Author: अनंत पांगारकर
अनंत पांगारकर महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क यापूर्वी असलेली दक्षिण-उत्तर अशी शहरप्रमुखांची विभागणी आता पक्षाच्या आदेशावरून रद्द करण्यात आली असून विद्यमान दक्षिणचे शहराध्यक्ष प्रसाद पवार यांना पदावरून मुक्त करण्यात आले असून शहराचे संपूर्ण जबाबदारी अमर कतारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. आठव्यांदा संधी मिळालेले कतारी शिवसेनेचे नवे शहर प्रमुख असतील. पवार यांच्यासह तालुकाप्रमुख असलेले जनार्दन आहेर यांना देखील पदमुक्त करण्यात आले असून त्यांच्या जागेवर नवे तालुका प्रमुख म्हणून भाऊसाहेब हासे आणि संजय फड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फड यांना पठार भागाचे तालुकाप्रमुख म्हणून तर हासे यांना उर्वरित संपूर्ण तालुक्याचे तालुकाप्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे. मुंबईतील शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयाकडून…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुंबई शिर्डीचे संपर्कप्रमुख बबन घोलप यांच्या नेतृत्वाखाली निवडल्या गेलेल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीला तत्कालीन जिल्हाप्रमुखांकडून हरकत घेण्यात आल्याने वादाच्या भोवऱ्यात रखडलेल्या नियुक्त्याना अखेर मुहूर्त लाभला आहे. विशेष म्हणजे पक्षांतर्गत राजकारणाला खतपाणी घालणाऱ्या ‘त्या’ पदाधिकाऱ्यांला जबाबदारीतून मुक्त करण्यात आले तर काहींना थेट घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. त्यामुळे नव्या निवडींना पक्षात महत्त्व प्राप्त झाले आहे. एकीकडे शिवसेनेतील मोठ्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल होत असताना शिवसेनेत अंतर्गत कुरघोड्यांना देखील उत आल्याने अंतर्गत कलह माजला होता. यातून मार्ग काढण्याचे मोठे आव्हान पक्ष नेत्यांसमोर होते. अखेरीस शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नव्या नियुक्त्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नवी दिल्ली २०२३ च्या संसद रत्न पुरस्कारांची नामांकने मंगळवारी जाहीर करण्यात आली. यात देशातील तेरा खासदारांचा समावेश असून त्यामध्ये महाराष्ट्रातील चौघेजण आहेत. तेरा खासदारांमध्ये आठ खासदार लोकसभेचे असून उर्वरित पाच खासदार राज्यसभेवर आहेत. येत्या २५ मार्चला या पुरस्कारांचे वितरण केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. संसद रत्न पुरस्कारांच्या निवडीसाठी केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. कृष्णमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या निवड समितीने १३ खासदारांची नामांकने जाहीर केली. नामांकने मिळालेल्या लोकसभेतील खासदारांमध्ये काँग्रेसचे खासदार अधीररंजन चौधरी, कुलदीप राय शर्मा, भाजपचे विद्युत बरन महतो, डॉ. सुकांत मजुमदार, हिना गावित,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर येथील प्रसिद्ध उद्योजक, मालपाणी उद्योग समुहाचे प्रमुख राजेश मालपाणी यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी जिल्ह्यात डोळ्यांसंदर्भात महत्वपूर्ण कार्य करणाऱ्या रोटरी क्लब संगमनेर संचलित रोटरी आय केअर हॉस्पिटलसाठी तब्बल २५ लाखांची मदत मालपाणी परिवाराने जाहिर केली आहे. उद्योजक संजय मालपाणी यांनी ही मदत मालपाणी परिवाराचे वतीने जाहिर केली. मालपाणी परिवाराने दिलेली ही मदत ओपीडी व्हॅनच्या स्वरुपात असणार आहे. ही व्हॅन अत्यंत आधुनिक असून सर्व साधनांनी युक्त अशी असणार आहे. यामुळे आता गावोगावी जाऊन तिथेच रुग्णांना तपासता येणार आहे आणि त्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे की नाही हे सांगता येणार आहे. याआधी डोळ्यांची तपासणी करून निदान करण्यासाठी नेत्र रुग्णांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर आपल्या अधिकारांसाठी आपण रोजच संघर्ष करतो, मात्र जेव्हा इतरांच्या अधिकारांची रक्षा हे आपल्याला कर्तव्य वाटू लागते त्यावेळी आपण विजयाच्या मार्गावर अग्रेसर होतो. मालपाणी परिवारात सामाजिक बांधिलकी व अनेक सद्गुणांचे दर्शन पदोपदी होते. या परिवाराचे नेतृत्व करणारे राजेश मालपाणी स्वाध्यायशील उद्योगपती आहेत. त्यांच्या सानिध्यातून आपलीही दृष्टी अधिक व्यापक बनली आहे. अशा प्रकारचे अनमोल रत्न लाभणे ही संगमनेर व परिसरासाठी परमेश्वराची मोठी देणगीच असल्याचे गौरोवोद्गार राष्ट्रसंत, श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी यांनी सोमवारी काढले. उद्योगपती राजेश मालपाणी यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्या निमित्त जाणताराजा मैदानावर आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा सोमवारी ‘रामायण’ या महानाट्यांच्या सादरीकरणाने समारोप झाला. यावेळी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पुणे पिंपरी चिंचवड मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच निवडणूक आयोगाकडून भाजपच्या चिंचवडच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना पेड न्यूज प्रकरणी नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यामध्ये कसबा पेठ आणि चिंचवड मतदार संघासाठी रविवारी पोट निवडणूक होत आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषद पदवीधर, शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोर जाव लागल्यानंतर भारतीय जनता पक्षाने या दोन्ही पोट निवडणूक प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. या दोन्ही जागा बिनविरोध न झाल्याने भाजपचा हिरमोड झाला आहे. भाजप सोबतच महाविकास आघाडीचे दिग्गज नेते या दोन्ही जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रचारात उतरले आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्यात आले आहे. वास्तविक ठाकरे गटाकडून दुसऱ्या गटाला चिन्ह आणि पक्षाचे नाव देण्याचा निर्णय दुर्दैवी असून अनाकलनीय असून मी मात्र कायम उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहणार असल्याचे नेवाशाचे आमदार माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी म्हटले आहे. धनुष्यबाण चिन्हा बाबत निवडणूक आयोगाने घेतलेली भूमिका याबाबत माजी मंत्री शंकरराव गडाख हे नेवासा येथे आले असता त्यांनी माध्यमांशी बोलतांना ही प्रतिक्रिया दिली. आमदार शंकरराव गडाख म्हणाले की निवडणूक आयोगाने ठाकरे गटाकडून काढून दुसर्या गटाला धनुष्यबाण हे चिन्ह दिले. त्यामुळे शिवसेना व कार्यकर्ते खचून जातील अशी कोणतीच परिस्थिती…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुत्राच्या म्हणजेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या ठाकरे गटाच्या शिवसैनिकाला तीन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी पोलिसांनी तडीपार केले आहे. यामुळे उल्हासनगर मध्ये ठाकरे गटाला धक्का बसला आहे. सुरेश बाबुराव पाटील असे या शिवसैनिक शाखाप्रमुखाचे नाव आहे. शिंदेंच्या कार्यालयावर दगडफेक करणे या शाखाप्रमुखाला चांगलंच महागात पडल आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर राज्यात मोठा राजकीय पेच निर्माण झाला होता. बंद करत शिंदे यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आव्हान देत आपल्या समर्थक आमदारांसह सुरुवातीला सुरत आणि त्यानंतर गुवाहाटी गाठले होते. त्याच दरम्यान त्यांचे पुत्र आणि शिवसेना पक्षाचे खासदार श्रीकांत शिंदे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी मेधा महोत्सवाची सुरुवात सोमवारी मेधा मॅरेथॉनने झाली असून सात किलोमीटरच्या स्पर्धेमध्ये सातशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. मेधा महोत्सव हा महाराष्ट्रातील सांस्कृतिक महोत्सव ठरला असून याची सुरुवात या मॅरेथॉनने झाली. यशोधन जनसंपर्क कार्यालय ते इंजिनिअरिंग कॉलेज या दरम्यान झालेल्या या मॅरेथॉनमध्ये सातशे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, संस्थेच्या विश्वस्त शरयू देशमुख, ॲथलेटिक डॉ. संजय विखे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, मेधाचे समन्वयक प्रा. जी. बी. काळे, डॉ. मनोज शिरभाते, सौ जे. बी. शेट्टी, श्रीमती शितल गायकवाड, प्रा.…
अनंत पांगारकर महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी स्पष्टपणे “आहे त्याच जागेवर वाढीव जागेसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करणार असल्याचे स्पष्ट केले आहे”. त्यामुळे काँग्रेस शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांचा छत्रपतींच्या पुतळ्याबाबतचा दावा सपशेल खोटा ठरला असून भारतीय जनता पक्ष मात्र एक एकरामध्ये छत्रपतींचा पुतळा उभारण्यास बांधील असल्याचा पुनरुच्चार माजी उपनगराध्यक्ष भाजप शहर सरचिटणीस जावेद जहागीरदार यांनी केला आहे. नवनिर्वाचित आमदार तांबे यांनी संगमनेर मधील एका सायं दैनिकाला मुलाखत देताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्या बाबतची भूमिका स्पष्ट केली. त्यात तांबे यांनी म्हटले आहे की, “सध्या नवीन पूर्णाकृती अश्वरुढ पुतळा उभारण्याबाबत सरकारचे नियम…
