Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – जनआरोग्यम परिवार व जाणीव फाउंडेशनच्यावतीने दिला जाणारा ‘लोकनेते बाळासाहेब थोरात गुणगौरव पुरस्कार’ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडझरी खुर्द येथील पदवीधर शिक्षिका श्रीमती सुरेखा आनंदराव भालेराव यांना प्रदान करण्यात आला. यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम: नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, नाशिक जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे, नाशिक मराठा विद्या प्रसारक समाजाचे नितीन ठाकरे, संगमनेर वकील संघाचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह ढोमसे पाटील आदींच्या उपस्थितीत सह्याद्री महाविद्यालयात नुकताच हा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील पुरस्कार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कामाची दखल: भालेराव गेली २५ वर्षे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सेवा…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – रस्ता ओलांडताना एसटी बस जवळून गेल्याचा राग आल्याने बसवर दगडफेक करत बस चालकाच्या केबिनमध्ये शिरून कंडक्टरला मारहाण करणे आरोपीला चांगलेच भोवले आहे. याप्रकरणी आरोपीला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी तीन महिने सश्रम कारावास आणि पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. काय होती घटना: आठ वर्षांपूर्वी 2 सप्टेंबर 2015 रोजी नासिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर प्रवरा नदी पुलाजवळ ही घटना घडली होती. नाशिक-पलूस-सांगली (MH 14 BN 4239) ही एसटी बस संगमनेर बस स्थानकातून सांगलीच्या दिशेने जात असताना प्रवरा नदी पुलापाशी रस्ता ओलांडणाऱ्या इसमाच्या जवळून बस गेल्याने त्याला याचा राग आला. त्यामुळे त्याने…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – निळवंडे धरण हे उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाकरता बांधले गेले आहे. या भागात अत्यंत कमी पाऊस झाला असून पिके वाया गेली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे सरकारने तातडीने निळवंडे धरणातून कालव्यांद्वारे पाणी सोडावे, अशी आग्रही मागणी निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांनी सरकारकडे केली आहे. का केली मागणी: निळवंडे कालव्यांमधून पाणी सोडण्याबाबत आग्रही मागणी करताना थोरात म्हणाले, यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अत्यंत कमी पावसामुळे खरीप पेरण्या पूर्णपणे वाया गेल्या आहेत. यामुळे ग्रामीण भाग उध्वस्त झाला. दुष्काळी परिस्थितीत सरकारने काळजी म्हणून बैठका घेऊन पिण्याच्या पाण्याचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शिक्षक दिनाचे औचित्य साधून मंगळवारी 5 सप्टेंबर राज्यातील 108 शिक्षकांचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यात संगमनेर तालुक्यातील धांदरफळच्या देशमुख मळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका वृषाली कडलग यांचा समावेश होता. कार्यक्रमावेळी हे होते उपस्थित: मुंबईच्या नरिमन पॉईंटवरील टाटा थिएटर, नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट येथे झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कपिल पाटील, कौशल्य विकास विभाग तथा मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार अरविंद सावंत, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्या उपस्थितीत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – दोन रुपयासाठी एसटी कंडक्टर सोबत हूज्जत घालने तिघा तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने या तिघा तरुणांना तीन महिने कारावास आणि 21 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. यांना झाली शिक्षा: सोमेश उर्फ सोमनाथ सुखदेव बोंबले, शुभम सुखदेव बोंबले व शुभम पांडुरंग गुंजाळ अशी न्यायालयात गुन्हा सिद्ध झालेल्या तिघा आरोपींची नावे आहेत. या तिघांविरोधात संगमनेरच्या जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्यासमोर खटला सुरू होता. सरकार पक्षाच्यावतीने ॲड. बी. जी. कोल्हे यांनी काम बघितले. अशी होती घटना: 11 जून 2016 रोजी संगमनेर-साकुर या बसमधून प्रवास करणाऱ्या एका तरुणाने साकुर फाट्यापर्यंतची…
आगामी गणेशोत्सव, ईद ए मिलाद सणासंदर्भात अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या या महत्त्वाच्या सूचना…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – जिल्ह्यात साजरे होणारे आगामी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सण निर्विघ्नपणे व शांततेत साजरे करावेत, असे आवाहन अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी करताना काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. यांची उपस्थिती: जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शांतता समिती बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, संबंधित विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, गणेश मंडळांनी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. गणेश मंडळांच्या विविध परवान्यासाठी, महानगरपालिका कार्यालयात, “एक खिडकी योजना” सुरू करुन या माध्यमातुन गणेश मंडळांना सर्व परवानग्या एकाच ठिकाणी देण्यात याव्यात. या कक्षात संबंधित…
महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक – नाशिक विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी दैनिक लोकमतच्या अहमदनगर आवृत्तीचे निवासी संपादक सुधीर लंके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. येथे झाली बैठक: अध्यक्ष निवडीची बैठक नाशिकच्या विभागीय माहिती कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अध्यक्ष निवडीसाठी निवडणुक प्रक्रिया राबविण्यात आली. बिनविरोध निवड: अधिस्वीकृती समितीचे सदस्य किरण लोखंडे यांनी सुधीर लंके यांची अध्यक्षपदी निवड करण्यात यावी असे सुचविले. त्यांच्या सुचनेला सर्व सदस्यांनी अनुमोदन दिले. लंके यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. यांची होती उपस्थिती: सदर निवडणूक प्रक्रिया नाशिकच्या विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक (माहिती) ज्ञानेश्वर इगवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी समिती सदस्य विजयसिंह होलम, अभिजित…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याला मिळत असलेल्या भावामुळे शेतकऱ्यांचा ओढा बाजार समितीकडे वाढला आहे. बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असून मंगळवारी (5 सप्टेंबर) उच्च प्रतीच्या एक नंबर कांद्याला 2200 ते 2601 रुपयांचा भाव मिळाला. असे होते बाजारभाव: मंगळवारी झालेल्या कांदा लिलावात दोन नंबर कांद्याला 1700 ते 2000 रुपये, तीन नंबर कांद्याला 1000 ते 1700 रुपये तसेच गोल्टी कांद्याला 200 ते 900 रुपये भाव मिळाला आहे. टोमॅटो डाळिंबालाही उच्चदर: बाजार समितीत टोमॅटोला पन्नास ते दीडशे रुपये पर्यंत भाव मिळाला असून डाळिंबाची देखील मोठ्या प्रमाणात आवक झाली. एक नंबर डाळिंबास प्रति किलो 251 ते…
शासनाला अन्नदात्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायला भाग पाडू: अमर कतारी नाफेड मार्फत कांदा खरेदीसाठी अटी शर्ती शिथिल करा: भाऊसाहेब हासे महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संगमनेर शिवसेना (ठाकरे) आक्रमक झाली आहे. पावसाने पाठ फिरविल्याने तालुक्यात शेतीचे प्रश्न गंभीर बनले त्यामुळे तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची व टंचाईग्रस्त गावांना तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. अशी आहे स्थिती: संगमनेर तालुक्यात पावसाने पाठ फिरविल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने बाजरी, सोयाबीन, मका, कापूस, भुईमूग ही पिके पूर्णपणे जळाली असून जनावरांचा चारासुद्धा खाण्यायोग्य राहिला नाही. तालुक्यात पाण्याची देखील टंचाई निर्माण झाली असून टंचाईग्रस्त गावांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अकलापूर देवस्थान विकासाकरिता जिल्हा परिषदेअंतर्गत 65 लाख रुपयांची कामे मार्गी लागली असून अकरा लाखाच्या निधीतून अद्यावत व्यासपीठ निर्माण केले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अजय फटांगरे यांनी दिली. फटांगरे म्हणाले, श्री दत्त देवस्थान अकलापूर हे पठार भागासह जुन्नर व संगमनेर तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या देवस्थानच्या विकासाकरता काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 65 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. या निधीमधून देवस्थानकडे येण्याकरता रस्ते, पेव्हींग ब्लॉक इत्यादी कामे करण्यात आली. स्वतंत्र व्यासपीठ: याचबरोबर सहकारातील दीपस्तंभ सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या…
