Author: अनंत पांगारकर
शुक्रवार दि. २९ मार्च, संगमनेर गुटक्याच्या अनुषंगाने प्रकाशित झालेल्या बातम्यांवर समाज माध्यमातून कमेंट करणाऱ्या शिवसेनेच्या दीपक साळुंखे यांना बंदी असलेल्या गुटख्याची सर्रासपणे शहरात विक्री करणाऱ्या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला. या संदर्भात विजय भागवत याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक दैनिकात गुटखा तस्करांकडून संगमनेरात राजरोसपणे गुटख्याची विक्री केली जाते. बंदी असलेला गुटखा संगमनेरात कोणत्याही पानटपरीवर सर्रासपणे मिळतो. पोलीस देखील अशा किरकोळ विक्रेत्यांवर वारंवार कारवाई करतात मात्र या सर्व प्रकारांमधील प्रमुख गुटका किंग असलेले विक्रेते पोलिसांना सापडत नाही किंवा जाणीवपूर्वक त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. या गुटक्यावर नियंत्रण ठेवणारे अन्न औषध प्रशासन नावाचे खाते…
गुरुवार दि. २८ मार्च, मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपल्या आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आठ जागांपैकी रामटेकचा अपवाद वगळता उर्वरित सातही ठिकाणी विद्यमान खासदारांना संधी देण्यात आली असून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिर्डीत आता ठाकरेंच्या शिवसेनेचे वाकचौरे व शिंदे यांच्या शिवसेनेचे लोखंडे यांच्यात लढत स्पष्ट झाली आहे. शिर्डीत आजी-माजी खासदारांमध्ये लढत होणार असली तरी मोठ्या प्रमाणात या मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने या मतदारसंघातून इच्छुक असलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची संधी हुकली आहे. त्यांचे समर्थक व काँग्रेसकडून इच्छुक…
गुरुवार दि. २८ मार्च न्यूमोनिया झालेल्या दोन रुग्णांना चुकीच्या रक्तगटाचे रक्त चढविणाऱ्या दोन परिचारिकांचे निलंबन करण्यात आले आहे. पुण्याच्या औंध रुग्णालयात कार्यरत असलेल्या प्रिती ठोकळ आणि शांता मकलूर अशी तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या दोन्ही परिचारिकांची नावे आहेत. दत्तू सोनाजी सोनवणे आणि दगडू कांबळे यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणी अगदी त्यांना न्यूमोनीया असल्याचे आढळून आले. त्यांच्या हिमोग्लोबिनची पातळी सामान्य पातळीपेक्षा कमी असल्याने, दोघांनाही त्वरित रक्तसंक्रमण आवश्यक असल्याचा निष्कर्ष वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण खलाटे यांनी काढला होता. त्यानंतर त्यांनी नर्सिंग स्टाफला दोन्ही रुग्णांना रक्त देण्याचे निर्देश दिले. संबंधित परिचारिकांनी निष्काळजीपणा करत दत्तू सोनवणे…
गुरुवार दि. २८ मार्च देशातील ६०० वकिलांनी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना पत्र लिहीत धक्कादायक गोष्ट समोर आणली आहे. काही विशिष्ट लोकांचा समूह न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा, न्यायालयीन प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा आणि विचित्र तर्क आणि राजकीय अजेंड्याच्या आधारावर न्यायालयांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप करत त्यांनी चिंता व्यक्त केली. वकिलांनी असा आरोप केल्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना पत्र लिहिणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे, पिंकी आनंद, हितेश जैन, मनन कुमार मिश्रा, आदिश अग्रवाल, चेतन मित्तल, उज्वला पवार, उदय होल्ला आणि स्वरुपमा चतुर्वैदी आदींचा समावेश आहे. काय म्हटले आहे पत्रात… विशेष करून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर…
गुरुवार दि. २८ मार्च, मुंबई लोकसभा निवडणुकीचा पारा तापू लागला आहे. भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश असलेली चाळीस स्टार प्रचारकांची यादी जाहीर केल्यानंतर आता त्या पाठोपाठ मुख्यमंत्री शिंदे गटानेही त्यांची यादी जाहीर केली आहे. त्यांच्या यादीत देखील चाळीस स्टार प्रचारकांचा समावेश असून राहुल शेवाळे यांना या यादीतून वगळण्यात आले आहे. शेवाळे यांचे यादीत नाव नसल्याने विविध चर्चा सुरू झाल्या आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा वाढू लागला असताना आता दुसरीकडे लोकसभेचे रणांगणही तापू लागले आहे. सर्वच पक्षांकडून आपले उमेदवार जाहीर केले जात असताना आता त्यांच्या विजयाची जबाबदारी देखील स्टार प्रचारकांवर सोपविण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या…
गुरुवार दि. २८ मार्च – अनंत पांगारकर बुधवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने शिर्डी लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केल्याने शिर्डीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. वाकचौरे यांना मोठा विरोध होत असल्याने या मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असलेल्या व त्यादृष्टीने तयारी करणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपवतेंच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. रुपवते यांची बंडखोरी झाली तर ती वाकचौरेंसाठी डोकेदुखी ठरणार आहे. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेशी गद्दारी करत आता पुन्हा उमेदवारीसाठी मातोश्रीच्या पायऱ्या चढणाऱ्या वाकचौरे यांचा अपवाद वगळता शिवसेनेकडे दुसरा उमेदवार नव्हता. शिवसेनेतीलच एका गटाचा हात धरत वाकचौरे पुन्हा ‘मातोश्री’ची पायरी चढले खरे पण…
गुरुवार दि. २८ मार्च निवडणुकीमध्ये जात किंवा धर्माचा आधार घेतला जातो, ते मला खटकतं. माझ्याकडे निवडणूक लढवण्यासाठी पैसे नाहीत! त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी स्पष्ट नकार दिला असल्याचे अर्थमंत्री सीतारामन म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे विधान केली. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र आपण तो फेटाळल्याचे सीतारमण यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून आता सर्वच पक्षांकडून उमदेवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाने बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी सातवी यादी जाहीर केली. याच दरम्यान, देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. ‘लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी माझ्याकडे पुरेसे…
बुधवार दि. २७ मार्च लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने बुधवारी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राष्ट्रीय व राज्यातील ४० नेत्यांचा यात समावेश आहे. भाजपसह मित्र पक्षांमधील नेत्यांचा देखील या यादीत समावेश आहे. राज्यात महायुतीमध्ये असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. जगत प्रकाश नड्डा, राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण, देवेंद्र फडणवीस, नुकतेच भाजपवासी झालेले अशोक चव्हाण यांच्यासह केंद्रीय मंत्री रामदास आठवले, नारायण राणे, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील यांचा देखील यात समावेश आहे. महाराष्ट्रात…
बुधवार दि. २७ मार्च, मुंबई लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली सातवी यादी बुधवारी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील एकच नाव जाहीर करण्यात आले असून अमरावती लोकसभा मतदारसंघांमध्ये नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आले आहे. राणा यांच्या उमेदवारीला मित्रपक्ष शिवसेना, बच्चू कडू, आनंदराव अडसूळ यांच्यासह स्वपक्षियांचा देखील मोठा विरोध होता. हा सर्व विरोध धावून रामा यांना संधी देण्यात आली आहे. नवनीत राणा या मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडणूक लढून जिंकल्या होत्या.
बुधवार दि. २७ मार्च, संगमनेर चेअरमन भाऊसाहेब कुटेसह त्याच्या नातेवाईकांनी तब्बल ८१ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केलेल्या बहुचर्चित दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेची मोठी अपडेट समोर आली आहे. मोठ्या आर्थिक गुन्ह्यातील आरोपींना अटकपूर्व जामीन नाकारण्याचा जिल्हा न्यायालयाचा सिलसिला कायम राहिला आहे. या घोटाळ्यातील चेअरमन भाऊसाहेब कुटे याचे नातेवाईक असलेले कर्जदार आरोपी अजित कृष्णराव कदम व सुजित कृष्णराव कदम या दोघांचा अटकपूर्व जामीन संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी नाकारला आहे. ऑगस्ट २०२३ पासून पोलिसांना गुंगारा देणारे आणि राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठित असलेल्या, समाजात व्हाईट कॉलर म्हणून मिरविणाऱ्या या गुन्हेगारांना न्यायालयाने बेल नाकारल्याने आता आर्थिक गुन्हे शाखा त्यांना पकडून जेलमध्ये टाकणार का? असा…
