Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात आज नवा धक्कादायक ट्विस्ट बघायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पाडत विरोधी पक्ष नेते अजित पवार आज राज्याच्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्यासोबत नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. पहाटेच्या शपथविधीनंतर यावेळी त्यांनी भर दुपारी बंडाचा झेंडा फडकविला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात होती. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांकडून आपली एकजूट कायम असल्याचे वारंवार सांगितले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अध्यक्ष शरद पवार यांनी भाकरी फिरविण्याचा प्रयोग केल्यानंतर अजित पवार नाराज असल्याचे वारंवार समोर येत होते. अखेर पहाटेच्या शपथविधीनंतर आज पुन्हा एकदा अजित पवार यांनी…
रविवार विशेष | प्रवीण पूरो राज्य भाजपचे सर्वेसर्वा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी घेतलेली मुलाखत पाहण्याची संधी मिळाली. एका होयब्याने दुसर्या सांगकाम्याची घेतलेली मुलाखत म्हणून या मुलाखतीकडे पहावं लागेल. विरोधकांना सातत्याने दोष देणार्या संपादकाच्या या मुलाखतीला कोणीही गंभीरपणे घ्यावं अशी परिस्थिती नसली तरी फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात अनैतिकता आल्याचं मान्य केलं आणि या अनैतिकतेचा आपण वेळोवेळी आसरा घेतल्याचं कबुल केलं. आपण राजकारणात अनैतिक वागलो, हे इतर वेळा शुचिर्भूततेचा आव आणणार्या फडणवीसांनी स्वत:च कबुल केलं हे बरं झालं. अनैतिक राजकारणी असा ठपका त्यांच्यावर इतर कोणी लावला असता तर त्यांच्या हुजर्यांनी त्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – काँग्रेस नेते व माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकाराचे मॉडेल ठरलेल्या संगमनेर तालुक्याने याही वर्षी आपल्याकडील कर्जफेडीची परंपरा कायम राखली असून अहमदनगर जिल्हा बँकेत 30 जून 2023 अखेर 99.70% इतकी उच्चांकी वसुली देत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक राखला असल्याची माहिती उपाध्यक्ष माधवराव कानवडे व तालुका विकास अधिकारी अशोक थोरात यांनी दिली. आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा व मेंबर पातळीवर चांगली वसुली झाली आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या शिस्तीच्या व आदर्श तत्त्वांवर संगमनेरचा सहकार कार्यरत असून कर्ज परतफेडची परंपरा कायम राखताना यावर्षी 99.70% इतकी उच्चांकी वसुली दिली.…
महाराष्ट्र संवाद न्यूज अकोले – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा १० वी, १२ वी तसेच स्पर्धा परीक्षा गुणवंत विद्यार्थी गौरव हा त्यांच्या भविष्यासाठी प्रेरणा देणारा आहे. आपल्या पुढील भविष्यासाठी गौरव रूपी ऊर्जा घेवुन हे पुरस्कारार्थी तालुक्याचे व देशाचे नाव उज्ज्वल करतील, असे प्रतिपादन अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे होते. साईबाबा संस्थानचे विश्वस्त डॉ. जालिंदर भोर, तहसीलदार सतिष थेटे, गटशिक्षणाधिकारी जालिंदर खताळ, अमृतसागर दुध संघाचे कार्यकारी संचालक दादाभाऊ सावंत, पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव अनिल रहाणे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज बुलढाणा – महत्त्वकांक्षी आणि ड्रीम प्रोजेक्ट ठरलेल्या समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसला भीषण अपघात झाला. रस्ता दुभाजकाला धडकून पलटी झालेल्या बसणे अचानक पेट घेतला. यात २५ प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर हा अपघात झाला. या बसमध्ये एकूण ३३ प्रवासी होते. चालक, वाहकासह ८ प्रवासी खिडक्या तोडून सुखरूप बाहेर पडले. उर्वरित २५ प्रवाशांचा मात्र होरपळून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. त्यावेळी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली.…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर नगर परिषदेतील वादग्रस्त अभियंता राजेंद्र सुतावणे यांनी महिलेशी अरेरावी करत उद्धट वागणूक देण्याचा प्रकार समोर आला आहे. आशा उद्धटखोर अधिकाऱ्यावर कारवाईसाठी तसेच संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीवरील पूल पडण्यासदेखील संबंधित अधिकारीच जबाबदार असून यासंदर्भात त्याच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना तीन माजी नगरसेवकांसह नागरिकांनी साकडे घातले आहे. बदली होऊन देखील संगमनेर नगरपालिकेतील पदभार न सोडणाऱ्या या अधिकाऱ्यावर जिल्हाधिकारी काय कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख व माजी नगरसेवक कैलास वाकचौरे, शिवसेनेच्या माजी नगरसेविका अल्पना तांबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश थोरात आदींसह नागरिकांनी या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. आधीच पोलीस ठाण्यात…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – पूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या आणि गत दोन वर्षात पुन्हा गुन्हेगारी करणाऱ्या 33 व्यक्तींना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे प्रस्ताव संगमनेर उपविभागाच्यावतीने पोलीस अधीक्षकांना पाठविण्यात आल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने प्रस्ताव पाठविण्याची संगमनेर उपविभागातील ही पहिलीच वेळ आहे. संगमनेर उपविभागात संगमनेर शहर संगमनेर तालुका आश्वी घारगाव अकोले आणि राजुर या सहा पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. या सहा पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे हे प्रस्ताव पाठविले आहेत. या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वारंवार गुन्हे करणाऱ्या व गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या गुन्हेगारांची जंत्री उपअधीक्षक…
महाराष्ट्र संवाद न्यूज “बंटी, काय करतोयेस” आईनं विचारलं. “गेम खेळतोय” मोबाइलवरची नजर न हटवता बंटीनं उत्तर दिलं. राजला फोन कर कोण राज??? तुझा मावसभाऊ, सुमा मावशीचा मुलगा, मी कशाला फोन करू अरे, त्याचे वडील गेले मग! अशी घटना घडली की भेटायचं असतं. तू काही जाणार नाहीस निदान फोन तरी कर. तुम्ही एकाच वयाचे आहात. त्याचा काय संबंध, मी सांगते म्हणून फोन कर फोर्स करू नकोस. काही फोन बिन करणार नाही. तसंही आमचं रिलेशन फक्त नावलाच आहे दोन मिनिटं तर बोलायचयं. मित्रांशी कसा तासनतास बोलतोस उगीच मित्रांना मध्ये आणू नकोस, बंटी चिडला. मग फोन कर आता तर मुद्दाम करणार नाही बंटी,…
महाराष्ट्र संवाद न्यूज गुरुवारी (ता. 29 जून) आषाढी एकादशीचा मुहूर्त साधत संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव बोटा आणि कुरकुटवाडी येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या शाखांची स्थापना करण्यात आली. यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातही आता विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचा नारा घुमणार आहे. विहिंप बजरंग दलाच्या शाखांच्या उद्घाटन प्रसंगी जय श्रीराम…! जय कारा वीर बजरंगी, हर हर महादेव..! छत्रपती शिवाजी महाराज की जय…!च्या घोषणा देवून फटाके वाजवण्यात आले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसाद म्हणून खिचडी व केळी वाटप करण्यात आले. बजरंग दल संगमनेर प्रखंड संयोजक कुलदिप ठाकूर यांनी ध्वज पूजन करून विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे सेवा, संस्कार व…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या चौघांचे सेवा जेष्ठतेनुसार भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये निवड करण्यात आली आहे. यामध्ये संगमनेरच्या विकास पानसरे यांच्यासह गोरक्ष गाडीलकर गुलाबराव खरात व सतीश खडके यांचा समावेश आहे. या चौघा अधिकाऱ्यांना लवकरच प्रशासकीय सेवेतील सर्वोच्च पद असलेले जिल्हाधिकारी पद भुषविण्याचा मान मिळणार आहे. विशेष म्हणजे निवड झालेले चौघेही आयएएस अधिकारी कृषी पदवीधर असतील. जिल्ह्यातील चौघांना एकाच वेळी हा सन्मान मिळाल्याने अहमदनगर जिल्ह्याची मान प्रशासकीय सेवेत उंचावली आहे. सध्या अहमदनगर जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष असलेले विकास पानसरे संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील रहिवासी असून त्यांनी बारा वर्षांपूर्वी अहमदनगर येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे.…
