Author: अनंत पांगारकर

सुरत : महाराष्ट्र संवाद न्यूज मानहानी संदर्भातील याचिका सुरतच्या सत्र न्यायालयाने फेटाळली आहे. यामुळे खासदारकी रद्द झालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचे बोलले जाते. सुरतच्या सत्र न्यायालयाने याचिका फेटाळल्याने तूर्तास गांधी यांना खासदारकी देखील मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच खासदार गांधी यांची शिक्षा कायम राहणार आहे. सुरत न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणात दोन वर्षाची शिक्षा सुनावली असल्याने गांधी यांनी या निर्णयाविरोधात सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. दरम्यान न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. खासदार गांधी यांना न्यायालयात आज झालेल्या सुनावणी मध्ये दिलासा मिळू शकला नाही. याचिका फेटाळल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांचे सुपुत्र डॉ. सिद्धार्थ शिंदे यांनी ऑर्थोडोंटिक्स दंतरोग चिकित्सा विभागात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना ऑस्ट्रेलियाचा तेज गोलंदाज ब्रेट ली यांच्या हस्ते ‘इंडिया ब्रँड आयकॉन अवॉर्ड 2022-23’ मिळाला आहे. मुंबई येथे टाईम सायबर मीडियाच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा इंडिया ब्रँड आयकॉन अवॉर्ड 2022-23 देऊन एका शानदार कार्यक्रमात ऑस्ट्रेलियाचा तेज गोलंदाज ब्रेट ली याच्यासह विविध क्रिकेटपटू व सिने क्षेत्रातील कलावंतांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. डॉ. सिद्धार्थ शिंदे हे मागील 11 वर्षापासून पुणे येथे दंत सर्जन व विशेष सेवा म्हणून कार्यरत आहेत. ऑर्थोडोंटिस्ट म्हणून काम करताना त्यांनी…

Read More

मुंबई : महाराष्ट्र संवाद न्यूज नगर विकास मंत्रालयातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर गुणवंत अभियंता पुरस्कार अकोले तालुक्यातील सुपुत्र विजय कारभारी चौधरी यांना जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी (20 एप्रिल) मुंबईत नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स येथे पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती शासनाचे अप्पर सचिव अजयसिंग पाटील यांनी दिली. अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम अकोले तालुक्यातील आंभोळ या छोट्याशा दुष्काळी गावाचे रहिवासी असलेले विजय चौधरी नगर विकास मंत्रालयात उपसचिव म्हणून कार्यरत आहे. चौधरी यांनी नागरी जमीन कमाल धारणा कायदा निरसिद्ध झाल्यानंतर शासन देयक्षेत्रापोटी सन 2019 ते 2023 या कालावधीत योजना धारकांकडून सुमारे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज पळशी वनकुटे ता. पारनेर येथील एका मेंढपाळाच्या अल्पवयीन पंधरा वर्षीय मुलीस काहीतरी अमिष दाखवत फुस लावून तिला पळवून नेल्याप्रकरणी नांदुरी दुमाला येथील शुभम प्रकाश कवडे यांच्या विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (१८ एप्रिल) सकाळी नऊ वाजता संगमनेर तालुक्यातील कवठे धांदरफळ येथील पतंग बाबा मंदिराशेजारी असलेल्या शेतात हा प्रकार घडला असल्याचे पन्नास वर्षीय तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, लालू नन्हू घुले (वय ५० वर्षे, धंदा – मेंढपाळ, रा. पळशी वनकुटे, ता. पारनेर) हे हल्ली संगमनेर तालुक्यातील कवठे धांदरफळ येथे राहावयास आहेत. फिर्यादीच्या पंधरा वर्ष तीन महिन्यांची अल्पवयीन मुलीस…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरमधील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या लोखंडी स्क्रॅपचे कॉन्ट्रॅक्ट घेतलेल्या दोघा व्यवसायिकांमध्ये आर्थिक व्यवहारातून वाद झाल्याने मुंबईच्या एका व्यापाऱ्याने संगमनेर येथील एका स्क्रॅप (लोखंडी भंगार) व्यापाऱ्याचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी रात्री समनापुर येथील व्यापारी अश्फाक मुक्तार मलिक यांनी यासंदर्भात दिलेल्या फिर्यादीवरून साबान अत्तर अली उर्फ बाबू (रा. तुर्भे, नवी मुंबई) याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती की, अश्फाक मलिक यांचा समनापुर येथे मलिक स्टील नावाने लोखंडाचा व्यवसाय आहे. तसेच त्यांचा मोठा भाऊ मोबीन मुक्तार मलिक उर्फ सज्जू यांचा भंगार स्क्रॅपचा व्यवसाय आहे. त्यामुळे मोबीन मलिक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर महाविद्यालयाच्या संस्कृत संशोधन केंद्रातील विद्यार्थिनी आणि आश्वी खुर्द येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतनच्या पर्यवेक्षिका माधुरी सातपुते यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी पदवी मिळाली आहे. महाविद्यालयाच्या माजी संस्कृत विभाग प्रमुख प्राध्यापिका डॉ. रूपाली कापरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना हे यश मिळाले. त्यांचा महाविद्यालयाच्यावतीने गौरव करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ. रवींद्र तासीलदार, मार्गदर्शिका डॉ. रूपाली कापरे, संस्कृत विभागप्रमुख डॉ. अनिरुद्ध मंडलिक, महाविद्यालयाचे कुलसचिव संतोष फापाळे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. अरुण गायकवाड म्हणाले, सातपुते ह्या लोणी खुर्द येथील प्रवरा कन्या विद्या मंदिर मध्ये 25 वर्षापासून संस्कृत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. ऑगस्ट 2021 पासून…

Read More

मुंबई : महाराष्ट्र संवाद न्यूज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. येत्या काही दिवसात मोठा राजकीय स्फोट होणार असल्याच्या शक्यता वर्तविला जात असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या सोशल मीडिया प्रोफाइल वरून राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख वगळण्यात आला असून हे प्रोफाइल पूर्णतः रिकामे ठेवण्यात आले आहे. यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क सुरू झाले आहे. शिखर बँक प्रकरणाच्या आरोप पत्रातून अजित पवार यांचे नाव वगळल्याच्या बातम्या आल्यानंतर अजित पवार भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात असल्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. अजित पवारांनी अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर या चर्चा आणखी वाढल्या आहेत.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर वकील संघाच्या कार्यकारीणीसाठी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. उदयसिंह ढोमसे पाटील निवडून आले आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार ॲड. अतुल आंधळे यांचा ३६ मतांनी पराभव केला. वकील संघाच्या कार्यकारिणी निवडण्यासाठी सोमवारी (१७ एप्रिल) संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात मतदान झाले. ३६२ वकिलांनी निवडणुकीत मतदान केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मावळते अध्यक्ष ॲड. सुहास आहेर यांनी काम बघितले. ढोमसे आणि आंधळे यांच्यात अध्यक्षपदासाठी सरळ लढत झाली. यात ढोमसे यांना १९८ तर आंधळे १६२ यांना मते मिळाली. वर्षभरासाठी असलेल्या कार्यकारिणीमध्ये यावर्षी कोणाला संधी मिळते याची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली चर्चा निवडणूक निकाल आल्यानंतर संपली असून नवीन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज जनावरांचा रस्ता का अडवीला, अशी विचारणा करणाऱ्या सख्या भावाच्या डोक्यात मुलाच्या मदतीने खोऱ्याने मारत त्याचा खून करणाऱ्या बाप-लेकाला अकोले पोलिसांनी अटक केली. अकोले तालुक्यातील केळी कोतुळ येथील गोडेवाडीमध्ये ही घटना घडली. मनोहर सावळेराम लेंभे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून मयताची पत्नी सोनाबाई मनोहर लेभें (वय ४०) रा. गोडेवाडी, केळी-कोतुळ ता. अकोले यांनी या संदर्भात अकोले पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सुरेश सावळेराम लेंभे, राजाराम उर्फ राहुल सुरेश लेंभे या बाप-लेका विरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी (ता. १६ एप्रिल) सायंकाळच्या वेळी शेतातील जनावरे दीर सुरेश सावळेराम लेंभे यांच्या रिकाम्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नवी दिल्ली :  दिल्लीच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वतःच ट्विट केलेला एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. केजरीवाल यांनी आज भर विधानसभेत आमदारांना एक गोष्ट ऐकवली. मोदींच्या डिग्री प्रकरणावरून केजरीवाल यांनी या गोष्टीद्वारे त्यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधल्याचं म्हटलं जातंय. केजरीवाल म्हणाले, एक चौथी पास राजा होता. त्याने एमएची खोटी डिग्री तयार केली. माहितीच्या अधिकाराखाली याची माहिती मागितली तर लोकांवर त्याने २५-२५ हजार रुपयांचा दंड ठोठवला. एक दिवस रात्री ८ वाजता राजाने सगळ्या चलनी नोटा बंद केल्या. देशात हाहाकार माजला. लोकांचे धंदे बंद पडले. लोकांकडे रोजगारही उरला नाही. त्यानंतर शेतकरी कायदे केले. मूर्खपणाने या राजाने ते तीन काळे कायदे मंजूर…

Read More