या महाराष्ट्रातच होत असावा आणि केवळ विरोधकच तो करत असावा, असं…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – जिवंत गोवंश जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाल्याच्या कारणावरून संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल 76 हजार रुपये किमतीचे गोमांस आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी कत्तलखाना चालक जावेद लियाकत शेख (वय 29 वर्षे रा. अलकानगर) याला अटक केली. शहरातील मदिना नगरमध्ये गोवंश जनावरांची कत्तल केल्याची माहिती मिळतात पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे, विजय खाडे रोहिदास शिरसाठ व अजित कुर्हे यांनी घटनास्थळी जात छापा टाकला असता तेथे त्यांना मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची कत्तल केल्याचे आढळून आले. पथकाने तेथे असलेले गोमांस ताब्यात घेत त्याची मोजणी केली. कारवाई मध्ये पथकाला 76 हजार रुपये किमतीचे 380 किलो गोमांस आढळून…

Read More