Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी : अहमदनगर जिल्ह्यातील साडेसहा लाख लाभार्थ्यांना रेशन दुकानांच्या माध्यमातून आनंदाचा शिधा कीट वाटप करण्यात येणार आहे. या योजनेत रेशन दुकानदारांनी पारदर्शकता ठेवत तत्परतेने कीटचे वाटप करावे, अशा सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. राहातामधील खंडोबा चौक येथे आनंदाच्या शिधा कीट वाटपाचा कार्यक्रम महसूलमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. शिर्डी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, पुरवठा अधिकारी श्री.खरात, रेशन दुकानदार राजू वायकर तसेच स्थानिक पदाधिकारी मुकुंदराव सदाफळ, भाऊसाहेब जेजुरकर, अॅड. रघुनाथ बोठे, नानासाहेब बोठे, कैलास सदाफळ, चंद्रभान…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँक, नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक आणि जी एस महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सोनेतारण घोटाळ्यानंतर आता सोने मूल्यांकनकार गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश शहाणे याचा प्रवरा सहकारी बँकेतील 38 लाख 44 हजार 422 रुपयांचा फसवणुकीचा घोटाळा समोर आला आहे. या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात शहाणे याच्यासह नऊ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात बँकेचे संगमनेर शाखेचे व्यवस्थापक सुदाम किसन शेजवळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बँकेने नेमलेल्या अधिकृत मूल्यांकनकार जगदीश शहाणे याच्यामार्फत कर्जदाराने दिलेल्या सोन्याची शुद्धता तपासणी करून ते खरे किंवा खोटे याची खात्री केल्यावर सोन्याचे मूल्यांकनाचे तपासणी व ते खरे असल्याचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिवसेनेतील मोठ्या फुटीनंतर राज्य पातळीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा शिवसेनेची पुनर्बांधणी सुरू झाली आहे. संगमनेरसह शिर्डी लोकसभा मतदारसंघात पक्षाची कार्यकारिणी नव्याने जाहीर झाल्यानंतर “आता जिंकेपर्यंत लढायचं” हा आदेश मानत नवे पदाधिकारी कामाला लागले आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये शाखा बांधणीचा धडाका सुरू झाला असून एकाच वेळी १५ प्रभागांमध्ये १५ शाखांचा शुभारंभ केला जाणार असल्याची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख अमर कतारी यांनी दिली. संगमनेरमध्ये एकाच दिवसात पंधरा शाखांचा शुभारंभ प्रथमत:च होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना बांधणीला संगमनेरमध्ये वेग आल्याचे मानले जाते. या संदर्भात कतारी म्हणाले, आगामी काळात शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संघटनात्मक बांधणी नव्याने करून…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर सहकारात दिशादर्शक आणि अनुकरणीय ठरलेल्या संगमनेरमधील सेवा सोसायट्यांनी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून उचललेल्या कर्जफेडीची परंपरा कायम ठेवली आहे. मार्च अखेर ८८ टक्के वसुली देत जिल्ह्यात संगमनेर प्रथम क्रमांकावर राहिला आहे. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ज वसुलीमध्ये अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्याने सर्वाधिक वसुली दिल्याने तालुका प्रथम क्रमांकावर राहिला. याशिवाय तालुक्यातील ५७ सेवा सोसायट्यांनी जिल्हा बँकेला शंभर टक्के वसुली दिली असल्याची माहिती तालुका विकास अधिकारी अशोक थोरात यांनी दिली. सहकारातील दिवंगत नेते सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील सहकाराची पायामुळे भक्कम केल्याने तालुक्यात विकासाचे जाळे निर्माण झाले आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: मनोरुग्णाचा झटका आल्याने दिवस-रात्र अन्न पाणी न देता त्याला दोरीने बांधून ठेवत मनोरुग्णाच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्या महिलेवर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे हा प्रकार घडला असून सारंगधर गंगाधर पावसे (वय ६० वर्ष) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या संदर्भात त्यांच्या पत्नीने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून माधुरी प्रभाकर गोडसे (रा. लहीत लिंगदेव, ता. अकोले, हल्ली मु. आठरके वस्ती, हिवरगाव पावसा, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात माहिती अशी, फिर्यादी माहेरी गेल्यानंतर तिचा पती सारंगधर गंगाधर पावसे यांना २९…
रविवार विशेष ○ प्रवीण पुरो सावरकरांच्या नावाने राजकारण करणाऱ्या भाजपेयींचा शिवरायांवरील प्रेमाचा उमाळा कमालीचा आगलावा ठरला आहे. सावरकरांच्या बदनामीच्या निषेधार्थ गौरव यात्रेची घोषणा करणाऱ्या या पक्षाला छत्रपतींची बदनामी चालली. त्यांच्या गौरवार्थ यात्रा काढावीशी वाटली नाही. यावरून या मंडळींचा हेतू किती कलुषित आहे हे स्पष्ट होतं. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची गेल्या आठवड्यात एक पत्रकार परिषद होती. अदानीच्या संकटातही राज्यातील वाढत्या उद्योगाची स्थिती सांगण्यासाठी ते पत्रकारांना माहिती देत असावेत, असं वाटल्याने सर्वच जण या पत्रकार परिषदेवेळी उपस्थित होते. पण अदानींच्या उद्योगाऐवजी सावरकरांचं तुणतुणं वाजवण्याच्या त्यांच्या या पत्रकार परिषदेने सगळेच आश्चर्य व्यक्त करत होते. राज्य सरकारच्या सावरकर गौरव यात्रेची भलामण करता करता…
महाराष्ट्र संवाद न्यूज जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून २०२४ पर्यत प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी देण्याचे धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. गावपातळीवर या योजनेची अंमलबजावणी करताना गावात जावून योजनेतील त्रृटी दूर कराव्यात, वेळ पडली तर पुन्हा सर्वेक्षण करा, एकाच कंपनीचे पाईप खरेदी करण्याची सक्ती मात्र करू नका, अशा सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिल्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून श्रीरामपूर तालुक्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनांच्या कामांचा गावनिहाय आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. यावेळी आमदार लहू कानडे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांसह स्थानिक पदाधिकारी दिपक…
लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी भाजपाच्या धर्मांध व्यवस्थेला उखडून टाका: काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले
महाराष्ट्र संवाद न्यूज राज्यात आणि देशात हुकूमशाही पद्धतीने सध्या कारभार सुरू आहे. भाजप जाती-जातीत आणि धर्मामध्ये फुट पाडून राजकीय पोळी भाजत आहे. विरोधकांचा आवाज दडपण्याचे काम सुरू आहे. हे लोक देशातील लोकशाही आणि संविधान संपवण्याचे काम करत असून, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे याचाच भाग आहे. लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी भाजपाच्या धर्मांध व्यवस्थेला उखडून टाका, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. पटोले म्हणाले, मनुवादी व्यवस्थेने अन्नदाता, गरीब माणूस, छोटे दुकानदार यांना बरबाद करण्याचे काम केले. मोदी- अदाणींचा संबंध काय? अदाणींच्या कंपनीत शेल कंपन्यांचे २० हजार कोटी रुपये कुठून आले? फक्त अदानीलाच देशातील आणि परदेशातील…
महाराष्ट्र संवाद न्यूज देश सध्या एका वेगळ्या संक्रमणातून जात आहे. सार्वभौम लोकशाही व्यवस्था आणि संविधानाला धोका निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाल्याने संविधान वाचावं, लोकशाही वाचावी या उद्देशाने काँग्रेसने राज्यात वेगवेगळी आंदोलने सुरू केली असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हा प्रतिनिधी मधुकरराव नवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समवेत मिलिंद कानवडे होते. नवले म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना ही जगातील सर्वात सामर्थ्यवान राज्यघटना असून सध्या याच घटनेच्या तत्त्वांची पायमल्ली होत आहे. विरोधात बोलणाऱ्या विरोधकांचा आवाज बंद करण्याचे काम लोकशाहीला घातक असून सर्वांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज स्वतःला महाविकास आघाडीचे नेते म्हणून घेणारे सोयीनुसार राजकारण करत आहे. पदवीधर निवडणुकीत त्यांना महाविकास आघाडी आठवली नाही, तेव्हा ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला. आत्ताही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोचा वापर करत पोपटपंची करणारे महाविकास आघाडीशी तरी प्रामाणिक आहेत का? असा सवाल राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथे जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत २७ कोटी रुपयांचा नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन व एक कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला. अध्यक्षस्थानी बापूसाहेब गुळवे…
